देश

90 टक्के भारतीयांनो सावधान ! ही आहेत तुमच्या समस्यांची कारणे..

90 टक्के भारतीयांनो सावधान ! ही आहेत तुमच्या समस्यांची कारणे..

आज भारतीय जनतेला मोठ्या संकटांनी घेरले आहे.ते म्हणजे लोकांच्या गरजात वाढ होत आहे पण त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी लोकांकडे उत्पन्नाचे कोणतेच स्रोत उरलेले नाही.त्यामुळे पोटाची खळगी कशी भरावी हा मोठा प्रश्न निर्माण होताना दिसतो.एकीकडं विज्ञान,तंत्रज्ञान जगतिकीकरण यामुळे जग अगदी मुठीत आले पण;मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे हा एक गंभीर प्रश्न प्रत्येकाला भेडसावत आहे.तर यात तुमची काहीच चूक नाही मुळातच शासन जी ध्येयधोरणे राबवते ती जेव्हा चुकीच्या पद्धतीने राबवली गेली की,अशी परिस्थिती निर्माण होते. आज देशात बेरोजगारी वाढली, लोकांच्या हाताला काम नाही. सगळीकडेच महागाईने तोंड विस्फारलेले आहे .म्हणजेच जणू काही चोफेर मार्गांनी तुमची लूट चालू आहे .होय हे अगदी बरोबर आहे तुम्ही संकटात आहात कारण इथली लोकशाही संकटात असून सरकार हे तुम्हाला केंद्रित धरून धोरणे राबवत नाही तर देशातील प्रत्येक धोरण हे भांडवलदार केंद्रित असल्याने तुमचा विकास अथवा कोणत्याही प्रकारची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या वास्तव परिस्थितीचा विचार केला असता तुमच्या समस्यांना कारणीभूत घटक म्हणजे
●देशातील 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे गरीब श्रीमंतीची दरी मोठ्या प्रमाणात वाढली.
●10 टक्के लोक गर्भश्रीमंत आणि 90%जनता कंगाल अवस्थेत जीवन कंठत आहे.
●देशात 140 डॉलर अरबपती तयार झाले.हे लोक देशाच्या GDP एवढे श्रीमंत आहेत.
●कोरोना काळात GDP 7.7 टक्क्यांवर घसरला,तसेच करोडो लोक बेरोजगार झाले.
●140 धनदांडग्या व्यक्तीची श्रीमंती 100टक्यांनी वाढली.
●ग्रामीण भागात राहणाऱ्या 90 टक्केपेक्षा जास्त कुटुंबांची कमाई 5 हजारापेक्षा कमी कमी आहे. त जर वर उल्लेखित धनदांडग्या लोकांएवढी कमाई करायची ठरवली तर नरेगातील योजनेतील मजुरीला सुमारे 4 करोड वर्ष काम करावे लागेल.
अशाप्रकारची भीषण अवस्था देशात निर्माण झाली. ही भीषण अवस्था म्हणजेच विषमतेला फुटलेले पाय होय.त्यामुळे भारतीय जनतेचे जीवन अगदी धोक्यात आले आहे. देशातील सर्व लोकांना सामाजिक न्याय मिळणे हा भारतीय संविधानाचा अंतिम उद्देश आहे; पण सत्ताधाऱ्यांनी केवळ सत्ता कायम प्रस्थापित राहावी यासाठी आपली धोरणे आखली असल्याने ते तुमच्या मताचे मूल्य नेस्थाभूत करण्यास निघाले आहेत.देशातील ही विषमता म्हणजे गुलामीकडे होणारी वाटचाल होय असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. म्हणून भारतीय जनतेनी वरील परिस्थितीच्या दाहकतेचा गांभीर्याने विचार करावा.
–(रायटर्समंच कोणत्याही पक्षाचे समर्थन अथवा बाजू उचलून धरत नाही तर संशोधणीय वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडते. ख्यातनाम वरिष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती व्याखानमालेत आपले विचार मांडले त्यात आजच्या संभाव्य परिस्थितीचा आढावा दिला त्यातील पुष्टीशी मर्यादित)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button