देशातील एकमेव गाव जिथं जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्यासाठी यात्रा भरते; तरुणीची पान खाण्याची मागणी म्हणजे पसंती
देशातील एकमेव गाव जिथं जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्यासाठी यात्रा भरते; तरुणीची पान खाण्याची मागणी म्हणजे पसंती
ओ खइके पान बनारसवाला
खुल जाये बंद अकल का ताला
फिर तो ऐसी करे धमाल
सिधी करदे सबकी चाल
ये छोरा गंगा किनारेवाला”
डॉन चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं खूप प्रसिद्ध आहे. या गाण्याने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर धुमाकूळ घातला आहे.
भारतीय समाजव्यस्थेत पान खाण्याचा एक मोठा वर्ग आहे. पण हेच पान जेव्हा असेही
प्रेमाची मधुरता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन घडून आणत असेल तर त्यातील गोडवा आणि त्यानिमित्ताने त्या क्षणाचे महत्व वेगळेच.
होय भारतीय समजव्यवस्थेत आदिवासी भागातील समाजजीवणाने आपली संस्कृती जपत पारंपरिक रूढी परंपरांना छेद देत गेली अनेक वर्षांपासून एक महत्वपूर्ण पद्धत जोपासली आहे. त्यात संपूर्ण स्वातंत्र्य, पसंती, आवड -निवड ,स्नेह,मैत्री जिव्हाळा यासर्व बाबतीत जी प्रथा कायम आखली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावेच लागेल. देशात असणारी ही अनोखी प्रथा असली तरी ती खूप महत्वपूर्ण संदेश देणारी ठरते.
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यापासून 70 किलोमीटर दूर असलेल्या आदिवासी बहुल भाग असलेल्या मोरगडी या गावात दरवर्षी एक यात्रा भरते .या यात्रेची अनेक तरुण तरुणी मोठ्या उमेदीने आणि उतावळेपुर्वक वाट पाहत असतात. कारण या यात्रेत प्रत्येक तरुण -तरुणीला विवाहासाठी आपला जोडीदार निवडण्याचा संपूर्ण अधिकार असतो.म्हणून मोठ्या सजून सावरून(सज धजके) अनेक तरुण तरुणी या यात्रेत सहभागी होतात. दिवाळी नंतर 7 दिवसांनी भरणाऱ्या या यात्रेत विवाहासाठी जोडीदार निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.जोडीदार निवड तोपर्यंत पक्की होत नाही जोपर्यंत एकमेकांना पान खाऊ घातलं जात नाही.जेव्हा एखादी तरुणी एखाद्या तरुणाला पसंद पडली आणि तो तरुण त्या तरुणीच्या पसंतीस उतरल्यावर ती लगेच मोठ्या ख़ुशी खुशीत लाजत लाजत म्हणणार की,
“पान खिलाए सैयां हमार.’ हे वाक्य म्हणजे जन्मभराच्या साथीसाठीची स्वनिवडीची खूणगाठ होय.म्हणून या भागातील हे पान खूप प्रचलित असून ही यात्रा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येते.
आदिवासी भागातील समाज जीवनातील ही प्रचलित प्रथा म्हणजे म्हणजे मुक्त जीवनाचं प्रतीकच होय.