संपादकीय

संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- ६

6 गणपत महार

आज गोविंदा विचार करीत होता. आपण केलं ते अतिशय चांगलं केलं असं त्याला वाटत होतं. त्याला त्याबाबत पश्चाताप वाटत नव्हता. तसं पाहता गोविंदाला विचारायला खानाची माणसं वारंवार येत होती. तरीही तो गप्प होता. ती विचारीत होती की त्याच्या कटात कोण होती. पण तो सांगत नसल्यानं बेवारस फटक्यांना झेलावं लागत होतं.
गोविंदा आत होता. त्या अंधा-या कोठडीत. ती कोठडी आज गोविंदाला पाषायमान वाटत होती. त्यातच त्यांचे अत्याचार पाहून गोविंदाला वाटत होते की त्याला लवकर मृत्यू यावा किंवा त्याला लवकरच औरंगानं मृत्युदंड द्यावा. पण तसं काही होत नव्हतं.
संताजी व धनाजी दोन सख्खे भाऊ होते. महाराज संंभाजीच्या मृत्यूनंतर राजाराम गादीवर बसले. त्यातच संताजी हे मराठ्यांचे सरससेनापती होते. त्यांचा घोडा सुद्धा त्यांना घाबरत होता.
औरंगजेब बादशाहा ज्यावेळी दक्षिणेस आला. तेव्हा त्यानं संगमेश्वरला आपली राजधानी बनवली. त्यातच संताजीचं राजेरामाशी पटेनासं झालं. त्यामुळं राजारामनं संताजीकडून सेनापतीपद काढलं. ते पद धनाजीला दिलं व ते जींजीला चालले गेले. पुढे राजारामने जींजीला आपली राजधानी बनवली. परंतू संताजीनं सेनापती पद जरी सोडलं असलं तरी त्यानं लढाई बंद केली नव्हती. त्यातच त्याला संभाजीच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. ज्या संभाजीच्या खुनाला मुकर्बखान जबाबदार होता. त्याला ठार केल्याशिवाय त्याला चैनच पडणार नव्हतं. त्यानं प्रतिज्ञा केली होती, ती म्हणजे ज्या माणसाने संभाजीला पकडले, त्याला ठार करण्याची.
औरंगजेब बादशाहा जेव्हा संगमेश्वरला आला. तेव्हा त्यानं संगमेश्वराला आपली राजधानी बनवली. त्यातच संताजीनं बेत आखला. आपण संगमेश्वरवर हमला करायचा. त्यातच योजनेनुसार गनीमी काव्यानं संताजीनं औरंगजेबाच्या संगमेश्वरावर हल्ला चढवला. त्यात मकर्बखान जबर जखमी झाला. तो पळायला लागला. त्यातच धनाजीनं त्याचा पिच्छा सोडला नाही. त्यानं मकर्बखानाचा पिच्छा केला. आता मुकर्बखान जीवाच्या आकांतानं पळत होता. पण संताजीही तेवढाच चपळ होता. त्यानं मुकर्बखानाला वाटेतच पकडलं. त्यातच अतिशय घाबरलेला मुकर्बखान भीतीच्या भयानंच मृत्यू पावला व संताजीनं संभाजीच्या खुनाचा बदला घेतला.
ती कालकोठडी. त्या कालकोठडीला नतमस्तक होत गोविंदा आपले दिवसं काढत होता. एवढ्यात बादशाहा औरंगजेब आला. बादशाहा जसा आला. सगळे त्याला सलाम करु लागले. त्यातच दरवाजे उघडले गेले व गोविंदाला साखळदंडात जखडून बाहेर काढण्यात आले. तसा तो धिप्पाड देहाचा औरंगजेब म्हणाला,
“गोयंद्या, तू का बरं सांगत नाहीस ती माहिती? का बरं गावाला वाचवतोस? का बरं त्यांचे गुन्हे आपल्या अंगावर घेतोस? तू का बरं त्यांच्यासाठी मरण पत्करतोस?”
बादशाहाचं ते निर्मळ बोलणं. आज अचानक त्याच्यात एवढं परीवर्तन. अगदी गोड गोड बोलायला लागला होता बादशाहा. एवढं प्रेम काहून त्याच्याच गोटातील एक सरदार म्हणाला,
“बादशाहा सलामत, गुस्ताखी माफ करो तो एक बात कहूँ।”
“बोलो, क्या बात है?”
“बादशाहा.सलामत, यह गीदड की औलाद है। मराठा है ये। ये लोग प्रेम से बाज नही आते। इन्हें सख्त कडी से कडी सजा देनी पडती है।”
बादशाहानं ते बोलणं ऐकलं. तसा त्यानं हात आडवा करीत चूप राहण्याचा इशारा दिला. त्याला चूप राहण्याचा आदेश देत बादशाहा गोविंदाला म्हणाला,
“गोयंद्या, पाहा. अरे जेव्हा माणूस जन्म घेतो. तेव्हा तो एकटाच येतो आणि मरतो तेव्हा एकटाच मरतो. तू ज्या गाववाल्यांना वाचवतोस ना. ते गावकरी तूला वाचवायला एकतरी येईल का? अन् आला काय, नाही ना. मग तू असा कसा वागतोस. अरे सांग कोण कोण होतं त्या संभाजीचे मांसाचे तुकडे गोळा करायला. तू एकटाच होता का?”
औरंगजेब बादशाहाचा कुटील डाव गोविंदाच्या लक्षात आला. तसं समद्या मराठ्यांना माहित होतं की बादशाहा औरंगजेब कपटी आणि कुटील वृत्तीचा माणूस आहे. तेव्हा या बादशाहापुढं न वाकलेलं बरं. कारण ज्यावेळी बादशाहा जेव्हा राजगादीवर आला. तेव्हा त्यानं आपल्या गादीवर बसण्यापुर्वी आपल्या बापाला कैदेत टाकलं. त्यातच आपल्या भावाची हत्याही केली. तसं त्यानं स्तब्धता बाळगली.
गोविंदा चूप बसलेला पाहून बादशाहा म्हणाला,
“गोयंदा, बताओ तो सही. क्या हुआ था उस रात? अगर तू वह राज बतायेगा, तो तुझे छोड देंगे।”
गोविंदा विचार करीत होता. बादशाहा कपटी आहे. तो आपल्याला विचारत आहे प्रेमाप्रेमाने. पण समजा सांगीतलंच तरीही बादशाहा आपल्याला सोडणार नाही. त्यातच ही आपली मातृभुमी आहे. ही मातृभुमी आपल्याला दुषीत करायची नाही. ही मातृभुमी आपली आई आहे. आपली एक वेगळी भाषा आहे. त्यातच आपली एक संस्कृती. आपला एक धर्म आहे. जो धर्म पवित्र असा धर्म. त्या धर्मासाठी महाराज माझे अन्नदाते प्राणास मुकले. त्यांनी वीरमरण पत्करलं. शिवाय ती माणसं. ती जीवाभावाची माणसं. त्या माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवून संभाजीचे तुकडे गोळा करायला मदत केली आणि मी त्यांचा विश्वासघात करु. नाही आपण त्या लोकांशी विश्वासघात करु नये. ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला.
तो त्या दामाजीचा विचार करु लागला की जो दामाजी अख्ख्या गावाचा पाटीस. बिचा-यानं जागा दिली नाही. पण त्याच्याच प्रयत्नानं आज संभाजीचे तुकडे गोळा झाले. जर दामाजी नसता तर जनाबाईनं कोणाला सांगीतलं असतं तुकडे गोळा करायला. बिचारी जनाबाई. तिला तर पकडलं या बादशाहानं. बिचारी जनाबाई……. कुठं ठेवलं तर माहित नाही तिला.
ही मातृभुमी. या मातृभुमीची रक्षा करणे हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मी जे काही केलं. ते माझं कर्तव्य होतं आणि त्यांनी जे काही केलं, तेही कर्तव्य होतं. त्या कर्तव्याचा अर्थ मी असा घेवू नये की त्यांना परेशानी व्हावी. कदाचित हा औरंगा माझ्याशी आणि त्यांच्याशी संभाजीसारखाच व्यवहार करेल हे नाकारता येत नाही. तसंच ती माझी गावची माणसं. अगदी जीवाभावाची माणसं. ती माणसं. त्यांनी माझ्यावर प्रेम करुन मला मदत केली. ज्यांनी संभाजीवर प्रेम करुन मला मदत केली. समजा त्या दामाजी पाटलानं मला कळवलंच नसतं तर, मला संभाजीची चिता जाळायची संधी मिळाली असती का? बिचारा दामाजी! त्या दिवशी गोरेगावावरुन आला होता. त्याच्या अपेक्षेवर पाणी फेरु की काय मी. अन् ती बिचारी राधाई. हिमतबाज बाई. तिच्याच हिमतीवर तुकडे गोळा झाले. मर्दानी आहे ती. मी तिच्या स्वप्नांचा बळी देवू.
दामाजी तर ऐकतच नव्हता तुकडे गोळा करायला. म्हणत होता जावू द्या. त्या औरंग्यांचे सैन्य पहारा देवून आहेत नदीपलिकडं. जर एवढासाही आवाज झाला की औरंगा सैनिक येतील. प्रेत बाजूलाच राहिल अन् आपल्याला पकडून नेतील. जावू द्या. तो संभाजी तर मेला. पण त्याच्याबरोबर आपणही मरुन जावू. कारण संभाजीपाठोपाठ औरंगजेब आपल्यालाही मारुन टाकेल. पण ती राधाई माऊली. ती एकटीच निघाली जनाबाईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आपली मर्दानगी दाखविणारी बाई. ती बाई तेवढ्याच हिंमतीनं एकटीच निघाली. त्याचबरोबर तिच्या मागं ती जनाबाई. अन् पुर्ण नारीशक्ती. व्वा व्वा. नारीशक्ती जिंदाबाद. त्या होत्या म्हणून मीही हिमतीनं पुढं झालो. अन् तो गोरखनाथ. बिचारा बुवा. तो तर यायलाच तयार नव्हता. त्यातच आमचा दामाजी पाटील. त्याचा तर पानच नव्हता हालत गोरखनाथाशिवाय. दामाजीमुळंच आला बिचारा. बिचारा गोरखनाथ. तेवढ्याच रात्री त्यानं बेलफुलं गोळा केली. अन् अग्नी द्यायला मदत केली संभाजीले. अन् ती माणसं. ते समदे तरुण त्या संभाजीसाठी झटले. बिचारे दामाजीच्या इशा-यावर गावच्या शिवेवर उभे राहिले गोफनगुंडा घेवून. अन् ती सारी गावातील माणसं……… बिचारी! मरणाची भीती होती त्यांना, तरीही त्यांनी ती भीती न बाळगता माझ्यासोबत संपूर्ण इंद्रायणी ढवळून काढली. महाराज संभाजीचे तुकडे गोळा करायला आणि तीही माणसं थोरंच म्हणावी की त्यांनी शेणकुर धसकट अन् लाकडं गोळा केली. हं अग्नी मी दिला. माझ्या अंगणात. माझ्या शेतात. जंगलात त्या काळोख्या रात्री. माझं शेत…….. ते माझं शेत नसून माझ्यासाठी अंगणच आहे. माझा भाऊच होता संभाजी. कारण त्याच्या बापानं माझ्या बापाची गोष्ट ऐकून मला संधी दिली. नवे पराक्रम करण्याची. त्याचा बाप होता म्हणून मला कर्तबगारी दाखवता आली. नाहीतर याच वळूच्या मातीत मी खितपत पडून राहिलो असतो. आज मला हा वळू गावच नाही तर संपूर्ण इंद्रायणी ओळखते.. मी जरी अस्पृश्य असलो तरी. आज संपर्ण गाव माझी इज्जत करते. मला पुसते. कारण मी किल्लेदार झालो रामशेजचा म्हणून. पण मी जर सैन्यात भर्ती झालो नसतो तर रामशेजचा किल्लेदार झालो नसतो. अन् रामशेजचा किल्लेदार झालो नसतो तर मला या गावानं सन्मान दिला नसता. हं मी गुन्हा केला. संभाजीला जाळण्याचा गुन्हा. हं हाच गुन्हा झाला माझा. अन् तो गुन्हा मी एकट्यानंच केला नाही तर माझ्या गावानं केला. कुणासाठी? तर त्या लाडक्या संभाजीसाठी. ते लेकरु. माझा भाऊ. माझा एकट्याचाच भाऊ नाही तर जगाचा भाऊ. तो माझ्या मायबापाचा लेकरु. माझ्या मायबापाचा एकट्याचाच लेकरु नाही तर तो सा-या गावाचा लेकरु. हे कसं विसरु मी. हं केला असन संपूर्ण गावानं गुन्हा आपल्या लेकरासाठी. हं केला असल आपल्या भावासाठी या गावानं गुन्हा. पण मी कशाला त्याला गोवू या वादात. हा वाद माझा आहे. मग मी फासावर गेलो तरी चालेल. मला मृत्युदंड झाला तरी चालेल. पण मी माझ्या गावाला संंकटात टाकत नाही. जर मी आज या गावाला संकटात टाकलं तर………उद्या मला माझा गाव माफी देणार नाही. माफ करणार नाही. जरी मी संभाजीला अग्नी दिला असेल तरी. अन् जर मी गुन्हा कबूल केला आणि मला जर मृत्युदंड झालाच तर उद्या हीच माती माझ्यावर गर्व करेल. म्हणेल की धर्मासाठी प्राण देणा-या संभाजीला कर्तव्याचे पालन करणा-या त्या इंद्रायणीच्या लेकरानं म्हणजेच गोविंदानं अग्नी दिला. त्या शिरप्याचाही उदोउदो होईल. ज्यानं संभाजीचे तुकडे शिवलेे अन् त्या शिर्क्याचाही उदोउदो होईल. ज्यानं कपडे शिवले. एक गणोजी शिर्के असा होता की ज्यानं संभाजी राजांना पकडायला शत्रूंना मदत केली अन् एक हा शिर्के की ज्यानं संभाजीचे कपडे शिवले. जर मला माझं कर्तव्य पार पाडतांना वीरमरण आलंच तर उद्या हीच इंद्रायणी धन्य होईल आणि ओरडू ओरडू सांगेल की या भीमेच्या काठी असाही कर्तव्यवीर होवून गेला की ज्याने आपले कर्तव्य तर केलेच. पण कर्तव्यासाठी प्राणही दिला. आज मी जरी अस्पृश्य असलो तरी मला कोणाला फसवायचं नाही. मग मी मेलो तरी चालेल.
हा गाव संभाजीच्या अंत्ययात्रेवेळी सहभागी होता. या गावानं संभाजीला अग्नी देण्यासाठी बरीच मदत केली. ही संभाजीला अग्नी देणारी गोष्ट काही साधीसुधी गोष्ट नव्हती.
आज इंद्रायणी धन्य झाली संभाजीच्या रक्षेला आपल्यात सामावून घेवून. उद्याही धन्य होईल, जेव्हा माझी राख या नदीत विरघळेल. उद्या इंद्रायणी म्हणेल आणि ओरडून सांगेल की ती दोन लेकरं या धरणीवर जी झाली. ती कधीच झाली नव्हती. कधीच होणार नाही. एक लेकरु धर्मासाठी मरण पावला तर दुसरा आपलं कर्तव्य बजावत. कदाचित मी मेलोही या औरंग्याच्या हातानं. तरीही या धरणीवर माझे एकट्याचे नाव होवू नये संभाजीला अग्नी देणारा म्हणून. माझ्या संपूर्ण गावाचं नाव व्हावं. कोणीही उद्या म्हणू नये की एकट्या गोविंदानं संभाजीला अग्नी दिला. तर म्हणावं या वळू गावच्या संबंधीत सर्व लोकांनी अग्नी दिला. उद्या माझंच नाव संभाजीबरोबर अजरामर होवू नये.
हे परमेश्वरा, तू मला त्याबद्दल सद्बुद्धी दे आणि हे औरंग्याचे अत्याचार सहन करण्याची ताकद दे. माझी उद्या जीभ जरी कापली गेली संभाजीसारखी किंवा माझं मुंडकं जरी छाटलं गेलं संभाजीसारखं तरी मला हसता हसता स्विकारता यायला हवी ती वेळ. अन् हसता हसता मला माझ्या वेदनाही सहन करता यायला हव्यात. हे परमेश्वरा, मला एवढा काफिर बनवू नकोस की माझ्या तोंडून अलगद गाववाल्यांचं नाव निघावं. जेणेकरुन बिचा-यांना संभाजीसारख्याच वेदना सहन कराव्या लागतील. माझ्यामुळं असं काही होईल. असं घडू नये देवा माझ्याहातून. हे मातृभुमी यदी कदाचित माझं चुकत असेल, हे इंद्रायणी तूही सांग माझं चुकत असेल तर मला माफ कर. पण मी माझ्या संभाजीसाठी या संपूर्ण माणसांचा बळी देवू शकत नाही.
गोविंदा विचार करीत असतांना औरंगजेब बादशाहा म्हणाला,
“क्या सोच रहा है गोयंदा?”
ते औरंगजेबाचे शब्द अचानक गोविंदाच्या कानावर पडले. तसा गोविंदा भानावर आला. म्हणाला,
“काही नाही.”
“तो फिर बता कि उस रात तेरे साथ कौन कौन था?”
“कोणीच नव्हता माझ्यासोबत.”
“म्हणजे तू एकटाच होता का?”
“होय, मी एकटाच होतो.”
“असं कसं होईल? अरे गोयंद्या, कोणाच्या मुदड्याले अग्नी देणं हे एकट्याचं काम तरी आहे का अन् तेही एवढ्या लवकर?”
“होय, मी एकट्यानंच या सर्व गोष्टी केल्या. मीच लाकडं आणली. मीच तुकडे गोळा केले. मीच शेण धसकटं गोळा केली. अन् मीच अग्नी दिला. सर्व मीच केलं. दिसलं नं वं शेतात. माझ्या शेतात जावून पावा. तेथंच तुम्हाले त्या संभाजीच्या अग्नीची जागा दिसन. तेथंच अंत्यसंस्कार झाला संभाजीचा.”
“पण हे सारं तू केलं?”
“होय, मीच केलं हे सारं.”
बादशाहा गोंधळात पडला होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता की ही अग्नी आणि तो संभाजीचा अंत्यसंस्कार विधी एकट्या संभाजीनं केला.
बादशाहानं गोविंदाचं सगळं ऐकलं. त्यावर थोडासा विचार केला. तसा तो ओरडून म्हणाला,
“बंद करो इस कालकोठडीका दरवाजा बंद. हम इसके बारे में कल निर्णय लेंगे।”
सैनिकांनी पुन्हा गोविंदाला त्या अंधा-या कालकोठडीत टाकलं व त्याला टाळेबंदी करीत ते बादशाहाला म्हणाले,
“जहापनाह, अब इसको कमरे में डाल दिया है। अब आपका आदेश आनेतक यह कालकोठडी में बंद रहेगा।
सकाळ झाली होती. आज बादशाहा औरंगजेब लवकर उठला होता. तसा तो दररोजच लवकर उठत असे. तसा तो नमाज पढत असे. त्यानंतर तो आपल्या कामाची सुरुवात करीत असे. दुपारी फावला वेळ मिळाला की टोप्या शिवत असे. तसा आजही बादशाहा तो सकाळी लवकर उठला होता. त्यानं नमाजही संपवला होता. पण आज त्याला काम करावसं वाटत नव्हतं. त्याला टोप्याही शिवावाश्या वाटत नव्हत्या. त्याला काही लिहावसंही वाटत नव्हतं. तसा तो कोणत्यातरी विचारात असावा असं वाटत होतं. तो कसलातरी विचार करीत होता. तसे दुपारचे बारा वाजले होते.
दुपारचे बारा वाजले खरे. पण बादशाहाचं कोणत्या गोष्टीकडे लक्ष नाही हे पाहून एक सरदार त्याला म्हणाला,
“जहापनाह, क्या आप बेचैन हो?”
“हाँ।”
“बेचैनी का कारण?”
“वो गोयंद्या।”
“क्यो? क्या किया गोयंद्या ने?”
तसा दुसरा एक सरदार म्हणाला,
“जहापनाह, कहे तो मै उसकी गर्दन उडा दूँ?”
“नही नही नही। ऐसी भूल कभी नही करना। मै वह राज जानना चाहता हूँ कि आखिर यह ताकत आती है कहाँसे उन मराठों में?”
“कौनसी ताकत?”
“अरे ये लोग इतनी तकलिफ सहन करते है। मगर अपनी जबान तक नही खोलते। देखो, वह संभा की ही बात ले लो। आखिर वह मर गया।परंतू जबान जैसी की वैसी रही। न किल्ले का अता पता बताया, न साला इस्लाम कबूल किया। आखिर वह मर गया। किंतू टस से मस नही हुअा और यह गोयंद्या भी बता नही रहा वह राज कि किसकिसने संभाजी का अंत्यसंस्कार किया है।”
“जहापनाह, कैसे बतायेगा वह। वह इतना बुजदील नही कि आपको अपना राज बतायेगा।”
“क्या वह राज का राज ही रहेगा कि पता चलेगा?”
सरदार चूप होते. त्यातच त्या सरदारांना हेही माहित नव्हतं की त्या गावातील कोण कोण या कटात सहभागी असू शकतात. तसेच तो गोविंदाही त्याबाबत काहीच सांगत नव्हता. तसा अचानक बादशाहा म्हणाला,
“आपण त्या जागी जावूया का?”
“कुठे जहापनाह?”
“ज्या ठिकाणी संभाजीला जाळलं तिथं.”
सर्वांनी इकडंतिकडं पाहिलं. त्याचबरोबर त्यांनी होकार दिला आणि ठरलं की बादशाहानं तिकडं प्रस्थान करावं.
बादशाहा वळूच्या त्या स्थळी जायला तयार झाला होता. त्यानं नमाज अदा केला. तसा सांडणीस्वारानं त्याच्यासाठी खास शाही उंट सजविण्यात आला. त्यातच बादशाहा त्यावर स्वार झाला व तो त्या वळूच्या संभाजीच्या अग्नीस्थळावर पोहोचला.
ते संभाजी राजाचं अग्नीस्थळ. त्या अग्नीस्थळावर दुपारचे तीन वाजले होते. आजुबाजूला पक्षाचा कलारवंही नव्हता. झाडं भरपूर होती. पण ती झाडंही बोलकी नव्हती. आजूबाजूला ऊन्हं पडलेलं होतं. ते ऊन एवढं प्रखर होतं की त्या ऊन्हाचे चटके अंगाला झोंबत होते. वाराही सुटला नव्हता. तसेच अंगात उकाडा आला होता. अंगाला घामही आला होता. जणू असं वाटत होतं की या औरंगजेबाला येथील पक्षी, प्राणी, झाडं, झुडपं आणि येथील हवाही घाबरत असावी. जणू तसंच दृश्य परीसरात तयार झालं होतं.
बादशाहा औरंगजेब उंटावरुन खाली उतरला. त्यानं गुडघे टेकले. तसा तो त्या जागेचं निरीक्षण करु लागला. तोच त्याच्या तोंडून शब्द फुटले.
“हे अल्ला, तुने क्या किस्मत बनाई मराठी राजा संभाजीकी। हमने तो सोचा था कि इसके तुकडों को अग्नी ना मिले। इसके तुकडों को कोई गीदड कौए खाए। कोई इन नदियों की मछलियों का शिकार बने संभाजी। मगर नही। संभाजी की किस्मत सही निकली। हमारी ही किस्मत खराब है।”
बादशाहा स्वगत बोलला. त्याचं मन त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हतं. तसा तो उभा झाला. आजुबाजूला पाहू लागला. तसा त्याला काहीच पुरावा आढळला नाही. तोच तो चिंतीत झाला होता.(क्रमश:) वाचा पुढील …..

शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button