पालीचे भविष्य उज्वल आहे :ऍड. नारनवरे

पालीचे भविष्य उज्वल आहे :ऍड. नारनवरे
नुकताच केंद्र सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यामुळे पाली भाषेला भविष्य उज्वल आहे. पाली भाषा ही प्राचीन भारतीय भाषा आहे. पाली भाषेतच तथागत बुद्धाचे संदेश आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागील अनेक वर्षापासून बौद्ध व आंबेडकरी अनुयायी सामाजिक व संवैधानिक दृष्टीने संघर्षरत होते. त्याचाच परिणाम या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.
ही भाषा संविधानाच्या आठव्या अनुसूचित व यूपीएससीच्या परीक्षेत समाविष्ट व्हावी. तसेच केंद्र सरकारच्या वतीने पाली भाषेचे केंद्रीय विद्यापीठ सुद्धा सुरू व्हावे असे मनोगत व्यक्त करण्यात आले.
आज ऑल इंडिया डॉ आंबेडकर लायर असोसिएशन नागपूर, पाली प्रचारिणी सभा व परियती शासन समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रवीभवन येथे *पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पाली भाषेचे भवितव्य* या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विधीतज्ञ एड शैलेश नारनवरे, पालीच्या माजी विभाग प्रमुख डॉ मालती साखरे, प्रा सुधीर भगत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाली तज्ञ डॉ तुळसा डोंगरे ह्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त न्यायाधीश एड विजय धांडे यांनी, प्रास्ताविक एडवोकेट लालदेव नंदेश्वर यांनी तर समारोप एड रमेश राठोड यांनी केला.