साहित्य

अव्यक्त अबोली साहित्य मंच आयोजित तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन लवकरच

अव्यक्त अबोली साहित्य मंच आयोजित तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन लवकरच

आयोजकांकडून सर्व काव्यप्रेमींना या संमेलनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन

सुनील शिरपुरे/यवतमाळ

अव्यक्त अबोली साहित्य मंचाद्वारे तिसरे भव्य राज्यस्तरीय कवि संमेलन व गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कवि संमेलन हे अशोक स्तंभ आठवडी बाजार पुलगाव ता.देवळी जिल्हा वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे हे तिसरे वर्ष असून लोकसहभागातून संपन्न होणारे हे संमेलन वैचारिक निष्ठा, सामाजिक एकता व प्रबोधनपूर्ण असते. संमेलनाचे आयोजन मा.जयश्री चव्हाण पुलगाव आणि मा.योगेश ताटे नांदेड यांनी केले आहे.
संमेलन दि.२२ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ०५:०० ते रात्री १०:०० या वेळेत संपन्न होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी व समीक्षक मा.डॉ.भुषण रामटेके पुलगाव यांची निवड करण्यात आली आहे, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अभियंता मा.मनोहर शहारे यवतमाळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच स्वागताध्यक्ष जेष्ठ कवी हरिदास काका कोष्ठी पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे संमेलन तीन सत्रात संपन्न होणार असून पहिल्या सत्रात उदघाटन व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होईल. या संमेलनात कवयित्री सुचिता मेहेंदर्गे बोईसर यांचा “मितवा” काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे आणि या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून मा.नितीन शेलार चाळीसगाव, ऍड.श्याम खंडारे यवतमाळ, मा.संजय ओरके पुलगाव, मा.कुंदनभाऊ जांभुळकर पुलगाव, मा.उषा शीलवंत घोडेस्वार भंडारा, प्रांजली काळबेंडे वसई तर सूत्रसंचालक म्हणून राजेश नागुलवार चंद्रपूर यांची निवड करण्यात आली आहे.
दुस-या सत्रात गझल मैफिल आयोजित करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून मा.प्रकाश बनसोड वर्धा यांची निवड केली. सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध गझलकारा मा.वृषाली मारतोडे, प्रीती वाडीभस्मे वर्धा यांची निवड केली आहे.
तिस-या व अंतिम सत्रात कवि संमेलन आयोजित करण्यात आले असून अध्यक्ष म्हणून मा.सिंहल मेंढे पुणे यांची निवड करण्यात आली आहे, तर सूत्रसंचालक मा.स्नेहल सोनटक्के आणि प्रांजली काळबेंडे यांची निवड केली आहे. सदरील सत्रात अतिथी म्हणून मा.प्रकाश महामुनी बार्शी, मा.नितीन भोसले पुणे, मा.पुर्वा चौधरी नेरुळ मुंबई, मा.नंदिनी मनोहर शहारे यवतमाळ यांची निवड करण्यात आली आहे.
आयोजित संमेलनाचे मार्गदर्शक मा.शीला आठवले नागपूर आणि मा.सुनील ससाणे पाटील असून संयोजक म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ बोरकर पुलगाव, मा.प्रवीण भगत लातूर, शैलेशजी सहारे पुलगाव, वर्षाताई जांभुळकर, मिथुन टेम्भुरने, विक्की सहारे, शुभम नंदेश्वर, मंजुश्री पाटील, नंदा सहारे यांची निवड करण्यात आली आहे.
तमाम काव्यप्रेमींनी या कवि संमेलनाचा आणि गझल मुशाय-याचा आस्वाद घ्यावा. अशी विनंती आयोजक मा.जयश्री चव्हाण पुलगाव आणि मा.योगेश ताटे नांदेड यांनी केले आहे.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of MPhil in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button