ना नोकऱ्या देता येतात ; ना परीक्षाही घेता येतात मग तुम्हाला येते काय नुसती पेपर फोडी ?
ना नोकऱ्या देता येतात ; ना परीक्षाही घेता येतात मग तुम्हाला येते काय नुसती पेपर फोडी ?
राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून दोनदा नोकर भरतीला समोर ठेऊन परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या पण यापूर्वीही काही तास शिल्लक राहिले असताना अचानक परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आल्या त्यातही अनेक शंकास्पद प्रकार घडले.पेपर उशिरा येणे,फुटणे या बाबी घडवून आल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी आघाडी सरकारच्या या ढिसाळ कारभारावर रोष व्यक्त केला आहे. एक तर लाखो विद्यार्थी बेरोजगारीचा झळीतुन स्वतःला सावरत प्रचंड मानसिक त्रास सहन करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यातील प्रचंड जीवघेणी स्पर्धा असताना आपल्या आयुष्याचा अर्धा जीवनमान याच काळोखात टाकुन संपवत आहेत.ना कुठली उमीद ना कुठला आशेचा किरण यात दिसतो.तरी सरकारी नोकरी शिवाय समाज स्वीकारायला तयार नाही.विवाहाचे वय पार निघून गेलेतरी जगण्याच्या आकांताने झुंजनाऱ्या या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून एकवेळ एकदा नाही तर दोनदा टोप्या बसल्या. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात खूप चांगली कामगिरी बजावली ही बाब प्रशंसनीय असली तरी आरोग्य विभागाच्या नोकर भरती प्रक्रियेच्या बाबतीत परिक्षेदरम्यानची टोपी सैल का करत येत नाही हा सवाल निर्माण होत आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान असा घोळत घोळ आणि परीक्षेचा पायघोळ कुठेतरी पाणी मुरत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहत असेल तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुन्हा काय आहे?ही बाब पुढे येत आहे. एक तर आघाडीच्या सरकारातील आशेचे किरण म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य ज्या वरचष्म्यातून पाहत आहे.त्या आशेवर पूर्ण विरजण घालण्याचा प्रकार आज राज्यात घडत आहे.मुळातच आधीच्या सरकारच्या काळातील पोर्टलच्या नावाने जी बोंबाबोंब झाली ;त्यातून ते भरती प्रक्रियेतील पोर्टल बंद करण्यात आले. पण विद्यार्थ्यांची बोंबाबोंब कायम आहे. सरकार बदलले तरी विद्यार्थ्यांच्या समोरील अडथळे मात्र बदललेले दिसत नाहीत म्हणून आजघडीला एक संतप्त रोष राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये पहावयास मिळत आहे. आरोग्य विभागाचे नेमके चाललेतरी काय दोन वेळेस परीक्षा आयोजित करून त्यात पेपर फुटत असेल तर परीक्षा घेताच कशाला वशिलेबाजी व पैसा,आप्त संबंध, या पात्रतेवर नोकऱ्या देऊन टाकाव्या.ह्याच बाबी या निमित्ताने उपस्थित होत आहेत.मुळातच ह्या आरोग्य विभागाच्या परिक्षेनिमित्ताने शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा झाला. पाचशे हाजर किलो मीटरचे अंतर पार करून विद्यार्थी राज्यातील या कानाकोपऱ्यातून त्या कानाकोपऱ्यात गेले अचानक परीक्षा रद्द ,पेपर फुटणे,पेपर उशिरा मिळणे या बाबी घडल्या आहेत. या परिणामाने आर्थिक चणचनीतून धपडणाऱ्या विद्यार्थ्यांने कुठे जावे हा सवाल आरोग्य विभागाला आहे.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मोठी घोषणा करत आरोग्य विभागात भरती करणार असल्याचे जाहीर केले होते;पण त्यात अशाप्रकारची कुचकामी यंत्रणा राबवून मेहनत करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना डावलून मेहरबान होत आहेत ह्या बाबी पडद्या आड आहेत. परिणामी आज राज्यातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर दिलेल्या टोप्या कोणत्या वळणावर उतरतील हे स्पष्ट करणे आतातरी शक्य नाही;पण एकदा नाहीतर दोन-दोनदा टोप्यावर टोप्याच्या या खेळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जातीने लक्ष घालून ही यंत्रणा पारदर्शी करून योग्य न्याय द्यावा एवढाच राज्यातील सर्व विद्यार्थ्यांकडून टोपे यांना मागणीचा सन्मानपूर्वक फेटा..!
-मनोहर सोनकांबळे
8459233791,8806025150