संस्कृती
उच्च शिक्षणातून मिळणारं फलीत ; उच्चशिक्षणाचा उपयोग काय?

उच्च शिक्षणातून मिळणारं फलीत ; उच्चशिक्षणाचा उपयोग काय?
सर्वच मुलं ही उच्चशिक्षण घेत असतात. मायबाप हे त्यांना उच्च शिक्षण शिकवीत असतात. ते शिकतात. मोठ्या हुद्द्यावर जातात नव्हे तर गलेलठ्ठ पैसाही कमवतात. तसेच जगात आपल्या नावाचा उदोउदो करवून घेतात.
ते उदोउदो करवून घेतात. विचारपीठावर भाषणे देतात आणि स्वतः पुण्यवान असल्याची ग्वाही देतात. ते प्रत्यक्षात तसे नसतात. परंतू स्वतः थोर असल्याचे दाखलेही देतात. त्यांच्या या चांगूलपणाला दुस-या भाषेत उलटा चोर कोतवाल को दाटे असंच म्हणता येवू शकेल.
एक साहसिक नावाचा व्यक्ती. तो पेशानं डॉक्टर होता. त्याची पत्नीही डॉक्टरच होती. त्यांना दोन मुलं होती. त्यांनी अगदी काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना घडवलं. पेशानं दोघांनाही डॉक्टरच बनवलं. ह्या डॉक्टर मुलांचे विवाह करुन दिले. त्यांचे जोडीदारही पेशानं डाक्टरच. मुलं विदेशात स्थायीक झाली. त्यांना साहसिकनं विदेशात मोठमोठे बंगलेही घेवून दिले.
मुलं विदेशात स्थायीक झाली. ती आपली पत्नी व मुलाबाळात रमली. त्याचबरोबर ती मुलं आपल्या मायबापाला विसरली.
कालांतरानं काळ बदलत गेला. साहसिक म्हातारपणाच्या उंबरठ्यावर गेला. त्याची पत्नीही म्हातारी झाली. तशी त्यांना मुलांची आठवण आली. त्यांनी संपर्क साधला. परंतू त्या संपर्कानुसार मुलांनी त्यांना आधार दिला नाही. त्यातच साहसिकच्या पत्नीचं निधन झालं.
निधनाची बातमी साहसिकनं मुलांना दिली. परंतू मुलांना त्याचं काहीच वाटलं नाही. ती तिकडं फिरकली नाही.साधं दुःखही दाखवलं नाही. त्यातच साहसिक खजील झाला. त्याला अतिशय वाईट वाटलं. मी विनाकारणच त्यांना उच्चशिक्षण शिकवलं असंही क्षणभर त्याला वाटलं. यापेक्षा मी त्यांना निरक्षर ठेवलं असतं तर बरं झालं असतं असंही त्याला वाटलं. जर ती निरक्षर असती तर आज माझ्याजवळच राहिली असती असंही एका अर्थानं वाटत होतं.
साहसिकला तसं वाटणं साहजिक होतं. आज पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकाकी झाला होता. त्याला मुलांची आणि पत्नीची आठवण येत होती. पण आता उपाय नव्हता. तो दिवसेंदिवस खंत करीत आयुष्य काढत होता.
आज तो अधिकच म्हातारा बनला होता. त्याच्यानं स्वतःचा स्वयंपाक बनवणं जमत नव्हतं. तसा तो वृद्धाश्रमात गेला.
वृद्धाश्रमात तो अतिशय वेदनेत राहात होता. ज्या वृद्धाश्रमात त्याच्या उच्चशिक्षणाचा फायदा होत नव्हता. त्या वृद्धाश्रमात त्याच्या उच्चशिक्षणाचे धिंडवडे निघत होते. शेवटी एक दिवस असाच वेदनेत दिवस काढता काढता तो मरण पावला. त्यातच त्याच्या मरणाची बातमी वृद्धाश्रम वासीयांनी त्याच्या मुलाबाळांना दिली. परंतू मुलंबाळं त्याच्या मयतीला आले नाही. त्यांनी मयत आटोपवून घ्या असा संदेश पाठवला. तसं पाहता वृद्धाश्रमवासीयांनी साहसिकची मयत आटोपवली.
आज मायबाप आपल्या मुलाबाळांना शिकवीत आहेत. उच्चशिक्षण शिकवीत आहेत. परंतू त्या उच्चशिक्षणातून मिळणारं फलीत काय? फलीत जर असं उलट निघत असेल तर त्या उच्चशिक्षणाचा फायदा काय? आज मुलं शिकतात. मायबाप कसोसीनं शिकवतात. परंतू आज शिकणारी मुलं आपला संसार पाहतात. आपली पत्नी व मुलाबाळात खुश होतात. परंतू ज्या मायबापानं शिकवलं. त्यांच्या मायबापाच्या मयतीला येणं दूरच. त्यांना साधं विचारत नाही. मग ह्या उच्चशिक्षणाचा उपयोग काय?
साहसिकच्या बाबतीत असंच झालं.त्यानं उच्चशिक्षण शिकवलं. मुलांना मोठं केलं. परंतू त्याच्या एवढ्या शिकवण्याचा फायदा काय झाला. काहीच नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०