वंचितच्या हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी समाज कार्याचे संशोधक धम्मपाल वाढवे यांच्या निवडीसह इतर कार्यकारणी गठीत
वंचितच्या हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी समाज कार्याचे संशोधक धम्मपाल वाढवे यांच्या निवडीसह इतर कार्यकारणी गठीत
हिमायतनगर: वंचित बहुजन आघाडी जनसामान्यांना न्याय देणारा पक्ष असून यात माणसाच्या कालागुणांची कदर होते. प्रतिभेला व्यासपीठ देणारा एकमेव पक्ष असल्याने यात पक्ष प्रवेशासाठी अनेकांची धडपड असते. अशात नुकतीच वंचित बहुजन आघाडीने हिमायतनगर तालुक्यात नवीन पक्षबांधणी केली यात तालुका अध्यक्ष धम्मपाल वाढवे तर महासचिव अँड. शेख जब्बार,सुनील घोडगे,, प्रकाश वाढवे, यांची तर उपाध्यक्षपदी संतोष खिल्लारे,संभाजी राऊत ,विशाल हानवते,गणेश मुनेश्वर,संजय राऊत, यांचा समावेश असून सचिव म्हणून आकाश कदम,वैभव नरवाडे,यांची निवड करण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील अध्यक्ष पदाच्या निवडीत यावेळी एका उच्यशिक्षित तरुणाला संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी चळवळीपासूनच समाजकारण, राजकारण, शिक्षण,न्याय,हक्कांसाठी नेहमीच पुढे राहून विद्यापीठस्थरीय प्रश्न यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, स्वाधार यासह अनेक प्रश्नांसाठी आंदोलने उभे करून न्याय मिळवून देण्यात धम्मपाल वाढवे यांचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे.तालुक्यातील आंडेगाव येथील मूळचे रहिवासी असलेले वाढवे यांनी ग्रामपंचायतीवरही सत्ता स्थापन केली आहे. मोठा जनसंपर्क संवादाची सौम्य भाषा, आणि शासन प्रशासनाच्या कारभाराची जाणीव आणि समाजकार्य या विषयात डॉक्टरेट करणाऱ्या धम्मपाल वाढवे यांच्या निवडीतून तालुक्याला एक उमदा चेहरा मिळाल्याने त्यांच्या निवडीसह इतर तालुका कार्यकारिणी याप्रमाणे तालुका अध्यक्ष धम्मपाल वाढवे महासचिव अँड. शेख जब्बार,सुनील घोडगे,महासचिव, प्रकाश वाढवे,उपाध्यक्ष संतोष खिल्लारे,संभाजी राऊत ,विशाल हानवते,गणेश मुनेश्वर,संजय राऊत,सचिव आकाश कदम,वैभव नरवाडे,राजरत्न राऊत,राहुल तुळ,अविनाश कदम,,सहसचिव बाळासाहेब सावते,योगेश लव्हाळे,सहसचिव अमोल वाढेकर ,शरद हानवते , प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील हानवते ,सल्लागार चंदकांत काळबांडे ,गोविंद गोखले सरसमकर, सहसचिव भूमन्ना मिरेवाड,शेख एस्ताक सरसमकर ,सतीश भूसावळे ,अरुण सावते,सुभाष गोपने संघटक,सिद्धार्थ वाठारे ,प्रवक्ता विशाल राउत पाडरीकर आशा प्रकारची हिमायतनगर तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीने यावेळी तालुक्यातील तरुणांना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले असल्याने नवनियुक्त कार्याकरणीचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.या निमित्ताने तालुक्यातील राजकिय वर्तुळात चर्चेला एक नवे उधाण आले आहे.