स्प्रुट लेखन
न्यायालयाच्या प्रलंबीत केसेस ; चिंतेची बाब
न्यायालयाच्या प्रलंबीत केसेस ; चिंतेची बाब
कोरोना काळ. काही दिवस न्यायालयही बंद राहिलं. आता काही दिवसापुर्वी न्यायालय सुरु झालं. सुनावण्या सुरु झाल्या. लोकं यायला लागले. त्यातच गर्दी वाढू लागली. तसं पाहता आज कोरोना जरी असला तरी न्यायालयात गर्दी आहे.
न्यायालयात खटले आजही प्रलंबीत आहेत. त्यातच त्या खटल्यात वाढ होतांना दिसत आहे. त्यात घट होतांना दिसत नाही. त्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडू शकतो.
न्यायालयातील प्रलंबीत खटल्यांच्या कारणाचा शोध घेतांना एक गोष्ट नक्कीच सापडली की न्यायालय ठोस पुराव्याशिवाय खटले संपवायचे नावच घेत नाही. या संदर्भात एक खटला सांगतो.
एका खटल्यात तक्रारदार मरण पावला. त्यातच त्या तक्रारदारानं टाकलेली तक्रार. त्या तक्रारीत कितपत सत्यता होती हे त्यालाच माहित. (कारण काहीकाही खटल्यात जुलूम हा आरोपीवरही होत असतो) तो काळाच्या ओघात मरण पावला. त्यातच त्याला झालेल्या अपघाताविषयी वर्तमानपत्रात बातमी आली. त्या बातमीची एक सांक्षांत्कित प्रत आरोपींनी न्यायालयात लावली. परंतू न्यायालय तो तक्रारदार मरण पावल्याचं ऐकत नव्हतं. पुढे तर आरोपींनी न्यायालयात मृत्यूचीही सांक्षांत्कित प्रत लावली. परंतू तिही न्यायालयानं अस्विकार केली. न्यायालयाचं म्हणणं होतं. मुळ प्रत आणा.
तक्रारदाराच्या मृत्यूची मुळ प्रत. आरोपी कशी आणणार. कारण मृत्यू प्रमाणपत्र हे स्वतःच्या मुलाबाळ व पत्नीव्यतिरीक्त कोणालाही देता येत नाही. त्याचं कारणंही तसंच आहे. सध्याचं जग हे स्वार्थानं भरलेलं आहे. लोकं मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवतात व त्याच आधारावर मालमत्ताच्या मालमत्ता हस्तगत करतात. त्यातच न्यायालय तर असं म्हणत होतं की सदर व्यक्ती जीवंत असून अशा बातम्याही खोट्याच छापल्या जातात. पण हे जरी खरं असलं तरी ज्यावेळी अशी बातमी खोटी निघाली तर आरोपीला दोषी करार देवून त्याला केव्हाही आरोपीच्या पिंज-यात टाकता येतं.
खटलाच तो. आता मुळ मृत्यू प्रमाणपत्र आरोपींना कुठून मिळेल. त्यातच आरोपी त्रस्त. केव्हा केव्हा खटला बंद होतो आणि केव्हा केव्हा नाही. असं आरोपींना वाटणारच. वाटल्यास या खटल्यात आरोपींच्या म्हणण्यानुसार न्यायालयानं संबंधीत प्रकरणाची पोलिसांतर्फे चौकशी करायला हवी. परंतू न्यायालय तसं करीत नाही. म्हणून खटला प्रलंबीत.
न्यायालयात असे बरेच खटले आहेत. जे अशाचप्रकारच्या वेगवेगळ्या कारणानं प्रलंबीत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. यातूनच न्यायालयात गर्दी वाढतांना दिसणार नाही तर काय? आज न्यायालयात प्रलंबीत खटल्याची संख्या वाढत आहे. तसेच खटल्यांचीही संख्या वाढत आहे. पण ते खटले संपायचे नाव घेत नाही वा त्यात घट होण्याची चिन्हही दिसत नाही. हे असे प्रलंबीत खटले........ जे संपायचं नावच घेत नाही. यावरुन असं जाणवतं की न्यायालय हे न्याय देण्यासाठी आहे की त्रास देण्यासाठी. पण कोणीही यात बोलू शकत नाही. कारण न्यायालयाविरोधात काहीही बोलणं म्हणजे न्यायालयाचा अवमान असतो. जो कोणालाही करता येत नाही. त्यातच न्यायालय हे जनतेच्या सेवेसाठी असतो. प्रत्येकाला न्याय मिळायलाच हवा. मग तो मृत व्यक्ती का असेना. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०