संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- भाग ८
8 गणपत महार
“मी मेल्यानंतर माझी कबर ही पक्की बनवू नये. माझं सर्व अवयव झाकलं जावं. त्यातच मी मेल्यानंतर माझं तोंड उघडं ठेवावं. जेणेकरुन मला अल्लाला दररोज माफी मागता यावी. मला माझ्या पापाचं क्षालन करता यावं. तसंच लोकांना चांगला संदेश देता यावा की जो माझ्यासारखे असे पाप करतो, त्याची दुर्गती माझ्यासारखीच होते. अल्ला त्याला माफ करीत नाही.”
बादशाहा औरंगजेब ज्यावेळी मरण पावला. त्यावेळी तो अधिकच दुर्बल व असहाय्य वाटत होता. त्याच्याजवळ कोणीच नव्हतं. एक चाळीस वर्षीय पुत्री होती. जिचं नाव जिनत होतं. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा सम्राट औरंगजेब एकटा होता मरतासमयी. मरतासमयी त्याच्या मनात तो पश्चाताप होता. त्यानं आपल्या जीवनात वडीलांना कैद करणं, आपल्या भावांची हत्या करणं आणि प्रजेचे हाल करुन मारणं ह्याच गोष्टी केल्या होत्या.
त्यानं आपला वसीयतनामा तयार केला होता. त्यात त्यानं राजगादीसाठी मुलांना युद्ध करु नका असंच दर्शवलं होतं. परंतू नियती काही त्याच्या कर्मानं चूप नव्हती. नियतीनं त्याच्या कर्माची शिक्षा त्याच्या मुलांनाही दिली. त्याच्या तीनही मुलात युद्ध झालं.
मुहम्मद मुअज्जल, मुहम्मद आजम व मुहम्मद कामबख्श मध्ये जे उत्तराधिकारी पदासाठी युद्ध झालं, त्यात मोठा भाऊ मुहम्मद मुअज्जल विजयी झाला. त्यानं कामबख्शला जानेवारी १७०९ मध्ये हैदराबादला व मुहम्मद आजमला १८ जून १७०७ मध्ये जिजाऊ नावाच्या स्थळी मारुन टाकले.
बादशाहा औरंगजेब ३ मार्च १७०७ मध्ये मरण पावला. त्यावेळी तो एकोणनव्वद वर्षाचा होता. त्याला महाराष्ट्रात खुल्ताबाद नावाच्या लहानशा गावात दफन करण्यात आलं. तिथे लहानसा मकबरा बनवला गेला. त्याला त्या मकब-यात साध्या पद्धतीनं दफन केलं गेलं. ती कबर कच्च्या मातीची बनवली गेली. त्यावर छतही टाकलं गेलं नाही. त्यातच दरवर्षी त्याच्या त्या मजारवर हिरवं गवत लावण्यात येतं. ते हिरवं गवत म्हणजे बादशाहाच्या पश्चातापाचं लक्षण आहे. आजही बादशाहा त्या पश्चातापाच्या अग्नीत जळत आहे.
बादशाहा औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या वारसात उत्तराधिकारी पदासाठी युद्ध झालं. त्यातच बादशाहा औरंगजेबानं त्याच्या कैदेत असलेल्या महाराणी येशूबाई व शाहू महाराजांना आजमशाहच्या ताब्यात दिलं होतं. परंतू ज्यावेळी औरंगजेब मरण पावला. तेव्हा दक्षिणेत असलेला आजमशाहा उत्तराधिकारी पदासाठी दिल्लीला गेला. त्यातच त्याला वाटलं की महाराष्ट्रात छत्रपतीच्या गादीसाठी शाह महाराज व राणी ताराबाईत कलह होईल व मराठ्यांचे खच्चीकरण होईल. ज्याचा फायदा आपल्याला होईल. असा विचार करुन त्यानं शाहू महाराज व येशूबाईची दिल्लीला जाण्यापुर्वी सुटका केली.
क्रमश:)-अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०