नवीन शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करणे हे आपले आद्य कर्तव्य-डॉ. डी.एन.मोरे
सिध्दार्थ पत्रकारिता महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
नवीन शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करणे हे आपले आद्य कर्तव्य. -डॉ. डी.एन.मोरे
सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी, नांदेड येथे चार जिल्ह्यातील महाविद्यालय प्रतिनिधीच्या उपस्थित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
नांदेड :- नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड अंतर्गत येणाऱ्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमाची एक दिवसीय कार्यशाळा आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. डी.एन. मोरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हे विद्यापीठ, महाविद्यालयाचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र गोणारकर (बीओएस चेअरमन तथा संचालक जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग स्वा. रा.ती. म.विद्यापीठ,नांदेड) यांनी धुरा सांभाळली. सोबतच डॉ.चंद्रकांत बाविस्कर (अधिष्ठाता, अंतरविद्याशाखा विभाग स्वा. रा.ती. म.विद्यापीठ,नांदेड) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मोरे सर पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी लागेल, ज्यामुळे कौशल्य प्राप्त विद्यार्थी पुढील पिढीस प्राप्त होतील.
दुसऱ्या सत्रात मार्गदर्शक म्हणून डॉ.सुहास पाठक (बीओएस सदस्य वृत्तपत्रविद्या विभाग स्वा. रा.ती. म.विद्यापीठ,नांदेड) आणि सत्र अध्यक्ष डॉ.बालाजी शिंदे (बीओएस सदस्य वृत्तपत्रविद्या विभाग स्वा. रा.ती. म.विद्यापीठ,नांदेड) उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना डॉ.शिंदे यांनी, शैक्षणिक धोरणाची उद्दीष्टे आणि कार्यप्रणाली वर प्रकाश टाकला तर कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप डॉ. गोणारकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.गजेंद्र टोंम्पे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.संदीप गोणारकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व सहकारी मित्र आणि उपस्थित सर्व प्राध्यापक वर्गाचे आभार मांडले आणि राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप झाला.