बार्टीच्या मुख्य इमारतीला बार्टी २०२२च्या आधिछात्रधारक विद्यार्थ्यांनी केला टाळे ठोकण्याचा प्रयत्न
आमरण उपोषणाचा आठवा दिवस
बार्टीच्या मुख्य इमारतीला बार्टी २०२२च्या आधिछात्रधारक
विद्यार्थ्यांनी केला टाळे ठोकण्याचा प्रयत्न
बेमुदत आमरण उपोषणाचा आठवा दिवस
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी येथे आठ दिवसांपासून चालू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण व आंदोलना दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न होऊनही शासन स्थरावरून अद्यापही कोणताच ठोस निर्णय न आल्याने अखेर आधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी बार्टीच्या मुख्य इमारतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.
बार्टी २०२२ च्या संशोधक विद्यार्थ्यांची मुख्य मागणी म्हणजे ३० ऑक्टोबर २०२३ रोजीचे बार्टी, सारथी, महाज्योती आणि टार्टीसाठीचे सर्वकष समान धोरण हे बार्टी आणि टार्टी यांना लागू केले जाऊ शकत नाही .ते असंविधानिक आहेत तसेच 30 ऑक्टोबरच्या निर्णयाला आधार म्हणून 25 जुलै 2024 शासन निर्णय घेण्यात आला. हा निर्णय असंविधानिक व बेजबाबदारपणे घेण्यात आला आहे.त्या निर्णयातून अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
या दोन्ही निर्णयाच्या विरोधात तसेच बार्टी 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांना यूजीसी ने निर्धारित केलेल्या अधिछात्रवृत्ती प्रमाणे म्हणजे 100 टक्के दराने नोंदणी दिनांक पासून फेलोशिप देण्यात यावी, तसेच 2018- 2019 आणि 2020 च्या विद्यार्थ्यांना जिआरएफ अधिछात्रवृत्ती मिळाली आहे. आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी एसआरएफ देण्यात यावी. सध्याच्या सरकारकडून 2022 च्या सारथी म्हणजे मराठा जातीच्या 851 संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून अधिछात्रवृत्ती देण्यात आली, तर महाज्योतीच्या १२३६ संशोधक विद्यार्थ्यांना अधीछात्रवृत्तिचा लाभ मिळाला आहे, परंतु बार्टी 2022 च्या अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना अद्यापही अधिछात्रवृत्तिचा लाभ मिळालेला नाही.
25 जुलै रोजी या जातीवादी शासनाने 50 टक्के अधिछात्रवृती देण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाला बार्टी 2022 च्या अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी या 50 टक्के अधिछात्रवृत्तीचा एकमताने कडकडून विरोध केला असून ०५ ऑगस्टपासून होणाऱ्या कागदपत्र पडताळणीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच जोपर्यंत 100% नोंदणी तारखेपासून अधिछात्रवृती मिळणार नाही, तो पर्यंत कुठल्याही प्रकारची कागदपत्र पडताळणी व इतर प्रक्रियेला संशोधक विद्यार्थी समोर जाणार नसल्याचे या ठिकाणी सांगितले आहे. शंभर टक्के नोंदणी तारखेपासून अधिछात्रवृती देण्यात यावी. या मागणीसाठी 5 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत आमरण उपोषणास हर्षवर्धन दवणे व पल्लवी गायकवाड हे संशोधक विद्यार्थी बसले असून आज आमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे, या उपोषणकर्त्यांची जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या बेमुदत उपोषणापासून प्रवृत्त होणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान आज बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022 मार्फत बार्टी कार्यालयात ताळेबंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यावेळी भीम शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री खा.चंद्रकांत हंडोरे यांनी उपोषणाला भेट देऊन भीम शक्ती संघटनेचा पाठींबा दर्शीवला तसे भाजप आमदार अमित गोरखे व आमदार सुनील कांबळे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन संशोधक विद्यार्थी व शासन यांच्यात समन्वय साधून दिला. आंदोलनाला दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम,रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात,नसोसवायएफचे प्रा.सतीश वागरे , रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डांबळे, संजय सोनवणे (रिपाई आठवले गट)एनएसवायएफच्या श्रावणी बुवा , एसएफआय, एनएसयुआय,रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,युथ काँग्रेसचे रोहन सूर्यवंशी,राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गौरव जाधव, भीमशक्तीचे अजय डोळस, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेशभाऊ अल्लट,रिपब्लिकन कामगार सेनेचे हनुमंत अण्णा पपुल, दिशा संघटनेचे अविनाश कुमार यासह पुणे शहर व विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला
यावेळी अनके विद्यार्थी उपस्थित होते.आंदोलन यशस्वी करण्यासाठी शोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती २०२२ महाराष्ट्र राज्याचे सदस्य उत्तम शेवडे,स्वप्निल नरबाग, किशोर हुमणे, अनुपम सोनाळे, मनोहर सोनकांबळे, प्रतीक झाडे ,सीमा वानखेडे, अंकित राऊत, दीपक वस्के, कुमार चौधरी, जयवर्धन गच्चे, मारोती बरमे,सचिन पवळे, जयवंत आठवले,पुंडलिक गच्चे,नमिता खरात,प्रज्ञा उके,सोनी खोब्रागडे ,पांडुरंग वाघमारे, बाळासाहेब रोहिनेकर,आदी परिश्रम घेत आहेत.