डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तत्वे..!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तत्वे..!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी विचार -तत्वांचे दर्शन त्यांच्या सार्वजनिक जीवनातील औद्योगिक कार्यातून आणि वेळोवेळी प्रसंगानुरूप सभा ,संमेलने,परिषद-अधिवेशने समाजव्यवस्थेत आमूलाग्र स्थित्यंतर त्यांच्या विचारांनी घडूवुन आले. शोषित, वंचित,बौद्धिक या सर्व पातळ्यावरची मुक्ती मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणे हेच मानवाचे सर्वश्रेष्ठ कर्त्यव्य समजून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती घडवली. या क्रांतीने संपूर्ण जीवन बदलून गेले.पाच हजार वर्षाचा इतिहास घडवला.कोणत्याही वर्गाला दुसऱ्या वर्गावर अधिसत्ता गाजवण्याचा अधिकार नाही,असे निरामय मत बाबासाहेबांचे होते.भारतीय चातुर्वण्य व्यवस्थेने अस्प्रश्यांना रोटीबंदी ,बेटीबंदी ,स्पर्श बंदी आणि शिक्षण बंदी असा सर्व प्रकारच्या बंदी असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी दारिद्र्याचे चटके ,अस्पृश्यतेची दाहकता, पराकोटीची यातना अमानूष अत्याचार, प्रचंड मानहानी सोशीत ज्ञान लालसेने समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ ,धर्मशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ ,कायदाशास्त्रज्ञ ,मानसशास्त्रज्ञ ,मानववंशशास्त्रज्ञ धर्म इत्यादी अनेक विषयांचा अध्ययन ,चिंतन ,संशोधन करून प्रचंड ज्ञान प्राप्त केले नि महान प्रकांड पंडित झाले. भगवान बुद्धानंतर ज्ञानासाठी खडतर ज्ञानसाधना करणारे म्हणून बाबासाहेबांचा नामोल्लेख करावा लागेल. “डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक ज्ञानविचार आहेत.” म्हणून अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठाने त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचे प्रतीक म्हणून अभिमानाने गौरवले आहे .त्यांच्या ज्ञानाला आणि कार्याला प्रभावित होऊन अमेरिकेने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात ” अगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हमारे देश में पैदा हुए होते तो हम उन्हे सूर्य कहते . एक ऐसा सूर्य जिसने राजनीति, सामाजिक, धार्मिक तौर पर संपूर्ण विश्व को अपने ज्ञान असे प्रकाशित किया “.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित, वंचित समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या ज्ञानाचा, जिवाचा ,संसाराची तमा न बाळगता अथक परिश्रम करून असामान्य जीवनकार्य केले. उपनिरिष्ठ समाजाला या उदार वागणूक नसली तरी ,न्याय वागणुकीचा हक्क मिळाला पाहिजे ,त्याच्या हक्कासाठी आपल्या चार मुलांचे ,पत्नीचे बलिदान दिले. माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल या चिंतेने ते अगदी लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडणारे डॉ.बाबासाहेब होणे नाही. समाजाच्या प्रति त्यांच्या हृदयात अतोनात प्रेम होतं .म्हणून संघर्षाच्या वनव्यातून मार्गक्रमण केले.वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य डावावर लावले.बाबासाहेब आपल्या जीवनाचे सार व्यक्त करताना भूतपूर्व काव्य करतात” या महान संघर्षमय गाथेतून करोडो भारतीयांच्या जीवनात सूर्य उगवला न कधी सुर्य झाला .ज्यांच्या जीवनात विचार आकाशाचा स्पर्श झाला. त्यांच्या जीवनात हर्ष झाला”. सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भरीव योगदान आहे. समग्र विचारसृष्टीचे विचार, तत्वांची व्याप्ती आणि स्वरूप विस्तृत व सर्वसमावेशक आहे .सदर लेखात सामाजिक क्रांतीला पोषक मूल्यात्मक सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आणि तत्त्वांचा थोडक्यात आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या असामान्य कार्याचे व विचार तत्त्वांचे समीक्षण उथळ अकलनातून केल्या गेले. राष्ट्रीय योगदानाची किंवा सनातन हिंदूनी दुर्लक्षित करून वर्णव्यवस्थेने त्यांच्या कर्तृत्वाच्या, सौंदर्याला बाधित केले. भारतीय जातीव्यवस्था चढत्या क्रमाने आदराची व उतरत्या क्रमाने तिरस्काराची आहे,याचा प्रत्यय दिला. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन ,नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह ,लंडन येथील गोलमेज परिषद सहभाग ,धर्मांतर, संविधान निर्मितीचे ऐतिहासिक कार्य ,खोतीपद्धती नष्ट करणे,शेतकरी- शेतीजमीन आणि कामगार कल्याण, हिंदू कोड बिल ,भारतीय रिझर्व बँक स्थापनेतील भूमिका ,हिराकुड धरण ,दामोदर खोरे प्रकल्प ,नद्या जोड प्रकल्प ,भाकरा ,नागल धरण इत्यादी क्षेत्रात विपुल कार्य केले आहे. हे राष्ट्रीय योगदान विचारात न घेता लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जातीवरून द्वेष बाळगत असतील तर भारतीय समाज व्यवस्थेतील मानवतेला फार मोठी घातक गोष्ट आहे.उथळ आकलन हा सार्वत्रिक रोग आहे. या ग्रहितांचा फायदा घेत जातियवाद्यांनी अस्पृश्य धारक अशी प्रतिमा निर्माण केली.ही प्रतिमा जण सामान्यांच्या मनावर ठसवण्यासाठी प्रचार प्रसार सर्वत्र करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात काही काळ यशस्वी झाले ;परंतु बाबासाहेबांच्या तत्व सूत्राचे समाज ज्ञानकांक्षी बनू लागला. तसे आंबेडकरी विचाराचे सर्व स्थरातून याथाष्ट्य अन्वेषण बौद्धिक, विवेकी दृष्टिकोनातून चिकित्सा होऊ लागली. बाबासाहेबांच्या विशाल अखिल मानव मुक्ती तत्त्वज्ञानाच्या विचाराचे वास्तव व सत्य दर्शन होऊ लागले .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार तत्त्वांनी शोषिताच्या जीवनाला मानव मुक्तीचा आशय बहाल केला. मानव मुक्तीसाठी भौतिक परिस्थितीत परिवर्तन करून इतिहास घडवणारी ती एकमेवाद्वितीय सामाजिक क्रांती होती .माणूस हाच धर्म ही या क्रांतिची भाषा होती. तो नव्या परवाचा युगारंभ होता. बहिष्कृतांचे जीवन या क्रांतीने सुंदर बनवले. खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र्य मिळाले. सामाजिक समतेचा संगर हा बहिष्कृतांच्या स्वातंत्र्यासाठी होता. त्यांच्या सुख-समृद्धीसाठी त्यांचे मानव मुक्तीचे तत्त्वज्ञान मानवी हक्काची सनद प्रदान करणारा सन्मानाचा विचार आहे.हा आंबेडकरी विचार विज्ञानाने आणि तत्वज्ञानाने दिग्दर्शित केलेला विवेकनिष्ठ जीवणाविष्कार आहे. तो विचार विज्ञानाच्या सत्यावर व तथ्यावर आधारलेला आहे.विचार तर सर्वजण सांगतात पण परिपूर्ण तेच असतात जे चांगल्या ज्ञानातून कुशल क्रांतीतून आणि अचूक तथ्या तुन प्ररोह पावतात. आधुनिक तार्किक दृष्टीची कृती म्हणजे सामाजिक क्रांती होती .सामाजिक क्रांती मानवतेची प्रस्थापना करिता होती. मानवाधीकारासाठी होती.कृती विवेकनिष्ठ समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समाजरचना कायम ठेवून केवळ मत परिवर्तित करून व्यवस्थेतील अन्याय कायम ठेवून केवळ मतपरिवर्तन करून व्यवस्थित अन्याय अत्याचाराला पायबंद घालून जातीची प्रभुत्व कायम ठेवून वरवरची डागडुगी करण्याची न्हवती. तर समूळ विषमता अन्याय-अत्याचार नष्ट करण्यासाठी समाज रचनेत बदल करण्याचा होता. त्यांना रचनात्मक बदल अपेक्षित होता. मूलगामी परिवर्तन त्यांना हवे होते. त्यासाठी त्यांना चातुर्वण्य व्यवस्थेची चौकट उध्वस्त करायची होती. समाज क्रांतीच्या माध्यमातून समाजाची पुनर्रचना करू पाहतात .राष्ट्राची संपत्ती ही सोने-चांदी नसते तर तिथली जिवंत माणसे असतात.म्हणून सर्वसामान्य माणसाची प्रगती झाली तर आपोआप राष्ट्राची उन्नती होईल,सर्वांना समान संधी आणि समान हक्क समाजातील सर्व घटकांना प्राप्त झाले पाहिजे ,हा विचार राष्ट्र निर्मितीचा व त्यांच्या समाजशास्त्रीय चिंतनाचा विषय होता .”चिंतन करा चिंता नाही, नव्या विचारांना जन्म द्या”या बुद्ध वचनाप्रमाणे ते कृतिशील होतांना दिसतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक एक क्रांती ही सन १७८९च्या फ्रान्स क्रांतीपेक्षा अपूर्व होती. कारण फ्रान्सची सामाजिक क्रांती समाजातील श्रेणीबद्ध विषमतेच्या निष्पादित करण्यासाठी होती तर डॉ. बाबासाहेब यांची सामाजिक क्रांती ही भारतीय समाज व्यवस्थेतील जातीबद्दल विषमतेच्या समूळ निर्मूलनासाठी होती. वर्गण्यव्यवस्थेच्या समाजव्यवस्थेत जातीतिची अस्पृश्यता होती. तर फ्रान्सच्या व्यवस्थित गुलामगिरीची होती. जगातल्या कुठल्या माणूस समूहाला अस्पृश्यांचे घ्रानास्पद तिरस्कार आणि गुलामगिरीचे जीणे वाट्याला आले नाही ,ते येथीलअस्पृश्यांनी भोगले. सद्यस्थितीत जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरसने तांडव मानले आहे.या रोगाने एकजण एकाच जागी थिजल्यागत थांबलेला आहे. जगाची गती आणि प्रगती या विषयावर मी पूर्णपणे थांबवली आहे. अगदी असाच सत्तेच्या धर्माने करोनासारखा भयानक विषाणू सोडून भारतीय अस्पृश्य समाजाला ही कोरूना पीडित करून बरबाद केले होते. तिथल्या समाजव्यवस्थेने अस्पृश्यांचे सक्तीचे क्वारंटाइन केले. या समाजाने हजारो वर्ष सोशल डिस्टंसिंग अनुभवले .अस्पृश्य समाजाचे लॉक डाऊन कायमस्वरूपी संपून करूना सारख्या अस्पृश्य रोग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीने समूळ नष्ट केला. आशा त्रिकालबाधित अस्पृश्य स्थितीतून सुख -स्वरूप सुटका केली व माणूस की प्राप्त करून दिली .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनविषयक तत्वज्ञान तीन सूत्रात समूर्त झालेले आहे.ती म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व होय.हे तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून उसने घेतले नाहीत तर बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाची मुळे राजकारणात नसून धर्मात आहेत.त्यांचे प्रथम गुरू भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतून ते तत्वज्ञान त्यांनी स्वीकृत केल्याचे स्पष्ट झाले आहे .स्वतंत्र विचाराच्या स्वातंत्र्य मानवी मनाच्या प्रामाणिक श्रद्धेच्या आणि ज्ञानाच्या परिणाम स्वरूप निष्कर्षातून उदयाला आलेले डॉ.बाबासाहेबांचे विचार आहेत. ही उदात्त जीवनमूल्ये आपल्या विचाराततून ,कृतीतून अविष्कृत केली. भारत देश महान आणि बलशाली बनवा हा त्यामागचा व्यापक दृष्टिकोन होता. त्यांच्या दृष्टिकोणाचा अवयव डोळा नाहीतर ज्ञानही हा दृष्टिकोन त्यांच्या भूमिकेतून प्रगट झाला.” मी कोणा एका विशिष्ट जातीसमूहासाठी कार्य केले नाही ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही त्यांनी भारतीय संविधान अवश्य वाचावे “बाबासाहेबांच्या या विधानाच्या कसोटीवर त्यांचे कार्य तोडणी करून पहावे व सत्याची खात्री करून घ्यावी. समाजामध्ये तेज व जागृती उत्पन्न करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणादायी विचार सांगितले व स्वाभिमानाच्या क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवले. वागणी दाखल काही विचाराचे नमुनी दिले आहेत.”शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा”.
” तुम्हाला तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणी येणार नाही, मनात आणलं तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्यास समर्थ व्हाल”जसा बाबासाहेबांचा पूर्ण विश्वास होता की, एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात बौद्ध धम्माचा स्वीकार करेल हा आशावाद ते बाळगून होते .सांप्रत बहुजन समाज सुव्यवस्थित दिसतो जगतो तो आंबेडकरी विचारांचा कार्याचा परिणाम आहे.बाबासाहेबांच्या विचारातील तार्किक परिणीतीचे आकलन समाजमनाला झाला का?आपल्या अनुयायकडून जी भूमिका बाबासाहेबांना अभिप्रेत होती ती जबाबदारी अनुयायांनी पार पाडली का? या प्रश्नांची उत्तरे ही समाधानकारक मिळत नाहीत. बाबासाहेबांचे विचार सोयीनुसार स्वीकारत आहेत. कम्युनिस्ट आंबेडकरवादी ,पोथी नितळ आंबेडकरवादी, बहुजन आंबेडकरवादी, हिंदू आंबेडकरवादी ,आंबेडकरवादी इत्यादी समाजात आंबेडकरी तयार झाले. तशी समाजाची शकली पडली .आंबेडकरी विचार अभंग राहिला नाही, त्यामुळे विचारातील क्रांती तत्व निखळून पडले. आंबेडकरी तरुण बाबासाहेबावर भावनिक प्रेम करतो .बाबासाहेबांचा उदो उदो करण्यासाठी हा तरुण लगेच आकर्षित होतो. त्याचा फायदा काही मतलबी मंडळी घेतात. कार्यकर्त्याचा वापर आणि सोडून द्या असा उपयोग करतात.चळवळीचा कणा असलेला कार्यकर्ता याचा उपमर्द करायचा ही कोणती मानसिकता आहे ?निष्ठा ,सेवा, त्यागाच्या समर्पित भावनेने हा अभाव व निधीचा अभाव असणारे स्वार्थी मंडळी यात आघाडीवर असते. नीती ,स्वार्थी मनुष्याला नैतिक बनवायचे साधन आहे. मी तिचा स्वीकार केला आणि स्वार्थ बाजूला ठेवला तर शुद्ध आंबेडकरवादी भूमिका घेता येते, म्हणजे सुद्धा आंबेडकरवादी भूमिका घेण्यास स्वार्थ आडवा येतो ही मोठी अडचण आहे. मनुष्य मूलत स्वार्थी प्रवृत्तीचा आहे. परिणामी शुद्ध आंबेडकरवादी विचारवंत, कार्यकर्ताता दुर्मिळ झालेला आढळतो .दुसऱ्या शब्दात स्वतंत्र आंबेडकरी विचार स्वार्थी मनुष्याला झेपत नाहीत ,पचत नाहीत.आंबेडकरी विचार पेलायला नीतिमत्ता निस्वार्थीपणा धैर्य लागते.सुशिक्षित जागरण स्वाभिमानी समाज असेल तरच त्याचे सामर्थ्य वाढेल .अन्यथा बहुसंख्यांक असूनही समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. “तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही” मरगळलेल्या बहिष्कृत समाजाला विचारांची संजीवनी देऊन जागृत केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार तत्वाचे अधिष्ठान हे समतेचे ,नीतिमत्तेचे होते .बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक होता. तो बाबासाहेबांनी तार्किक नियमांचा स्वीकार करून प्राप्त झाला होता. त्यांचे विचार सर्जनात्मक होते.बहिष्कृत भारतातील समाजाचे दुःख हे सृजनात्मक आहे. दुःख हे सर्जनाची मूळ असते .तात्कालीन रूढी परंपरेपेक्षा वेगळेपणा देणारे विचार असतात. ती सर्जन विचाराप्रती असते. या सृजनात्मक विचाराचे आधुनिक भारताच्या शासित मानवाचा प्राण फुंकला.प्रज्ञान, करुणा ,समता ,मैत्री आणि प्रेम ही वरील मूल्य आहेत.प्रज्ञा ,करुणा आणि समता ही बौद्धिक बौद्ध धम्मातील तीन सिद्धांत जगातील शोषण थांबू शकतात. आंबेडकरी विचारांमध्ये मतभेद आहेत. आंबेडकरी विचारवंतांमध्ये एकाच मुद्दा याबाबत मतभिन्नता असते. कारण प्रत्येक मनुष्य वेगळा असतो प्रत्येकाची जडणघडण व विचार करण्याची पद्धत भिन्न असते.बापाप्रमाणे मुलगा नसतो पण समाजाचे हीत लक्षात घेता आणि आंबेडकरी विचारसरणी एकच असल्याने किमान समाजाचा कार्यक्रमांतर्गत तरी एकमत झाले पाहिजे. परंतु विवेक बुद्धीला पटत असेल तर स्वीकारा या बुद्ध वचनाचा दाखला देत चिकित्सा करण्याच्या पद्धतीचा अतिरेक केला जात आहे. अतिचिकित्सकाच्या नादात साखरेची साल काढतो. परिणामी समाजात मतभेदाचे दुफळी निर्माण होऊन समाजाची क्षती होत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हे वंचितांचे कल्याण समाज उपयोगी आणि राष्ट्रीयहिताचे आहेत .बाबासाहेबांचे विचार केवळ भाषण वाचन आणि श्रवण करण्यासाठी नसून प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची निरातिशय गरज आहे. ती सर्वांनी ज्ञात करावी आणि कर्तव्याची जाणीव ठेवावी..!
प्रा. रंगनाथ धांडे
91 86239 01586
“नालंदा “
एकता नगर ,रिसोड ता.रिसोड जि.वाशिम( महा.)