कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरवण्यात भारत दीड शहाणा..
कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरवण्यात भारत दीड शहाणा..
नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि ती तांत्रिक व्यवस्था स्विकारणे आज अपरिहार्य झाली आहे.पण तांत्रिक ज्ञानाचा उपयोग हा चांगल्या कामासाठी होणे गरजेचे असतांना त्याचा दुरुपयोग झाला तर ती तंत्रव्यस्था घातक ठरू शकते. आजच्या घडीला समाज माध्यमे ही जेवढी उत्कृष्ट ठरत आहेत.तेवढीच ती नकारात्मक ठरत आहेत.याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे अलीकडेच झालेल्या अभ्यासातून भारत चुकीची माहिती पसरून समाजविघातक कृत्यास पाठबळ पुरवतात हे स्पष्ट होते.ते असे की,
”प्रिविलिसिस अँड सोसिअल अनालीसीस ऑ कोव्हिड 19 मिसइनफॉर्मशन इन 138 कन्ट्रीज हा अवहाल सेज च्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इंस्टिट्यूशन्स” जर्नलमध्ये प्रकाशित झाला.त्यात जगातील 138 देशांच्या 9657 इतकी माहितीचा गोळा केली.ही माहिती सत्यात पडताळून पाहण्यासाठी 94 संस्थांनी अभ्यास केला.तपास, संशोधनाच्या हाती लागलेल्या निष्कर्षात एकूण 138 देशांपैकी भारत सर्वाधिक फसवी माहिती पसरवण्यात आघाडीवर आहे. गैरमाहितीला बळी पडलेलेल्या राष्ट्रात भारत15.94%अमेरिका 9.75%,ब्राझील8.03%
यात असे स्पष्ट झाले की कोव्हिड 19 प्रकरणात सकारात्मक बाबींचा संबंध असतांना समाज माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यात 84.94%वाटा आहे. इंटरनेटवरून 90.5%प्रमाण तर फेसबुकवर या माहितीचे प्रमाण 66.87%होते.
या सगळ्या प्रकारच्या भारतीय समाजव्यवस्थेतील जनतेला चुकीची माहिती पुरवण्यात त्या माहितीचे प्रसारण करण्यात भारतीय जनता आघाडीवर होती.त्यामुळे कुठल्याही माहितीची सत्यता पडताळून न पाहता ती पसरवण्यात काही महाभाग भारतीय मात्र दीड दीड शहानेच म्हणावे लागेल.