संपादकीय

संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- ५

5 गणपत महार

ते बंदीवासातील दिवस गोविंदाचं काळीज फाडून टाकत होते. त्याला ती कालकोठडी बेचैन करीत होती.
कारागृहाचा अर्थ मुळात जे गुन्हे घडले. ते गुन्हे पुन्हा घडू नये. तसेच ज्याने गुन्हा केला. त्याला सुधरवता यावं यासाठीग दिलेली शिक्षा करण्यासाठी उभ्या केलेल्या व्यवस्था आणि शिक्षेचा अर्थ गुन्हेगाराने किंवा इतरांनी तसा गुन्हा पुन्हा करु नये म्हणून केलेले शासन. अशी शिक्षा करण्याचा अधिकार हा राज्यकर्ते, गुरु व मायबाप यांनाच असतो. ज्यावेळी व्यक्ती तुरंगातील शिक्षा भोगून किंवा जामीनावर स्वतःची निर्दोष सुटका करुन समाजात जाते. तेव्हा या समाजात वावरतांना कैद्याचे मोठे हाल होत असतात. त्याला वाळीत टाकलं जातं. त्याला हिन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यातील अनेकजण आपली शक्तीही हरवून बसतात. त्यामुळं ते गुन्हेगारीचा मार्ग पत्करतात.
औरंगजेबाचा तुरुंग म्हणजे केवळ तुरुंग नव्हता. तिथं एकएक दिवस काढणं मुश्किल होत होतं. उद्याचा दिवस कसा निघेल हे काही सांगता येत नव्हते. पण गोविंदानंही कंबर कसली होती. प्रत्येक दिवसाचा तो सामना करीत होता. औरंगजेबाच्या शिक्षेला न घाबरता.
औरंगजेबांच्या कारागृहात कैद्यांना व्हि आय पी वागणूक नव्हती.तर तिथं अमानुषता होती. असंवेदनशीलता होती. त्यातच धाकानं का होईना, त्या औरंगजेबाचे आदेश पाळणारे काही अंमलदारही होते. ज्यावेळी गोविंदाला वेदना होत. त्यावेळी त्यांंना हसू येत असे. ती माणसं माणूसकी मेलेलीच होती. त्यांच्याकडं पाहून असं वाटायचं की ते मेलेले मुदडे आहेत की काय? औरंगजेबापेक्षा त्यांचाच त्रास गोविंदाला जास्त होता.तूरुंग हे खरंच मानवाचं मन बदलविणारं दालन नाही असं पदोपदी वाटत असतं. कारण एकदा का तुरुंगात एखादा कैदी गेलाच, तर तो सुधारुन येईलच याचा थांगपत्ता नाही. कारण आज तुरुंगाची व्याख्याच मुळात बदलली आहे. आज तुरुंगात शिक्षा कमी आणि हसतखेळत जगणंच शिकवलं जात.
तुरुंगात गुन्हेगारच येतात असे नाही. कधीकधी चांगली मंडळीही येत असतात. ज्यांनी गुन्हे केलेले नाही. त्यातच काही शिकलेलीही माणसं येतात.
तुरुंगात येणा-या कैद्यात भेदभाव दिसत नाही. हा उच्च जातीचा हा कनिष्ठ जातीचा. पण एक भेदभाव तेवढा असतो. तो म्हणजे सीनिअर ज्युनीअर. जो जास्त जुना होत जातो. तो जास्त प्रमाणात इज्जतदार बनत जातो. त्यातच त्या तुरुंग अधिकारी वर्गाची जी मंडळी कामे करतात. ती जवळची असतात. मग अशावेळी एखाद्याला कोणतं एखादं छोटंसं व्यसन असेल, तेही पुरवलं जातं. आता कैद्यांना अगदी सहिष्णू आणि दयाभावनेची वागणूक दिली जाते. त्यांच्याकडून जास्त कामं केली जात नाहीत.
कारागृह……..पुर्वीचे कारागृह असे नव्हते. त्या कारागृहात अतिशय हिन दर्जाची वागणूक मिळत असे. कारण ती कारागृह बदल्याच्या भावनेनंं प्रेरीत असायची. प्रत्येकाला स्वतंत्र्य असे बैरीकेट असायचे. त्यात एक किंवा दोनच कैदी राहात असायचे. कैद्याचा गुन्हा कोणता आहे. त्यावरुन त्या कारागृहाची रचना असायची. अर्थ असा की कैदी किती महत्वाचा आहे.
विशेष सांगायचं म्हणजे या देशात जे ही कोणी महान झालेत. त्यांनी अशा कारागृहाच्या असंख्य यातना भोगलेल्या आहेत. काहींच्या यातना लिखीत असल्याने त्या बाहेर आल्या. तर काहींच्या यातना ह्या लिहिल्या नसल्यानं समजलेल्या नाहीत. पर्यायानं सांगायचं झाल्यास हा देश ज्याला देव म्हणून पुजतो, त्या देवाचाही जन्म बंदीगृहात झाला. तसेच जिला देवी म्हणून पुजतो. त्या देवीलाही बंदीगृहातच ठेवलं होतं.
आता प्रश्न हा पडतो की तो बंदीगृहातील देव कोण? तसेच ती बंदीगृहातील देवी कोण? तर याचं उत्तर सहज सोपं आहे. तो बंदीगृहातील देव म्हणजे क्रिष्ण आणि ती देवी म्हणजे सीता. याचा अर्थ असा की क्रिष्णाला महाराजा कंसानं बंदीगृहात टाकलेलं नव्हतं. परंतू जी आकाशवाणी झाली असा जो उल्लेख काही पुराणात आहे. त्यानुसार कंसानं वासूदेव व देवकीला बंदीवासात टाकले होते. त्यातच देवकीचा रथ हाकलत असतांना अचानक आकाशवाणी झाली आणि राजा कंसाला कळलं की देवकीचा आठवा पुत्र त्याला मारणार आहे. त्यातच तो आठवा मुलगा पहिल्याच वेळी जन्माला आला तर…….. म्हणून कंसानं चक्क आपल्या बहिणीलाच बंदीवासात टाकले. त्याच ठिकाणी कंसाचाही जन्म झाला. तसेच सीतेलाा तर राक्षसराज रावणानं अशोकवाटिकेत ठेवले होते. तेही नजरकैदेत. यामध्ये त्रास असा की दर जन्माच्या दिवशी कंस यायचा व देवकी व वासूदेवाची सख्खी लेकरं मारुन जायचा. हा त्रास अति भयंकर होता नव्हे तर ती एक शिक्षाच होती. तसाच सीतेलाही तसा त्रास भोगावाच लागला. दररोज रावण अशोकवाटीकेत यायचा आणि म्हणायचा की सीते, तू माझ्याशी विवाह करण्यास तयार झाली काय? त्यातच ते तिला दररोजचं सतावणं म्हणजे कारागृहात दिला जाणारा त्रासच होता. त्यातच काही रावणासोबतची मंडळी हसतही होती. यातच रामायणात रामाला चौदा वर्ष झालेला वनवास तसेच महाभारतात पाच पांडवांना भोगावा लागणारा बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास ही देखील एक कारागृहाचीच वेदनाच होती.
संभाजीलाही कारागृह भोगावा लागला. त्यातच त्या काळी किती प्रमाणात यातना दिली गेली संभाजीला हेही कळलं नसतं. पण तिथं असलेल्या एका गुप्तहेराकडून ते माहित पडलं. त्याचं नाव होतं मियाखान. मियाखान असा व्यक्ती होता की ज्यावेळी संंभाजी घरच्यांच्या रोषामुळं दिलेरखानाला जावून मिळाला होता. त्यावेळी दिलेरखानाच्या आश्रयास असतांना त्यानं दिलेरखानाचा विरोध असूनही मियाखानच्या दोन्ही मुलीचे विवाह लावून दिले होते. त्यामुळं मियाखान हा संभाजीचा हस्तक बनला होता. मियाखान हा संभाजीला जेवण आणून देत असे.
रायप्पा महार संभाजीला सोडविण्याच्या प्रयत्नात मरण पावला होता. तो मरण पावला होता. पण त्याचा भाऊ देवप्पा अजून जीवंत होता. ज्यावेळी रायप्पा व देवप्पा दोघंही बंधू संभाजीची पत्नी संभाजीच्या गैरहजेरीत गादीवर बसताच तिची आज्ञा घेवून जेव्हा संभाजीला सोडवायला निघाले, तेव्हा रायप्पा म्हणाले कीमला वीरमरण आलं तरी चालेल, पण मी राजाला सोडवेन. परंतू त्यावेळी महाराणी येशूबाईनं त्यांच्या हातात एक चिठ्ठी देत म्हटले की रायप्पा तुम्ही काहीही करा. पण ही चिठ्ठी संभाजीपर्यंत नक्की पोहोचवा. रायप्पानं तसं आश्वासन दिलं व सांगीतलं की मी काहीही करीन. पण ही चिठ्ठी संभाजीपर्यंत पोहोचवीन.
रायप्पा व देवप्पा हे दोघंही भाऊ संभाजीला वाचवायला रायगडावरुन निघाले. त्यातच रायप्पा व देवप्पा पखालजीचं वेषांतर करुन व भुमिका करुन औरंगजेबाच्या सैन्याला कातडी पिशवीतून पाणी पाजण्याचे उद्योग करु लागले. त्यातच रायप्पानं पाहिलं की त्याच्या धन्याची या स्थळी धिंड काढली जात आहे. तेव्हा त्यांच्या अंगात विरश्री संचारली. त्यातच त्यानं ती चिठ्ठी आपले बंधू देवप्पाच्या हातात देत तो म्हणाला की देवप्पा मला ही आपल्या अन्नदात्याला मिळत असलेली वागणूक माझ्यानं पाहणं होत नाही. ही चिठ्ठी ठेव. सुरक्षीत ठेव. आता काहीही झालं तरी चालेल. मी या दोन चार अंमलदारांना कापूनच टाकतो. त्यातच ती चिठ्ठी देवप्पानं जवळ ठेवली व रायप्पानं आपले दात विचकवीत त्यानं एका सैनिकांच्या म्यानातील तलवार हिसकली आणि दोन अंमलदारासह तब्बल बारा जण अौरंगजेबाच्या गोटातील सैनिक कापून टाकले. मात्र ज्यावेळी त्या रायप्पाला त्या औरंगजेबाच्या शेकडो सैनिकांनी मारलं, तेव्हा त्याच्या बंधूचीही इच्छा होत होती की आपल्या भावाला वाचवावे. पण तो तसे करु शकत नव्हता. कारण त्याच्यावर त्या चिठ्ठीची जबाबदारी होती. देवप्पा नाईलाजानं का होईना काही काळ चूप बसला.
रायप्पाच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं संभाजीचा पहारा खुप वाढवला. त्याचा मियाखानवर खुप विश्वास होता. त्याला काहीही माहित नव्हतं की मियाखानच खरा संभाजीचा जासूस आहे. जेव्हा देवप्पाला सैनिकांना पाणी पाजता पाजता समजलं की मियाखान हा संभाजीचा चहेता आहे आणि तोच एकटा संभाजीला जेवण देण्यास जात असून संभाजीच्या कम-यात त्याच्याशिवाय कोणीच जावू शकत नाही. तेव्हा देवप्पानं मियाखानला चिठ्ठी दिली. ज्यावेळी ती चिठ्ठी घेवून मियाखान संभाजीला जेवण देण्यासाठी संभाजीच्या कक्षात गेला. तेव्हा त्यानं संभाजीला ती चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की राजे तुम्ही चिंता करु नको. इकडे सर्व खुशाल आहे. राज्याचा कारभार व्यवस्थीत आहे. सैन्याची जुळवाजुळव सुरु आहे. योग्य संधी चालून येताच आम्ही योग्य वेळी त्या औरंग्यावर हल्ला करु व तुम्हाला सुखरुप सोडवू. तेव्हापर्यंत तुम्ही मात्र निश्चींत राहा.
संभाजीनं ती चिठ्ठी वाचली. त्याला आपल्या राणीची किव आली. तसं त्याच्या डोळ्यातून अलगद पाणी टपकलं त्याचबरोबर तो मियाखानला म्हणाला,
“मियाभाई, आपले उपकार मी कसे फेडणार. आपण या संकटसमयीही मला ही चिठ्ठी आणून दिली.”
तेव्हा मियाखान म्हणाला,
“राजे, लवकर सांगा तुमचा काय निरोप आहे ते. ही वेळ काही बरी नाही. थोडासाही वेळ झाला तर हे सैनिक आतमध्ये येतील. मग समदं राहून जाईल जाग्यावरच.”
त्यावर संभाजी म्हणाले,
“मियाभाई, हा राज फक्त तुमच्या ओठात ठेवा. कोणालाही कळता कामा नये. हं एक गोष्ट आवर्जून सांगा सरुबाईंना की तुम्ही चिंता करु नका. आम्ही बरे आहोत. आमच्याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही फक्त दुर्ग सांभाळा. आमच्या आबासाहेबांनी अत्यंत कष्टानं किल्ले मिळवले आहेत. ते किल्ले औरंग्याच्या घशात जायला नको. आम्ही मेलो तरी चालेल. पण दुर्ग औरंग्याच्या हातात लागता कामा नये.”
मियाखाननं ते ऐकलं. तो राज त्यानं मनातच दफन केला. तो राज ज्यावेळी सरुबाईला माहित झाला होता. तेव्हा वेळ निघून गेली होती. संभाजीनं तेव्हापर्यंत मृत्यूला मिठी मारली होती.
मियाखान समोर औरंग्यानं संभाजीवर केलेले अनन्वीत अत्याचार पुढे मियाखाननं रायगडावर बयाण केल्यानं मराठ्यांना संभाजीवर औरंग्यानं कोणते कोणते अत्याचार केले ते संपूर्ण माहित झालं. त्यातच रायगडालाही माहित झालं. रायगडंही तो अत्याचार ऐकून थरारला होता.
गोविंदा ज्यावेळी कैदेत होता. तो काही गुन्हेगार नव्हता. पण तरीही औरंगजेबाच्या पाहणीतून व समजण्यातून तो गुन्हेगारच होता. त्यातच तो जेव्हा संभाजीला अग्नी देवून व त्याचा अंत्यसंस्कार करुन रायगडावर गेला होता. त्यावेळी त्याला रायगडावर महाराणी सरुबाईच्या तोंडून महाराज संभाजीला मिळालेल्या यातनेबाबतची माहिती मिळाली होती. आज तो औरंगजेबाच्या कारागृहात त्या अंधा-या खोलीत एकटाच राहात असला तरी त्या कैदेबाबत त्याला वाईट वाटत नव्हतं वा वैषम्यता वाटत नव्हती. तसेच त्या औरंगजेबाचे त्याच्यावर होत असलेले अत्याचार म्हणजे जणू कोणी आपल्या अंगावर फुलेच उधळत आहेत की काय, असेच वाटत होते. त्याच्या डोळ्यासमोरुन आज तो क्रिष्णाच्या मातापित्याचा, पाच पांडवांचा, माता सीतेचा व धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास तरळत होता. ज्यांनी सत्तेसाठी नाही तर आपल्या कर्तव्यासाठी आपल्या शरीरावरील शत्रूंकडून होणारे अत्याचार सहन केले होते. हाच इतिहास गोविंदाला बळ देत होता. तसेच त्याच्या अंगातही नवी उर्मी आणत होता.
आज त्याला तेही आठवत होतं की राजाच्या कैदेत असणारे कैदी कौलू चालवतात नव्हे तर शेतात बैलाच्या जागी जुंपले जातात. आज त्याला तेही आठवत होतं की त्याच्या कित्येक बिरादरीनं भोसले घराण्याच्या पालख्या उचलण्यासाठी आपले खांदे झिजवले होते. पण तो अत्याचार नव्हता तर ती एक धन्यासाठी केलेली स्वामीभक्ती होती.
हे तुरुंग म्हणजे कैद्यांना सुधारण्यासाठी केलेली उपाययोजना असते हे जरी बरोबर असलं तरी यात संभाजीला मिळालेली कैद हा बदला होता. तसेच गोविंदाला मिळालेली कैद हाही बदलाच होता. त्यातच बदल्याच्या भावनेनंच ज्याप्रमाणे संभाजीला ठार केलं होतं. त्याचप्रमाणे गोविंदालाही ठार करण्याचाही औरंगजेबाचा मानस होता.
तुरुंग म्हणजे कैद्यांना सुधारण्याचे केंद्र असून त्यात कैद्यांना सुधारण्याची पूर्ण सुविधा असावी. तो कुणाचाही बदला घेण्याचं केंद्र बनू नये. तसेच तुरुंगातून कैदी सुधारुन निघायला हवे. जेणेकरुन तुरुंगावर कोणीही विश्वास ठेवेल. त्यासाठी तुरुंग हे शिक्षेचे केंद्र ठरु नये.

( क्रमश:)

-अंकुश शिंगाडे, नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button