मुलांवर संस्कार करतांना..
मुलांवर संस्कार करतांना…..
मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. ते अगदी खरं आहे. कारण जी मुलं लहानपणी समजदारीनं वागतात. तीच मुले मोठ्यापणीही समजदारीनं वागत असतात आणि जी मुलं लहानपणापासून समजदारीनं वागत नसतात. ती मुलं मोठेपणीही समजदारी दाखवत नाहीत. परंतू या गोष्टीला कधी कधी अपवाद अाहे. आजच्या काळात तर हे शक्य नाही. आज जी मुलं लहानपणी संस्कारी दिसतात. ती मुलं मोठेपणी संस्कारी दिसतालच असे नाही. कारण ती मुलं मायबापाच्या अतीव लाडानं व त्यांच्या पैशानं वाया जात असतात. त्यामुळं आजच्या काळात मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. हे म्हणणं धांदात खोटं ठरत आहे. याबाबत प्रसंग सांगतो.
ती एक शाळा की ज्या शाळेतील मुलं जेव्हा लहान होती, तेव्हा ती फार मस्त्या करायची. त्यातच त्यांच्या शाळेत एक मुलगा होता. त्याचं नाव होतं अविनाश. तो मोरक्या होता बदमाश गँगचा. सकाळची शाळा असायची. त्यातच मधली सुटी व्हायची. त्यावेळी त्या शाळेला कुंपण नव्हतं. त्यामुळं मुलं खेळायला कुठंही जायचे. तशी शाळेच्या मागच्या भागात झाडी होती. इथे साप, विंचू नेहमी निघायचे. परंतू ती मुलं त्यांना त्या बालवयातही घाबरायची नाहीत. जणू ते त्यांच्या मायबापाचं रक्त असेल. ते मात्र अड्ड्यात जायचे. अगदी निर्भीडपणे न घाबरता.
अड्डा……..त्यांचा अड्डा तिरंगा चित्रपटात जसं झाडाच्या आड दाखवला आहे. तसा त्यांचा अड्डा होता. तिथे गंमतगमतची त्यांची अवजारं असायची. त्या अवजारात चाकू, तलवारी, भाले होते. ते लाकडाचे बनवले असून त्याला वार्नीश लावलेलं होतं. तसेच बाणही होते त्यांचे. त्या बाणाच्या टोकावर बाभळीचे काटे टोचले होते त्यांनी. त्यावेळी ते गंमतगंमतचे युद्ध त्या मधल्या सुटीत खेळायचे. मग घंटा वाजली की ते सर्व विद्यार्थी वर्गात जात होते.
अविनाशचा मित्र होता एक. सुरज त्याचं नाव होतं. तसा तो हुशार होता. त्याला वाटत होतं की आपण अशा बदमाश गँगसोबत राहू नये. कारण उद्या ही गँग गुन्हेगारी प्रवृत्तीकडं वळेल. परंतू तरीही तो खेळ समजून त्या गँगसोबत राहातच होता.
वर्षामागून वर्ष गेले. काळ ओसरला. शाळेचं शिक्षण सुटलं. शालान्तपर्यंत काही मुलं होती सोबत. काही सोडून गेली होती. सा-या वर्गात दोन गट असतात. परंतू त्यांच्या वर्गात एकच गट होता. तो म्हणजे बदमाश गट. सर्वच मुलं त्या अड्ड्यात जात होते. चांगला गट म्हणायला नव्हताच. चांगल्या गटाचं हे लक्षण नव्हतंच.
जसजसा काळ ओसरला. तसतसा बदलत्या काळानुसार सर्वजण कामधंद्याला लागले. काही विद्यार्थी जास्त शिकले. ते नोकरीला लागले. परंतू त्या समद्या वर्गातून कोणीही बदमाश बनला नाही वा हदमाश गँगचा मोरक्याही बनला नाही. ते विद्यार्थी आजही चांगल्याच स्वभावाची आहेत.
कोणी काय विचार करतात ते मला माहित नाही. परंतू याबाबत मी नक्की म्हणेल की मुलांचे पाय पाळण्यात दिसत नाहीत.
मुलं घडतात. ते त्यांच्यावर येणा-या परिस्थीतीवरुन. काही मुलांचे मायबाप हे,अकाली मरण पावतात. त्यांना मग कोणीही मदत करीत नाहीत. ती मुलं वाईट मार्गाकडे लागू शकतात. जसे कोरोनात झालेली अनाथ मुलं. या कोरोनामध्ये काही मुलांचे मायबाप दोघंही मरण पावले आहेत. तर काहींच्या घरी कोणी माय तर कोणी बाप गेलेला आहे. त्या मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशी काळजी न घेतल्यास ती मुलं पुढे गुन्हेगारी जगताकडे वळणार नाहीत. हे आता काही सांगता येणे कठीण आहे.
मुलांची गुन्हेगारी जगताकडे जाण्याची वाटचाल ही अगदी नाजूक वयापासूनच सुरु होते. जेव्हा ते लहान असतात. याच वयात जपावं लागतं मुलांना. परंतू जपणार कसं? ज्या वयात जपावं लागतं. त्या वयात त्याचे मायबाप दोघंही अपघातात मरण पावलेले असतात. मग त्यांच्याकडे लक्ष देणार कोण? आजी आजोबा पाहिजे तेवढ्या प्रमाणात लक्ष देवू शकत नाहीत आणि बाकीची मंडळी म्हणजे आत्या वा मावश्या वा इतर नातेवाईकही पुरेसं लक्ष पुरवीत नाहीत. तेव्हा मुलांवर संस्कार कसे करावेत हाच प्रश्न असतो. अलिकडे अाणखी एक अतिशय बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे घटस्फोट.
आज मुलंमुली वयात आल्यावर तर विवाह करतात. परंतू दोघांचेही अलिकडच्या पाश्चात्य विचारसरणीच्या नादाला लागून वा त्याचा परिणाम झाल्यानं त्यांचे विचार हे जुळत नसल्यानं त्यांचं फारसं पटत नाहीत. ते मुलं तर पैदा करतात. परंतू त्यांचं पटत नसल्यानं ते एकमेकांकडून फारकत घेवून राहतात. त्यातच मुलंमुली कधी बापाकडं तर कधी आईकडं असतात. त्यातही ते वडील आणि ती आई दुसरा विवाह करते. त्यानंतर त्या घरात येणारा दुसरा व्यक्ती हा त्या मुलांना सांभाळेल असं नाही. कारण ती त्यांची स्वतःची मुलं नसतात. सरतेशेवटी ती मुलं त्यांच्या आईवडीलांंचा तमाशा पाहून गुन्हेगारी वृत्तीकडं वळतात.
काही काही घरात पतीपत्नी बनलेले जोडपे एकमेकांना सोडून जात नाहीत. परंतू अगदी शुल्लक शुल्लक कारणावरुन भांडत असतात. त्याचाही परिणाम मुलांवर होतो. मुलं गुन्हेगारीकडं वळत असतात.
वरील सर्व प्रकारावरुन हे लक्षात येते की मुलं ही गुन्हेगारी प्रवृत्तीची बनत नाहीत. ती बनवली जातात. त्याचे पाय पाळण्यात दिसत नाहीत. कारण तसं त्याच्या मस्तकावर लिहिलेलं नसतं. त्याचा विचार कोणीही करु नये. हं, एवढंच महत्वाचं की मुलांवर संस्कार हवेत. ते संस्कार मायबापच करु शकतात. आप्त नाहीत. त्यामुळं याचा विचार निदान मायबापानं तरी करावा. त्यांनी मुलांना पैदा केलं ना. मग मुलांच्या भविष्यासाठी तरी एकमेकांशी भांडू नये. एकमेकांना कधीच सोडून जावू नये. अन् जायचेच असेल तर मुलं पैदा करु नये. त्यातच समजा अकाली पती पत्नीपैकी एक मरण पावला तर दुसरा विवाह करु नये. कारण त्यामुळंही मुलं बिघडतात. त्यांचेवर संस्कार होत नाहीत. तसेच त्यामुळं त्यांचंच नाही तर देशाचंही भविष्य खराब होतं. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०