बार्टी BANRF 2018 ते 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध मांगण्यासंदर्भात दि.२३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री विद्यार्थी शिष्टमंडळाशी करणार चर्चा
बार्टी BANRF 2018 ते 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध मांगण्यासंदर्भात दि.२३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री विद्यार्थी शिष्टमंडळाशी करणार चर्चा
पुणे: मागील एक महिन्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे इथे BANRF 2018 ते 2022 च्या पी.एचडी संशोधक विद्यार्थी आधिछात्रवृतीच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. BANRF-2022 चे संशोधक विद्यार्थ्यां हर्षवर्धन दवणे,पल्लवी गायकवाड यांनी दि .५ ऑगस्ट २०२४ पासून १२ दिवस बेमुद्दत आमरण उपोषण केले होते. BANRF-2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून युजीसीने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे १००% आधिछात्रवृती देण्यात यावी ही मुख्य मागणी होती. दि.१५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यानी उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत फोनद्वारे चर्चा केली तसेच उपोषण सोडण्याची विनंती केली व दि २३ रोजी मुख्यमंत्र्यानी विद्यार्थ्यांना बैठकीसाठी वर्षा निवास स्थान मुंबई येथे बोलावले असून बार्टी BANRF 2018 ते 2022 च्या पी.एचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या आधिछात्रवृती संदर्भातील सर्व विषय सोडवण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिनांक १६ ऑगस्ट२०२४ रोजी रात्री ११ वाजता आपले उपोषण स्थगीत केले.
डॉ..बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत अनुसूचीत जातीतील एम.फिल,पी.एचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांना युजीसीने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे व नियमाप्रमाणे आधिछात्रवृती दिली जाते. पण बार्टी प्रशासन युजीसीच्या नियमाची पायमल्ली करत आहे. BANRF-2018,19,20 व 2021 एम.फिलच्या संशोधक विद्यार्थ्यांची मागणी आहे की, युजीसी नियमाप्रमाणे पी.एचडी अभ्यासक्रमास सरळ SRF आधिछात्रवृती विद्यार्थ्यांना देण्यात यावी या मागणी साठी दि.22 जुलै 2024 पासून बार्टी कार्यलया बाहेर आंदोलन सुरू केले होते.
मुख्यमंत्र्यांनी दिनांक २३ ऑगस्ट बार्टीच्या अनुसूचीत जातीतील संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्याचे निवास स्थान वर्षा बंगला,मुंबई इथे दुपारी.12.00 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत BANRF-2022 च्या 763 पैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना पी.एचडी नोंदणी दिनांकापासून युजीसीने निर्धारीत केलेल्या 100% दराप्रमाणे आधिछात्रवृती देण्यात यावी तसेच 30 आक्टोबर 2023 चा “समान सर्वकष धोरण” हा शासन निर्णय अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यावर लादणे असंवैधानिक आहे. हा शासन निर्णय बार्टीच्या आधिछात्रवृतीसाठी रद्द ठरवण्यात यावा. BANRF-2018,19,20 व 2021मधील ज्या एम.फिल विद्यार्थ्यांना JRF मिळाली आहे त्याना सरळ पी.एचडी अभ्यासक्रमासाठी SRF आधिछात्रवृती तीन वर्ष देण्यात यावी. BANRF-2021 च्या संशोधक विद्यार्थ्यांना पी.एचडी प्रवेश नोंदनी दिनांकापासून आधिछात्रवृती द्यावी या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बार्टी संशोधक विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत.
वरिल मागण्या या संविधानीक असून मुख्यमंत्री महोदय याबैठकीत मान्य करतील ही अपेक्षा आहे.जर मागण्या मान्य न झाल्यास दि.23 ऑगस्ट२०२४ पासुन बार्टी कार्यालय पुणे येथे बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू करणार आहोत.
या आंदोलनामध्ये विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे,पल्लवी गायकवाड,स्वप्निल नरबाग,अक्षय जाधव,भीमराव वाघमारे,प्रकाश दिपके, प्रा.सतीश वागरे,संविधान दुगाने,समींदर घोकसे,प्रदीप महेंदकर,राहुल चव्हाण ,मनोहर सोनकांबळे, जयवर्धन गच्चे, उत्तम शेवडे अनुपम सोनाळे,मारोती बरमे,सोनाली खोब्रागडे, उके, बाळासाहेब रोहणेकर,अंकित राऊत,सचिन पवळे,अमर भोगे, जयंत आठवले यांच्यासह २०१८ पासून ते २०२२ चे सर्व संशोधक विद्यार्थी सहभागी होणार आहेत तसेच या आंदोलनाला दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम,नसोसवायएफचे प्रा.सतीश वागरे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष राहुल डंबाळे, संजय सोनवणे (रिपाई आठवले गट)एनएसवायएफच्या श्रावणी बुवा ,भीम आर्मी, एसएफआय, एनएसयुआय,रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,युथ काँग्रेसचे रोहन सूर्यवंशी,राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गौरव जाधव, भीमशक्तीचे अजय डोळस, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेशभाऊ अल्लट,रिपब्लिकन कामगार सेनेचे हनुमंत अण्णा पपुल, दिशा संघटनेचे अविनाश कुमार यासह पुणे शहरातील अनेक विद्यार्थी संघटना, युवा संघटना,सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. अशी माहिती संशोधक विद्यार्थी स्वप्नील नरबाग यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.