सामाजिक

…अन्यथा गुलामांच्या पिढ्या तयार होतील !

…अन्यथा गुलामांच्या पिढ्या तयार होतील!

*महेंद्र कुंभारे,*
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३.
मो.नं. 8888182324.

सध्या ५ राज्यात निवडणुका आहेत. तिथे प्रचार जोरात सुरु आहे. त्यापैकी छत्तीसगड येथे शनिवारी प्रचार करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली आहे की देशातील ८० कोटी गरीब कुटुंबियांना यापुढे ५ वर्ष मोफत धान्य दिले जाईल. ही घोषणा म्हणजे स्वतःला विश्वगुरु समजणाऱ्या आणि मागील १० वर्ष सत्ता भोगत असणाऱ्या कर्तुत्ववान पंतप्रधानांनी यापुढे ८० कोटी कुटुंब गरीबच राहणार आहेत यावर शिक्कामोर्तब केले आहे. *अनेक फसव्या घोषणा करुन बोलघेवड्या केंद्र सरकारने आधीच जनतेला मूर्ख बनविले आहे. धर्माचे कार्ड खेळून भोळ्याभाबड्या धार्मिक जनतेच्या भावनांशी खेळून त्यांचा विश्वासघात केला आहे.* समाजातील प्रत्येक घटक केंद्र सरकारवर नाराज आहे. निवडणुकांचा सर्व्हेही भाजप सरकारच्या विरोधातच जनमत दाखवित आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या भाजप सरकारने पराभव समोर दिसताच मतांची भीक मागताना पुन्हा जनतेला फुकट धान्य देण्याची लालूच दाखविली आहे.

*राज्य काबीज करायचे असेल तर जनतेला फुकटच्या सवयी लावा, त्यांच्या शिक्षणावर घाला घालून त्यापासून त्यांना वंचित ठेवा, रोजगारावर गदा आणून बेरोजगारांच्या फौजा तयार करा म्हणजे ते आपले झेंडे आणि सतरंज्या उचलण्यास मजबूर होतील. शेतकऱ्यांची बियाणे आणि खतांची किंमत वाढवून बनावट बियाणे देऊन त्यांच्या उत्पादनावर नियंत्रण आणल्यास शेतकरीही कंगाल होऊन शरण येतील. प्रत्येकाला लाचार केल्यानंतर तो आपोआप गुलामगिरीचा पत्करेल. फुकटचे धान्य दिल्यानंतर ऐतखाऊ गुलाम जनता सरकारसमोर डोके वर काढू शकणार नाही. यामुळे गुलामांच्या पिढ्या तयार होतील. आणि देश अजुनच रसातळाला जाईल. विकसित देश बनण्याच्या एवजी अश्मयुगाकडे देशाची वाटचाल सुरु होईल. जनतेवर धार्मिकतेचा पगडा असल्यामुळे त्यांच्या भावनेचा फायदा घेऊन त्याला विकासाची स्वप्ने दाखवून झोपेतून जागेच होऊ द्यायचे नाही अशी व्यवस्था बनावट हिंदुत्वाची चादर ओढलेल्या केंद्रातील भाजप सरकारने केली आहे.*

जनतेला काहीही फुकट देण्याची सवय लावण्यापेक्षा बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, तरुणांना रोजगार आणि जनतेला दर्जेदार आरोग्याच्या सुविधा दिल्यास जनता सक्षम होईल. मग अशी भिक मागावी लागणार नाही. *कारण, शिक्षण अशा वाघीणीचे दुध आहे जो हे प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. शिक्षण घेतलेली व्यक्ती लाचारी पत्करीत नाही. तो बुध्दीच्या जोरावर प्रश्न विचारतो. त्याच्यात अन्यायाविरोधात बोलण्याची आणि लढण्याची ताकद निर्माण होते. रोजगार निर्मिती झाल्यास बेरोजगारांना अशा फुकटच्या धान्याची गरज भासणार नाही. तो स्वतःच आपल्या कुटुंबियांच्या अन्नधान्याची व्यवस्था करेल. तसेच दर्जेदार आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्यास सदृढ जनता देशाच्या विकासात मोलाचे कार्य करु शकेल.* भारत देशातील कित्येक डाॅक्टर इतर देशात प्रॅक्टिस करतात. त्यांना भारतातच राहण्याची व्यवस्था केल्यास जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकेल.

*मात्र शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सुविधा जनतेला दिल्यास यांचे घाणेरडे राजकारण संपुष्टात येईल. म्हणून जनता कशी मजबूर राहील याचाच जास्त विचार राजकारणी करत असतात.* २०१४ पासून केंद्रात भाजप सरकार आहे. तरी अजूनही काँग्रसवरच सर्व खापर फोडण्याचे काम भाजप सरकार करत आहेत. १० वर्षात भाजपने काय केले हे सांगण्याचे सोडून सुईपासून ते परमाणु बाँम्ब तयार केलेल्या काँग्रेसलाच जाब विचारत आहे. केंद्रातील भाजप सरकार सर्व शासकीय कंपन्या अदानी, अंबानी या व्यापाऱ्यांना विकून फुकटचे धान्य देऊन गुलामांच्या पिढ्या तयार करण्यात धन्यता मानत आहे. ✍️

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button