तिचं रक्त सांडलंच पाहिजे म्हणून

तिचं रक्त सांडलंच पाहिजे म्हणून
स्वातंत्र्याच्या या बेगड्या व्यवस्थेत मानवी मनाच्या बुरसट परंपरा अजूनही इतक्या खोलात रुतलेल्या असतील याची कल्पना नव्हती ;पण पुरोगामी महाराष्ट्र आणि 8 GBस्पीड च्या गतीने स्त्रियांच्या गुलामगिरीच गुंतत जाणार हे जीवन आजच्या घडीला मन सुन्न करणारे आहे .कंजारभाट समाजात असलेल्या या मानवीय अघोरी प्रथा अजूनही आपल्या रीती ,परंपरेच्या जोखडातून बाहेर पडत नाहीत .त्यांच्या या प्रथेनं आज आज एकविसाव्या शतकात भारतातील स्त्रीदास्यतेची प्रचिती येणे म्हणजे महासत्ताक भारताच्या मुखवट्यावर बुरसटलेल्या जातपंचायतीच्या दांभिक दर्शनाची चपराक आहे. नुकतेच राज्यातील कोल्हापुरात एक घटना घडली. दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगावातील दुसऱ्या दोन सख्या भावा सोबत झाला होता.
विवाहाची संपन्नता मोठ्या थाटा- माठात पार पडल्यानंतर विवाहाच्या पहिल्या रात्री दोन्ही सख्ख्या बहिणीची कौमार्य चाचणी घेण्यात आली आणि प्रथेच्या कुविचाराच्या आणि कंजारभाट समाजातील तोलामापात त्यात दोन्ही बहिणी नापास झाल्या.म्हणजेच कौमार्य चाचणी अर्थातच व्हर्जिनिटी च्या टेस्टमध्ये दोघेही सख्ख्या बहिणी दोषी ठरलेल्याचा आव आणत झाडाची फांदी मोडून गावात जातपंचायत भरवण्यात आली.तेथील जातपंचायतीने तो विवाह मोडीत काढला .अशा प्रकारच्या अघोर प्रथेचे लोन केवळ कोल्हापूरातच नाही तर’ पुणे तिथे काय उणे’ याबाबतीतही पुण्याने ही आपली उणीव पुन्हा एकदा धुडकावून लावली. यातील गंभीर बाब म्हणजे पुण्यातील ज्या दोघी वधूंची कौमार्य चाचणी घेतली त्यामध्ये उच्च शिक्षण ,नोकरी ,सुधारित विचार आणि जीवनशैली या सर्वांना काळिमा फासणारी आहे. तेथील वराचे वडील हे नंदुरबार जिल्ह्यातील न्यायालयात सेवा करून निवृत्त झालेले अधीक्षक आहेत, तर दुसऱ्या वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते .ह्या गोष्टी एवढ्यावरच थांबत नाही तर गत मासात परदेशात उच्च शिक्षण घेऊन आलेल्या एका महाभागाने तर त्याच्या उच्यशिक्षणाला काळिमा फासून आपल्या अकलेचे तारे तोडले आणि त्यानेही आपल्या वधूची कोमार्य चाचणी घेतली होती. त्यामुळे शिक्षणाचा अभाव ,दुर्गम भाग, खेड्यापाड्यातील अविकसित जीवन यांच्यातच ही पद्धत आहे, असे नाही तर शिक्षणाचं माहेरघर, मेट्रो सिटी, गतिमान जीवन,औद्यगिकतेतून पुढे आलेल्या मोठमोठ्या शहरातही ह्या बाबी उघड होऊ लागल्या आहेत.स्त्रियांना पाण्यात पाहणाऱ्या या पुरुषसत्ताकपणाचा डांगोरा पिटवणाऱ्या या व्यवस्थेत पुरुषप्रधान संस्कृती किती धुतल्या तांदळासारखे आहे ,याचाही काहीसा विचार होणे गरजेचे आहे. कुठल्याही समाजाची प्रगती ही त्याच्या अर्थसंपन्न राहणीमान व जगण्यातली उच्चनीचतेवरून ठरवता येत नाही, तर त्या समाजाच्या आत दडलेल्या मानवी संवेदनात्मक नितीतीवर अवलंबून आहे.
विचाराने मागासलेला वर्ग हा मानवी स्वातंत्र्य,समता ,हक्क अधिकार या बाबतीत पूर्णतः न्याय देऊ शकत नाही. म्हणून विचारांची कास महत्वाची आहे. आजही घनघोरपणे जाणवत असलेली ही कौमार्य चाचणी म्हणजे परंपरेचा अविवेकी पगडा आहे.त्यामुळे भारतीय समाजव्यवस्थेतील ही सामाजिक समस्या विज्ञानाच्या मार्गाने आगेकूच करणारी नाही तर अंधश्रद्धा, धर्म, रूढी, परंपरा यांनाच खतपाणी घालणारी आहे .मुळातच मानवी विचाराच्या परिसीमा ज्या डबक्यापुरत्या मर्यादित राहिल्या तर अशा प्रकारच्या समस्यांचे उच्चाटन करणे जिकरीचे ठरते .अशा या अघोरी प्रथेचं आणि स्त्रियांच्या संदर्भातील बुरसटलेल्या अविचारी प्रवृत्तीचं त्यातील वैचारिक मागासलेपणा ठेवून जगणाऱ्या समाजव्यवस्थेत स्त्रियांची होणारी ही कुचंबना व त्यांच्या बाबतीतील आजची ही घनघोर दास्यता मन व्यतीत करणारी आहे.कुठून अली ही विचारातील घ्रनता .सगळ्याच गोष्टी एकाच पद्धतीने नाही स्पष्ट करता येत.त्यातही असतात कितीयरी दावे, कारणे आणि परिस्थिती. पण रक्ताच्या थेंबावरून स्त्रियांचे चारित्र्याची शोधणाऱ्या युगात पुरुषी मानसिकतेची हार मला आज क्षणोक्षणी जाणवते.रक्ताचाच प्रश्न जर जर त्यातील सत्य सांगत असेल तर ते एकेरीच का भोवते…दुसऱ्या बाजूच्या सत्वपरीक्षेचं काय या सगळ्या बाबी तोंड लपवणाऱ्या असतात. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न तोच स्त्रीदास्येतेचाच. या प्रथेचे समाजातून उच्चाटन झाले पाहिजे .तिचे निर्मूलन झाले पाहिजे .आजच्या अशा प्रकारच्या रोजच्याच प्रकारांना स्त्रियांना समोर जावे लागते .पुरुषसत्ताक पद्धतीच्या मानसिकतेतून निर्माण झालेल्या या समस्या नष्ट झाल्या पाहिजे .एकीकडे आज स्त्रिया पुरुषापेक्षा अधिक यशस्वीपणे जगाच्या परिसीमा ओलांडत आहेत ,तर भारतात मात्र अशा प्रकारची अघोरी प्रथा खोलात घर करून बसल्या आहेत. अशा या प्रथेचं “रायटर्समंच”पूर्णतः निषेध व्यक्त करते व स्त्रियांच्या हक्क अधिकार आणि आत्मसन्मानतेच्या बाजूने आपली भूमिका विषद करून त्यांचा आवाज बनते तुर्तास “रायटर्समंच” पीडितेच्या बाजूने त्या पुरुषप्रधानतेचा टेंम्भा मिरवणाऱ्या कुविचारांचा जाहीर निषेध करते…
-रायटर्समंच (मनोहर सोनकांबळे,८८०६०२५१५०,८४५९२३३७९१