बार्टीच्याने पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करावी- काँग्रेसची मागणी
बार्टीच्याने पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करावी- काँग्रेसची मागणी
आज दि.०६ जुलै २०२३ रोजी माजी ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत साहेबांच्या आदेशानुसार व औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथील माननीय निबंधक इंदिरा आसवार मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
UGC, ICSSR च्या धर्तीवर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करून संशोधन कार्यस अधिक चालना मिळेल असा सूर संशोधकानाचा असल्याचे आढळून आले आहे, विवीध विषयात Ph.D झाल्यानंतर सुदधा सखोल संशोधन करण्याकरिता आर्थिक पाठबळ जर संशोधकांना मिळाले तर संशोधन अधिक उत्तम व दर्जेदार होण्यास मदत होणार आहे असेही संशोधक व उच्च शिक्षण क्षेत्रातील
तज्ञांचे म्हणणे आहे, तरी माननीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कॅग्या मार्फत शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली. यावेळी प्रा.शिलवंत गोपणारायन यांनी निवेदन कार्यालयात चर्चा करून दाखल केले.