शिक्षणाचा लॉकडाऊन”ग्रामीण भागातील वास्तव मांडणारा लघुपट
“शिक्षणाचा लॉकडाऊन”ग्रामीण भागातील वास्तव मांडणारा लघुपट
शिक्षण हा नैसर्गिक हक्क आहे.तो प्रत्येक व्यक्तीला मिळणे गरजेचे आहे.शिक्षण हे सर्व परिवर्तनाचे द्वार आहे.महात्मा फुलेंनी शिक्षणासंबंधीची जी संकल्पना मांडली,त्यात ते म्हणतात”शिक्षणाचा केंद्रबिंदू झोपडी असली पाहिजे. शिक्षण हे तळागाळातील लोकांपर्यंत गेले पाहिजे.त्या शिक्षणाचा उद्देश माणसाला संदर्भीत करणारा पाहिजे.पण जी व्यवस्थ इथल्या प्रस्थापितानी निर्माण करून शिक्षणाची मक्तेदारी एक हाती अपल्याचकडे राखून ठेवली. या विरुद्ध जो लढा फुलेंनी लढला आणि सामाजिक क्रांती घडून आणली. ती क्रांती म्हणजे माणसाला माणूसपण बहाल करणे होय.आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुन्हा शिक्षणात पायखेच सुरु झाली.शिक्षणाचे स्वरूप बदलले.दर्जा बदलला.आणि त्यासाठीची साधनेही बदली.या साधनांची पूर्तता मात्र मागासवर्गीय,पीडित,गोरगरीब, भटके,तळागाळातील लोकांच्या कडून होत नाही. त्यामुळे त्यांच्या हातून पुन्हा शिक्षण नाहीसे होते की काय हा भारतीय समाजव्यवस्थेत ऐरणीवर आलेला प्रश्नच. आज शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला पैसे कमावण्याचा व्यवसाय बनवलेल्या बेगडी व्यवस्तेत गरिबांचे मुले तग धरू शकत नाहीत. पण त्यांच्यात शिक्षणाची कमालीची ओढ आहे. आज संपूर्ण जगाला करोना सारख्या महामारीने विळखा घातला. यातून अधिकचा फैलाव होऊ नये म्हणून मार्ग काढण्यासाठी लॉकडाऊन ठेवण्यात आले. जवळपास दळणवळण,व्यापार,बाजरपेठा ह्या सगळ्या बाबी बंद करण्यात आल्या.त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालये,विद्यापीठही बंदच .पण सरकारच्या धोरणानुसार शाळा बंद पण शिक्षण बंद नाही असे घोषित करण्यात आले. त्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. त्यामुळे घरी बसून मोबाईल,कॉम्पुटर,लॅपटॉप, सारख्या साधनांचा उपयोग केला जाऊ लागला .पण सरकारने ऑनलाइन शिक्षण देऊन उंटावरून शेळ्या हकण्याचा प्रकार केला. कारण ज्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे त्या पद्धतीने शिक्षण घेण्याची साधने आजच्या वीस कोटी मुलांकडे नाहीत.कारण त्याच्या पालकांची तशी कुवत नाही. याच विवंचनेतून विधवा आई.घरची हलाखीची परिस्थितीशी.अशातच तिला कामात मदत करत शिकणारा एक दहावीचा विध्यार्थी पवन हा ‘ शिक्षणाचा लॉकडाऊन”या शॉर्टफिल्मचा नायक आहे. नामदेव माने यांच्या अर्थातच नामा फिल्म निर्मित या शॉर्टफिल्ममध्ये लॉकडाऊनच्या काळात भाजी विकणाऱ्या पवनला चित्रित केले आहे. तो गावात जाऊन ‘भाजी,घ्या भाजी,भाजी घ्या भाजी ‘,असे ओरडून घरोघरी जाऊन मेथीच्या जुड्या विकतो.हे विकत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की,बऱ्याच घरी मुलं मोबाईलच्या साहाय्याने अभ्यास करत आहेत हे तो पाहतो.या विचारात तो गावच्या शाळेत थोडा विसावा घेणासाठी बसतो आणि स्वतः मनातल्या मनात संवाद साधतो हे’ सगळेजण ऑनलाइन, अभ्यास करत आहेत माझ्याकडे मोबाईल नाही.हे सगळे पुढं जातील आणि मी मात्र माघे राहील ही काळजी पवनला लागते मोबाईलसाठी काहींना काही कराय पाहिजे’ असे म्हणून तो पुढे भाजी विकण्यास निघतो .एका घरी गेल्यावर तो तिथे त्याच्याजवळील उरलेल्या दोन्ही जुड्या विकतो .त्याला पैसे देण्यासाठी म्हणून जी स्त्री घरात पैसे आणण्यासाठी जाते त्यावेळेस त्याला एका स्कुटीवर मोबाइल ,गाडीची चावी,व मेन्स वोलेट (पॉकीट)दिसते. याठिकाणी माने यांनी उत्तम संकल्पना मांडली ती म्हणजे या शॉर्टफिल्मचा नायक पवन फक्त मोबाइलला उचलतो व खिशात ठेवतो ,पैस्याच्या पाकिटाला हात सुद्धा लावत नाही.कारण तो जर चोर असता तर पोकीटही उचललं असतं, पण त्याला मोबाईलची गरज होती.शिक्षणाच्या ओढीने त्याने केलेली चोरी सुद्धा त्याक्षणी गैर वाटते.नंतर जुडीचे पैसे घेऊन घेऊन अतिशय आनंदात तो घराच्या दिशेने निघतो.मोबाईल घेऊन अभ्यास करण्यास बसतो मात्र मोबाईलचे लॉक पॅटर्न काढण्यात अपयशी ठरत राहतो.जेव्हा आपला मोबाईल केवळ भाजीवाला पवनच घेऊन गेला आहे हे जेव्हा त्या मोबाईलधारकाच्या लक्षात येते तेव्हा तो त्याचा शोध घेणे सुरु करतो . पवन सापडल्यास त्याला काय शिक्षा करतो?तो त्याच्यासोबत कशाप्रकारे वर्तन करतो यासाठी यूट्यूबवर पहा नामदे माने निर्मित,दिग्दर्शित शॉर्ट फिल्म शिक्षणाचा लॉकडाऊन .केवळ दहा मिनिट एकोणपन्ना सेकंदाच्या या लघुपठामध्ये शिक्षणाचा महत्वपूर्ण विषय हाताळलेले आहे.व आजची ती गरज आहे.केवळ मुख्य पात्र एक व बाकी दुय्यम चार पाच पात्राने ही शॉर्ट फिल्म निर्माण झाली. आशयपूर्ण लघुपट शिक्षणाचा लॉकडाऊन यूट्यूबवर उपलब्ध असून त्याची लिंक याप्रमाणे ,
https://youtu.be/F90sYMd8-d ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाचे शिक्षणाच्या साधनांतील वास्तव मांडते.या पुढेही असेच नवनवीन वास्तवाचे विषय घेऊन नामदेव माने यांच्याकडून लघुपटापासून ते संपूर्ण चित्रपट निर्मिती होओ यासाठी आपल्यास कार्यास हार्दिक शुभेच्छा व आपले खूप खूप अभिनंदन!
-मनोहर सोनकांबळे
8806025150,8459233791