ओमायक्राॅनला घाबरण्याचं नाही; खबरदारी मात्र घ्यावीच लागेल..
ओमायक्राॅनला घाबरण्याचं नाही;
खबरदारी मात्र घ्यावीच लागेल..
अख्या जगावर कोरोनाने आपले अधिराज्य गाजवले. कोरोनाच्या या दहशतीमुळे संपूर्ण जग हादरून गेल होत. कोरोना महामारीची लाट थोडीफार ओसरत नाही, तेच म्युकर मायक्रोसिसने आपला हल्ला चढविला. त्यावर कसंबसं नियंत्रण मिळवत नाही, तर झिंका व्हायरस आवासून उभा झाला. त्यावरही कसंबसं विजय मिळवण्यात यश मिळालं. आता ओमायक्राॅन व्हेरिएंट स्वार व्हायला लागला. परंतु या ओमायक्राॅन व्हेरिएंटला घाबरण्याचं काहीच कारण नाही. यासंबंधित अफवांना बळी पडून मनात भीतीला स्वार होवू देऊ नये. कारण कोरोना व्हायरसच्या ओ मायक्राॅन व्हेरिएंटचा शोध लावणा-या वैज्ञानिकाने म्हटलं आहे की, ब्रिटन विनाकारण दहशत पसरवत आहे. याचे लक्षण खुपच हलके आहे. साऊथ आफ्रिका मेडिकल असोसिएशनचे डाॅ.एंजलिक कोएत्जीने म्हटलं आहे की, त्यांनी सर्वात आधी 30-32 वर्षाच्या युवकामध्ये या व्हेरिएंटचा शिरकाव पाहला असता फक्त थकवा आणि हलके डोकंदुखी असल्याचं कळालं. याच्या व्यतिरिक्त त्याच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही. साऊथ आफ्रिकाच्या ज्या महामारीच्या सेंटरवर ते काम करत आहे, तिथे हे लक्षण खूप हलके असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ब्रिटन याच्या प्रभावाला अनावश्यक फुगवून सांगत आहे. आता तर हे तुमच्या देशात आहे. तुम्हाला यासंबंधी माहिती नाही, तर मला हे सांगावं लागत आहे. डाॅक्टरनी स्पष्ट केलं म्हणून याला अनावश्यक घाबरायचं नाही. घाबरायचं नाही म्हणजे बिनधास्त वावरायचं असंही नाही. आपली काळजी घ्यायची ती घ्यावीच लागते. तर जनतेंनी आपली प्राथमिक सुरक्षा माॅस्क वापरायची सवयच लावून घ्यावी. मग कोणताही व्हायरस असो वा नसो.!
–सुनील शिरपुरे, झरीजामणी