संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- ७
7
गणपत महार
औरंगजेब रात्रभर झोपला नाही. त्यातच आता त्याच्या बुबूळाची अंगार होत होती. त्याचे डोळे लाल झाले होते. त्यातच त्याला वाटत नव्हतं की हा परीणाम त्यानं गोविंदाच्या जखमा चिघळविण्याचा परीणाम आहे. त्यामुळं की काय त्याला झोप आली नव्हती. परंतू त्या क्रुरकर्मी बादशाहाला त्याचं काहीच वाटत नव्हतं.
आज मात्र त्यानं ठरवलं होतं की आज आपण संभाजीचे तुकडे गोळा करणा-या गोविंदाला ठार करायचं. तसा तो त्याच गोष्टीची प्रतिक्षाच करीत होता.
दुपार झाली होती. तरीही त्याला झोप येत नव्हती. तसा तो चिंताग्रस्त झाला. त्यातच आपल्या निवडक सरदारांना म्हणाला,
“आज काहीही करा आणि मला गोविंदाचं कापलेलं मस्तक आणून दाखवा.”
त्याचे सरदार हे आदेशाचे पालन करणारेच होते. तसे दोन सरदार पुढं होवून म्हणाले,
“जी जहापनाह.”
त्यांनी होकार दिला. तसे सरदार त्यांच्या कालकोठडीत जावू लागले. त्यातच ती कालकोठडी आली.
सरदारांनी एक कटाक्ष गोविंदाकडं टाकलं. त्याचप्रमाणे त्यांनी त्याचे हात आणि पाय बांधायला लावले व त्यातच एका सरदारानं आपल्या म्यानातून एक नंगी तलवार काढली आणि ती गोविंदापुढं झळकवली. परंतू गोविंदाही काही घाबरणारा वीर नव्हता. तो म्हणाला,
“हे औरंग्याच्या कुत्र्यांनो, नामर्दांनो, नपुसकांनो, तुमच्यात मर्दानगी तरी हाये काय? तुमच्या या नंग्या तलवारींना आमी घाबरतो की काय, आम्ही महार माणसं, जे आमच्यावर जुलूम करत होते एवढ्या वर्षापासून. त्यांनाच आमची पिढी घाबरली नाही तर मी तुमच्या या नंग्या तलवारीले घाबरणार तरी काय. आमी या नंग्या तलवारीसमोर झुकत नाही. आमी झुकतो फक्त आमच्या मायबापासमोर अन् त्या मातृभुमीसमोर, जी मातृभुमी आमाले पोसते. लहानाचं मोठं करते. आमाले अन्न देते.”
ते गोविंदाचे शब्द. ते अखेरचे शब्द ठरणार नव्हतेच गोविंदाचे. त्यातच औरंगजेबाचा तो हुुकूम. तसे ते सरदार. ते सरदार आदेशाचे पालन करणारे. त्यातच त्या सरदारांंना कुत्रं म्हटलेलं आवडलं नाही. त्यातच त्यांना गोविंदाचा भयंकर राग आला. मग क्षणाचाही विलंब न करता एका सरदारानं एक धारदार हत्यार काढलं. तसा तो गोविंदाच्या जवळ गेला व त्यानं ते हत्यार गोविंदाच्या मानेवर ठेवत म्हटलं,
“साल्या कुत्र्या, आम्हाला तू नपुंसक म्हणतोस काय. आता तू त्या अल्लाची आठवण कर.”
त्या सरदारानं मानेवर तो खड्ग ठेवताच गोविंदाला माहित झालं की आता आपण मरणार. त्यानं क्षणात घट्ट डोळे मिटले. त्याचबरोबर मानेवर तो खड्ग सुरीसारखा चालवत तो सरदार गोविंदाची मान करकर कापणार होता. तोच एक दूत तिथं येवून धडकला. म्हणू लागला,
“गुस्ताखी माफ करो सरकार.”
“बोलो, क्या आदेश है जहापनाह का?”
“जी सरकार, जहापनाह का आदेश है कि गोविंदा को छोड दिया जाये।”
औरंगजेबाचा आदेश. त्या सरदारांनी स्वप्न रंगवलं होतं. त्याचबरोबर त्या स्वप्नात गोविंदाच्या रक्ताच्या चिरकांड्या आजुबाजूला उडू लागल्या होत्या. त्यावेळी त्या भीमेला आणि इंद्रायणीलाही थरकाप सुटू लागला होता. त्याही आपल्या भुमीत जन्म घेतलेल्या गोविंदाची मान कापतांना पाहून घाबरल्या होत्या. कदाचित त्यांनाही वाटत होतं की औरंगा ह्या गोविंदाच्या शवाचेही तुकडे करुन आपल्या डोहात टाकतो की काय.” तसे पुन्हा त्या सरदारांच्या कानावर ते. शब्द आले.
ती मान करकर कापतांना सरदारांचे हात कतरले नसते. कारण त्यांना गोविंदानं कुुत्रा, नपुंसक, नामर्दांनो असं म्हटलं होतं. त्यातच गोविंदाही घाबरला नव्हता. खरं तर गोविंदाही महान व्यक्ती होता की ज्यानं आपल्या मनात एवढा मोठा राज दफन केला होता.
तो औरंगजेबाचा आदेश. त्या सरदारानं गोविंदाला सोडलं. त्यातच गोविंदाला थोडं हायसं वाटलं.
बादशाहा औरंगजेब हा लहरी स्वभावाचा होता. त्यानं गोविंदाला मारण्याचा तर आदेश दिला. परंतू लगेच त्याला वाटलं की जोपर्यंत आपण दख्खनवर ताबा मिळवू शकत नाही. तोपर्यंत या गोविंदाला कैदेतच ठेवावं. आपण दख्खन जिंकलो की याला मुक्ती द्यावी अर्थात त्याचा शिरच्छेद करावा. म्हणून की काय, त्यानं आपला आदेश मागे घेत गोविंदाला मारण्याचं टाळलं व त्यानं आता दख्खन सर करण्यावर लक्ष केंद्रीत केलं.
राजाराम महाराज हे जिंजीला पोहोचले होते. संभाजीच्या आज्ञेनुसार त्याची राणी महाराणी येसूबाईनं संभाजीच्या हत्येनंतर आपला मुलगा शाहू याचा राज्यभिषेक न करता छत्रपती राजारामाचा राज्यभिषेक करुन त्याला राजा बनवलं व सांगीतलं होतं की आपण जर दोघं रायगडावर असलो तर राज्याला धोका आहे. समजा मला रायगडावर औरंगजेबानं कैद केलं तर तुम्ही राज्याची धुरा सांभाळावी. त्यासाठी तुम्ही जिंजीला प्रयाण करावं.
जिंजी…… जिंजीचा किल्ला अभेद्य होता. तो सरासरी जिंकता येणं शक्य नव्हतं. त्यातच की रायगडाच्या वेढ्यातून राजाराम काही निवडक लोकांना घेवून बाहेर पडले आणि जिंजीला गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ व रुपाजी भोसले इत्यादी मंडळी होती.
मुघलांनी नोव्हेंबर १६८९ मध्ये रायगड ताब्यात घेतला. त्यातच महाराणी येसूबाई व युवराज शाहू महाराजांनाही पकडून नजरकैदेत ठेवलं.
महाराणी येसूबाई व युवराज शाहूंना कैदेत टाकताच मराठे थोडे खचले. पण मराठ्यांनी हार मानली नाही. औरंगजेबानं अनेक मराठे सरदारांना वतनाचं आमीष दाखवू दाखवू आपल्या बाजूनं वळवलं. पण ती बाब फार काळ टिकली नाही. कारण छत्रपती बनलेले राजाराम महाराजही हुशारच होते. औरंगजेबानं वतनाचं आमीष दिलं. पण राजाराम किल्ल्याचं आमीष द्यायचा. मुघल प्रदेश जिंकताच तो प्रदेशच राजाराम मराठे सरदारांना सोपवायचा व त्या प्रदेशाचा ज्याच्या कामगीरीनं तो प्रदेश जिंकला, त्याला ताबा द्यायचा. त्यामुळं अनेक मराठी मंडळी पुढे आली व ती मंडळी वतनासाठी लढू लागली होती. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. एकदा तर संताजी विठोजी चव्हाण या मराठे सरदारांनी बादशाहाच्या छावणीवर अचानकपणे हल्ला करुन त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळसच कापून आणला होता.
रायगड ताब्यात घेताच बादशाहानं झुल्फीकारखानाला दक्षिणेत जिंजी सर करण्यासाठी पाठवले. हा जिंजीचा किल्ला राजारामानं आठ वर्ष लढवला. त्यातच जिंजीतून महाराज राजाराम शिताफीनं निसटले व ते महाराष्ट्रात आले. त्यानंतर झुल्फिकारखानानं जिंजीचा किल्ला जिंकून घेतला.
राजाराम महाराज महाराष्ट्रात परत आल्यामुळं महाराष्ट्रातील मराठ्यांचा जोर फारच वाढला. ते परत औरंगजेबाशी जोमानं पुन्हा लढायला लागले. परंतू दुर्दैव असं की राजारामचं हे सर्व घडत असतांना एका अल्पशा आजारानं २ मार्च १७०० मध्ये निधन झालं. त्यानंतर महाराणी ताराबाई राजगादीवर बसली.
राजाराम मरण पावला होता. आता बादशाहा औरंगजेबाला वाटत होतं की आतातरी आपल्याला मराठ्यांना जिंकता येईल. कारण तो आता लढायामागून लढाया जिंकत होता. कारण त्याला दख्खन जिंकून पुढं उत्तर भागंही जिंकायचा होता. त्यातच त्याला संपूर्ण हिंदूस्थान इस्लाममय बनवायचा होता. परंतू त्याची आशा मावळली. कारण महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदाराच्या साहाय्यानं अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीत स्वराज्याचा संघर्ष नेटानं सुरु ठेवला. औरंगजेब एक एक किल्ला जिंकत पुढे जायचा तर ताराबाई त्याच्या मागवून एकएक किल्ला जिंकत मागवून जायची. असा हा पाठशिवणीचा खेळ. ते पाहून बादशाहा औरंगजेबही त्रस्त झाला होता.
काही इतिहासकार सांगतात की महाराणी ताराबाई आपल्या सरदारांना सांगायची की बादशाहा औरंगजेबाशी संगनमत करुन दारुगोळा व धन्यधान्य घ्या आणि ज्यावेळी गरज संपली की फितूर व्हा.
औरंगजेब कपटी आणि दगाबाज विचारांचा असल्यानं मराठ्यांची दगाबाजी त्याच्या लवकर लक्षात आली नाही. त्यातच ताराबाईच्या चाणाक्ष नजरेपुढं औरंगजेबाचं काहीच चाललं नाही. तब्बल सत्तावीस वर्ष तो दख्खनचा लढा लढवीत राहिला. त्याचं सारं स्वप्न धुळीस मिळालं. त्यातच बादशाहा आज संपुर्णतः वयोवृद्ध झाला होता. त्याला आता काम करणं जमत नव्हतं. कारण ताराबाईदेखील हुशार निघाली होती. तिच्या महत्वाकांक्षी पणापुढं वयोवृद्ध बादशाहाचं काहीही चालत नव्हतं.
बादशाहा म्हातारा झाला होता. आज त्याचे प्रजाजन त्याचं ऐकत नव्हते. त्याचे स्वतःचे पुत्रही त्याचं ऐकत नव्हते. त्यातच त्याला त्याचा भुतकाळ आठवत होता. त्याला तो संभाजी आठवत होता. ज्या संभाजीला त्यानं अतिशय क्रुर पद्धतीनं ठार केलं होतं. ती जीभही आठवत होती, जी जीभ औरंगजेबानं छाटली होती. ज्या जीभेनं तो ओरडून ओरडून सांगत होता की हे औरंग्या तुझं मरणंही असंच तडपू तडपू होईल. तुला सुखाची झोपही कधी येणार नाही. ते संभाजीचे शब्द आज खरे झाले होते. कारण बादशाहाला आता बरोबर झोप येत नव्हती. त्यातच बादशाहा मरणासाठी तडपत होता.
तो कानही आठवत होता. ज्या कानानं संभाजी ऐकत होता. नव्हे तर ती नाखूनं. जी नाखूनं संभाजीची त्याच्या सरदारांनी उखडून फेकली होती. त्यातच त्या संभाजी आधी कवी कलशाला त्यानं ठार केलं होतं. ज्यावेळी औरंगजेब झोपायचा. तेव्हा तो संभाजीचा संपूर्ण देह त्याच्यासमोर यायचा आणि म्हणायचा की मीच संभा आहे. तुला न्यायला आलोय. तेव्हा धिप्पाड देहाचा औरंगजेब खडबडून जागा व्हायचा आणि आजुबाजूला पाहायचा. परंतू आजुबाजूला कोणीच दिसायचं नाही. तेव्हा मात्र त्याच्या जीवास धडकी भरायची. त्यामुळं की काय, त्याला पश्चाताप व्हायचा आणि वाटायचं की मी ज्या गोष्टीसाठी हे सारं केलं. मला ते आता नको. मला सुखान मरण यावं. नको मला दख्खन आणि नको मला उत्तर. आता या भुमीतच मला विसावा हवा. कारण ही दख्खनची माती खरंच मौलवान आहे की या मातीनं एवढे वीर जन्माला घातले.
अचानक याच सगळ्या विचारात त्याला गोविंदाही आठवायचा की ज्या गोविंदानं आपल्या मातीशी गद्दारी केली नव्हती. जो आजही त्याच्या कारागृहात बंद होता. ज्यानं आजही आपल्या गावच्या लोकांची नावं सांगीतली नव्हती. ज्यानं आजही आपल्या मातृभुमीशी नाळ जोडून ठेवली होती. तो स्वाभामानानं आजही औरंगजेबासमोर उभा राहायचा. परंतू औरंगजेबालाही तो घाबरवायचा नव्हे तर औरंगजेबही त्याची हत्या करायला मागंपुढं पाहायचा. जर औरंगजेबानं विचार केला असता तर गोविंदा केव्हाच यमसदनी पोहोचला असता. जशी त्यानं संभाजीची हत्या केली होती. जशी त्यानं जनाबाईची हत्या केली होती. तशीच गोविंदाचीही त्यानं हत्या केली असती.
बादशाहा औरंगजेब हा लहरी सम्राट होता. त्याला तरुणपणात असं वाटत होतं की मी मरेपर्यंंत सशक्त राहील. अल्लाही मला काही करणार नाही. पण तो जे ही काही करीत होता. ते अल्लाला दिसत होतं. त्यामुळं की काय, त्याच्या अल्लानं त्याला शिक्षा देण्याचं ठरवलं. त्यातच तो एक आक्टोंबरचा दिवस उजळला. ते साल अंदाजे १७०० होते. अचानक या दिवशी माण नदीला पूर आला. त्यातच बादशाहाचे अनेक सैन्य व खजिना या पुरात वाहून गेला. मोगल छावणीतही पाणी शिरल्यानं मोगल छावणीतही हाहाकार उडाला. त्यामुळं अचानक बादशाहा औरंगजेबाला मध्यरात्री जाग आली. त्यातच त्याला वाटलं की या छावणीवर मराठ्यांनी हल्ला केला असावा. त्यातच तो दचकून इकडे तिकडे सैरावैरा पळू लागला. मात्र अडखळून त्याचा तोल गेला व तो चांगला जोरात आपटला. यात त्याचा गुडघा दुखावला गेला. कसाबसा स्वतःला सावरत तो सुरक्षीत ठिकाणी गेला. पुढं वैद्य व हकीम यांनी अनेक उपचार केले. परंतू औरंगजेबाचा पाय सुधरला नाही.
माण नदीच्या आसपासचा प्रदेशाला मानदेश म्हणतात. पुढं या घटनेनंतर बादशाहानं पुन्हा सैन्यभरती केली.
बादशाहाचा पाय अधू झाला होता. तो काही केल्या सुधरत नव्हता. त्यातच त्या पायान तो विव्हळत होता. त्यातच त्याला गतकाळातील पाप आठवत होते. त्याला संभाजी आठवत होता. त्याला गोविंदसिंंहही आठवत होता.
गुरु गोविंदसिंह…… त्याला चार मुलं होती. जोरावर सिंह, फतेह सिंह, अजीतसिंह व जुझार सिंह. सरसा नदीवर गुरु गोविंदसिंह जेव्हा परीवाराकडून अस्ताव्यस्त झाला. तेव्हा गोविंदसिंहची मोठी मुलं ही वडीलासोबत गेली. परंतू लहान मुलं ही जावू शकली नाही. ती मुलं आपली आजी गुजरी सोबत राहिली होती.
गुजरी गरीब होती. ती गंगू नावाच्या आपल्या सेवकाकडे जेवन बनवायची. त्यातच आपल्या दोन्ही नातवांचा सांभाळ करायची. तो गंगू, जो एकेकाळी गोविंदसिंहाचा नोकर होता.
गंगूनं गुजरीला कामावर ठेवलं खरं. परंतू तो कपटी असूनही त्यानं आश्वासनंही दिलं की तो तिच्या परीवाराला मिळवून देणार. त्यातच त्यानं कपटीपणा केलाच. त्यानं औरंगजेबाचा एक सरदार वजीर खानला सांगीतलं की गुरु गोविंदसिंहाची दोन्ही मुलं माझ्याकडे आहेत.
वजीरखान गंगूकडे आला. त्यानं गंगूला सोन्याच्या मोहरा दिल्या. त्यातच त्या तिघांना कैद करुन तो घेवून गेला.
वजीरखानानं त्या तिघांनाही एका बर्फाच्या घरात ठेवलं. त्यातच त्यांच्या अंगावरचे कपडेही काढले होते. तसेच त्या तिघांना थंडीच्या त्या घरातून काढून दुस-या दिवशी वजीरखानापुढं दाखल करण्यात आलं. वजीरखानानं म्हटलं,
“मी तुम्हाला सोडतो. पण तुम्हाला इस्लाम कबूल करावं लागेल.”
तो कपटी वजीरखान. त्यातच त्याचे ते कपटाने उच्चारलेले शब्द. पण त्या शब्दानं गुरु गोविंदसिंहाची दोन्ही मुलं घाबरली नाही. ती वजीरखानाला म्हणाली,
“वजीरखान.,आम्ही गोविंदसिंहाची मुलं. आमच्याच आमचा आजा तेजबहाद्दूरचं रक्त आहे. आम्ही तुम्हाला घाबरणारे नाहीत. प्रसंगी तुम्ही आम्हाला ठार केलं तरी चालेल.”
ती इवली इवली मुलं. मोठा जोरावर सिंह सात वर्षाचा होता तर लहान फतेहसिंह पाच वर्षाचा. परंतू त्यांचे ते ओजस्वी बोल. त्यातच त्यांना मुलाजिमनं म्हटलं,
“लडको, जरा जबान सँभालकर बात करो और इन वजीर खान के आगे सिर झुकाओ।”
त्या गुरु गोविंदसिंहाच्या मुलांनी तेही ऐकलं व उत्तर दिलं,
“आम्ही फक्त आमचे पुर्वज, आमचेे मायबाप व गुरु आणि आमच्या मातृभुमीच्या चरणावर मस्तक झुकवतो. या असल्या शैतानावर नाही. आम्ही आमच्या दादाजींना काय उत्तर देवू, ज्यांनी आम्हाला धर्माच्या नावावर मस्तक कटू देणं शिकवलंं. झुकवणं नाही.”
त्या मुलांचे ते तेजस्वी शब्द वजीरखानाचे काळीज चिरुन गेले. त्याला भयंकर राग आला. त्यातच त्यानं त्या दोघांनाही भिंतीमध्ये दफन करण्याची शिक्षा फर्मावली. ही गोष्ट जेव्हा गुजरीला माहित झाली. तेव्हा तिनं त्याचा धसका घेतला व प्राण त्यागले.
अजीजसिंह तर मुघलांशी लढता लढता मरण पावला. ज्यावेळी मुघलांशी लढता लढता त्याचे बाण संपले तेव्हा मुघल शत्रूंनी त्याला घेरलं. शेवटी अजीजसिंह आपल्या तलवारीनं लढू लागला. पण दुर्दैव असं की ती तलवारही तुटली. शेवटी तो म्यानानं लढू लागला. पण त्याचा त्या मुघल सैन्यापुढं टिकाव लागला नाही. त्यातच त्यानं मृत्यूला कवटाळलं. त्यावेळी अजीजसिंह सतरा वर्षाचा होता. त्यानंतर जुझारसिंह गादीवर आला. परंतू तोही मुघलांपुढं जास्त दिवस टिकला नाही. त्याचाही मुघलांनी अंत केला.
औरंगजेबाचं दुखणं जसजसं वाढत होतं. तसतसा तो तडपत होता. त्याला झोपही येत नव्हती. त्यातच आता त्याला गोविंदा सारखा आठवत होता. त्यातच २६ डिसेंबर १७०४ ला औरंगजेबाच्याच आदेशानं वजीरखानानं जोरावर सिंह व फतेहसिंहला भिंतीमध्ये ठार केलं.
आज सन १७०७ उजळला होता. बादशाहाला वाटत होते की आता आपण जगू शकत नाही. त्यातच त्याचं पायाचं दुखणं. त्यातच तो बैठी बादशाहा झाला होता. त्यातच त्याला झोप न येणं. त्यातच गोविंदाही त्याला आठवत होता. त्याला वाटत होतं की जाता जाता आपण गोविंदाची कैदेतून मुक्तता करावी. पण आदेश देणार कोणाला. तसं पाहता त्याची मुलंही त्याचं ऐकत नव्हती. राण्याही ऐकत नव्हत्या आणि ते सरदारही. तो निराश होत होता. त्याला चिंता सतावत होती. त्यातच त्यानं जे काही पाप केले. ते सारे पाप त्यांना आठवत होते.
मुलंच ती…… ती मुलं निघून गेली होती त्याच्यापासून दूरवर. तसे दोनचार सरदार जर सोडले तर बाकी त्याच्याजवळ कोणीच नव्हतं. एक राणी होती उदयपुरी. जी गायीका होती व जी सर्वात लहान होती. तशीच एक मुलगी होती. तिचं नाव बेगम जिनत होतं.
तो जसजसं त्यानं केलेलं पाप आठवायचा. तसतसा तो विव्हळायचा. त्यातच त्याला वाटायचं की आता आपण जास्त दिवस जगणार नाही. तोच त्याला गोविंदा आठवला. त्यातच त्याला वाटलं की जाता जाता हे तरी पुण्य काम करुन जायचं. नाहीतर अल्ला आपल्याला माफ करणार नाही. कारण बिचारा गोविंदा एक भला माणूस. त्यानं त्रास सहन केला. मरणं पसंद केलं. पण त्या वढू गावच्या अनेकानेक लोकांना वाचवलं. आपण त्याला सोडून थोडंसं पुण्य कमवावं. जेणेकरुन आपण पूर्ण पापाचे भागीदार होणार नाही. थोडंसं तरी पुण्य आपल्या वाट्याला येईल. त्यातच तो आपली कनिष्ठ राणी उदयपुरीला म्हणाला,
“महाराणी बेगम साहेबा, आपण कृपा करुन माझा शेवटचा आदेश पाळाल काय?”
राणी उदयपुरी आश्चर्यचकित झाली. तशी ती म्हणाली,
“बोलो, कौनसा आदेश है जहापनाह मेरे लिए?”
“आप कृपा करके उस गोविंदा को कैद से छोड दो। आजाद करो उसको। ताकि मै सुकून से मर जावू।”
त्याच्याजवळ एकटी त्याची लहान पत्नी उदयपुरी होती. तो अठ्ठयाऐंशी वर्षाचा झाला होता. तसेच खुल्ताबादला राहात होता. त्यानं राणी उदयपुरीला जसा आदेश दिला. तसं गोविंदाला कैदेतून मुक्त केलं होतं. पण गोविंदा काही राजा नव्हता वा सरदार नव्हता की त्याच्या कैदेची कोणी प्रशंसा करेल. मात्र वढू गाव आजही त्याची प्रशंसा करीत होता नव्हे तर त्याला मानत होता. त्याचं महत्वाचं कारणही होतं की त्यानं वढू गावातील अख्खा राज आपल्या मनामध्ये दफन केला होता. त्याच्या या राज दफन करण्यानं वढू गावातील त्याच्या बहुसंख्य साथीदाराचे प्राण वाचले होते.
आज गोविंदा खुश होता. त्यातच गोविंदाची सुटका झाल्यानं त्याला हायसं वाटत होतं. त्याला तो कारागृह आजही आठवत होता आणि आठवत होता तो अक्राळविक्राळ दिसणारा व चेह-यावर अक्राळलविक्राळ हावभाव ठेवणारा औरंगजेब. तो त्याला अतिशय त्रास देत होता. म्हणत होता की गावातील कोण कोण होते तुझ्यासोबत.
औरंगजेब बादशाहा आता फारच म्हातारा झाला होता. त्यानं गोविंदाला आपल्या कैदेतून सोडलं होतं. त्याला आता आपला मृत्यू पुढे दिसत होता. वाटत होतं की आपण अल्लाला प्यारे होणार.
तो काळ आला होता. त्यातच ती शेवटची वेळ. ती शेवटची रात्र होती. आज बादशाहाजवळ फक्त त्याची मुलगी बेगम जिनत होती.
बादशाहा औरंगजेब हा क्रुरकर्मी होता. त्यानं आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनाही कैदेत टाकलं होतं. त्यातच संभाजीचीही शरीराचे अवयव कापून हत्या केली होती. त्यानंतर गुरु गोविंदसिंहाच्या मुलांनाही त्यानं अत्यंत सुडानं संपवलं होतं. तसेच अनेक राजांना त्यानं आपल्या तरुणपणात संपवलं होतं.
तो शेवटचा दिवस होता औरंगजेबाचा आणि तीच शेवटची रात्र होती. त्या दिवशी त्याची तो आपल्या मुलीच्या तंबूत होता आणि तिच्याच कक्षात झोपला होता. त्यामुळं की काय, विद्रोहानं सर्व लोकं मारले गेले. पण बादशाहा अजुनही जीवंत होता.
काही दिवसापुर्वी छत्रसाल आणि महाप्रभूनं योजना बनवली की ज्या औरंगजेानं एवढ्या जणांना तडपवू तडपवू मारलं, त्याला सहजासहजी मृत्यू यायला नको. त्यानुसार छत्रसालला महाप्रभूनं एक विशेष जहर लावलेलं खंजर दिला. त्यातच सांगीतलं की बादशाहाला छत्रसालानं पुर्ण मारु नये. तर त्याचा तळपत तळपत अंत व्हायला हवा. जर त्याला पुर्ण मारलं तर त्यानं केलेले अत्याचार त्याला आठवणार नाहीत.
बुंदेला वीर छत्रसालनं या कार्याला यशस्वीपणे अंजाम दिला. महाप्रभूनं सांगीतल्याप्रमाणं औरंगजेबाला एक लांब चिरा दिला गेला. ज्यामुळं त्याच्या वेदना जास्त वाढत गेल्या.
राजा छत्रसाल……..ज्यावेळी बादशाहानं बुंदेलखंड जिंकण्यासाठी बुंदेलखंड वर आक्रमण केलं. त्यावेळी तिथं असलेल्या छत्रसाल राजानं रणकौशल व छापामार युद्धनीतीनं मुघलांना पराजीत केलं. त्यातच बुंदेलखंडला असलेलं मुघलांचं एकछत्री साम्राज्य समाप्त केलं होतं. त्याचवेळी त्यानं बादशाहा औरंगजेबाला एक चिरा देवून सोडलं होतं.
बादशाहा त्या शेवटच्या रात्री झोपला होता. तो विव्हळत होता आपल्या जखमांनी आणि पायाच्या त्रासानंही विव्हळत होता. त्या रात्री तो स्वगत बडबडत होता. म्हणत होता.
“हे अल्ला, तू मेरे आँखों के सामने निवास करता था। किंतू मै मेरी आँखों में छाये हूए अज्ञान के काले अँधेरे छाये में लिप्त था। आज मुझे पता चला कि जीवन नाशवान है और बीता पल कभी वापस नही आता। भविष्य में मेरे लिए कोई आशा भी नही रह गई है। ज्वर अब उतर गया है। किंतू मुझ में अब मांस और सुखी चमडी के अलावा कुछ भी शेष रह नही गया है। हे अल्ला, काश मुझे एक ही बेटा होता. जो संभा की तरह होता। जिसने अपना सर कटवाया, मगर अहमीयत नही बदलायी।”
औरंगजेब बादशाहा स्वतःला अतिशय दुर्बल समजत होता. त्यानं शाहजादा आलमला एक पत्र लिहिला. त्यात लिहिलं की मी फारच म्हातारा झालो असून दुर्बलही बनलेलो आहे. जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा माझ्याजवळ पुष्कळ लोकं होते. परंतू यावेळी मी एकटाच चाललो आहे मृत्यूला कवटाळायला. मला माहिती नाही की मी या जगात का आलो. तसेच मला त्या वेळेचं दुःख ही आहे की ज्यावेळी तू मला लोकांची सेवा करायची संधी दिली होती. त्यावेळी मी ते सगळं विसरुन लोकांवर अत्याचारच केले. माझं जीवन त्यामुळंच निरर्थक बनलं.
ज्याप्रमाणे माझ्या जीवनात शांती नाही, त्याप्रमाणे माझी सेना भी निराश झाली आहे. त्या सेनेमध्येही उत्साह राहिलेला नाही. त्या सेनेलाही माहित नाही की त्यांचा सम्राट जीवंत आहे किंवा नाही. मला माहित आहे की लोकं या संसारात येतात. तेव्हा काहीच घेवून येत नाहीत आणि काहीच घेवून जात नाहीत. पण मी या संसारात जेव्हा आलो, तेव्हा काहीच घेवून आलेलो नाही. परंतू जातांना भारी पापाचं ओझं घेवून जाणार आहे. मला माहित नाही की माझ्या अल्ला तू माझ्यासाठी पापक्षलनाचा कोणता मापदंड तयार केलाय. परंतू मला तुझ्या दयाळूपणावर विश्वास आहे. त्यामुळं मी आता इतर कोणावरही विश्वास करु शकत नाही. जेव्हा माझीच स्वतःची जगण्याची आशा विफल झाली आहे, तेव्हा मी इतरांची आशा का करावी? हे अल्ला जावू दे ते सारं. आता मी माझी नौका पाण्यात सोडलेली आहे. आता मला जास्त काळ जगावसं वाटत नाही.
ज्याप्रमाणे बादशाहा औरंगजेबाचे शेवटचे दिवस सुरु झाले. तेव्हा त्याला वाटलं की आपण आता जगू शकत नाही. तेव्हा त्यानं आपला मुलगा कामबख्शला एक पत्र लिहिलं. त्यात लिहिलं,
“तू अल्लाच्या मतानुसार चालावं असं मला वाटते. मी घोर पाप केले आहे. त्याची शिक्षाही मी भोगत आहे. अल्ला, आपण जे पाप करतो, त्याची जबर शिक्षा देत असतो. मलाही त्यानं शिक्षा दिली. जबरच दिली. मी फारच दुःखी असून मला वाटते की तुझी आजारी आई देखील माझ्यासोबत जाईल. मी अल्लाकडे आशा करतो की अल्ला तुला शांती देईलच. शिवाय तुझं संरक्षणंही करेल.”
कामबख्शला पत्र लिहून झालं होतं. तसा तो अल्लाला म्हणाला,
“हे अल्ला, मी आता येत आहे. त्यामुळं जी ही पापं माझ्या हातून झाली असतील. त्या सर्व पापांना तू क्षमा कर आणि क्षमा जर करत नसशील तर त्या सर्व पापाची शिक्षा तू मला दे. माझ्या लेकरांना देवू नकोस. आता मी जिकडे जिकडे पाहात आहे. तिकडे तिकडे तुझंच जग आता मरतासमयी दिसत आहे. हे अल्ला, मला घेवून जा. मला मृत्यूचं भय नाही. पण एक माझी अंतिम इच्छा पूर्ण कर. ती म्हणजे माझ्या मुलाला सद्बुद्धी दे. त्याला हे शिकव की त्यानं पूर्णतः चांगली कर्म करावीत. जेणेकरुन त्याच्या कर्माची फलप्राप्ती त्याला व्हावी. मी फारच दुःखी आहे. तेव्हा मला हे अल्ला लवकरच घेवून जा. आता माझी या धरेवरची सर्व कामे संपलेली असून मी तुझ्यासोबत यायला मोकळा आहे.”
बादशाहा औरंगजेबाचं अल्लासोबत बोलून झालं होतं. तसा तो आपल्याजवळ मरतासमयी असलेल्या लोकांना म्हणाला,
क्रमश:)-अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०