शनिवारवाडा, हाच खरा लाल महाल..
शनिवारवाडा, हाच खरा लाल महाल..
✍️शिवश्री संतोषबादाडे
लाल महाल ही छोटीशी वास्तू पुण्याच्या मध्यभागी राजमाता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे..।
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालातच गेले. महाराजांचा पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. “शिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा शिवाजी को.!” असे शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला होता. शाहिस्तेखान दिल्लीवरून दोन तीन लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला होता. त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला.. आणि त्याने राहण्यासाठी पुण्यातील लालमहाल वर कब्जा केला. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहचले होते आणि त्याचं दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. एक दोन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्याने ओळखले होते की शिवछत्रपतीचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून तो त्याच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचा नाही. दरम्यान छत्रपती शिवरायानी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक ३००- ४०० विश्वासू मावळ्यांना घेऊन लालमहालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला आणि त्याच्या बेगमा मृत्युमुखी पडल्या. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या दोन तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लालमहाल मुक्त केला. इतिहासातील असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालात केला याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते कारण दोन तीन लाख सैन्य असताना अवघ्या ३००- ४०० मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब यांनी बांधलेला लालमहाल. सध्या अस्तित्वात नाही.।
सध्याची लालमहालाची प्रतिकृती पुणे महापालिकेने बांधली आहे. पण मुळ लालमहालाची तीच जागा आहे का नाही हे स्पष्ट नाही.?
यांची सविस्तर माहिती इतिहासकार प्रा.मा.म.देशमुख सर लिखित “भांडारकर तो झांकी है,शनिवारवाडा बाकी है” या ग्रंथात करण्यात आली आहे.आणि अशा गोष्टी समाजाला उजेडात आणायच्या असतील तर गडगंज संपत्ती जमवलेली मराठा बहूजन समाजाच्या लोकांनी आणि छत्रपती च्या वंशजानी सर्व समाजाला लोकांना एक करून संघटीत होऊन आवाज उठवला पाहिजे आणि रस्त्यावर उतरले पाहिजे, ज्या लाल महालात शाहिस्तेखानाची एक दोन लाखभर फौज सामावली होती तो लालमहाल पुण्यातील सर्वात मोठी वास्तू असली पाहिजे. आणि शनिवारवाडा येवढी मोठी वास्तूच लाल महाल असणे स्वाभाविक आहे. कारभार्याला वापरायला दिलेला वाडा कालांतराने कारभार्यानेच ढापल्यांची असंख्य उदाहरणे इतिहासात आहेत. अगदी अलिकडच्या काळात सरदार गायकवाडांनी सिंहगडावरील वाडा टिळकांना वापरायला दिला व तो त्यांनी ढापल्याचे आपण पहातच आहोत.. आणि आणखी पुरावे मिळू शकतील पण मराठा बहुजन इतिहासकारांनी परिश्रम पुर्वक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. सदर लालमहाल (शनिवारवाडा ) निर्माण हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी केला असावा? तेंव्हा वाड्याचे बांधकाम करतांना त्यांचे नजरेसमोर माहेरचा (सिंदखेडराजा) राजवाडा असणारच. त्यामुळे दोन्ही वाड्यातील साम्यस्थळे नक्कीच मीळतील त्यादृष्टीने ही संशोधन होणे आवश्यक आहे. मराठा बहुजन इतिहासकारांनी यात लक्ष घातल्यास सहज पुरावे उपलब्ध होऊ शकतील..।
शनिवारवाडा हाच खरा लाल महाल आहे. आणि शाहिस्तेखानाच्या एक दोन लाख सैनिकांनी वेड्या दिल्या ना तो लाल महाल कुठे आहे.. आणि हो शनिवार वाड्यात कबर नव्हतीचं इतिहासात कुठे याचा उल्लेखच नाही. आम्ही म्हणतो तो शनिवारवाडा नाही आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा लाल महाल आहे जो पेशव्यांनी ढापला. पेशवाई ही आयत्या भोकात नागोबा सारखीच आहे. शनिवारवाडा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा लाल महाल होय. मोडतोड करून शनिवारवाडा तयार केलेला आहे.फक्त हातोडा वापरून मोडतोड करून पेशवाई आणल्या गेली आहे..।
मराठ्यांचा गौरवशाली इतिहास संपूर्ण नष्ट करण्यासाठी लाल महाल उध्वस्त केला आणि त्याठिकाणी म्हणजेच तो शनिवारवाडा तयार केला.साडेचारशे वर्षानंतरही महाराजांचे किल्ले साबुत राहू शकतात तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी बांधलेला लाल महालाचे अवशेषही साधे जागेवर राहिली नाही याचा अर्थ काय.?
*भांडारकर तो झांकी है, शनिवारवाडा बाकी हैं..*
*शनिवारावाडा हाच लालमहाल होय..*
✍️संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे – 9689446003
जिल्हाध्यक्ष पुणे ..🚩
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य..🤝📖