रिपब्लिकन युवा सेनेमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश; पुसद तालुका अध्यक्षपदी अमोल वाढवे
रिपब्लिकन युवा सेनेमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश ;
अमोल वाढवे यांची पुसद तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.आंनदराज आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या राजकिय पक्षांची पुसद तालुका आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला होता.
युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांची प्रमुख उपस्थितीत तर यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून धम्मदिप मोगले,औंढ्याचे तालुका महासचिव संतोष ढोकणे, सेनगावचे युवा तालुका अध्यक्ष दिनकर उबाळे, सचिव संजय वाकळे, संघटक आकाश कांबळे, मुरलीधर इंगोले, देविदास इंगोले, उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे,उमरखेड शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कदम,शहर संघटक नंदू इटकरे इत्यादी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्ताविक उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे यांनी केले.
आढावा बैठकीदरम्यान पुसद उमरखेड व यवतमाळ जिल्ह्यातील कामाचा आढावा सादर आला तसेच पुसद तालुका कार्यकारणीतील नियुक्तीबद्दल आलेल्या प्रस्तावास मंजुरी देत, अमोल वाढवे यांची पुसद युवा तालुका अध्यक्ष तर विकी काशिंदे यांची ता. उपाध्यक्षपदी तसेच विष्णू धुळधुळे यांची ता.संघटक पदी तर सिद्धार्थ पठाडे तालुका सचिव, शुभम शिंदे तालुका प्रवक्ता, वाल्लव हाटकर यांची ता. सहसंघटक तर योगेश वाळके यांची तालुका सहसचिव पदी, साहेबराव कदम यांना उमरखेड तालुका कार्याध्यक्ष तर शेख सलीम यांना जिल्हा सचिव पदी नियुक्ती देण्यात आली.
मान्यवरांनी विविध विषयी मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी शुभम पाईकराव, दीपक बहादुरे, प्रदीप पाईकराव, कार्तिक काळे, शुभम सूर्यवंशी, संतोष मोहाळे, मुरलीधर इंगोले, देविदास इंगोले, धम्मदीप मोगले तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते