व्यक्तिविशेष

जनतेच्या सेवेचा एक संघर्षशील व लढवय्य नेतृत्व समाजसेवक ते राजकीय रणनीतीकार म्हणजे “संघरत्न निवडंगे”

नांदेडच्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाचा रंजक प्रवास

जनतेच्या सेवेचा एक संघर्षशील व लढवय्य नेतृत्व समाजसेवक ते राजकीय रणनीतीकार म्हणजे “संघरत्न निवडंगे”

नांदेडच्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाचा रंजक प्रवास.

संघरत्न भुजंगराव निवडंगे.नांदेड शहरातील गिरणी कामगार चा मुलगा. ते संस्थापक महती फोंडेशन, समाजसेवक, राजकीय रणनितीकार, मासिक पाळी दुत.
महाविद्यालय जीवनापासून सामाजिक कार्यात सहभाग घेत शिक्षणाच्या प्रवाहात असतानाच विद्यार्थ्यांच्या समस्या जवळून अनुभवल्याने सन २००५ पासून विद्यार्थी -युवकांच्या समस्यांवर काम करण्याचा त्यांनी निश्चय केला. आर्थिक परिस्थिती स्थिरावत, नोकरी सांभाळत शिक्षण आणि सामाजिक कार्य अविरतपणे सुरू ठेवले. सम्यक संकल्प मित्र मंडळाची स्थापना केली अन् नांदेडमधील प्रत्येक क्षेत्रातील युवकांना एकजूट केले. २०१८ पासून महती प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून राजकीय रणनीती, विश्लेषक म्हणून त्यांच्या कामाचा रंजक प्रवास सुरू झाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गोवा अशा नावलौकीक राज्यात काम केले. आणि सध्या करत आहे.

युवकांच्या वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण लक्षात घेता प्रायव्हेट सेक्टरमधील अनेक जॉबच्या संधीचे महत्व जाणून त्या जॉबचे प्रशिक्षण युवकांना देत त्यांना अनेक नामांकित कंपनीमध्ये पाठवले. तसेच सरकारमध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्या रोजगाराचे प्रशिक्षण दिले पाहिजे यासाठी वारंवार निवेदने, आंदोलने केली. शहरातील व प्रभागातील प्रमुख समस्यांवर प्रशासनाला नेहमीच धारेवर धरत आंदोलने करत न्यायाची भूमिका घेतली. भारत देशासाठी अनेक महान व्यक्तींनी स्वतःचे बलिदान दिले आहे. त्यांच्या विचारांवर हा देश उभा आहे या जाणिवेतून नांदेड येथे जयंती व पुण्यतिथी निम्मित अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवले. ज्यामध्ये युवक, युवती महिला पुरुष या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य अनमोल असते.

रोहित वेमुला, योगेश जाधव या व्यवस्थेच्या बळी ठरवलेल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला. भीमा कोरेगाव दंगल वेळी समाजात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी नागरिकांना शांततेचे आणि सहकार्याचे आवाहन केले. समाजात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा. देशभावना प्रबळ व्हावी आणि भारतीय हीच भावना जोपासली जावी यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य अशा तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येते. या रॅलीचा समारोप भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन करण्यात येतो. या रॅलीमध्ये नांदेडमधून अनेक नागरिक सहभागी होतात. स्त्री ही समाजाचा कणा असते. पण हा कणा कणखर रहावा म्हणून स्त्री आरोग्यकडे कोणीच लक्ष आणि महत्त्व देत नाही अशा वेळी महती फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र भर २०१८ पासून मासिक पाळी आणि बरच काही व किशोरवयीन बदल बदल समजून स्वीकारून यावर खेडे, गाव, वस्त्या, तांडे, आदिवासी जमात, शाळा, महाविद्यालये, शहर अशा सर्व ठिकाणी जनजागृती करण्याचा प्रयत्न आजवर केला. यातून महिलांचा आवाज बुलंद होईल हीच एक माफक इच्छा समोर ठेवली.

देशावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले. अशावेळी सर्वजण लॉकडाउनमध्ये असताना नागरिकांचे मनोधैर्य बळकट करण्यासाठी व नवोदित कलाकारांना स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी दंगल प्रबोधनाची हा कार्यक्रम ऑनलाईन राबवला. कोरोनाविषयी अनेक गैरसमज आणि भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. अशा वेळी जनजागृतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील शेकडो खेड्यांमध्ये कोरोना जनजागृती अभियान महती फाऊंडेशन माध्यमातून राबवले.हे सर्व सामाजिक कार्य करत असताना महान व्यक्तींच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केली. प्रत्येक व्यक्ती ही समाजाचं देणं लागते. त्यांचे ऋण फेडण्यासाठी निस्वार्थी भावनेने काम करणं गरजेचं आहे. समाजात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. पण हे सारे लोक एकत्र यावेत आणि यांच्या माध्यमातून समाजपयोगी कार्य घडावे या हेतूने संघरत्न निवडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक संकल्प मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिर दरवर्षी राबवले जाते. या शिबिरात शेकडो नागरिक सहभागी होतात.

अनेक काळापासून प्रलंबित / दुर्लक्षित असणाऱ्या आणि नागरिकांची आवश्यक गरज असणारे रस्त्यांचे प्रश्न, पथदिवे, ड्रेनेज नाल्या आणि कचरा समस्यावर प्रशासनाला धारेवर धरत आंदोलने करून प्रश्न मार्गी लावले. महापालिका करवसुली विरोधात महापालिकेच्या चुकीच्या कामकाजामुळे सर्वसामान्यांना अतिरिक्त कर भरावा लागत होता. सर्वसामान्य नागरिक या अतिरिक्त कराला बळी पडत होते. ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या व महापालिकेच्या निदर्शनास आणून करामध्ये वाढ झालेली चूक दुरुस्त करण्यास लावून नागरिकांना अतिरिक्त करापासून वाचविले.महामानवांचा आदर्श आणि त्याग डोळ्यासमोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेतून असंख्य विद्यार्थ्यांच्या एडमिशन, स्कॉलरशिप व हॉस्टेलचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. महान व्यक्तींचे विचार आमलात यावेत व तरुणांना स्फूर्ती मिळावी यासाठी महानव्यक्तीच्या जयंती निम्मित १८ तास अभ्यासिका घेण्याचा उपक्रम राबवत तरुणांना शिक्षणाचे महत्व दिले. या उपक्रमात अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी होत.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देश भावना प्रबळ व्हावी आणि भारतीय हीच भावना जोपासली जावी यासाठी भव्य अशा तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येते या रॅलीचा समारोप भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन करण्यात येतो. या रॅलीमध्ये नांदेडमधून अनेक नागरिक सहभागी होतात. नूतन वर्षाची सुरुवात आणि शिक्षणाची क्रांती करणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या उद्धारकर्त्याच्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखावा सहित रॅली आयोजन केले जाते. तसेच नाटक पोवाडे एकपात्री व्याख्यान प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून नवोदित कलाकारांना स्टेज आणि संधी निर्माण करून दिली. महिलांसाठी सामाजिक विषयांवर रांगोळी स्पर्धा, व्यक्तींच्या जीवनावर अभ्यास परीक्षा चित्रकला व महिला आरोग्य शिबिर हे उपक्रम राबविण्यात आले.

२०१७ रोजी रोहित वेमुला या विद्यार्थ्यांची प्रस्थापित शैक्षणिक व्यवस्थेने हत्या केली. या हत्येचा निषेध करत व रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक बंद पुकारला. जिल्हाधिकारी यांच्याकडे दोषींना शिक्षा मिळावी यासाठी निवेदने दिली. 3 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या भीमा कोरेगाव दंगलीवेळी समाजात असंतोष निर्माण झाला होता. अशावेळी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य आणि शांतता निर्माण करण्याचे वेळोवेळी आवाहन केले. भीमा कोरेगाव दंगल व हदगाव शहरातील आष्टी या गावांमध्ये नववीचा विद्यार्थी योगेश जाधव पोलीस लाठीचार्ज मध्ये मृत्यू पावला यासाठी death factuality committee of Yogesh पण करून योगेशला न्याय मिळवून देण्याचे काम केले.

2018 साली महती या संस्थेची स्थापना करून दुर्लक्षित सामाजिक विषयांवर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. स्त्री ही सृष्टीची निर्माती आहे. पण तिच्या गरजा आणि आरोग्याबाबत नेहमीच केविलवाणी भूमिका पहायला मिळते. मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा आणि दुर्लक्षित विषय म्हणजे मासिक पाळी या विषयावर शतकांपासून गैरसमज अंधश्रद्धा रूढी परंपरा लादल्या गेल्या आहेत. यामुळे स्त्री आरोग्य धोक्यात आले आहे. याचा विचार करून महती फाउंडेशन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचवण्याचा प्रयत्न केला. खेडेगाव वस्त्या, आदिवासी भाग, शहर शाळा, महाविद्यालय, कॉलेज अशा प्रत्येक ठिकाणी उपक्रम राबविला जातो. तोच उपक्रम “चला तिला समजून घेऊ, मासिक पाळी बरच काही” या माध्यमातून राज्यभर पोहचला आहे. विद्यार्थी देशाचे भविष्य असतात. विद्यार्थी जीवनामध्ये मुलांना आणि मुलींना स्वतः मधील बदल समजून घेऊन स्वीकारण्याची गरज असते. समाजातील बाल अत्याचार व बालघृणा थांबवण्यासाठी किशोरवयीन योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते.

महती फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळांमधील किशोरवयीन बदल समजून स्वीकारू उपक्रम राबवले. 2019 चाली देशामध्ये कोरोना महामारीचे महाभयंकर संकट आले संपूर्ण जग एका जागीच स्तब्ध झाले अशावेळी नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करत राज्यातील शेकडो नवोदित कलाकारांना हक्काचं स्टेज देऊन “दंगल प्रबोधनाची” हा कार्यक्रम आजवर राबवित आहोत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी प्रतिसाद आणि प्रेम दिले.त्याचबरोबर या महामारीमध्ये नागरिकांना मदत म्हणून आणि त्यांनी स्वतःची व इतरांची योग्य काळजी घ्यावी यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये शेकडो खेड्यापाड्यांमध्ये कोरोना जनजागृतीचे कार्यक्रम राबवले. या कार्यक्रमातून लोकांना धीर दिला. कोरोनाबाबत पसरलेले गैरसमज दूर केले. आणि त्यावेळी लसीकरणामध्ये सहभाग नोंदवला. एका गिरणी कामगाराचा मुलगा सध्या राज्यस्तरीय राजकीय, सामजिक स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे. महती फाऊंडेशनच्या माध्यमातून राजकीय रणनीती आणि इलेक्शन कँपिगचे कार्य सध्या राज्य, देशभर पोहचवण्याचे काम ते कराताहेत.

– काजल दिलीप कोथळीकर
संस्थापिका-महती फाउंडेशन, लेखिका, व्याख्याती

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of MPhil in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button