आंबेडकरी चळवळ विखुरली..?
आंबेडकरी चळवळ विखुरली..?
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनाचा होम करून सर्व विषमतावादी परंपरांना विरोध करून समतावादी परंपरा निर्माण केली.ज्याना मांनसाचे सर्व अधिकार नाकारले होते.पशुपेक्षाही हीन जीवन जगण्यास बाध्य केले.त्यास मानवतेचे समानतेचे अधिकार मिळवून दिले.ताटमानाने जगू लागले तशी परिस्थिती निर्माण केली.कायद्याचे संरक्षण दिले.त्यामुळे समाजात आत्मविश्वास निर्माण झाला.समाजाच्या एकजुटीने आपली ताकत दाखवून दिली.शिका
संघटित व्हा लोक शिकले मोठ्या सरकारी पदावर रूजू झाले.प्रस्थापित समाजाच्या डोळ्यात.सलू लागले.आरक्षणामुळे हे सरकारी जवाई झाले. नोकरी न लागण्याचे कारण हे आरक्षण धोरण असल्याचा अपप्रचार करुन माथे भडकविले.समाजाप्रती घृणा द्वेष पसरविला. जाती जाती मध्ये भांडणे लावले.जे आमच्या अंगणात सडयाच्या पुढे येण्याची हिंमत करत नव्हते ते आरक्षणामुळे माजघरात बसतात यांचा राग मनात घोळत असतो. ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांना ह्या विरूद्ध भडकविले जाते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी पोलादी संघटनेची बांधणी केली.कोणाची हिम्मत होत नव्हती त्यांच्या मोहल्यात जाण्याची हिंमत होत नव्हती.अशी एकजुटीने जनता राहत होती तीला फोडण्याचे काम त्यावेळीच्या काँग्रेस पक्षाचे लोकांनी केले.व आजही ते पुरोगामीच्या नावाने करितआहेत.हयापासून सावध असणे आवश्यक आहे.. परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर समाजातील शिक्षित साहित्यिक यांनी आंबेडकरी चळवळ मार्क्स वादी चळवळी सोबत जोडली पाहिजे अश्या प्रकारचा आग्रह धरला. त्याला रिपब्लिकन पक्षाचे पुढारी विरोध करित
होते.त्याच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे काम साहित्यीक सुशिक्षित वर्ग करु लागले.त्याचा परिणाम रिपब्लिकन पक्ष दुभगण्यात झाला. सत्तापक्ष सूविधा मिळवून देण्यासाठी लोकांना आकर्षित केले. सत्तेच्या गाजराचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बळी पडले. लोकशाहीने पक्ष चालावा ही भुमी का घेतली.त्याला विरोध झाला.पक्ष दुभगला.आज पर्यंत पक्ष विभाजित आहे. यांचा फायदा काँग्रेस व भाजप घेत आहे.आपल्या दावणीला बांधली आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ विचारांपासून भरकटले असून दुसर्याच्या पक्षाचीओझै वाहण्यात धन्य मानतो आहेत आंबेडकरी समाजाला विभाजित ठेवण्याचे षडयंत्र सूरूआहे.हयापासून सावध असणे आवश्यक आहे.
विनायकराव जामगडे
७८२३०९३५५६
९३७२४५६३८९