संविधान समता दिंडीचा समारोप
संविधान समता दिंडी समारोप
संविधान समता दिंडीचा समारोप ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर सांगोला रोड पंढरपूर येथे झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘पंढरीभूषण’चे संपादक शिवाजी शिंदे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, संत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, दर्शन मंदिरचे सेवकराम मिलमिले, कैकाडी महाराज मठाचे प्रमुख भारत जाधव, दादा महाराज पनवेलकर, धम्मकीर्ती महाराज परभणीकर, दिंडी चालक शामसुंदर महाराज सोन्नर, एक दिवस वारीचे प्रवर्तक शरद कदम, विशाल विमल, सुमित प्रतिभा संजय, भारत महाराज घोगरे, समाधान महाराज देशमुख आदी उपस्थित होते. सप्तखंजिरी वादक भाऊ महाराज थुटे, रामपाल महाराज धारकर, गुलाब महाराज यांनी सप्तखंजिरी भजन सादर केले. प्रास्ताविक सोन्नर महाराज यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल विमल यांनी केले. भारत महाराज घोगरे यांनी आभार मानले.