ईश्वराला ‘भगवान’ हा शब्द लावल्या गेला नाही. या मूळ ग्रंथात हा शब्द ‘८७५८’ वेळा आलेला आहे..
गौतम बुद्धांना भगवान किंवा भगवंत म्हणून वारंवार संबोधित केलेले आहे. त्या करीता भगवान या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे वाचकांनी जाणून घेणे जरुरी आहे. संस्कृत पंडित प्रा. जगन्नाथ उपाध्याय म्हणतात हिंदुच्या एकाही धर्मग्रंथात ईश्वराला भगवान हा शब्द लावल्या गेला नाही. भगवान ही मनुष्याची पदवी आहे. आणि ही पदवी गौतम बुद्धाची आहे. ईश्वर कधी भगवान बनू शकत नाही. भगवान बुद्धा मुळे देव मनुष्याच्या खालचे समजल्या गेले. परंतु आपल्या ईश्वराला चालविण्या
करीता वैदिक ब्राम्हणांनी मनुष्याची जी भगवान पदवी होती ती देवासोबत जोडून दिली.
डॉ. आ. ह. साळुंखे त्यांच्या सर्वोत्तम भूमी पुत्र गौतम बुद्ध” या पुस्तकात लिहितात. पाली वांगमयात गौतम बुद्धांना उद्देशून पुनः पुन्हा वापरण्यात आलेला शब्द म्हणजे भगवा, भगवा याचा अर्थ उत्तम गुणांनी संपन्न मूळ त्रीपिटका मध्ये हा शब्द ८७५८ वेळा आलेला आहे. गौतम बुद्धांना उद्देशून वापरल्या जाणारा भगवा शब्द काळाच्या ओघात त्यांच्या चीवराचा (वस्त्राचा) रंग दर्शविण्या साठी वापरला जाऊ लागला आणि मग हळू हळू भगवा शब्द एका रंगाचा उल्लेख करण्यासाठी वापरला जाऊ लागला. व त्या रंगाचे द्योतक बनला.
पुढच्या काळात गौतम बुद्धाचा विचार अत्यंत प्रभावी झाला. गौतम बुद्धाला पचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून वैदिकांनी भगवा शब्द स्वीकारून तो आपल्या ब्राम्हणी संस्कृती चा मानबिंदू बनवला. आणि गौतम बुद्धा वरील प्रेमा मुळे भगव्या रंगा विषयी आदर असलेला बहुजन समाज नकळत वैदिक संस्कृतीशी जोडल्या गेला व हळू हळू बुद्धा पासून तुटून, वैदिकांच्या बंधनात अधिका अधिक अडकत गेला.
संदर्भ: तिरुपती बालाजी एक प्राचीन बौद्ध क्षेत्र
लेखक.- डॉ. के. जमनादास