हुकुमशाहीचा कहर चक्क मा.न्यायाधीशाच्या भाषनाला जेव्हा विरोध होतो तेव्हा…
हुकुमशाहीचा कहर चक्क मा.न्यायाधीशाच्या भाषनाला जेव्हा विरोध होतो तेव्हा…
सत्तेचा उपयोग जर लोकांच्या हितासाठी करण्याऐवजी लोकांना सर्व स्थरातून गुलाम बनवण्यासाठी करत असलेल्या व्यवस्थेत लोकांना जागृत करणे सरकारला किती झोंबू शकते याचे ताजे उदाहरण म्हणजे विधितज्ञ पूर्व न्यायमूर्ती.बी.जी. कोळसे पाटलांवर एका पोलीस अधिकाऱ्याने ‘तुम्ही मनुवाद”हा शब्द का वापरला म्हणून आपल्या वर्दीचा रुबाब दाखवत चक्क एका माजी न्यायाधीशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गडांतर आणण्याचं काम केलं.हा प्रकार म्हणजे सत्तेच्या विरोधात सत्य मांडणाऱ्याचे तोंड दाबणे होय.
भारतीय राज्यघटनेने कलम १९(१)मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद करण्यात आली आहे. हे सर्वशृत असले तरी हल्ली आपल्या देशात हुकूमशाहीचा कहर दिवसें दिवस वाढत चालला आहे.भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे व्यक्ती आपले मत मांडू शकतो.पण सद्यस्थितीत सत्य बोलणाऱ्याची जीभ छाटण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पण जेव्हा एखादा सामान्य माणूस जर कुठल्या बाबतीत बोलत असेल किंवा अन्य काही प्रकारच्या त्याला आपल्या वर्दीचा व अधिकाराचा रुबाब दाखवत त्यावर एक प्रकारचा दबाब टाकून मारझोड करणे, त्याच्या अधिकाराचे हनन करणे,विनाकारण त्रास देणे हे प्रकार सामान्य माणसासंदर्भात रोजच घडतात.पण तोच प्रकार जर एका माजी न्यायाधीशासोबत घडत असेल तर इथल्या हुकूमशाही व्यवस्थेची कल्पना अधिकपणे जाणवू लागते.
बी. जी. कोळसे पाटील एका बौद्ध विहाराच्या अनावरणासाठी गेले होते.गेली दीड -दोन वर्षांपासून त्यांना बोलावण्यात येत होतं पण ;त्यांना जाता येत न्हवतं; त्यामुळे कित्येक दिवसापासूनचे बोलावणे ते झुगारू शकले नाही. अशा अवस्थेत पुण्यातील एक ग्रामीण भागात वक्तव्य करताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवलं ही बाब चुकीचीच आहे.
बी. जी. कोळसे पाटील हे सामान्य व्यक्तिमत्व नाहीतर ते एक सर्वश्रुत परिचयाचं विधीतज्ञ,शोषित वंचित,पीडित,जनसामान्यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणारं राज्यभरासह देशात ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व आहे. राजकारण हे धर्म, हिंदू -मुस्लिम ,मंदिर -मस्जित, सत्ताधाऱ्यांच्या केंद्रित राहू नये असा त्यांचा पवित्रा आहे.राजकारण हे माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा,या मूलभ गरजा आणि प्रश्नाभोवतो केंद्रित असले पाहिजे अशी त्यांची धारणा आहे.व्याख्याने,आंदोलने,लोकचळवळ,जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या,सत्यासाठी आवाज उठवणाऱ्या शासनव्यवस्थेच्या विरोधात जाणाऱ्या जनतेचं, समतेचं,स्वातंत्र्याची व्यवस्था निर्माण करू इच्छिणाऱ्या बी जी कोळसे पाटलांना एक साधा पोलीस कर्मचारी ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध बोलू नका म्हणून आडवा येणे म्हणजे पोलीस अधिकारण्याने आपल्या अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार आहे.कारण मनुवादी ,ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात आजपर्यंत काय केवळ बी जी कोळसे पाटलांनीच वक्तव्य केले नाही तर रोजच या व्यवस्थेविरुद्ध बोलल्या जाते.व ते सत्य मांडणे गैर नाही. मुळातच भारताचा इतिहास हा शोषण व्यवस्थेचा इतिहास आहे. गेली पाच हजार वर्षांपासून केलेले अन्याय,अत्याचार,शोषण हा सगळा इतिहास पुरावे,दाखले,संदर्भग्रंथ, या सगळ्या बाबतीत ब्राह्मण, मनु हाच शोषक आहे.त्यामुळे त्यास मनुवादी ब्राह्मण बोलणे गैर काय आहे? आणि मनुवादी किंवा ब्राह्मणवादी व्यवस्थेवर टीका टिप्पणी करणारे व्यक्तिमत्व काय केवळ आजपर्यंत बी जी कोळसे पाटलांनीच केले अशातला भाग नाही. रोजच कितीतरी वृत्तपत्र,पुस्तके,टीव्ही चॅनल,चित्रपट,सभा,-संमेलने,मोर्चे,आंदोलने, समाजमाध्यम या सगळ्या माध्यमातून अगदी जाहीरपणे बोलतो.ही अगदी सामान्य बाब असून कोणत्याही व्यक्तीस पुराव्याच्या आधारे,सत्य मांडण्याचा अधिकार आहे त्यास कोणीही रोखू शकत नाही. तरीही जर देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल तर ही बाब मात्र गंभीरच -रायटर्समंच(मनोहर सोनकांबळे, नांदेड) 8806025150