तालुका

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जि.प.कारला शाळेचे नेत्रदीपक यश

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जि.प.कारला शाळेचे नेत्रदीपक यश

उमरी : जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा शैक्षणिक वर्ष 2024 -25 क्रुष्णा विद्यालय सिंधी येथे बुधवार रोजी पार पडली.त्यातील सांघिक खेळ खो _खो मध्ये जि प प्रा शा कारला तालुका उमरी येथील मुलींच्या संघाने नेत्र दीपक कामगिरी करून, प्रथम क्रमांक पटकावला.

विजेत्या संघाचा गावकऱ्यांनी गाडीमध्ये बसवून मिरवणूक काढली.या यशा बद्दल टीम मधील सर्व मुलींचे गावातील सरपंच श्री दिलीप पाटील पवळे, उपसरपंच व्यंकट पाटील , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मारोती जयवंता पवळे, उपाध्यक्ष श्री.केशवरावजी पुलकंटे यांनी सर्व खेळाडूंचे पुष्पहार घालून कौतुक केले. त्याचबरोबर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.नंदकुमार कुलकर्णी यांनी वेळोवेळी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुण उत्साह वाढवला. अभ्यासासोबत खेळही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. त्यांचा सर्वांगीण विकासासाठी ते खूप मोठी कामगिरी बजावत असतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे खूप मोठे काम या खेळाच्या माध्यमातून होते. ग्रामीण भागातील मुलींनी एवढी मोठी कामगिरी करणे हे सोपे काम नाही, या शाळेतील शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. मुलींचा ग्राउंड वरील खेळ पाहताना, या टीमची मेहनत नक्कीच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही,ज्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव,शिक्षक…खंडु नागरगोजे, ज्ञानोबा मुंडे, प्रदिप शिंदे, संतोष कुलकर्णी,पंचकिरन कंधारे या शिक्षकांचा समावेश आहे.कारला शाळेची घोडदौड एकाच क्षेत्रात नाही तर त्यांनी, गुणवत्ता, भौतिक सुविधा, शालेय सजावट, विद्यार्थी सुरक्षा,सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच क्रीडा क्षेत्रातही खूप मोठी कामगिरी केली आहे, व खऱ्या अर्थाने शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांनी घडवून आणला आहे.
गावातील सर्व पदाधिकारी, नागरिक शाळेच्या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत आहेत.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button