Uncategorizedजिल्हा
स्वारातीम विद्यापीठाची पी.एचडी कोर्स वर्कची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी -नसोसवायएफ
स्वारातीमची पी.एचडी कोर्स वर्कची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी -नसोसवायएफ
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी कोर्सवर्क हिवाळी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी अशी मागणी नॅशनल एसी एसटी ओबीसी स्टुडंन्ट अँड युथ फ्रंट या संघटनेने कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
२०२१ च्या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने पीएचडी कोर्सवर्कचे वर्ग चालू करण्यात आले होते. त्यानंतर विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावर परीक्षा ह्या ऑफलाईन घेणार दिनांक २२व २३ डिसेंबर २०२१ रोजी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणार असल्याचे नियोजित केले आहे.
पण पीएचडी कोर्सवर्कचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेतले परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्याचा आपला उद्देश काय आहे. व तो तर्कसंगत वाटत नाही. त्यामुळे विद्यापीठाने पीएचडी कोर्सवर्कचे वर्ग त्याच पद्धतीने परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्या या मागणीला जोर धरत कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हट
या निवेदनावर विद्यार्थी नेते डॉ. हर्षवर्धन दवणे( राष्ट्रीय अध्यक्ष नसोसवायएफ) प्रा.सतीश वागरे (राज्य प्रवक्ता) संदीप जोंधळे (जिल्हा प्रभारी,नांदेड) शुभम दिग्रस्कर (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,नांदेड) मनोहर सोनकांबळे
(जिल्हा प्रवक्ता,नांदेड) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.