संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- भाग ९
9
गणपत महार
छत्रपती शाहू महाराज व महाराणी येसूबाई मुघलाच्या कैदेत पडली. त्यातच ते सतरा वर्ष मुघलांच्या कैदेत राहिले. पुढे याच मुघलांच्या कैदेत शाहू महाराजांचे दोन विवाह झाले. त्यातच त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था जिनत उन्नीसा बेगम हिने केली. एकदा धर्मांतरावरुन शाहू व औरंगजेबात वाद झाला. परंतू औरंगजेबाची मुलगी जिनत बेगमनं मध्यस्थी केली. म्हणून तो वाद क्षमला. पुढे मराठेशाही खिळखिळी करण्यासाठी शाहू महाराजांची १७०८ ला सुटका झाली. त्यातच राजगादीसाठी ताराबाई व छत्रपती शाहू महाराजात वाद झाला. छत्रपती शाहूंनी सैन्याची जुळवाजुळव केली. त्यातच पुढे महाराणी ताराबाई सोबत खेड येथे लढाई झाली. त्यात शाहू महाराज विजयी झाले. त्यांनी सातारा जिंकून घेतला. त्यातच ताराबाईनं इस १७१० मध्ये पन्हाळगड जिंकला व आपला मुलगा दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषीत केले. त्यातच आता मराठ्यांचे दोन राज्य अस्तीत्वात आले. एक कोल्हापूर व दुसरं सातारा.
छत्रपती शाहू महाराजांना औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सोडण्यात आलं. त्यातच त्यानं सत्ता हातात घेवून सातारा इथं आपली राजधानी बनवली. त्यावेळी त्यानं बाळाजी विश्वनाथला पेशवा बनवलं. या बाळाजी विश्वनाथनं सन १७१५ मध्ये वढू गावाला जावून भिकाराम गोसावी व वासुुदेवभट बिन शामभटला संभाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सोपवली. त्यातच त्यांना त्या देखरेखीसाठी वढू गावातील जागाही दान म्हणून दिली.
काही दिवसपर्यंत वढू गावातील राजकारण शांत राहिलं. गोविंदाही शांंत होता. पण ज्याप्रमाणे इतर भागातील मराठ्यांचं राजकारण तापलं. त्याचप्रमाणे अशा बदलत्या वढू गावाच्या राजकारणाच्या वार्ता छत्रपती शाहू महाराजांच्या कानावर जावू लागल्या. त्यातच छत्रपती शाहू महाराज वढू गावाला गेले. त्यांनी वढू गावची एकंदर परीस्थीती पाहिली. त्यांना सत्य परीस्थीती माहित झाली. त्यातच त्यांनी संभाजीच्या देखरेखीखाली नेमलेल्या भिकाराम गोसावी व वासुदेव भट बिन शामभटला हटवलं व त्या देखरेखीची जबाबदारी १७३३ मध्ये गोविंदा गोपाळ गायकवाडला उर्फ गणपत महारला दिली. त्यातच काही जागाही त्या देखरेखीसाठी दिली. कारण छत्रपती शाहू महाराजांना माहित झालं होतं की त्याच्या पित्याचा म्हणजेच संभाजीचा दाहसंस्कार गोविंदा उर्फ गणपत महार यानं केलेला आहे.
छत्रपतीनं आपल्या पित्याचा दाहसंस्कार करणा-या गोविंदा गोपाळ गायकवाडला संभाजीच्या समाधीच्या देखरेखीची जबाबदारी छत्रपती शाहू महाराजानं दिली खरी. पण त्यामुळं भिकाराम गोसावी व वासुदेव भट बिन शामभटची मनं त्यांच्याकडून संभाजीच्या समाधी रक्षणाची जबाबदारी काढून घेताच कलुषीत झाली. त्यातच त्यांच्याकडून त्यांना देण्यात आलेली जागाही काढण्यात आली. त्यामुळं त्यांना वाटलं की गोविंदा महार जातीचा असून त्यांना संभाजीच्या समाधी रक्षणाची जबाबदारी का द्यावी. पुढं अस्पृश्य श्रेणीनुसार गावात दोन गट पडले. एक स्पृश्य व दुसरा अस्पृश्य. त्यातच भांडणं होवू लागले. ती भांडणं एवढी तीव्र झाली की पुढं लोकं संभाजीच्या तुकडे गोळा करण्याच्या गोष्टीला लोकं विसरले. तसेच त्या गोविंदानं गावासाठी काय योगदान दिलं. तेही गाव विसरलं. कारण त्यांना माहित नव्हतं की गोविंदानं औरंगजेबाच्या कारागृहात काय अत्याचार झेलले. कारण कारागृहात काय काय अत्याचार झाले. ते गोविंदालाच माहित होते. त्यानं तर आपल्या मौनव्रतानं अख्ख्या गावाला वाचवलं होतं. जर औरंगजेबाला माहित झालं असतं तर कदाचित गावच्या लोकांनाही औरंगजेबाच्या कहराचा सामना करावा लागला असता.
आज वढू गाव डौलानं सांगत आहे त्या संभाजीची गाथा. कोणी म्हणतात की गोविंदानं संभाजीच्या तुकड्यांना गोळा केलंच नाही तर मराठ्यांनी गोळा केले. त्यासाठी संदर्भ देतात. तर कोणी म्हणतात की ते तुकडे गोविंदानं गोळा केले. यात सगळं राजकारण. माझ्याच पिढीनं हे सारं केलं. म्हणून मलाच महान म्हणा. सर्व श्रेय लाटण्याचं काम. मरणारा मरुन गेला.
संदर्भातील एका पुराव्यानुसार महाराच्या प्रमुखाला ढगोमेगो म्हणत अर्थात ढगोजी व मेगोजी म्हणत असत. त्यातच गावची सुरक्षा करण्याचं काम महारांनाच असे. त्यामुळं त्या पुराव्यानुसार इस १७३३ ला संभाजीच्या समाधीची देखरेख करण्याची जबाबदारी गोविंदा गोपाळ गायकवाडवर अर्थात गणपत महारवर आली. ती संभाजीचे पुत्र शाहू महाराजांनी दिली. त्यानुसार संभाजीची समाधी कोणी बांधली हे सांगीतलेले नाही.
महत्वाचं म्हणजे संभाजीचे तुकडे गोविंदानं गोळा करुन त्याला कोणाकडून शिवून घेवून त्याच्या चिंंतेला आपल्या शेतीत त्यानंच अग्नी दिला असावा. म्हणूनच शाहू महाराजांनी त्यालाच सरक्षणाची जबाबदारी १७३३ ला दिली असावी हे या पुराव्यानुसार दिसते. त्यावेळी गोविंदाचे वय चौ-याहत्तर असावे. गोविंदानच समाधी बांधलेली असावी. याची माहिती छत्रपती शाहू महाराजांना असावी. त्यामुळंच गोविंदाचा इतिहास एक हस्तक म्हणून पुढं आला असावा. तर दुसरा पुरावा हा १८ जानेवारी १७१५ चा आहे. या दुस-या पुराव्यानुसार या संभाजीच्या समाधीची देखभाल १७१५ मध्ये भिकाराम गोसावी व वासूदेवभट बिन शामभटाला दिलेली आहे. याचाच अर्थ असा नाही की गोविंदानं संभाजीच्या बाबतीत काहीच केलं नाही. असे वढू गावातील काही लोकंं आजही म्हणत असतात. तसेच काही लोकं हे गोविंदाच्या कष्टाला मान देवून गोविंदाच्या बाजूने बोलत असतात.
छत्रपती शाहूच्या निर्णयानुसार गोविंदाला संभाजीच्या समाधीच्या देखरेखीची जबाबदारी देताच अख्खा स्पृश्य समाज एक झाला व त्यांनी एकत्र येवून त्या गोविंंदाची हत्या केली. त्यातच संभाजी व गोविंदाचा अख्खा इतिहास बदलविण्याचा प्रयत्न झाला. त्यातच काही मंडळींनी गोविंदाच्या मृत्यूनंतर संभाजीच्या समाधीजवळच गोविंदाची समाधीही बांधली.
आताही वढू गाव शांत नाही. तिथं आजही वणवा पेटतच असतो. गावातील लोकं चांगले आहेत. त्यांना काही राजकारणाशी लेनदेन नाही. बाहेरील लोकं येतात. तेच गावातील लोकांना भडकवितात. त्यातच राजकारण खेळतात. मग भांडणं होतात. वातावरण तापतं. त्या तापत्या वातावरणात वढूू गावंही भरडलं जातं आणि भरडली जातात ती माणसं. जी निष्पाप आणि इमानदार असतात. अगदी गोविंदासारखी……..
त्यांच्या सुटल्यानंतर आजमशाहाच्या विचारानुसार पुढे महाराणी ताराबाई व महाराणी येशूबाईत संघर्ष झाला. त्या दोघात जो संघर्ष झाला. त्याचा फायदा आजमशाहाला होणार होता. परंतू तो फायदा करुन घेण्यापुर्वीच आजमशाहाला मुहम्मद मुअज्जलनं हैदराबाद या स्थळी मारुन टाकलं होतं.
क्रमश:)-अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०