राजकीय

बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे जीवन म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराप्रतीचा अखंड संघर्ष…

1

बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे जीवन म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराप्रतीचा अखंड संघर्ष…

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आज,३७ वा स्मृतीदिवस. बॅरिस्टर राजाभाऊ यांच्याबद्दल फारस लिहिल्या गेले नाही. बुद्धिमत्ता, विचार, कृती, सामाजिक जाण भान तसेच बाबासाहेबांचे विचार व कृती यांचे सच्चे विचारांचे वारसदार असूनही दुर्लक्षित! साहित्यिक लिखाण उपलब्ध नसतानाच प्रा. इसादास भडके व प्रा. जंजाळ यांचं लिखाण वाचण्यात आल. त्यांच्या जीवनाचा दैदिप्यमान इतिहासाला उजाळा मिळाला, त्यांचा जीवनपट उलगडणारा प्रगल्भ लिखाण वाचण्यात आले. तेव्हा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिण्याची प्रेरणा मिळाली. अनेक फळ्यावर लढत असताना ऐकलं. भारतीय रिपब्लिकन पक्षाचा दैदिप्यमान काळ त्यानंतर स्वार्थापोटी झालेली अनेक शकले त्यातील धडाडीचे बॅरिस्टर राजाभाऊ यांनी समर्थपणे संपूर्ण दलित, पीडित, गरीब, लाचार ,शेतकरी, कष्टकरी यांच्या उत्थानासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. फक्त रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलने केले नाहीत तर संसदेत सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून मार्गी लावले. स्वार्थाचा लवलेश नाही. सतत भ्रमंती देश, परदेश दौरे यामध्ये नेहमी गुंग असायचे. ध्यास फक्त एकच बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणे यासाठी वाट्टेल ते कष्ट सहन करण्याची तयारी. त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ १९५०पासून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याने सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यात जीवन समर्पित केले. अशा योध्याबद्दल थोडफार वाचण्यात आले. तेव्हा त्यांच्या भव्यदिव्य कामाविषयी माहिती मिळाली. आवाज झालो! म्हणूनच अशा प्रगाढ व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीविषयी कुतूहल जागृत झाले. बाबासाहेबानंतर कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला तेव्हा हे न पेलणारे धनुष्य उचलून समर्थपणे पेलणारे एकच व्यक्ती ते म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ. म्हणूनच बाबासाहेब यांच्या नंतर त्यांच्या आचार विचार आणि कृती चे वारसदार म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ हेच होत. यात तिळमात्र शंका नाही. “आचारा वीना विचार नाही, व्यर्थ असे ते ज्ञान”. म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग गडगंज संपत्ती जमवण्यात खर्च न करता सामान्य माणसाचे जीवन सुखी कसे होईल यासाठी उपयोग केला. म्हणूनच त्यांना मोठेपण लाभले व सर्वसामान्यांची त्यांना “छोटे बाबा” ही पदवी एका कार्यक्रमात बहाल केली. चंद्रपूर जिल्हा त्याकाळे महारासाठी वरदानच होता .याचं कारण त्या ठिकाणचे अस्पृश्य हातमागावर कापड विकत असत म्हणून त्यांना विणकर म्हणत. सूत कातून कापड तयार करावयाचे आणि बाजारात विकायचे त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती. परंतु भिवाजी व पैकाबाई यांचे जीवन अतिशय हालाखीचे होते. त्यांनी देवडा हे चंद्रपूर जिल्ह्यातील जन्मगाव सोडून चंद्रपूरला आले. पत्रुजी, गोविंद व देवाजी व तीन मुली या परिवारासह चंद्रपूरातील दाद महल भागात राहण्यास आले. काय करावं सुचेना, पोट भरण्याची भरांत यातच या दाम्पत्यनी फळाचा छोटा व्यवसाय सुरू केला. अशातच भिवाजी खोब्रागडे यांचे अकस्मात निधन झाल्यामुळे संपूर्ण खोबरागडे परिवार उघडा पडला. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकट्या पैका बाईवर येऊन पडली. मुले लहान होती अशा परिस्थितीत स्वतःचे दुःख बाजूला ठेवून मुलाच्या शिक्षणासाठी उमेदीने व्यवसाय चालू केला. त्या डगमगल्या नाही. त्यांना मुलांना शिकवायचे होते. पैका बाई व त्यांचे दोन मोठे मुले सुद्धा व्यवसायात उतरल्यामुळे लवकरच व्यवसायात भरभराटी झाली. त्यामुळे खोबरागडे कुटुंब म्हणजे चंद्रपूर मधील फार मोठे व्यवसायिक ठरले. सर्वात लहान देवाची यांचे शिक्षण सुरू झाले. त्यांची आर्थिक स्थिती उत्तम झाली.खोब्रागडे कुटुंबाची छाप फक्त व्यवसायात नव्हती तर राजकारण, धर्मकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. व्यवसायात जम बसल्यानंतर सामान्य हात मागावर कापड विननाऱ्या या कुटुंबाचे हाल होऊ नये म्हणून त्यांना जाग्यावरच व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल रुई घरीच उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी फोर्ड कंपनीची गाडी घेणारे ते जिल्ह्यातील पहिले ठरले ते खोब्रागडे बंधू. याच खोब्रागडे घराण्यात भिवाजी व पैकाबाई यांच्या पोटी सर्वात लहान देवाजीचा जन्म झाला. देवाजी हुशार मेहनती असून त्यांनी आपलं शिक्षण दहावीपर्यंत पूर्ण केलं. अकराव्या वर्गात अपयश आल्यामुळे आपल्या भावाने सुरू केलेल्या व्यवसायात हातभार लावला. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. जिल्ह्यातील महार जातितिल पहिले मैट्रिक उत्तीर्ण करणारे व्यक्ति म्हणजे देवाजी ठरले. १८९९ ते १९६६ हा त्यांचा कालखंड होय. त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय सांस्कृतिक परिस्थिती दलित समाजाच्या संदर्भात अनुकूल नव्हती. जातीयता, विषमता, अंधश्रद्धा याचा उत आला होता. देवाची बापू यांनी या साऱ्याची संघर्ष केला. समाजाला नवा आयाम प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक व्यवसाय केले फळाचा व्यवसाय, टेलरिंग व्यवसाय, सूत कातण्याची साठी लागणाऱ्या रुईचा व्यवसाय, सागवान लाकडाचा व्यवसाय अशा कितीतरी व्यवसायात यशस्वी पदार्पण करून अति उच्च शिखर गाठले व गडगंज संपत्ती कमावली. चंद्रपूरच्या मध्यवस्तीत राजमहाला सारखा टुमदार महाल बांधणारे हे खोबरांगडे कुटुंब म्हणजे कुतूहलाचा त्याकाळी विषय ठरला. व्यवसायामध्ये देवाजी खोब्रागडे यांचा संबंध मोठमोठे व्यवसायिक, राजकारणी, धार्मिकनेते, सामाजिक चळवळीशी आला. विशेष करुन बाबासाहेबांच्या विचाराशी वाचनातून परिचय होऊ लागला. बाबासाहेबांच्या आंदोलनाशी बांधिलकी स्वीकारून एक रूप झाले. आयुष्याच्या शेवटपर्यंत आंदोलना करिता जीवाचे रान केले.

2

१९२६ च्या अंबादेवीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही चांदयावरून अमरावतीला गेले. तेथील बाबासाहेबांच्या भाषणाचा जबरदस्त प्रभाव देवाजी बापू वर झाला. तेव्हापासून ते बाबासाहेबांचे अनुयायी बनवून स्वतः त्याच्या कार्यात झोकून दिले. विदर्भातील आंबेडकरी चळवळीत त्या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. १९२५,२७,३०, ३२,३५ मध्ये सत्याग्रहाची चळवळ, मंदिरप्रवेश, राजकीय पक्ष याबाबत देवाजी खोबरागडे रस घेऊ लागले. चंद्रपूर म्हटल्याबरोबर एक मोठे प्रस्थ म्हणजे देवाजी खोबरागडे असे समीकरण झाले. देवाजी आपल्या साथीदारांसह चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेऊ लागले. १९३१ ची महार परिषद चंद्रपूर येथे भरली. पंच मंडळाची स्थापना करून १९३३साली चोखामेळा वसतिगृहाची स्थापना केली. समता सैनिक दल स्थापनेतही त्यांचा मोठा सहभाग होता. बाबासाहेबांचे विचार आणि चळवळ कार्यन्वित करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देवाचीबापू यांचे आहे. तसेच राजकीय चळवळ विदर्भा- मध्यप्रांतात गतिमान करण्याचे कार्य यांनीच केले. १९३६ला स्वतंत्र मजूर पक्षावर पंजा ह्या निशाणी वर उभे राहून प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, धार्मिक, राजकीय कामाची ही जणू पावतीच चंद्रपुर -ब्रह्मपुरी मतदार संघातील आमदार म्हणून दिली. असे म्हणणे वावगे ठरू नये. राजकीय कामाचा आलेख उंच वाढत जाऊन १९४९रोजी बल्लारपूर नगरपरिषद पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना जातो. त्याचं कार्यकाळात नवीन शाळा, आयुर्वेदिक दवाखाने ,सार्वजनिक वाचनालय सुरू केले. डॉ. बाबासाहेब यांच्या चळवळीत देवाची बापू यांचे फार मोठे योगदान आहे. बापू हरदास एल. एन (जयभीम चे जनक) व देवाजी बाबू समकालीन होते. विदर्भातील आंबेडकरी चळवळीतील या दोघांचाही सिंहाचा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब यांचा ४५वा वाढदिवस नागपूर येथे संपन्न झाला त्यातही त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांच्या अतिनिकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होत गेली. १२ऑक्टोबर १९३५ ची येवला या ठिकाणची धर्मांतराची घोषणा, मिलिंद महाविद्यालय औरंगाबादच्या बांधकामासाठी सागवान लाकूड रेल्वेने पाठविले. १६ ऑगस्ट १९५६चंद्रपूरचा धर्मांतर सोहळा या महत्त्वाच्या वेळी त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला तसेच तन-मन-धनाने सक्रिय झाले. १९५० ला डॉक्टर बाबासाहेबांनी तुमचा मुलगा समाजकार्यासाठी समर्पित करावा असे सूचना केल्या बरोबर देवाजी ने काकू न करता तयार झाले. आपला एकुलता एक मुलगा बाबासाहेबांच्या ओटीत टाकला. माझा समाजासाठी मुलगा दान देणारे देवाची खोब्रागडे. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी धम्म प्रचारासाठी आपल्या मुलाला व मुलीला धम्म चळवळ साठी दान केले याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा चारित्र्यसंपन्न उद्योगी कर्तव्यदक्ष समाजसेवी बुद्धिमान पित्याचा वारसा, फुले शाहू बाबासाहेब यांच्या विचारांचा वारसा व धार्मिक, सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,शैक्षणिक वारसा लाभलेल्या अशा सुख संपन्न घराण्यात दिनांक २५सप्टेंबर १९२५रोजी देवाजी व इंदिराबाई यांच्या पोटी बॅरिस्टर राजाभाऊ ऊर्फ भाऊराव यांचा जन्म झाला. चंद्रपूरच्या या मातीत जन्मलेला हा हिरा आहे. राजाभाऊंना जन्मच आपल्या ज्ञानसंपन्न पित्याकडून सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक, धम्मविषयक जवळचे बाळकडू मिळाले होते. देवाजी खोबरागडे व इंदिराबाई यांनी आपल्या मुलाला लाडात वाढलेली. पैकाबाईंनी आपल्या नातवाला घरी आणण्याचा अनोखा कार्यक्रम आखला. आजीने नातवाला बांबूची टोपलीत फुले हार चांदी सोन्याने सजवली ती टोपली डोक्यावर घेऊन बँड च्या ताफ्यात वाजत-गाजत मिरवणूक काढून राजेशाही थाटात घरी आणले. राजाभाऊनी बाबासाहेबां सारखे शिक्षण घ्यावे असे त्यांना मनोमन वाटे. त्यातही लहान बालक राजाभाऊ शिक्षणात तल्लख होते.
१९३१ मध्ये यांनी पहिल्या वर्गात नगर परिषद शाळा चंद्रपूर येथे प्रवेश घेतला. पहिल्या वर्गापासून आपल्या बुद्धीची चुणूक दाखवायला सुरुवात केली. राजाभाऊंचा व्यक्तीमत्वावर नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक राघोजी कांबळे यांचा प्रभाव पडला होता. स्नेहवर्धक मंडळात राजाभाऊंना नैतिक शिक्षण, लाठीकाठी, डंबेल्स ,लेझीम ,व्यायाम तसेच वक्तृत्वाचे पाठ मिळाले. १९४५ला चौथा वर्ग, १९४२ ला हायर मॅट्रिक, १९४५ला बी. ए.झाले तेव्हा त्यांचे वय १९ वर्षाचे होते. कॉलेजमध्ये ही त्यांनीशालेय राजकारणात प्रवेश करून वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणूक जिंकले. विविध स्पर्धेत भाग घेतला याचा देवाची बापूंना अभिमान वाटणे सहाजिकच होते. बाबासाहेब प्रमाणे राजाभाऊनाही बॅरीस्टर करण्याचे ठरविले. डॉ. बाबासाहेबांना भेटून आपला विचार व्यक्त केला. बाबासाहेबांच्या संकल्पना नुसार देवाजी बापूंनी स्वखर्चाने बॅरिस्टर पदवीसाठी लंडनला पाठवावे. तसेच देवाची बापू तयार झाले. शिष्यवृत्तीच्या मुलाबरोबर राजाभाऊंना बॅरिस्टर ऍट लॉ साठी विकंस येथे पाठविले. २६जानेवारी १९५०रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी बॅरिस्टर ऍट लॉ चे शिक्षण घेऊन भारतात आले. सर्वत्र पताका घोषणाही भारताचा पहिला प्रजासत्ताक या ऐतिहासिक दिनी राजाभाऊ मुंबईच्या बंदरावर आले. त्यांना प्रथम बाबासाहेबांचे वाक्य आठवले, “उच्च शिक्षण घेतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करा” हे शब्द बॅरिस्टर राजाभाऊंनी आपल्या मनात पक्के ठेवले. येथून पुढे त्याचा खडतर प्रवास सुरू झाला. स्वतःला बाबासाहेबांच्या चळवळीत झोकून दिले. आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान नेते म्हणून त्यांचा गुणगौरव होताना दिसतो. भूतकाळाचे अवलोकन करून वर्तमानाची जाणीव लक्षात घेऊन भविष्याचा वेध घेणाऱ्या नेत्यांमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ यांचा अंतर्भाव करावा लागेल. बॅरिस्टर राजाभाऊंचे संपूर्ण जीवन संघर्षमय असून डॉ. बाबासाहेबांनी टाकलेल्या विश्वासाला त्यांनी आयुष्यभर तडा जाऊ दिला नाही. तर बाबासाहेबांचे कार्य प्रामाणिकपणे समाजात रुजविले व राजाभाऊ हे संपूर्ण आघाड्यावर लढले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, धम्मविषयक या सर्व क्षेत्राला त्याने चळवळीचे रूप देऊन बाबासाहेबांचे विचार त्यात समाविष्ट केले. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर सर्व आघाड्यावर यशस्वी झाले. बॅरिस्टर राजाभाऊ तरुणपणात वयाच्या अठराव्या वर्षी बाबासाहेबांची भेट दिनांक १५ सप्टेंबर १९४३ ला चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर झाली. बाबासाहेब व्हॉईसरॉय मंत्रिमंडळाचे सदस्य झाल्यामुळे हैदराबादला सत्कार समारंभासाठी जाणार होते. येतानी चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर गाडी थोडा वेळ थांबणार होती. त्यावेळेस बाबासाहेबांचा भव्य स्वागत करण्याचे देवाचे बापूनी ठरविले. चंद्रपूर स्टेशनवर अलोट गर्दी उसळली तेव्हाच तरुण राजाभाऊ हातात पुष्पहार घेऊन स्वागतासाठी स्टेशनवर गाडीची वाट पाहत उभे होते. गाडीच्या खाली बाबासाहेब उतरतात त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून स्वागत केले. हीच बाबासाहेबांची घेतली पहिली भेट होय. प्रेरणास्थानी असलेल्या व्यक्तीस प्रत्यक्ष भेटण्याचा प्रसंग हा वेगळाच असतो. १९५० ते १९८४ हा त्यांच्या जीवनातील संघर्षाचा कालखंड होय. बॅरिस्टर राजाभाऊ हे लोक नेते होते त्यांची दिनचर्या बदलली नाही. अशा कालखंडात त्यांनी अनेक चढउतार अनुभवले कुठे यश तर कुठे अपेश. कधी तर आपल्याच लोकांनी दिलेला दगाफटका पण ते डगमगले नाही. दोन हात करून शेवटी जिंकले. सतत देश विदेश दौरे मोर्चे, सभा ,संमेलने ,पक्षाच्या बैठका, शासकीय कार्यक्रम, कार्यकर्त्यांचा नेहमी गराडा, समाजाच्या समस्या ,गरीब लाचार ,मजलुम ,कष्टकरी ,शेतकरी ,शेतमजूर, दुष्काळ, शासनाचे दुर्लक्ष, केंद्रात ,राज्यात बौद्धांना राखीव जागा त्यासाठी मोर्चे ,आंदोलने ,धम्मदीक्षा कार्यक्रम इत्यादी मुळे त्यांना सतत व्यस्त राहावे लागत असे. त्यामुळे वैयक्तिक कौटुंबिक जीवनाकडे लक्ष देता आले नाही. कौटुंबिक जीवनाबद्दल विचार करण्यास त्यांना वेळही मिळत नसे. ते एन तरूणपणात बाबासाहेबांच्या सहवासात आले. १९५० पासून प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली.

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या ध्येयाचा पाठलाग करताना व ही उद्दिष्टे साध्य करताना आपल्या वयाचे भान राहिले नाही. सातत्याने चळवळीसाठी झटत आणि झीजत राहिले. माहीत होते की बाबासाहेबांचे जीवन म्हणजे नीतिमत्तेचा आदर्श आहे. देशाच्या राजकारणात नैतिक मूल्य आचरणात आणणारा बाबासाहेबा सारखा दुसरा नेता म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ. आता त्यांचे वय ४८वर्षाचे झाले होते. चळवळीचे काम करत असताना भराभर दिवस गेले हे समजलेच नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यात मग्न झाले. पक्षाची धुरा, धम्मदीक्षा, सामान्यांचे प्रश्न त्यामुळे त्यांना १९७२पर्यंत सवडच मिळाली नाही. महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या राज्यसभेच्या खासदार की च्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ते चंद्रपूर लाच होते. त्यांचे जीवन सुने सुने व एकाकी वाटत होते. त्यांच्या सहकार्याच्या लक्षात आले. त्यांनी लग्नाबद्दल चर्चा केली. लग्नाबद्दल त्यांच्या डोक्यात विचार कधीच आले नव्हते कारण कार्याचा व्याप फार होता. सतत डोक्यात कार्यकर्त्यांचे प्रश्न असायचे. लग्नाबद्दल त्यांनी होकार देताच चंद्रपूर येथील राघोजी कांबळे यांच्या कन्या इंदुबाई यांच्याशी २८मे १९७३रोजी भदंत आनंद कौसल्यायन यांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने दीक्षाभूमी नागपूर येथे मंगल परिणय संपन्न झाला. राजाभाऊंचा उमदा स्वभाव, उत्तम वकृत्व, संवाद पटूत्व, स्वाभिमानी बाणा ,उच्च राहणीमान, प्रश्नाची जाण, आंतरराष्ट्रीय भान, कुशल संघटक, भारदस्त बुलंद आवाज आणि संविधानावर प्रभुत्व या गुणामुळे समतेच्या स गरातील महान योद्धा म्हणून ते मान्य पावले. बॅरिस्टर राजाभाऊ भारतीय रिपब्लिकन पक्ष जो बाबासाहेबांनी रूपरेखा तयार केली परंतु स्थापना करू शकले नाहीत त्या पक्षाची स्थापना १९५७ ला करण्यात आली. पक्ष एकसंध राहावा त्यात फूट पडू नये असे एन. शिवराज, भाऊराव गायकवाड, भैय्यासाहेब आंबेडकर यांना वाटायचे परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही शेवटी दोन शकले पडून नंतर अनेक शकले झाली. याचा त्यांना शेवटपर्यंत पश्चातापझाला. एकोणीसशे पन्नास ला इंग्लडवरून बॅरिस्टर ऍट लॉ ही कायद्याची पदवी घेऊन भारतात परत आल्यानंतर त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन च्या कार्याला सुरुवात केली. नव्या उत्साहाने बाबासाहेबांच्या चळवळीत ते सहभागी झाले. चंद्रपूर- नागपूर या भागात राजाभाऊनि आपले कार्यक्षेत्र बनविले. त्यांच्या कार्याने लोक प्रभावित झाले. चंद्रपूर नगरपरिषद मध्ये त्यांची निवड झाली. १९५२ मध्ये चंद्रपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदी विराजमान झाले. नागपूर प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनची बैठक १९५३मध्ये होऊन त्यांना नागपूर प्रदेश चे उपाध्यक्ष पद बहाल केले. सर्व ठिकाणी फिरून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून संघटना सर्वदूर पसरवली. परंतु 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत फेडरेशनचे अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले पण फारसे यश मिळाले नाही. मुंबईमध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला. शेड्युल कास्ट फेडरेशनचे संपूर्ण भारतात फक्त दोनच उमेदवार निवडून आले. 1954 च्या भंडारा पोटनिवडणुकीतही बाबासाहेब पराभूत झाले. १९३५साली येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती ती घोषणा पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी लक्ष घातले. अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना धर्मांतरासाठी तयार राहून जन्मत तयार करावे अशा सूचना दिल्या. भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राजाभाऊंनी घेतलेले परिश्रम व केलेला प्रचार बाबासाहेबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. बॅरिस्टर राजाभाऊंचे कर्तृत्व बाबासाहेबांच्या लक्षात आले होते. अशा बुद्धिमान, तरुण, तडफदार नेत्यावर मोठी जबाबदारी देण्याची हीच योग्य वेळ आहे हे बाबासाहेबांनी जाणले. बॅरिस्टर राजाभाऊंना राष्ट्रीय पातळीवर आपल्या सोबत घेतले. राजाभाऊंना जान होती की महापुरुषाच्या सोबत काम करणे सोपे नाही कधीकधी दमछाक व्हायची बाबासाहेबांकडून कानउघाडणी व्हायची मात्र त्यांच्यात बाबासाहेबांच्या सहवासामुळे प्रचंड उत्साह निर्माण व्हायचा. बाबासाहेबांनी २३सप्टेंबर १९५६ला एक पत्रक काढून अशोक विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर १९५६ ला नागपुर येथे सकाळी नऊ ते अकरा या वेळेस बाबासाहेबांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी समारोह होईल व सायंकाळी जाहीर व्याख्यान होईल. असे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करण्यासाठी केलेल्या आवाहनाला या देशातील कोट्यावधी लोक साथ देतील याची खात्री केंद्र सरकारला होती. या भीतीपोटी भारत सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या सवलती फक्त हिंदू व शीख धर्मानाच मिळतील इतर धर्मीयांना नाही असे सर्व वर्तमानपत्रातून २ऑक्टोबर १९५६ला घोषित केले होते. हा काँग्रेसचा कुटील डाव होता. त्यांना धर्मांतर रोकायचे होते. भारतातील आंबेडकर अनुयायांना बाबासाहेबा बरोबर धर्मांतर करायचे होते. पण सदर बातमीमुळे आपल्या सवलती जातील असा पेच त्यांना पडला. पेचात पडले ते मागे राहिले ज्यांनी बाबासाहेबा बरोबर धर्मांतर करायला निर्धार केला त्या लाखो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. १५ ऑक्टोबरला तेवढ्याच लोकांनी धम्मदीक्षा देऊन पंचशील -त्रिशरण व २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या त्यावेळी बाबासाहेब म्हणाले,”जरी दलित वर्ग बौद्ध धर्मात गेला तरी त्यांना मिळालेल्या सवलती सरकारला नाकारता येणार नाहीत. राज्यघटना हे माझ्या श्रमाचे फळ आहे सर्व सवलती अबाधित ठेवण्यास समर्थ आहे.”बाबासाहेबांनी दिल्ली येथे शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली. या बैठकीसाठी राजाभाऊंनी तातडीने नागपूर सोडून दिल्लीला रवाना झाले. याच बैठकीत लोकशाहीच्या रक्षणासाठी बलवान विरोधी पक्ष स्थापन करण्याचे ठरले. तसेच या नव्या पक्षाला अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे नाव देण्याचे ठरले. हा पक्ष स्थापन करण्या अगोदर अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करण्याचे ठरले. तसेच या ठिकाणी १६ऑक्टोबर १९५६ला चंद्रपूर येथे धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेण्याची संमती दिली. बैठक संपली त्यानंतर राजाभाऊसी नागपूर व चंद्रपूर च्या कार्यक्रमाबाबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना त्यांना दिल्या. राजाभाऊ दिल्लीवरून परतले, फक्त दहा-बारा दिवस कार्यक्रमासाठी बाकी होते. हे काम बॅरिस्टर राजाभाऊ ने दिवस-रात्र राबून काम करावयाचे होते.

3

हा अतिमहत्त्वाचा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी बॅरिस्टर राजाभाऊ वर येऊन पडली. नागपूरचा धम्मदीक्षा कार्यक्रम व सोबतच चंद्रपूरचा धम्मदीक्षा कार्यक्रम. ११ऑक्टोबरला बाबासाहेब नागपूरला येणार होते. त्यांच्या सोबत माईसाहेब व नानकचंद रत्तू होते. दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, रेवारामजी कवाडे, वामनराव गोडबोले यांच्या देखरेखीखाली सर्व तयारी सुरू होती. त्याच रात्री शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यावेळी बाबासाहेबांनी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, ज्यांना धर्मांतर करायचे नसेल त्यांनी धम्मदीक्षा स्वीकार सोहळ्यात अडथळे आणू नयेत. १४ऑक्टोबर १९५६ला नागपुर येथे सकाळी अकरा वाजता प्रथम स्वतः भजन आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते धम्मदीक्षा ग्रहण केली. नंतर सर्वसमोर उभे राहून उपस्थित सर्व अलोट जनसमुदायासमोर सांगितले की, ज्यांना धर्मांतर करायचे त्यांनी उभे राहावे सर्वांना त्रिशरण- पंचशील दिले नंतर त्यांनी स्वतः तयार केलेल्या २२प्रतिज्ञा त्यांच्याकडून वदवून घेतल्या कार्यक्रम एक तास चालला. इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी एकाच स्थळी व एकाच नेत्याच्या आवाहनाला साथ घेऊन धर्मांतराच् सोहळा पार पडला बॅरिस्टर राजाभाऊ यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम केले. धम्मदीक्षा कार्यक्रम यशस्वी झाला परंतु बॅरिस्टर राजाभाऊंना १६ ऑक्टोबर १९५६चंद्रपूरच्या कार्यक्रमाची काळजी होती. बाबासाहेब चंद्रपूरला पोचले तेव्हा चंद्रपूरच्या जनतेने बाबासाहेबांचे अभूतपूर्व स्वागत केले. भव्य स्टेजवर बाबासाहेब व माईसाहेब विराजमान होताच उपस्थितांनी टाळ्या व घोषणा दिल्या बाबासाहेबांनी सर्व उपस्थितांचे उभे राहण्यास सांगून त्रिशरण -पंचशील वदवून घेतले. 22 प्रतिज्ञांचे वाचन करून घेतले. त्यानंतर मार्गदर्शन केले. सदर धम्मदीक्षा सोहळ्यात ३ लाखाच्या वर लोकांनी धम्माचा स्वीकार केला. बॅरिस्टर राजाभाऊंना शाबासकी दिली. ही शेवटची भेट यापुढे तुम्ही समोर येऊन माझ्या कार्याचा रथ समोर न्या. असे राजाभाऊंना सांगितले. धम्मदीक्षाचा कार्यक्रम दोन्ही ठिकाणचा आटोपून बाबासाहेब दिल्लीला रवाना झाले. दोन्ही कार्यक्रमांच्या दगदगीमुळे थकलेले असून सुद्धा आनंदी दिसत होते. धम्मदीक्षेचे चा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. सर्व वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या. अनेक ठिकाणच्या बौद्ध स्थळांना भेटी देऊन काठमांडू येथे जागतिक धम्मपरिषद भाषण दिले. हिंदू विश्व विद्यापीठात भाषण दिले. दिल्लीत पोहोचले. डिसेंबर महिन्याचे पाच दिवस बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथाची टाईप केलेली प्रत रतुला आणावयास सांगितली. साडेअकरा वाजता रतुने परवानगी घेऊन घरी गेल्यावर ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी रेडिओवरून संपूर्ण जगभर पसरली. सर्व भारत दुःखाच्या सागरात डुबला दलित समाज हताश व निराश झाला. चैत्यभूमी दादर येथे लाखोच्या दुखी नयनाने आपल्या जीवनदात्याला अखेरचा निरोप दिला. सर्व नेत्यांचे आदरांजली पर भाषणे झाली. दलित, गरीब, कष्टकरी, जनतेचा तारणहार गेला. आता आपले कसे होणार..! राजेभाऊ म्हणजे झुंजार व्यक्तिमत्व व त्यांचे संघर्षमय आयुष्य होते. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे मिशन साकार करण्याची जबाबदारी बॅरिस्टर राजाभाऊ वर आली बाबासाहेबांची गर्जना,” मी संपुर्ण भारत बौध्दमय करीन” ही गर्जना प्रत्यक्षात उतरविण्याचे फार मोठे आव्हान बॅरिस्टर राजाभाऊ समोर होते. बाबासाहेब रत्नपारखी होते. म्हणून त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊंची निवड 27 ऑगस्ट 1956 ला अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या महासचिव पदावर नियुक्ती केली होती. तेव्हापासून बाबासाहेबांच्या सोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. एक ते दीड वर्षात बाबासाहेबांच्या हाताखाली काम केल्यामुळे त्यांना काम करण्याची हातोटी व कौशल्य प्राप्त झाले. याचा उपयोग त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात होऊन ते यशस्वीतिच्या उत्तुंग शिखरावर पोचविले.त्यांच्यासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाबासाहेबांनंतर संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा सुर्यपुत्र भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या सहकार्याने ठीक ठिकाणी धम्मदीक्षा कार्यक्रम घेण्यात आले. १९५१ मध्ये संपूर्ण भारतात बौद्ध धर्मियांची लोकसंख्या केवळ दोन लाखाच्या आसपास होती. संपूर्ण भारतात धम्मदीक्षाचे सोहळे झाल्यामुळे २००१ च्या जनगणनेनुसार भारतात बौद्ध धर्मीयांची संख्या ५८ लाख 37 हजार सत्तर एवढी झाली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतरचा पहिला धम्मदीक्षा सोहळा अहमदनगर येथे संपन्न झाला. अहमदनगर परिसरातील पी. जी. रोहम व दा. ता. रूपवते यांनी अहमदनगरचा धम्मदीक्षा समारंभ घेण्यासाठी आग्रह करून सर्व कार्यकर्ते जमा झाले. धम्मरथ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एन. शिवराज, बॅरिस्टर राजाभाऊ, दादासाहेब गायकवाड, राजभोज, हरदास एन एल, भैय्यासाहेब, आर .डी .भंडारे, हरिदास बाबू आवळे, शांताबाई दाणी, बी. सी .कांबळे, दादासाहेब रूपवते, गाणार इत्यादी होत. अहमदनगरच्या पहिल्याच बैठकीत बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक होती.

समता सैनिक दल, अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, पी ई एस सोसायटी, भारतीय बौद्ध महासभा, शेड्युल कास्ट इम्प्रोवमेंट ट्रस्ट, कनिष्ठ गावकामगार असोसिएशन, प्रबुद्ध भारत साप्ताहिक इत्यादी संघटनाचे पदाधिकारी हजर होते. संध्याकाळी ठीक आठ वाजता कार्यक्रम होऊन धम्मदीक्षा कार्यक्रम घेण्यात आला. अहमदनगरच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यातील लोकांनी एकच गर्दी करून आठ – दहा हजार लोकांनी त्रिशरण -पंचशील व २२प्रतिज्ञा वदवून घेण्यात आल्या. याच सभेत राजाभाऊंना शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष पद देण्यात आले. नेत्यांनी मार्गदर्शन करून हा दीक्षा सोहळा संपन्न झाला. 22 नोव्हेंबर 1970 ला कलकत्ता येथे बॅरिस्टर राजाभाऊंच्या अध्यक्षतेखाली धम्मदीक्षा सोहळा संपन्न होऊन 25 हजार लोकांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. 5 जून 1957 रोजी भंडारा जिल्ह्यातील चिखली या गावी बॅरिस्टर राजाभाऊ यांच्या हस्ते धर्मांतराचा कार्यक्रम घेण्यात आला. या सोहळ्यात दहा हजारावर लोकांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. 1971 ला बिहार राज्यातील वेगवेगळ्या भागात आलेल्या सात हजारावर लोकांनी पाटणा येथे आयोजित भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ यांच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली. तामिळनाडू सरकारने धर्मांतर विरोधी कायदा करू शकले नाही. त्या ठिकाणी पाच हजार दलित बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत. लखनऊ येथे 14 व 15 डिसेंबर 1957 बौद्ध संमेलनाचा अपूर्व सोहळा भदंत आनंद कौसल्यायन, भैय्यासाहेब, बी.पी मौर्य, ही उपस्थित होते. 1972 मध्ये विशाखापट्टणम बौद्ध धम्म सोहळा संपन्न झाला असंख्य लोकांनी धम्मात प्रवेश केला. हे आंध्रप्रदेशातील पहिलेच धर्मांतर होते. 1972 ला सारनाथ येथे हिंदू धर्माचा त्याग करुन हजारो लोक बौद्ध धम्मात आले. 1973 ला दिल्ली येथे दीक्षा समारंभात आयोजन केले या सोहळ्यात दलाई लामाची उपस्थित होती. म्हैसूर राज्याचे धर्मांतराचा कार्यक्रम होणार असल्याचे बॅरिस्टर राजाभाऊंनी जाहीर केले. चंद्रपूर जिल्ह्यातील बोरगाव येथे धम्मदीक्षा कार्यक्रम करण्यात आला. 16 ऑक्टोबर 1981 ला दीक्षाभूमीवर भव्य समारंभ झाला अध्यक्षस्थानी बॅरिस्टर राजाभाऊ होते. 26 मे 1958 रोजी आरमोरी, गडचांदूर, वडसा, देसाईगंज येथे धम्मदीक्षा समारंभ पार पडला यात सात हजार लोकांनी धम्मदीक्षा घेतली. बॅरिस्टर राजाभाऊ यांनी परदेशातील विविध ठिकाणी अधिवेशने, संमेलनातही बौद्ध धम्मावर आपले विचार व्यक्त केले. 1958 ला थायलंड, 1965 ला अमेरिका, 1971 ला जर्मनी, 1972 ला श्रीलंका, व्हिएतनाम इत्यादी ठिकाणी परदेश दौरे करून बौद्ध धम्माची भूमिका खंबीर पणे मांडून. अशांतता, शीत युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगात फक्त बुद्धाचा धम्म याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. बॅरिस्टर राजाभाऊंना नागरी सत्कार समिती नागपूरच्या वतीने मानपत्र देताना त्यात विशद केले ते त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरे होते. “भारत बौध्दमय करीन ही बाबासाहेबांची प्रतिज्ञा या प्रतिज्ञेला आपण फक्त शाब्दिक सहकार्य दिले नाही तर प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करण्याचे अपार कार्य केले. महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी आपण दीक्षा समारंभ पार पाडले परंतु कलकत्ता, पाटणा, सारणात आदी ठिकाणी जाऊन बाबासाहेबांचे अधुरे कार्य पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सिलोन, थायलंड देशात भारतीय बौद्धांचे प्रतिनिधित्व केले. बॅरिस्टर राजाभाऊ बाबासाहेबासोबत असताना त्यांनी त्यांच्या प्रगाढ कामाचा अनुभव आला. बाबासाहेब म्हणत,” मी शिक्षित लोकांसाठी भरपूर कार्य केले परंतु माझा खेड्यातील गरीब, अशिक्षित, मजूर, शेतकरी, कामगार वर्गासाठी काहीच करू शकलो नाही आज मी थकलो आहे परंतु त्यांच्यासाठी उर्वरित जीवन खर्च करायचे आहे.” याची जाण बॅरिस्टर राजाभाऊंना होती. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानुमते मध्यवर्ती अध्यक्ष मंडळ (प्रेसिदियम) स्थापन करण्यात आले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे (अध्यक्ष) दादासाहेब गायकवाड, जी.टी परमार, ए. रत्नम, आर. डी. भंडारे, के. बी. तळवटकर, बी. सी. कांबळे यांचा समावेश होता. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र, खान्देश ,नाशिक व मराठवाड्यातील दहा जिल्ह्यात भूमिहीनांच्या सत्याग्रहाला प्रारंभ झाला. एक ऑक्टोबर 1964 रोजी सरकारला रिपब्लिकन पक्षाच्या मागण्या वर उचित कार्यवाही न केल्यास सहा डिसेंबर 1964 पासून बेमुदत सत्याग्रह देश पातळीवर सुरू केला. पक्षाच्या नेत्यांनी 2 ऑक्टोबर पासून जेलभरो आंदोलन करणे भाग पडेल याची कल्पना दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर खोब्रागडे, दत्ता कट्टी, आरमुगम, बी.पी. मोरया, एल .आर .बाली यांनी जेलभरो प्रचाराला सुरुवात केली. पक्षाची भूमिका व जेलभरो सत्याग्रहासाठी तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितले. केंद्र सरकारला लाखो एकर पडीक जमीन भूमिहीनांना देण्यासाठी भाग पाडायचे असा संकल्प करून या जेलभरो सत्याग्रहाच्या दहा मागण्या सरकार समोर ठेवल्या. सहा डिसेंबर 1964 पासून भारताच्या विविध प्रांतातून व अनेक गावातून दररोज पक्षाचे अनुयायी सत्याग्रह करीत होते.
दररोज हजारो लोक तुरुंगाची वाट धरत होते. रिपब्लिकन पक्षाच्या सत्याग्रहींना अटक करून महिनोंमहिने जेलची हवा खायला लावू असा मनसुबा सरकारचा होता. देशभरात पक्षाचे बारा लाख प्राथमिक सदस्य असताना फक्त तीन लाख सदस्यांनी जेलभरो सत्याग्रह केल्यामुळे केंद्र सरकारची फटफजिती झाली. त्यामुळे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रींनी सन्मानाने वाटाघाटी करण्याचे आमंत्रित करून 30 जानेवारी 1965 ला प्रधानमंत्री शास्त्री, गृहमंत्री नंदा, संरक्षणमंत्री चव्हाण यांच्याशी रिपब्लिकन नेत्यांची चर्चा होऊन मागण्या मान्य करून सत्याग्रह स्थगित करण्यात आला .हे यश भारतीय रिपब्लिकन पक्ष नेते, कार्यकर्ते यांना जाते. यात बॅरिस्टर राजाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाणे 2 लाख 45 हजार एकर पडीक जमिनीचे वाटप भूमिहीनांना केले. समाजकारणाला राजकारणाची साथ मिळाली तर समस्या सोडविणे सोपे होते त्यामुळे डायरेक्टर राजाभाऊंनी राजकारणातून समाजकारण करीत होते. दलितांच्या सामाजिक प्रश्नांना राजकीय प्रश्न समजून आवाज उठवीत होते. 1943 ते 1945 या कालावधीत राजाभाऊ हे मध्य प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनचे सचिव होते. या काळात भव्य मोर्चा काढून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आवाज उठविला .1952 ते 1955 या काळात चंद्रपूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष असताना विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता प्रवृत्त करून पालिकेच्या शाळेत अस्पृश्य शिक्षकाला शिक्षक म्हणून संधी दिली. त्यांच्या नेमणुका केल्या. राजाभाऊंचे सक्रिय राजकीय जीवन चंद्रपूर पासून सुरू झाले. अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन गोळा बाजारात अनेक दलित इसमांना दुकानांची व्यवस्था करून दिली. ही कुटुंबे आजही व्यवसायावर ताठमानेने जीवन जगत आहेत. बाबासाहेबांनी 1936 आली काँग्रेसची एक पक्षीय हुकूमशाही येऊ नये म्हणून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांचे अध्यक्षस्थान एन.शिवराज यांना देण्यात आले. या पक्षाला महारेतर दलित समाजाकडून आणि शोषित स्पृश्य समाजाकडून योग्य पाठिंबा मिळत नाही म्हणून 1942 आली अस्पृश्यांच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र पक्ष असावा या उद्देशाने शेड्युल कास्ट फेडरेशन नावाच्या दुसऱ्या पक्षाची स्थापना करण्यात आली. 1953 मध्ये नागपूर शेड्युल कास्ट फेडरेशन च्या अध्यक्षपदी बॅरिस्टर राजाभाऊंना बहाल करण्यात आले प्रथम संघटनात्मक बांधणी करण्यासाठी लहान मोठी शहरे पालथी घातली सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या नवचैतन्य निर्माण केले. भंडारा लोकसभा मतदारसंघात बाबासाहेब उभे असताना बॅरिस्टर राजाभाऊ यांना निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. रात्रंदिवस एक करून प्रचार केला यात संघटन चातुर्य समाजनिष्ठ आणि कर्तृत्वाची ओळख बाबासाहेबांना झाली 1955 मध्ये राजाभाऊंना शेड्युल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस पदी नियुक्ती केली. बाबासाहेबांनी आपल्या उत्तरार्धात ज्या काही मोजक्या तरुणावर भिस्त होती त्यापैकी बॅरिस्टर राजाभाऊंचे फार वरचे स्थान आहे. नेतृत्वगुण ओळखून आपल्या महान नेत्यांनी एखाद्याच्या कर्तुत्वाला अंकुरित करण्याचे सामर्थ्य घ्यावं हा योगायोग नव्हता तर काळाची गरज होती. बाबासाहेबांच्या सहवासामुळे पुष्कळ काही बॅरिस्टर राजाभाऊंना शिकायला मिळाले. बाबासाहेबांनी निदर्शनास आणून दिलेल्या उनिवा बॅरिस्टर राजाभाऊ यांना पूर्ण करता येऊ शकल्या .तसेच बाबासाहेबांनी संवाद साधण्याची संधी मिळाली. यथोचित मार्गदर्शन मिळाले. त्यातून राजाभाऊंचे व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून निघाले. नागपूर प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष झाल्यावर त्यांचा दादासाहेब गायकवाड यांच्याशी अगदी जवळचा संबंध आला. त्यांचे वक्तृत्व राजाभाऊंना आकृष्ट करू लागले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रेसिदियम स्थापन करण्यात आले. त्यांचे अध्यक्षपदही बहाल करण्यात आले. कारण राजाभाऊ वर कामाचा डोंगर असायचा ते जिवापाड मेहनत करून बाबासाहेबांना साथ द्यायचे हे सर्व बाबासाहेब यांचे सहकारी पाहत होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतर बॅरिस्टर राजाभाऊंनी कार्याला जोरात सुरूवात केली. पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करू लागले. अध्यक्ष झाल्यावर दलित हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 1957 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या बैठकीत दादासाहेब गायकवाड यांच्याशी चर्चा करून उमेदवार निश्चित केले. देशात 25 जागा लढण्याचा निर्णय घेतला.दोघांनीही संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रचार करून पक्षाची बाजू बळकट केली. पैसा नाही प्रचाराची साधने नाहीत गाड्या नाहीत विरुद्ध काँग्रेस जवळ सत्ता व मुबलक पैसा यांच्याजवळ होता यांच्याकडे फक्त एक गोष्ट ती बाबासाहेबांचे तत्वज्ञान.

खिशात दमडी नाही किती दिवस बाहेर राहावे लागेल याचा नेम नाही. अशाही परिस्थितीत कार्यकर्ते प्रचाराला लागले झपाट्याने प्रचार केला अध्यक्ष राजाभाऊंनी विविध ठिकाणी दौरे केले 9 ते11 मार्चला मतदान होऊन निकाल जाहीर झाला. शेड्युल कास्ट फेडरेशनला भरगोस यश मिळाले. 25 पैकी नऊ खासदार बॅरिस्टर राजाभाऊ यांच्या नेतृत्वात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत यश संपादन केले .या निकालामुळे बाबासाहेबांच्या अनुयायात आणि कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. अशातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. राजाभाऊंनी महाराष्ट्रात शेड्युल कास्ट फेडरेशन व संयुक्त महाराष्ट्र समितीसी युती करण्यात आली. लोकसभा यशाने आत्मविश्वास वाढला. या निवडणुकीत राजाभाऊंनी स्वतःला गुंतवून घेतले. या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 17 आमदार निवडून आले पंजाबमधून पाच, कर्नाटक मधून दोन ,आंध्रमधून एक ,गुजरात मधून दोन ,मद्रास मधून दोन, असे एकूण 29 आमदार संपूर्ण भारतातून निवडून आले. राजाभाऊंच्या अध्यक्षतेखाली शेड्युल कास्ट फेडरेशनला मिळालेला हा ऐतिहासिक विजय होता. मुंबई महापालिकेत शेड्युल कास्ट फेडरेशन ला भरघोस यश येऊन पि.टी बोराळे मुंबईचे मेयर झाले खऱ्या अर्थाने यशाची सुरुवात झाली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आपला दरारा निर्माण केला. इतर पक्षाच्या अनु याया पेक्षा शेड्युल कास्ट फेडरेशनचे अनुयायी अधिक निष्ठावान व त्यागी असे होते की, कुठे नेत्यांच्या सभा असत तेथे तेथे कधी पायी तर कधी स्वखर्चाने एक कर्तव्य म्हणून जात-येत असत इतके प्रामाणिक की निवडणुकीत मतदानासाठी जाताना देखील एका पैशाची अपेक्षा करीत नसत वाहनासाठी खर्चाचा आग्रह उमेदवाराकडे न करता बाबासाहेबांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मतदान एक परम कर्तव्य म्हणून धोतराला घरची चटणी भाकरी बांधून दोन तीन मैल अंतरावरील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करी. समविचारी लोकांना एकत्र येऊन जाती जमाती च्या पलीकडे जाऊन शोषितांचे राजकारण करण्यासाठी एक नवा पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता बाबासाहेबांना वाटू लागली .त्यातूनच रिपब्लिकन पक्ष ही संकल्पना आकाराला येऊ लागली नवीन पक्षाला “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया” असे नाव देण्याचे ठरले. 1936 ला स्वतंत्र मजूर पक्ष, 1942 ला अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या दोन्ही पक्षाच्या वाट्याला पराभवाला आला त्यामुळे नव्या पक्षाची आखणी केली. बाबासाहेब म्हणतात,” इलेक्शन ही क्रिकेटची मॅच आहे क्रिकेटमध्ये पराभव झालेली टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही तर ती पुन्हा दुसऱ्या वर्षी नव्या जोमाने खेळायला सुरुवात करते .असाच आशावाद ठेवला पाहिजे.” नागपूर येथे नवीन पक्षाबद्दल बाबासाहेबांनी सूतोवाच वर्तमानपत्राच्या मुलाखतीत केले होते. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांचा संकल्प पूर्ण झाला नाही. शेड्युल कास्ट फेडरेशन ची शेवटची बैठक 2 ऑक्टोबर 19 57 ला संपन्न होऊन दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर 1957 ला सात लाख लोकांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. ही जगातील अभूतपूर्व घटना होती कारण एका राजकीय पक्षाच्या स्थापने साठी सात लाख लोकांची उपस्थित राहण्याचा हा विक्रम होता. पक्षाचे पहिले अध्यक्ष एन.शिवराज यांना करण्यात आले. नवीन पक्ष स्थापनेत बॅरिस्टर राजाभाऊंची महत्त्वाची भूमिका होती. एन. शिवराज यांना राजाभाऊंनी अध्यक्षस्थानी स्वतः आणून बसविले. रिपब्लिकन पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी राजाभाऊ यांच्यावर आली आंबेडकर चळवळीचे संगोपन करण्याचे ऐतिहासिक मोलाचे कार्य पार पाडण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. रिपब्लिकन पक्ष व बॅरिस्टर राजाभाऊंचे हे आंबेडकर चळवळीचे दोन घटक एक जीव झाले. पक्षाचा इतिहास म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊंचे जीवन चरित्र होय. 1957 ते 1967 या काळात पक्षाला वेगवेगळ्या विचारांची बाधा होऊ लागली. या पोलादी संघटनेला स्वार्थाची आणि सत्तेच्या आमिषाने ग्रासले. दुरुस्त व नादुरुस्त वादला पेव फुटले पळापळ सुरू झाली. हा पक्ष बहुजन समाजासाठी असल्याने बॅरिस्टर राजाभाऊंनी कबुली दिली. काँग्रेस पक्षाची संघर्ष करावा लागेल ही त्यांची विचारधारा तयार झाली होती. 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूरला रिपब्लिकन पक्ष साकार झाला. 1957 च्या निवडणुकीत यशही मिळाले आता पक्षात मतभिन्नता होऊ लागली. जरी हे लोकशाही मूल्यांना प्रबळ करणारी असेल पण त्यात स्वार्थ डोकावता कामा नये. कालांतराने शह-काटशह डावपेच खेळल्या जाऊ लागले. याची जाणीव बॅरिस्टर राजाभाऊंना होऊ लागली. बाबासाहेबांनी इथपर्यंत आणलेल्या प्रगतीचा रथ मागे जाता कामा नये ही जाणीव राजाभाऊना होती. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. पक्ष एक संघ असला पाहिजे याकरिता प्रथम प्राधान्य दिले. रिपब्लिकन पक्षाचे शकले पडून तीन गट निर्माण झाले. कालांतराने स्वार्थापोटी आठ गट निर्माण झाले. त्यामुळे बॅरिस्टर राजाभाऊ खूप अस्वस्थ झाले. दादासाहेबांना पक्षाघाताने विकलांग केले तेव्हा काही राजकीय नेत्यांनी याचा लाभ उठविला. दादासाहेब राजाभाऊ एकत्र येऊ नये असे डाव टाकले गेलेआपल्या शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकन पक्ष एकत्र रहावा या मताचे होते. बॅरिस्टर राजाभाऊंनी 1942 ते 1984 पर्यंतच्या तब्बल चार दशकांचा काळ त्यांनी चळवळीत व्यतीत केला. या कालखंडात चळवळीचे अनेक चढ-उतार त्यांनी अनुभवले ऐक्याच्या आड येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी काँग्रेस पक्षाची सबंध विच्छेदन. परंतु 15 सदस्यांचे प्रेसिदियम या बैठकीत उपस्थित होते. पक्ष ए क्यापुढे आता कोणताही गट राहणार नाही, कोणताही मतभेद नाहीत रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत मतभेदाचा फायदा घेऊन 18 वर्षानंतर पुन्हा या चळवळीला बदनाम करण्याचा दुष्ट कारवाया या देशातील काही लोकांनी सुरू केल्या .आमच्यातील काही बहीकलेल्या तरुणांना हाताशी धरून डाव्या पक्षांनी आमच्या चळवळीत सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. मुंबईची विराट सभा पाहून कुटील डाव उधळलेला गेला. हे सत्य स्पष्ट दिसून येईल परंतु हेही फार काळ टिकू शकले नाही .शेवटी रिपब्लिकन पक्ष आपापल्या राहोत्या निर्माण करून पक्षाला विकलांग करीत गेले. ऐक्याच्या बाबतीत बॅरिस्टर राजाभाऊ यांच्यावरही टीका झाल्या. पण ते डगमगले नाही यावर त्यांना प्रश्न विचारला की दोन गटाचे नजीकच्या काळात विलीनीकरण होईल काय? याबद्दल बोलताना तो पक्ष एक मृगजळाचा भास आहे .दुसऱ्याच्या तालानुसार नाचणारा तो पक्ष आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष कसा ठरतो. त्या पक्षाला स्वतःचे अस्तित्व तरी कुठे? बाबासाहेबांचे कार्य त्यांना पुढे न्यायचे होते. त्यांना पदाचा हव्यास कधीच नव्हता. फुटीरवाद्यांना बॅरिस्टर राजाभाऊ निर्वाणीचा इशारा देतात की, आमच्या कृतीमुळे जर पक्षाचे अहित होत असेल संघटनेच्या एकयात बिघाड होत असेल व अशी जनतेची खात्री पटत असेल तर मी बाबासाहेबांची संघटना अभेद्य राहण्यासाठी व पक्ष संघटनेसाठी माझ्या पदाचा त्याग करण्यास तयार आहे.

बॅरिस्टर राजाभाऊंनी अनेकांनी विश्वास घात केला त्यांनी आपला दरारा निर्माण केला. पक्षाचे दीपस्तंभ बनले. हुजरे यांनी मुजरे करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड नव्हता. 1957 ते 1970 पर्यंत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस म्हणून आपली जबाबदारी भक्कम पणे पार पाडली. 19 70 ला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या जगण्याचा श्वास म्हणजे रिपब्लिकन पक्ष होता. पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात अंतर्गत मतभेद झाले ते इतिहासास नाकारू शकत नाही. त्यांचे विपरीत परिणाम पक्षावर झाला. पक्ष वेगवेगळ्या गटात विभागला गेला रिपब्लिकन पक्ष्यासारखी मजबूत संघटना विस्कळीत झाली. केवळ निवडणुकीत जागा मिळवणे हे एक साधन आहे ,साध्य नव्हे. दुरुस्त रिपब्लिकन पक्ष व नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष नादुरुस्त रिपब्लिकन पक्षाचे दोन गट. एन. शिवराज यांचे निधन झाले. काही दिग्गज काँग्रेसवासी झाले. भंडारे, गाणार ,गवळी ,कांबळे इत्यादी. 10 ऑक्टोबर 1970 ला नागपूर येथे रिपब्लिकन पक्ष्यांची अधिवेशन झाले. त्यात बॅरिस्टर राजाभाऊंना सरचिटणीस पदावरून काढून टाकण्यात धक्कादायक ठराव होता. त्यामुळे पक्षाच्या फुटीवर शिक्का मारतब झाले. तर राजाभाऊंनी पक्षाच्या सहकार्याची विचारविनिमय करून आत्ता 11 ऑक्टोबर 19 70 ला खोबरागडे रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला. एकाच नागपूर या ऐतिहासिक शहरात रिपब्लिकन पक्षाचे दोन अधिवेशने झाले. रिपब्लिकन पक्षाला कमकुवत करण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहेत काँग्रेस बरोबर केलेली युती नडली. काँग्रेसने अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केली. पक्षात फूट पडली याला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. बॅरिस्टर राजाभाऊंना सत्तारूढ काँग्रेस तर्फे कितीतरी प्रलोभने आली पण त्यांच्या आहारी कधीच गेले नाही. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी आपला तोल ढळू दिला नाही. सम्यक आणि वैचारिक पातळीवर केलेल्या टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागणाऱ्या होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले,दलित ,गरीब, शेतमजूर ,शेतकरी, कष्टकरी यांच्या साठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले. आणीबाणी, निवडणूक पद्धतीत बदल, एक सदस्य मतदारसंघ, ग्रामपंचायत आधुनिक मनुचे राज्य, राखीव मतदार संघाला विरोध ,यामुळ दररोज हजारो लोक तुरुंगाची वाट धरत होते. रिपब्लिकन पक्षाच्या सत्याग्रहींना अटक करून महिनोंमहिने जेलची हवा खायला लावू असा मनसुबा सरकारचा होता. देशभरात पक्षाचे बारा लाख प्राथमिक सदस्य असताना फक्त तीन लाख सदस्यांनी जेलभरो सत्याग्रह केल्यामुळे केंद्र सरकारची फटफजिती झाली. त्यामुळे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रींनी सन्मानाने वाटाघाटी करण्याचे आमंत्रित करून 30 जानेवारी 1965 ला प्रधानमंत्री शास्त्री, गृहमंत्री नंदा, संरक्षणमंत्री चव्हाण यांच्याशी रिपब्लिकन नेत्यांची चर्चा होऊन मागण्या मान्य करून सत्याग्रह स्थगित करण्यात आला .हे यश भारतीय रिपब्लिकन पक्ष नेते, कार्यकर्ते यांना जाते. यात बॅरिस्टर राजाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाणे 2 लाख 45 हजार एकर पडीक जमिनीचे वाटप भूमिहीनांना केले. समाजकारणाला राजकारणाची साथ मिळाली तर समस्या सोडविणे सोपे होते त्यामुळे डायरेक्टर राजाभाऊंनी राजकारणातून समाजकारण करीत होते. दलितांच्या सामाजिक प्रश्नांना राजकीय प्रश्न समजून आवाज उठवीत होते. 1943 ते 1945 या कालावधीत राजाभाऊ हे मध्य प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनचे सचिव होते. या काळात भव्य मोर्चा काढून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आवाज उठविला .1952 ते 1955 या काळात चंद्रपूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष असताना विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता प्रवृत्त करून पालिकेच्या शाळेत अस्पृश्य शिक्षकाला शिक्षक म्हणून संधी दिली. त्यांच्या नेमणुका केल्या. राजाभाऊंचे सक्रिय राजकीय जीवन चंद्रपूर पासून सुरू झाले. अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन गोळा बाजारात अनेक दलित इसमांना दुकानांची व्यवस्था करून दिली. ही कुटुंबे आजही व्यवसायावर ताठमानेने जीवन जगत आहेत. बाबासाहेबांनी 1936 आली काँग्रेसची एक पक्षीय हुकूमशाही येऊ नये म्हणून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांचे अध्यक्षस्थान एन.शिवराज यांना देण्यात आले. या पक्षाला महारेतर दलित समाजाकडून आणि शोषित स्पृश्य समाजाकडून योग्य पाठिंबा मिळत नाही म्हणून 1942 आली अस्पृश्यांच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र पक्ष असावा या उद्देशाने शेड्युल कास्ट फेडरेशन नावाच्या दुसऱ्या पक्षाची स्थापना करण्यात आली. 1953 मध्ये नागपूर शेड्युल कास्ट फेडरेशन च्या अध्यक्षपदी बॅरिस्टर राजाभाऊंना बहाल करण्यात आले प्रथम संघटनात्मक बांधणी करण्यासाठी लहान मोठी शहरे पालथी घातली सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या नवचैतन्य निर्माण केले.

भंडारा लोकसभा मतदारसंघात बाबासाहेब उभे असताना बॅरिस्टर राजाभाऊ यांना निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. रात्रंदिवस एक करून प्रचार केला यात संघटन चातुर्य समाजनिष्ठ आणि कर्तृत्वाची ओळख बाबासाहेबांना झाली 1955 मध्ये राजाभाऊंना शेड्युल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस पदी नियुक्ती केली. बाबासाहेबांनी आपल्या उत्तरार्धात ज्या काही मोजक्या तरुणावर भिस्त होती त्यापैकी बॅरिस्टर राजाभाऊंचे फार वरचे स्थान आहे. नेतृत्वगुण ओळखून आपल्या महान नेत्यांनी एखाद्याच्या कर्तुत्वाला अंकुरित करण्याचे सामर्थ्य घ्यावं हा योगायोग नव्हता तर काळाची गरज होती. बाबासाहेबांच्या सहवासामुळे पुष्कळ काही बॅरिस्टर राजाभाऊंना शिकायला मिळाले. बाबासाहेबांनी निदर्शनास आणून दिलेल्या उनिवा बॅरिस्टर राजाभाऊ यांना पूर्ण करता येऊ शकल्या .तसेच बाबासाहेबांनी संवाद साधण्याची संधी मिळाली. यथोचित मार्गदर्शन मिळाले. त्यातून राजाभाऊंचे व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून निघाले. नागपूर प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष झाल्यावर त्यांचा दादासाहेब गायकवाड यांच्याशी अगदी जवळचा संबंध आला. त्यांचे वक्तृत्व राजाभाऊंना आकृष्ट करू लागले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रेसिदियम स्थापन करण्यात आले. त्यांचे अध्यक्षपदही बहाल करण्यात आले. कारण राजाभाऊ वर कामाचा डोंगर असायचा ते जिवापाड मेहनत करून बाबासाहेबांना साथ द्यायचे हे सर्व बाबासाहेब यांचे सहकारी पाहत होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतर बॅरिस्टर राजाभाऊंनी कार्याला जोरात सुरूवात केली. पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करू लागले. अध्यक्ष झाल्यावर दलित हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 1957 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या बैठकीत दादासाहेब गायकवाड यांच्याशी चर्चा करून उमेदवार निश्चित केले. देशात 25 जागा लढण्याचा निर्णय घेतला.दोघांनीही संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रचार करून पक्षाची बाजू बळकट केली. पैसा नाही प्रचाराची साधने नाहीत गाड्या नाहीत विरुद्ध काँग्रेस जवळ सत्ता व मुबलक पैसा यांच्याजवळ होता यांच्याकडे फक्त एक गोष्ट ती बाबासाहेबांचे तत्वज्ञान. खिशात दमडी नाही किती दिवस बाहेर राहावे लागेल याचा नेम नाही. अशाही परिस्थितीत कार्यकर्ते प्रचाराला लागले झपाट्याने प्रचार केला अध्यक्ष राजाभाऊंनी विविध ठिकाणी दौरे केले 9 ते11 मार्चला मतदान होऊन निकाल जाहीर झाला. शेड्युल कास्ट फेडरेशनला भरगोस यश मिळाले. 25 पैकी नऊ खासदार बॅरिस्टर राजाभाऊ यांच्या नेतृत्वात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत यश संपादन केले .या निकालामुळे बाबासाहेबांच्या अनुयायात आणि कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. अशातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. राजाभाऊंनी महाराष्ट्रात शेड्युल कास्ट फेडरेशन व संयुक्त महाराष्ट्र समितीसी युती करण्यात आली. लोकसभा यशाने आत्मविश्वास वाढला. या निवडणुकीत राजाभाऊंनी स्वतःला गुंतवून घेतले. या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 17 आमदार निवडून आले पंजाबमधून पाच, कर्नाटक मधून दोन ,आंध्रमधून एक ,गुजरात मधून दोन ,मद्रास मधून दोन, असे एकूण 29 आमदार संपूर्ण भारतातून निवडून आले. राजाभाऊंच्या अध्यक्षतेखाली शेड्युल कास्ट फेडरेशनला मिळालेला हा ऐतिहासिक विजय होता.

मुंबई महापालिकेत शेड्युल कास्ट फेडरेशन ला भरघोस यश येऊन पि.टी बोराळे मुंबईचे मेयर झाले खऱ्या अर्थाने यशाची सुरुवात झाली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आपला दरारा निर्माण केला. इतर पक्षाच्या अनु याया पेक्षा शेड्युल कास्ट फेडरेशनचे अनुयायी अधिक निष्ठावान व त्यागी असे होते की, कुठे नेत्यांच्या सभा असत तेथे तेथे कधी पायी तर कधी स्वखर्चाने एक कर्तव्य म्हणून जात-येत असत इतके प्रामाणिक की निवडणुकीत मतदानासाठी जाताना देखील एका पैशाची अपेक्षा करीत नसत वाहनासाठी खर्चाचा आग्रह उमेदवाराकडे न करता बाबासाहेबांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मतदान एक परम कर्तव्य म्हणून धोतराला घरची चटणी भाकरी बांधून दोन तीन मैल अंतरावरील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करी. समविचारी लोकांना एकत्र येऊन जाती जमाती च्या पलीकडे जाऊन शोषितांचे राजकारण करण्यासाठी एक नवा पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता बाबासाहेबांना वाटू लागली .त्यातूनच रिपब्लिकन पक्ष ही संकल्पना आकाराला येऊ लागली नवीन पक्षाला “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया” असे नाव देण्याचे ठरले. 1936 ला स्वतंत्र मजूर पक्ष, 1942 ला अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या दोन्ही पक्षाच्या वाट्याला पराभवाला आला त्यामुळे नव्या पक्षाची आखणी केली. बाबासाहेब म्हणतात,” इलेक्शन ही क्रिकेटची मॅच आहे क्रिकेटमध्ये पराभव झालेली टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही तर ती पुन्हा दुसऱ्या वर्षी नव्या जोमाने खेळायला सुरुवात करते .असाच आशावाद ठेवला पाहिजे.” नागपूर येथे नवीन पक्षाबद्दल बाबासाहेबांनी सूतोवाच वर्तमानपत्राच्या मुलाखतीत केले होते. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांचा संकल्प पूर्ण झाला नाही. शेड्युल कास्ट फेडरेशन ची शेवटची बैठक 2 ऑक्टोबर 19 57 ला संपन्न होऊन दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर 1957 ला सात लाख लोकांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. ही जगातील अभूतपूर्व घटना होती कारण एका राजकीय पक्षाच्या स्थापने साठी सात लाख लोकांची उपस्थित राहण्याचा हा विक्रम होता. पक्षाचे पहिले अध्यक्ष एन.शिवराज यांना करण्यात आले. नवीन पक्ष स्थापनेत बॅरिस्टर राजाभाऊंची महत्त्वाची भूमिका होती. एन. शिवराज यांना राजाभाऊंनी अध्यक्षस्थानी स्वतः आणून बसविले. रिपब्लिकन पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी राजाभाऊ यांच्यावर आली आंबेडकर चळवळीचे संगोपन करण्याचे ऐतिहासिक मोलाचे कार्य पार पाडण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. रिपब्लिकन पक्ष व बॅरिस्टर राजाभाऊंचे हे आंबेडकर चळवळीचे दोन घटक एक जीव झाले. पक्षाचा इतिहास म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊंचे जीवन चरित्र होय. 1957 ते 1967 या काळात पक्षाला वेगवेगळ्या विचारांची बाधा होऊ लागली. या पोलादी संघटनेला स्वार्थाची आणि सत्तेच्या आमिषाने ग्रासले. दुरुस्त व नादुरुस्त वादला पेव फुटले पळापळ सुरू झाली. हा पक्ष बहुजन समाजासाठी असल्याने बॅरिस्टर राजाभाऊंनी कबुली दिली. काँग्रेस पक्षाची संघर्ष करावा लागेल ही त्यांची विचारधारा तयार झाली होती. 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूरला रिपब्लिकन पक्ष साकार झाला. 1957 च्या निवडणुकीत यशही मिळाले आता पक्षात मतभिन्नता होऊ लागली. जरी हे लोकशाही मूल्यांना प्रबळ करणारी असेल पण त्यात स्वार्थ डोकावता कामा नये.

कालांतराने शह-काटशह डावपेच खेळल्या जाऊ लागले. याची जाणीव बॅरिस्टर राजाभाऊंना होऊ लागली. बाबासाहेबांनी इथपर्यंत आणलेल्या प्रगतीचा रथ मागे जाता कामा नये ही जाणीव राजाभाऊना होती. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. पक्ष एक संघ असला पाहिजे याकरिता प्रथम प्राधान्य दिले. रिपब्लिकन पक्षाचे शकले पडून तीन गट निर्माण झाले. कालांतराने स्वार्थापोटी आठ गट निर्माण झाले. त्यामुळे बॅरिस्टर राजाभाऊ खूप अस्वस्थ झाले. दादासाहेबांना पक्षाघाताने विकलांग केले तेव्हा काही राजकीय नेत्यांनी याचा लाभ उठविला. दादासाहेब राजाभाऊ एकत्र येऊ नये असे डाव टाकले गेलेआपल्या शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकन पक्ष एकत्र रहावा या मताचे होते. बॅरिस्टर राजाभाऊंनी 1942 ते 1984 पर्यंतच्या तब्बल चार दशकांचा काळ त्यांनी चळवळीत व्यतीत केला. या कालखंडात चळवळीचे अनेक चढ-उतार त्यांनी अनुभवले ऐक्याच्या आड येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी काँग्रेस पक्षाची सबंध विच्छेदन. परंतु 15 सदस्यांचे प्रेसिदियम या बैठकीत उपस्थित होते. पक्ष ए क्यापुढे आता कोणताही गट राहणार नाही, कोणताही मतभेद नाहीत रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत मतभेदाचा फायदा घेऊन 18 वर्षानंतर पुन्हा या चळवळीला बदनाम करण्याचा दुष्ट कारवाया या देशातील काही लोकांनी सुरू केल्या .आमच्यातील काही बहीकलेल्या तरुणांना हाताशी धरून डाव्या पक्षांनी आमच्या चळवळीत सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. मुंबईची विराट सभा पाहून कुटील डाव उधळलेला गेला. हे सत्य स्पष्ट दिसून येईल परंतु हेही फार काळ टिकू शकले नाही .शेवटी रिपब्लिकन पक्ष आपापल्या राहोत्या निर्माण करून पक्षाला विकलांग करीत गेले. ऐक्याच्या बाबतीत बॅरिस्टर राजाभाऊ यांच्यावरही टीका झाल्या. पण ते डगमगले नाही यावर त्यांना प्रश्न विचारला की दोन गटाचे नजीकच्या काळात विलीनीकरण होईल काय? याबद्दल बोलताना तो पक्ष एक मृगजळाचा भास आहे .दुसऱ्याच्या तालानुसार नाचणारा तो पक्ष आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष कसा ठरतो. त्या पक्षाला स्वतःचे अस्तित्व तरी कुठे? बाबासाहेबांचे कार्य त्यांना पुढे न्यायचे होते. त्यांना पदाचा हव्यास कधीच नव्हता. फुटीरवाद्यांना बॅरिस्टर राजाभाऊ निर्वाणीचा इशारा देतात की, आमच्या कृतीमुळे जर पक्षाचे अहित होत असेल संघटनेच्या एकयात बिघाड होत असेल व अशी जनतेची खात्री पटत असेल तर मी बाबासाहेबांची संघटना अभेद्य राहण्यासाठी व पक्ष संघटनेसाठी माझ्या पदाचा त्याग करण्यास तयार आहे. बॅरिस्टर राजाभाऊंनी अनेकांनी विश्वास घात केला त्यांनी आपला दरारा निर्माण केला. पक्षाचे दीपस्तंभ बनले. हुजरे यांनी मुजरे करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड नव्हता. 1957 ते 1970 पर्यंत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस म्हणून आपली जबाबदारी भक्कम पणे पार पाडली. 19 70 ला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या जगण्याचा श्वास म्हणजे रिपब्लिकन पक्ष होता. पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात अंतर्गत मतभेद झाले ते इतिहासास नाकारू शकत नाही. त्यांचे विपरीत परिणाम पक्षावर झाला. पक्ष वेगवेगळ्या गटात विभागला गेला रिपब्लिकन पक्ष्यासारखी मजबूत संघटना विस्कळीत झाली. केवळ निवडणुकीत जागा मिळवणे हे एक साधन आहे ,साध्य नव्हे. दुरुस्त रिपब्लिकन पक्ष व नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष नादुरुस्त रिपब्लिकन पक्षाचे दोन गट. एन. शिवराज यांचे निधन झाले. काही दिग्गज काँग्रेसवासी झाले. भंडारे, गाणार ,गवळी ,कांबळे इत्यादी. 10 ऑक्टोबर 1970 ला नागपूर येथे रिपब्लिकन पक्ष्यांची अधिवेशन झाले. त्यात बॅरिस्टर राजाभाऊंना सरचिटणीस पदावरून काढून टाकण्यात धक्कादायक ठराव होता. त्यामुळे पक्षाच्या फुटीवर शिक्का मारतब झाले. तर राजाभाऊंनी पक्षाच्या सहकार्याची विचारविनिमय करून आत्ता 11 ऑक्टोबर 19 70 ला खोबरागडे रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला. एकाच नागपूर या ऐतिहासिक शहरात रिपब्लिकन पक्षाचे दोन अधिवेशने झाले. रिपब्लिकन पक्षाला कमकुवत करण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहेत काँग्रेस बरोबर केलेली युती नडली. काँग्रेसने अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केली. पक्षात फूट पडली याला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. बॅरिस्टर राजाभाऊंना सत्तारूढ काँग्रेस तर्फे कितीतरी प्रलोभने आली पण त्यांच्या आहारी कधीच गेले नाही. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी आपला तोल ढळू दिला नाही. सम्यक आणि वैचारिक पातळीवर केलेल्या टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागणाऱ्या होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले,दलित ,गरीब, शेतमजूर ,शेतकरी, कष्टकरी यांच्या साठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले. आणीबाणी, निवडणूक पद्धतीत बदल, एक सदस्य मतदारसंघ, ग्रामपंचायत आधुनिक मनुचे राज्य, राखीव मतदार संघाला विरोध ,नागपूर हायकोर्ट ची आवश्यकता, भाषावार प्रांतरचना, काश्मिर हा भारताचा भाग, शिमला करार चिनी सरकारचा निषेध, बांगलादेश ऐतिहासिक निर्णय, भारताची राष्ट्रभाषा हिंदी ,संरक्षणासाठी भारताने अनुबॉम्ब बनवावा याबाबत पक्ष पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवर आपले रोखठोक विचार बॅरिस्टर राजाभाऊंनी मांडले. प्रत्येक चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी वृत्तपत्राची गरज असते. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, चळवळीची सुरुवात करताना वृत्तपत्राची अत्यंत गरज प्रतिपादन केली. 1920 मूकनायक, 1927 बहिष्कृत भारत, 1930 समता, 1956 प्रबुद्ध भारत ही नियतकालिके काढली. राजाभाऊंनी 3 मार्च 1969 ला प्रजासत्ताक नावाचे नवीन साप्ताहिक चंद्रपूर येथून सुरू केले. या साप्ताहिकाचे बॅरिस्टर राजाभाऊ संपादक होते. या साप्ताहिकात दर्जेदार लेखन, विचार प्रवर्तक लेख व देशभरातील चळवळीचा वृत्तान्त प्रकाशित व्हायचा अतिशय उत्तम छपाई हे साप्ताहिक लवकरच लोकप्रिय झाले. बॅरिस्टर राजाभाऊंनी कधीच धार्मिक हिशोब पाहला नाही. त्यामुळे प्रजासत्ताक आर्थिक अडचणीत येऊन बंद पडले. बॅरिस्टर राजाभाऊंनी संसदेत विरोधी पक्षाची भूमिका सक्षम पणे पाडली. 10 जानेवारी 1969 ला प्रधानमंत्री इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना भेटून भूमिहीनांचा प्रश्न, आरक्षण प्रश्न, अल्पसंख्यांक, बौद्धांना सवलती, अशा अनेक सामाजिक समस्यावर चर्चा करून लक्ष घालून सोडवण्याचे आश्वासन घेतले. अनेकदा रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून दिल्लीला संसदेवर मोर्चे, निदर्शनं , घेराव घातला. तरीही सरकार काही ठोस करीत नाही म्हणून 10 डिसेंबर 1969 ला राजाभाऊंच्या नेतृत्वात संसदेवर एक विशाल मोर्चा नेण्यात आला. पंजाब ,उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र ,हरियाणा ,मद्रास इत्यादी प्रांतातून मोर्चात सहभागी झाले. बॅरिस्टर राजाभाऊ, डी.पी मौर्य दोघे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना भेटले. अशा प्रश्नावर संसदेत आवाज उठविणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ होत. 17 डिसेंबर 1969 ला त्यांना राज्यसभेचे उपसभापती पद बहाल करण्यात आले ते 1972 पर्यंत उपसभापती होते. ह्या काळात त्यांनी राज्यसभेत दीन, दलितांच्या समस्या संसदेत मांडल्या.

5

नागपूर हायकोर्ट ची आवश्यकता, भाषावार प्रांतरचना, काश्मिर हा भारताचा भाग, शिमला करार चिनी सरकारचा निषेध, बांगलादेश ऐतिहासिक निर्णय, भारताची राष्ट्रभाषा हिंदी ,संरक्षणासाठी भारताने अनुबॉम्ब बनवावा याबाबत पक्ष पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवर आपले रोखठोक विचार बॅरिस्टर राजाभाऊंनी मांडले. प्रत्येक चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी वृत्तपत्राची गरज असते. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, चळवळीची सुरुवात करताना वृत्तपत्राची अत्यंत गरज प्रतिपादन केली. 1920 मूकनायक, 1927 बहिष्कृत भारत, 1930 समता, 1956 प्रबुद्ध भारत ही नियतकालिके काढली. राजाभाऊंनी 3 मार्च 1969 ला प्रजासत्ताक नावाचे नवीन साप्ताहिक चंद्रपूर येथून सुरू केले. या साप्ताहिकाचे बॅरिस्टर राजाभाऊ संपादक होते. या साप्ताहिकात दर्जेदार लेखन, विचार प्रवर्तक लेख व देशभरातील चळवळीचा वृत्तान्त प्रकाशित व्हायचा अतिशय उत्तम छपाई हे साप्ताहिक लवकरच लोकप्रिय झाले. बॅरिस्टर राजाभाऊंनी कधीच धार्मिक हिशोब पाहला नाही. त्यामुळे प्रजासत्ताक आर्थिक अडचणीत येऊन बंद पडले. बॅरिस्टर राजाभाऊंनी संसदेत विरोधी पक्षाची भूमिका सक्षम पणे पाडली. 10 जानेवारी 1969 ला प्रधानमंत्री इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना भेटून भूमिहीनांचा प्रश्न, आरक्षण प्रश्न, अल्पसंख्यांक, बौद्धांना सवलती, अशा अनेक सामाजिक समस्यावर चर्चा करून लक्ष घालून सोडवण्याचे आश्वासन घेतले. अनेकदा रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून दिल्लीला संसदेवर मोर्चे, निदर्शनं , घेराव घातला. तरीही सरकार काही ठोस करीत नाही म्हणून 10 डिसेंबर 1969 ला राजाभाऊंच्या नेतृत्वात संसदेवर एक विशाल मोर्चा नेण्यात आला. पंजाब ,उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र ,हरियाणा ,मद्रास इत्यादी प्रांतातून मोर्चात सहभागी झाले. बॅरिस्टर राजाभाऊ, डी.पी मौर्य दोघे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना भेटले. अशा प्रश्नावर संसदेत आवाज उठविणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ होत. 17 डिसेंबर 1969 ला त्यांना राज्यसभेचे उपसभापती पद बहाल करण्यात आले ते 1972 पर्यंत उपसभापती होते. ह्या काळात त्यांनी राज्यसभेत दीन, दलितांच्या समस्या संसदेत मांडल्या.

सरकारला धारेवर धरले तरी त्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा घडून आवाज उठविला. उपसभापती म्हणून काम करताना त्यांनी राज्य सभेचे संचालन निरपेक्षपणे केले. कधी सरकारला खडक इशारा दिला तर कधी सदस्यांना समज दिली. हा दूरचा व हा जवळचा असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. परंतु दलित मजूर शेतकरी, कष्टकरी ,अल्पसंख्यांक यांच्या समस्या बाबत कधीच तडजोड केली नाही. कारण त्यांचा पिंड हा संघर्षाचा होता. त्यांचा राज्यसभेत दबदबा होता. त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण असे ते कधीही लोकांना होसविण्यासाठी भाषण करीत नव्हते तर विचार प्रवृत्त करणे हे त्यांच्या भाषणाचे मर्म होता. बॅरिस्टर राजाभाऊ 1958 ते 1964, 1966 ते1972, 1978 ते 1984 असे18 वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. सदर काळात त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपल्या भूमिका मांडल्या. बौद्धदलितांच्या समस्या हा त्यांच्या स्वयंप्रेरणेनेचा भाग होता. अखिल भारतीय सर्विसेस, अन्न समस्या बाबत पंचसूत्री, पंचायत बिल कम्युनिस्ट बाबत, भारताची राष्ट्र भाषा, इंग्रजी भाषा चा वापर आवश्यक, मुंदडा प्रकरण, पूर्व बंगाल निर्वासितांचा प्रश्न, नागपूरला हायकोर्ट, अनुसूचित जाती-जमातीतील नोकर वर्गाची सूडबुद्धीने छळवणूक होऊ नये ,पंचवार्षिक योजना ,6 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन वर विचार, एडवोकेट बिलावर चर्चा, शेड्युल कास्ट, शेडूल ट्राईब कमिशन रिपोर्ट, इंडियन पिनल कोड बिल, राष्ट्रीय एकात्मता या आणि अशा अनेक प्रश्नावर त्यांनी विचार मांडून सरकारला धारेवर धरले. बऱ्याच समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलाबॅरिस्टर राजाभाऊ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. लोकशाहीचे पुरस्कर्ते, भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार ,कामगार संघटना, स्त्रियांचा सर्वांगीण विकास, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, मंडल आयोग, समाजसुधारका बाबतचे विचार याबाबत संसदेत व संसदेच्या बाहेर सडेतोड विचार मांडले. राजकारणात दिलेर व निगर्वी मानस दुर्मिळ असतात. बॅरिस्टर राजेभाऊ सारखा एखाद व्यक्तिमत्व प्रत्ययास येते. मनाने स्वच्छ आणि निर्मळ असा त्यांचा स्वभाव होता. तो संस्कारातून तयार झालेला स्वभाव असतो. राजकारणातील यश हे क्षणिक असते त्यामुळे हुरळून जाणारे बॅरिस्टर राजाभाऊ चे व्यक्तिमत्त्व नव्हते. त्यांनी आव्हानांना सामोरे जात जात आयुष्याची वाटचाल केली. मोठ्या मुक्कामावर पोचलो. 1969 च्या “प्रजासत्ताक” साप्ताहिकात प्रकाशित झालेले साहित्य आंबेडकरी चळवळीचा दस्तऐवज होता. 1974 ला प्रकाशित झालेले लेख “रावण दहन”, “ब्राम्हणी षडयंत्र”, “पुरीचा डुकराचार्य” त्या लेखामुळे जातीय व धार्मिक तणाव निर्माण झाला. बौद्ध समाजाविरुद्ध संघर्ष उभा राहिला. बौद्धसंस्था, राजाभाऊ चे निवासस्थान हे हिंदूचे लक्ष्य ठरविण्यात आले. शैक्षणिक संस्था व निवासवर दगडफेक होऊन नुकसान करण्यात आले. 7,8 हजार हिंदुत्ववाद्यांनी हल्ला चढविला. लाठ्या ,काठ्या, दगड, विटा घेऊन बॅरिस्टर राजाभाऊंना बाहेर येण्यास आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत राजाभाऊ बाहेर येऊन उभे राहिले त्यांना दगडांचा मारही सहन करावा लागला. निश्चल उभे राहून जातिवादयांचा हल्ला समर्थपणे त्यांनी परतवून लावला. सारे या क्षणी आश्चर्यचकित झाले. खंबीर ,कणखर व बाणेदार नेतृत्व निडरता व निर्भिडता प्रत्ययास आली. पाहुण्यांचे आतिथ्य करणारे संस्कार त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते. नाटक, साहित्यत त्यांना रुची होती. आपुलकी, आत्मीयता आणि आतिथ्य यांचा संगम म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ. विनोदी साहित्य आणि नाट्य यांचा आस्वाद चाखणारे तरल ,भावनात्मक मन राजाभाऊंचे होते. बॅरिस्टर राजाभाऊंनी महात्मा फुले यांचे “विद्येविना मती गेली “हे तत्व आत्मसात केले. शिक्षण म्हणजे परिवर्तन हे बाबासाहेबांनी जाणलं होतं. जसे बाबासाहेब शिक्षणाप्रती सजग होते. शिक्षणाच्या अभावी मनुष्य निर्बुद्ध राहिल्यास दुसऱ्याचा गुलाम होतो याची संमेक जाणीव बॅरिस्टर राजाभाऊंना होती. समता सैनिक दलात त्यांनी लहान असताना काम केले. देवाची बापू यांनी ही चंद्रपुरात समता सैनिक दलाची स्थापना केली. त्यांच्याच वारसा राजाभाऊंनी चालविला. ज्या बल्लारपूरात इंग्रजी व मराठी शाळा सुरू करण्याचे श्रेय हे नगरपालिकेचे अध्यक्ष देवाची बापू असताना त्यांनीच अनेक शाळा सुरू केल्या. शिक्षणाचे सर्व श्रेय त्यांना जाते. त्या शिक्षण संस्थेचा वारसा राजाभाऊंना मिळाला होता. त्यांना स्वतः नगरपरिषद चंद्रपूरचे उपाध्यक्ष असताना नगरपरिषद चंद्रपूर येथे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. मागास मुला मुली ना शाळेत येण्यास प्रोत्साहित करून मागासवर्गीय शिक्षकांची आपल्या कार्यकाळात भरती केली. त्याच बरोबर राज्यसभा सदस्य व राज्यसभा उपाध्यक्ष असतानाही त्यांनी संसदेच्या पटलावर वेळोवेळी व्यक्त केलेले शैक्षणिक विचार मोलाचे आहेत. बॅरिस्टर राजाभाऊंनी 1957 ला शिक्षण संस्थेद्वारे चंद्रपूर येथे विद्यालय वरोरा येथे होस्टेल स्थापन करून शैक्षणिक संस्थेचे बीजारोपण केले. 1961ला चंद्रपूर येथे विद्यालय व होस्टेल आणि नानोरी येथे हायस्कूल स्थापना केली. 1969 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी ची स्थापना केली. 1970 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची स्थापना केली. 1972 ला ब्रह्मपुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ची स्थापना करून बॅरिस्टर राजाभाऊंनी या परिसरात शिक्षणाची पायाभरणी केली. आपल्याकडील महत्त्वाचे ग्रंथ साहित्य आणि राज्यसभेचे भाषणे आंबेडकर महाविद्यालयात चंद्रपूर येथील ग्रंथ साहित्य महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जतन करण्याकरिता दिले होते. राजा भाऊ यांना ग्रंथाला हे शिक्षण चळवळीचे महत्वाचे हत्यार वाटायचे मागासलेल्या च्या प्रगतीचे शिक्षण हे प्रभावी माध्यम समजून बॅरिस्टर राजाभाऊ यांनी शैक्षणिक संस्था स्थापन करून चंद्रपूर गडचिरोली परिसरात शिक्षणाचे जाळे विणले. राजाभाऊ हे 1962 ते 1965 आणि 1967 ते1969 या काळात नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य होते. 1961 मध्ये इं नवर्सिटी ग्रँड कमिशन चा रिपोर्टवर राज्य सभेत भाषण करताना या संदर्भातील शैक्षणिक बाबींवर प्रकाश टाकला आहे. करारी भरारी आणि धडाडी म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ! उमदा स्वभाव ,उत्तम वकृत्व, संवाद पटूत्व व स्वाभिमानी बाणा, उच्च राहणीमान, राजकीय प्रश्नांची जाण, आंतरराष्ट्रीय भान, कुशल संघटक, भारदस्त बुलंद आवाज आणि संविधानावर प्रभुत्व या त्यांच्या गुणामुळे समतेच्या सगरातील महान योद्धा म्हणून ते मान्यता पावले. आता त्यांचे वय साठीच्या जवळपास आले होते. तरीही त्यांची दिनचर्या बदलली नव्हती. राज्यसभेत भाषण करायचे असल्यास ते खूप तयारी करीत. त्यांचे भाषण मुद्देसूद व विषयाला धरुन असायचे मोर्चा ,चर्चा ,विदेश दौरे, पक्षबांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद, वाचन यांमुळे ते सतत कार्यमग्न असायचे. एवढ्या लवकर मृत्यू त्यांना कव टाळेल असे त्यांच्या मनातही आले नव्हते. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. त्यांना थोडे अस्वस्थ वाटायला लागले डॉक्टर कडून औषधे घेतली पण त्रास कमी झाला नाही. उलट तो वाढतच राहिला. शेवटी त्यांना जी. बी पंत हॉस्पिटल दिल्ली मध्ये भरती करण्यात आले. आजारपणात ते रुग्ण कधीच वाटले नाही दवाखान्यात असूनही आपली दैनंदिन कामे व्यवस्थित करायचे. त्यांना मृत्यूचे भय कधीच वाटले नाही. अशातही भेटायला आलेल्या प्रत्येकाला भेटत त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत. शेवटच्या घटकेपर्यंत ते सर्वांसी अगदी सहजपणे बोलले. लोकांसाठी जीवन जगायचे या इच्छेने त्यांनी मृत्यूशी चार महिने झुंज दिली.

त्यांचा नोकर विलियम यांनी बॅरिस्टर राजाभाऊंची खूप सेवा केली. दिल्लीत बंगल्यावर विलियम यांच्या सेवेत असायचा त्याने दवाखान्यातही तोच सेवा धर्म पाळला. त्यांचे प्रत्येक काम तो आनंदाने करायचा. 9 एप्रिल 1984 ला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निर्वाण झाले. सर्वत्र शोककळा पसरली 12 एप्रिल 1984 ला त्यांची प्रेतयात्रा निघाली. लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. सर्व पक्षाची नेते मंडळी उपस्थित होती. सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. समता सैनिक दलाने राजाभाऊ यांना मानवंदना दिली सर्वत्र राजाभाऊ अमर रहे! च्या घोषणा निनादत होत्या. चंद्रपुरात कधी न निघालेली एवढी अंत्ययात्रा होती पठाणपुरा गेटच्या बाहेर ईरई नदीच्या पात्रात बॅरिस्टर राजाभाऊ यांचे पुतणे बाळू उर्फ प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.शेवटी बाबासाहेबांच्या विचाराचा सच्चा सैनिक धगधगत्या अग्नीत कायमचा विझला. अखेर मृत्यूचा विजय झाला. कार्यकर्त्यांची सावली कायमची नाहीशी झाली. गरीब, दलित ,कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर यांचा राजा शेवटी एकटाच निघून गेला. कधीही परत न येण्याच्या प्रवासाला. बॅरिस्टर राजाभाऊंच्या आचार, विचार, आणि प्रतिमांना वंदन! कोटी कोटी प्रणाम!!

मा.प्रा. सुभाष अंभोरे, वाशिम ९८२२९६१००८

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button