तत्व,मूल्याची लढाई लढणारे आंबेडकरी भाष्यकार डॉ.राजेंद्र गोणारकर एक विचारवैभव
तत्व,मूल्याची लढाई लढणारे आंबेडकरी भाष्यकार डॉ.राजेंद्र गोणारकर एक विचारवैभव
करुणेच्या उद्गात्याने विचार परिवर्तन हे सर्व परिवर्तनाचे मूळ असा मौलिक विचार दिला. जगातली सर्वात प्रभावी अवघड आणि सुलभतेची लढाई म्हणजे वैचारिक लढाई . त्यात हा मानव अन्य प्राण्यांपेक्षा या बाबतीतच भिन्न आहे की,तो विचार करू शकतो. विचारांच्या लढाईत शस्त्रांची गरज नाही; तर शास्त्राची गरज लागते. समाज ,उद्योग, व्यवसाय, राजकारण ,संस्कृती ,सैन्य ,मनोरंजन ,अन्नधान्य ,आर्थिक उत्पन्नाचा आलेख कितीही उंचावला तरी, ज्या समाजाला वैचारिक नेतृत्व याची उणीव भासते. तो समाज समाज होऊच शकत नाही .तो एक प्रवाहहीन लोकांचं साचलेलं डबकं बनत असते .साचलेल्या डबक्यात ची निर्मिती दुर्गंधीला दिला जन्म देते; म्हणून समाजाच्या नेतृत्वात तात्विक विचारवंताची,विचारवादी, विज्ञानवादी, बुद्धिवंत ,विचारवंताची निकड प्रत्येक क्षणा क्षणाला भासते. यापैकीच संबंध महाराष्ट्रात परिचित असलेलं वैचारिक व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर सर होय. सरांचा मी एमफिलचा विद्यार्थी म्हणून हे लेखन नाही तर सर बुद्धिवादी चळवळीचा भाग आहेत.त्यावर त्यांच्यावर लिहिण्याइतपत माझे हात प्रबळ नाहीत. त्या अनुषंगाने हे व्यक्तिमत्व विचार, चिंतन,भाष्य करते. त्यांच्यातील प्रत्येक विचार हा वास्तवाची जाणीव करून देतो. जाणिवेतून पसरलेले विचार चिरकाल टिकणारे असतात;आणि परिवर्तनाच्या प्रवाहात ते अनुकरनीय ठरतात .सरांच्या प्रत्येक विचारात चिंतन, मनन, संशोधन आढळते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात ते अध्यापन करतात.पत्रकारिता ,चित्रपट ,मराठी साहित्य, आंबेडकरी साहित्य यांचा त्यांना गाढा अभ्यास आहे. जनसंवाद व पत्रकारितेत पीएचडी करणाऱ्या सरांनी समाजशास्त्रातही पीएचडी केली.समाजशास्त्रातही पीएचडी मराठी केली .दोन दोन विषयाचं साक्षेपी ज्ञान असणाऱ्या सरांचा मराठी साहित्य ,शब्दसाठा या सगळ्या बाबी हे व्यक्तिमत्व विविध विषयात पारंगत असल्याची जाण करून देतात. प्रचंड मोठा जनसंपर्क, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ,सामाजिक शैक्षणिक ,धार्मिक ,सांस्कृतिक ,चळवळी आणि कार्यक्रमात सरांचा हिरीरीने सहभाग असतो. सरांची संवादाची शैली ही त्यांच्या गहन अभ्यासाची त्यांचा साक्ष देते . सर नांदेड कल्चरल ससोसीएशनचे अध्यक्ष आहेत.नामवंत विचारवंत डॉ.गंगाधर पानतावणे ,राजा ढाले ,डॉ.सुधीर गव्हाणे ,प्रा. दत्ता भगत ,डॉ.यशवंत मनोहर यांच्या तालमीतून पुढं आलेले सर बुद्धिवादी लोकांशी त्यांचा संपर्क येतो. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबादच्या विद्यापीठात पूर्ण करणारे गोणारकर सर दलित पॅंथर ,विद्यार्थी चळवळ त्यातून वर आले आहेत .प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांची पहिली कलाकृती पिस्तुल्या यात सरांना पोलिसांची भूमिका केली .प्रसिद्ध नामांकित कवी लेखक विचारवंत असणाऱ्या डॉ.राजेंद्र गोणारकर सरांना बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचा गाढा अभ्यास आहे त्यामुळेच आजच्या घडीला वैचारिक व्यासपीठावर त्यांना पाचारण करणे ही बहुतांशी कार्यक्रमाची अपरिहार्यता बनत चालली आहे. अनेक नामवंत लेखक ,कवी, विचारवंतांच्या ग्रंथावर ,कविता, कथा दिवसेंदिवस अभिप्राय देऊन पाठराखण करण्याचे शेड्युल आता व्यापक होत चालले आहे .कुठल्याही गोष्टीवर लेखन, भाष्य करताना सर वरवर लिहत नाहीत. तर त्यांची चिकित्सा करतात. प्रत्येक शब्द न शब्द काय काय सांगतो,यातून कोणता संदेश जातो या सगळ्या बाबतीत सर नेहमीच सजग असतात .अस्मितादर्श या नियतकालिकातून सरांची कवी ,लेखन म्हणून जडणघडन झाली.सरांच्या लेखनात संशोधनाचा अधिक व्याप असून साहित्याच्या क्षेत्रातून दुर्मिळ असलेले साहित्य त्यांनी प्रकाशात आणले. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक साहित्यापैकी पैकी बुद्धाची शपथ ही कथा पडद्याआड राहिलेली असताना त्याचा शोध घेऊन बुद्धाची शपत या कथेला अण्णाभाऊ साठेच्या मार्क्स व बुद्ध यातील संबंध जगासमोर आणले. अशा या महत्त्वपूर्ण कथेचं सरांनी केलेलं संपादन महत्वपूर्ण ठरते.त्यातच त्यातच क्रांतीजोत्यी सावित्रीबाई फुले यांच्या पत्रसंवाद या बाबी संशोधनातून समोर आणल्या.तर दे दैनिक सम्राट, सकाळ ,लोकमत, लोकनायक ,महानायक, यासारळ्या महाराष्ट्रातील नामवंत वृत्तपत्रातून सरांनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले. आकाशवाणी टीव्ही चॅनल यासारख्या माध्यमातून सर नेहमीच चर्चेत असतात. संवेदनशील मनाचे कवी विविध कार्यक्रमांतून त्यांनी केलेले भाष्य, मांडणी समाजाला दिशादर्शक ठरते. ते असे की,’ जगातील मागास व लोकांच्या लढ्याचे प्रतीक म्हणजे भिमाकोरे ग्रंथ होय “प्रबुद्ध भारताच्या निर्मिती शिवाय संविधानीक राजकारण शक्य नाही” तर डॉ.इ- झेड खोब्रागडे यांच्या पुस्तकावर भाष्य करतांना सर म्हणतात की, “खोब्रागडे यांचा प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न”. सरांनी महानायक या वृत्तपत्रातून काही काळ पत्रकारिता केली.अशाप्रकारे चौफेर क्षेत्राचे ज्ञान ठेवले.त्यांना मिळालेल्या अनके पुरस्कार,मानसन्मान,या सगळी गोष्टीचा आलेख त्यांच्यातील प्रतिभासंपन्न व्यतिमत्वाचे दाखले देतो.
सरांच्या अनेक कवितापैंकी मला भावणारी कविता म्हणजे ताजमहल होय.
नाही ती केवळ मुमताजआणि शहाजान यांची समाधी
मला दिसत आहेत हजारो कारागिरांचे छाटलेली हात प्रत्येक पायरीवर
ऐकूच येऊ नये आकाश किंकाळ्या शिल्पकाराच्या म्हणून
आज बेमालूमपणे चाललाय आल्हाचा गजर
आता टिकत नाही ताजमहल वर माझी नजर
ताजमहालत मला कुठेच दिसत नाही सुंदरता ,लालित्य
ताजमहल अमनुषतेच क्रौर्य ताजमहाल छाटलेल्या हाताचे दिनमान रूप
ताजमहल आपल्या बुठ्या बापाच्या वेदना दगडी बुबलांन पाहणारा आजाण मूल
विचारा जवळून वाहणाऱ्या येमुनेला ताजमहालाचा काय इतिहास आहे
आणि तिच्या पाण्याला अजूनही रक्ताचा का वास आहे
आपल्या शिल्पा ची किंमत कधी कुणी एवढी चुकली आहे का ?
दोस्तहो ताजमहाल दुसरं तिसरं काही नसून माझ्या माणसांचा
पृथ्वीच्या पाठीवरील गोठलेला अश्रू आहे.
या ओळीने ताजमहाल सारख्या जगप्रसिद्ध वास्तूचे पोस्ट मॉडर्म केल्याचा प्रत्यय येतो. अशा या विचारवंतांचा आज ८मार्च रोजी जन्म दिवस.सरांना जन्मदिनाच्या मंगल कामना!
-मनोहर सोनकांबळे
८८०६०२५१५०.८४५९२३३७९१
(एम फिल संशोधक विद्यार्थी माध्यमशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड)