संपादकीय

संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- ३

3
गणपत महार
तो काळ…….. त्या काळातही अस्पृश्यता शिगेलाच होती. जातीजातीत भेदभाव दूरपर्यंत पसरलेला होता. त्यातच अस्पृश्यांसाठी वेगवेगळे नियम लावले गेले होते. सकाळी दहा वाजेपुर्वी आणि सायंकाळी पाच वाजेनंतर अस्पृश्यांना गावात प्रवेश नव्हता. त्यातच अन्न मिळत नसल्यानं उष्ट्या पत्रावळी चाटल्याशिवाय पर्यायच नव्हता. माणसांना त्या हीन दर्जाची त्यांना ती कामे करावीच लागत असे.
गावात त्यांना उच्च जातीच्या माणसांसमोर झुकूनच काम करावं लागत असे. त्यांचा स्पर्श जर झाला तर विटाळच होता.
मात्र शुद्ध अशुद्धतेच्या बाबतीत थोडा वेगळा प्रकार होता. जर इतर समाजाची माणसं मरण पावली तर ब्राम्हण समाजाला जीवनावश्यक वस्तू दान देत असत. त्यानं आपल्या घरची अलाबला जावून आपल्याला चांगलं वैभव प्राप्त होते असं लोकांचं मानणं होतं. त्यातच ब्राम्हणाच्या घरी जर मैयत झालीच तर त्यांना स्वतः शुद्ध करण्यासाठी अस्पृश्यांची गरज होती.
गावात अस्पृश्यासह इतरही जातीची माणसं अगदी गुण्यागोविंदानं राहात असत. ते एकमेकांच्या कामात पडत असत. इतर जातीसह अस्पृश्य माणसेही सेवेचं कार्य करीत असत.
राजेरजवाड्याचा काळ. गावात जशी माणसं राहायची. ती माणसं मेल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचं काम जी होत असे. त्यात अस्पृश्यांची फार मोठ्या प्रमाणात मदत होत असे. जशी शिकोटी बांधणे आणि शरण रचण्यासारखी कामं अस्पृश्य करीत. तसेच त्या प्रेताला वाजतगाजत न्यायची कामही अस्पृश्य करीत. त्यातच ही अस्पृश्य माणसे रक्षा गोळा करण्यासाठी येत असत. ती रक्षा गोळा करण्यासाठी अस्पृश्यच माणसे कामात येत असत. गावात ज्याप्रमाणे माणसं राहायची. तसं पशूधन राहायचं. त्या पशूधनाची मरणानंतर विल्हेवाट लावायचं काम अस्पृश्यच करीत असत.
ती अस्पृश्य माणसं पशुधन मृत होताच त्या पशूधनाला ओढायचे. त्याचं चामडं काढायचे व त्या चामड्यांना पकवून त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायचे. ही अस्पृश्य माणसं जेव्हापर्यंत ब्राम्हणांच्या घरी दूरुन का होईना, जेवत नसत. तोपर्यंत ब्राम्हण माणसे शुद्ध होत नसत. मग या अस्पृश्यांना ही ब्राम्हण मंडळी वेगवेगळं दान देवून आपल्या घरची अलाबला या अस्पृश्य माणसांच्या घरी दत्त म्हणून देत.,असाच त्यांचा समज होता.
तो काळ…….. त्या काळातही अस्पृश्यता शिगेलाच होती.र जातीजातीत भेदभाव दूरपर्यंत पसरलेला होता. त्यातच अस्पृश्यांसाठीर वेगवेगळे नियम लावले गेले होते. सकाळी दहा वाजेपुर्वी आणि सायंकाळी पाच वाजेनंतर अस्पृश्यांना गावात प्रवेश नव्हता. त्यातच अन्न मिळत नसल्यानं उष्ट्या पत्रावळी चाटल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यातच ही अस्पृश्य माणसे हिन दर्जाची कामे करीत नव्हे तर त्यांना ती कामे करावीच लागत असे.
गावात त्यांना उच्च जातीच्या माणसांसमोर झुकूनच काम करावं लागत असे. त्यांचा स्पर्श जर झाला तर विटाळच होता. मात्र शुद्ध अशुद्धतेच्या बाबतीत थोडा वेगळा प्रकार होता. जर इतर समाजाची माणसं मरण पावली तर ब्राम्हण समाजाला जीवनावश्यक वस्तू दान देत असत. त्यानं आपल्या घरची अलाबला जावून आपल्याला चांगलं वैभव प्राप्त होते असं लोकांचं मानणं होतं. त्यातच ब्राम्हणाच्या घरी जर मैयत झालीच तर त्यांना स्वतः शुद्ध करण्यासाठी अस्पृश्यांची गरज होती.
गावात अस्पृश्यासह इतरही जातीची माणसं अगदी गुण्यागोविंदानं राहात असत. ते एकमेकांच्या कामात पडत असत. इतर जातीसह अस्पृश्य माणसेही सेवेचं कार्य करीत असत.
राजेरजवाड्याचा काळ. गावात जशी माणसं राहायची. ती माणसं मेल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचं काम जी होत असे. त्यात अस्पृश्यांची फार मोठ्या प्रमाणात मदत होत असे. जशी शिकोटी बांधणे आणि शरण रचण्यासारखी कामं अस्पृश्य करीत. तसेच त्या प्रेताला वाजतगाजत न्यायची कामही अस्पृश्य करीत. त्यातच ही अस्पृश्य माणसे रक्षा गोळा करण्यासाठी येत असत. ती रक्षा गोळा करण्यासाठी अस्पृश्यच माणसे कामात येत असत. गावात ज्याप्रमाणे माणसं राहायची. तसं पशूधन राहायचं. त्या पशूधनाची मरणानंतर विल्हेवाट लावायचं काम अस्पृश्यच करीत असत.
ती अस्पृश्य माणसं पशुधन मृत होताच त्या पशूधनाला ओढायचे. त्याचं चामडं काढायचे व. त्या चामड्यांना पकवून त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायचे. ही अस्पृश्य माणसं जेव्हापर्यंत ब्राम्हणांच्या घरी दूरुन का होईना, जेवत नसत. तोपर्यंत ब्राम्हण माणसे शुद्ध होत नसत. मग या अस्पृश्यांना ही ब्राम्हण मंडळी वेगवेगळं दान देवून आपल्या घरची अलाबला या अस्पृश्य माणसांच्या घरी दत्त म्हणून देत. असाच त्यांचा समज होता.
गावात जी अस्पृश्य माणसं होती. त्यांच्यासाठी कडक नियम असल्यानं ती माणसं इतर जातीच्या वाट्याला जात नसत. जर गेलीच तर त्यांना वाळीत टाकलं जाई. ज्यात त्यांची कोंडी होत असे. त्यातच अशा कारणानं त्यांची उपासमार होवून ते उपासानं तडफडून मरत असत.
वढू गावातही असाच भेदभाव होता. गोविंदालाही या गावात विटाळाचे चटकेच बसत होते. त्याला गावात काही सहानुभूतीची वागणूक मिळाली नव्हती. त्यातच त्याचेशी वार्तालाप करतांना तो वार्तालाप दूरुनच केला जाई. तसेच व्यवहारही दूरुनच केला जाई.
वढू गाव पुण्याच्या आसपासच असल्यानं या भागात शिवरायांची वतनदारी होती. ज्यावेळी जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. त्यावेळी याही भागात चोरांचा व लांडग्यांचा हैदोस वाढला होता. लोकं चोरांच्या भीतीनं व लांडग्यांच्या भीतीनं परेशान होती. त्यातच काही लोकं पुणं सोडून पळाले होते. त्यावेळी शिवराय लहान होते.
महार माणसं ही शुरवीरच नाही तर जीवावर उदार होवून लढणारी माणसं होती. त्यातच या माणसांची जी मुलं असायची. ती मुलंही लहानपणापासूनच शुरवीर असायची. ती लहानपणापासूनच जीवंत साप, सरडे पकडण्यात माहिर होती. त्यातच ही लहान अस्पृश्यांची मुलं त्या लहानपणीच या साप, सरड्यांना मारुन त्यांना जंगलातच भाजून टाकून ते खात असत.
शिवराय हे लहानपणापासूनच मावळ्यांच्या मुलांसोबत राहणारे. या मावळ्यात ती अस्पृश्य मुलेही होती. जी शिवरायांसोबत कांदा भाकर आवडीनं खात होती. त्यातच त्यांना भेदभाव कसा असतो हे अगदी लहानपणापासूनच माहित असतांना त्यातच शिवराय हे भेदभाव पाळणारे नसल्यानं व सोबतच जेवन करणारे असल्यानं ते या अस्पृश्य मुलांना आवडत. त्यातच ही अस्पृश्य मुलं ही शिवरायांच्या बरोबर रमतगमत खेळत खेळत लहानाची मोठी झाली. ती जीवाला जीव देणारी ठरली. कारण त्यांना शिवरायांमध्ये स्वतःच्या जातीच्या अस्पृश्यतेवरील कलंक धुणारा माणूस दिसला.
वढू गाव हे पुण्याच्या आजूबाजूलाच असल्यानं त्याही गावात लोकं दहशतीतच राहात. चोरं आणि लांडग्याची भीती असल्यानं जी लोकं घाबरली होती. ती लोकं जीजामाता या पुण्याला राहायला येताच निर्भीड झाली. त्यातच जीजाबाईनं घोषणा केली की जो कोणी जास्त लांडगे मारेल. त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल. त्यातच जीजाबाईच्या घोषणेनुसार याच अस्पृश्य जातीनं जास्तीत जास्त लांडगे मारले व योग्य बक्षीसही मिळवले होते. ही कर्तबगारी पाहता जीजाबाईनं पुढे जावून या अस्पृश्य माणसांना आपल्या राजदरबारात योग्य मानाच्या जागा दिल्या. हे जीजाबाईचे कार्य लहानपणापासूनच शिवरायांनी हेरलं. ज्यामुळं लहानपणापासूनच शिवरायांवर अस्पृश्यांबाबत योग्य संस्कार झाले.
शिवरायांची सवंगडी म्हणजे डोंगरावरील ही आदिवासी मुलं. ज्यात अस्पृश्यांचीही मुलं होती. ती अस्पृश्यांची मुलंही कधीकधी शिवरायांबरोबर राजवाड्यात येत. त्यातच जीजाबाई त्याही मुलांना हिन न समजता शिवरायापाठोपाठ योग्यच वागणूक देत. ह्याच गोष्टी शिवरायांवर संस्कार करणा-या ठरल्या. पुढे जेव्हा शिवराय मोठे झाले. तेव्हा ते आपल्या या सवंगड्यांना विसरले नाहीत. त्यांनी या सर्वांना सोबत घेवून स्वराज्य स्थापन केलं.
गोविंदा असाच व्यक्ती की ज्याने पुण्याच्या लालमहालात जीजाबाईचा मुक्काम असतांना नोकरी केली. त्यानं संभाजीला कित्येक वेळा दरवाज्यातून येता जाता पाहिलं. त्यामुळं त्याच्या मनात संभाजीबाबत साहजिकच. ऋणानुबंध व आत्मीयता निर्माण झाली होती.
शिवराय हे जाणते राजे होते. ते अस्पृश्यता पाळत नव्हते. जावळीच्या मो-याचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर एक किल्ला बांधला होता. ज्याचं नाव प्रतापगड ठेवलं होतं. तिथं भवानीमातेचं एक मंदिर बांधलं होतं. या मंदिरात ज्यावेळी देवीची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाली. त्यावेळी काही अस्पृश्य माणसेही तिथं हजर होती. त्यावेळी ती विटाळ व भेदभावामुळे थोडी दूर उभी होती. शिवरायांनी त्यावर चौकशी केली असता कळलं की ह्याच माणसांनी देवीची मुर्ती घडवली आहे. अर्थात बनवली आहे.
शिवरायांनी त्यावर या माणसांना देवीची पुजा करण्यास सांगीतले. पण त्यात पुजा-यानं आक्षेप घेतला की त्यांना पुजेचा अधिकार नसून त्यांना पुजा करु देवू नये. त्यातच शिवरायांनी पुजा-याला त्याचं कारण विचारलं. पुजा-यानं सांगीतलं की या लोकांच्या पुजा करण्यानं ती मुर्ती अपवित्र होईल. त्यावर शिवराय म्हणाले,
“ही मुर्ती जर याच माणसांनी बनवली आहे तर ही मुर्ती यांच्या पुजा केल्यानं अपवित्र कशी होणार?” त्यावर पुजारी म्हणाले,
“अपवित्र आणि पवित्रपणाचे नियम हे आमच्या पुर्वजांनी बनवले असून त्यांच्या मतानुसार ज्यावेळी ही मुर्ती बनवली गेली. तेव्हा तिच्यात जीव नव्हता. पण आज ती मुर्ती बनलेली आहे व आज केलेल्या प्राणप्रतिष्ठेनं तिच्यात जीव आला आहे. म्हणून ही मुर्ती अपवित्र होणार आहे.”
त्यावर शिवराय म्हणाले,
“अशी जर मुर्ती अपवित्र होत असेल तर ती देवी कशी? देवीला कोंबडं बकरं चालतं. मग ही अस्पृश्य माणसं पुजेला का चालत नाहीत? असे जर तुमच्या पुर्वजांचे नियम असतील तर ते बदलवून टाकावे. हे असे नियम मला मान्य नाही.”
शिवरायांच्या या प्रश्नानं पुजा-याला हार मानावी लागली व या प्रतापगडावर अस्पृश्यांनाही पुजा करता आली.
ही घटना त्यावेळी अस्पृश्यांसाठी लाभदायक ठरली होती. याचाच परीणाम गावोगावी झाला. अस्पृश्य मंडळी शिवरायांना देव मानू लागली. त्यांना अन्नदाता समजू लागली. हा शिवरायांवर झालेला अस्पृश्यता निर्मुलनाचा परीणाम म्हणजे त्याला जीजामातेनं लहानपणीच जे अस्पृश्यता निर्मुलनाचे बाळकडू पाजले होते. त्याचाच परीणाम होता. ज्या परीणामाने आज अस्पृश्यांना शिवरायात देव दिसला होता.
या अस्पृश्यांना मानाचं स्थान देण्याचा परीणाम व प्रतापगडावर पुजा करु देण्याचा परीणाम जसा गावोगावी झाला. तसा वढू गावातही झाला. तेथीलही अस्पृश्य माणसे ही शिवरायांना देव मानू लागली. त्यातच ते अन्नदाता समजून शिवरायच नाही तर त्यांच्या पूर्ण वंशावळीसाठी जीव द्यायलाही ते तयार झाले. ज्यातून गोविंदानं संभाजीचे तुकडे गोळा करुन त्याला अग्नी देण्याचं कसब दाखवलं. त्याला माहित होतं की आपल्या अशा कृत्याबद्दल बादशहा औरंगजेब पकडेल. कैद करेल. अनन्वीत यातना देईल आणि शेवटी मृत्युदंड. ज्याप्रमाणे त्यानं संभाजी व कवी कलशांना तडपवलं. अगदी तसंच आपल्यालाही करेल असं गोविंदालाही माहित होतं. तरीही त्यानं ते सर्व केलं होतं. एक कर्तव्य म्हणून त्यानं संभाजीला अग्नी दिला होता.
शिवरायांनी आपल्या कर्तृत्वानं अस्पृश्य जातीचीही माणसं जोडली होती. त्यांचा वैयक्तीक सेवक मदारी मेहतर होता. शिवाजी महाराजांनी अस्पृश्य आणि महारांना किल्लेदार बनवले होते. हेरप्रमुख बहिर्जी नाईक हा महार समाजाचा होता. तसेच शिवरायांच्या फौजेत हेच अस्पृश्य लोकं असल्यामुळे ते वेगवेगळ्या स्तरावरच्या लढाया जिंकू शकले. कारण अस्पृश्य मंडळी ही पुर्वीपासूनच काटक व शुर मंडळी होती.
गोविंदाला औरंगजेबानं पकडून त्याला कैद केलं होतं. तसं पाहता औरंगजेब गोविंदावर चिडलेलाच होता. त्याची दोन कारणं होती. पहिलं कारण होतं, ते म्हणजे संभाजीच्या पार्थीवाला अग्नी तर दुसरं कारण निराळच होतं.
गोविंदाचे बाबा गोपाळराव हे महार जातीचे होते. महार जातीचा स्वतःचा असा कोणताही व्यवसाय नसायचा. ती मंडळी मिळेल ती कामे करायची. त्यातच शिवरायांनी रायरीचा किल्ला जिंकला.
रायरीचा किल्ला हा अभेद्य असा किल्ला असून त्या किल्ल्याला आजुबाजूनं जंगलांनी वेढलेलं होतं. त्यातच हा किल्ला जेव्हा जिंकला. तेव्हा या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलं. त्यात दगडं फोडण्याचंही काम होतं. ती कामं करण्यासाठी गावोगावची मंडळी बोलावली होती. त्यात गोविंदाच्या वडीलाचा समावेश होता. गोपाळराव रायगडाच्या बांधकामाची दगडं फोडण्यात आघाडीवर होते. तसं पाहता रायगडावर दगडं फोडत असतांना ती दगडं फोडणं चाणाक्ष असलेल्या शिवरायांच्या लक्षात आलं. कारण गोपाळराव सफाईनं दगडं फोडत. त्यातच ते गोपाळरावांच्या कामावर खुश झाले व एक दिवस गोपाळरावांना म्हणाले,
“गोपाळराव, तुम्ही दगडं फोडण्यात अतिशय माहिर दिसता. सांगा याबद्दल तुमास्नी कोणता पुरस्कार हवा. आम्ही मासाहेबांना सांगून तुम्हाला ताबडतोब पुरस्कार देवू.”
यावर गोपाळराव शिवरायांना म्हणाले,
“महाराज, आपण कायले मले पुरस्कार देता जी? हे माह्य काम हाये. ते मी करणारच. मी त्याचे पैसे घेतो न जी.”
“नाही नाही गोपाळराव. आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार म्हणजे देणारच.”
शिवराय चाणाक्ष बुद्धीमत्तेचे होते. तसे तेे पुढे म्हणाले,
“बोला गोपाळराव, तुम्हाला काय हवं. लाजू नोका. मागून घ्या.” असे म्हणताच गोपाळराव म्हणाले,
“महाराज द्यायचेच तर माह्या लेकराले नोकरी द्या. आपल्या सैन्यात घ्या माह्या पोराले.”
शिवराय विचार करु लागले. तसे शिवराय म्हणाले,
“ठीक आहे. मी तुमच्या मुलांना नोकरीत घेतो.”
शिवरायांनी म्हटल्याप्रमाणे गोविंदाला आपल्या सैन्यात सामावून घेतलं होतं. अनेक सारे पराक्रम गोविंदानं केले होते.
शिवाजी महाराज हे जातपात मानत नव्हते. त्यांच्या सैन्यात अठरापगड जातीची माणसं होती. त्यातील गोविंदा एक. गोविंदा हा लहानपणापासूनच धष्टपृष्ट होता. त्याचं पीळदार व बलदंड शरीर पाहून शिवरायांनी त्याला सैन्यात घेतलं. त्यातच शिवरायांच्या मृत्यूनंतर त्याचे महाराज संभाजीशी संबंध दृढ झाले होते.
संभाजीही ज्यावेळी राजा बनले. त्यानंतर ते आपल्या वडीलांसारखे जातीयवाद विरोधीच होते. त्यांच्याही सैन्यात समतेचे तत्व असून त्या तत्वांना तत्कालीन ब्राम्हण मंडळी मानत नसत. अशातच ब्राम्हण मंत्र्यांकडून संभाजी महाराजांना मारण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यातच जेव्हा हा कट उधळला गेला व या कटाची माहिती संभाजींना झाली. तेव्हा या संभाजींनी त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा दिल्या. त्यातच या शिक्षा देणा-या लोकांमध्ये गोविंदाचा समावेश केला गेला. गोविंदा महाराजांच्या आदेशानं या लोकांना चाबकाचे फटके मारायचे काम करीत होता. याचा परीणाम हा झाला की या ब्राम्हण मंडळींच्या मनात संभाजीबाबत द्वेषाचे वारे निर्माण झाले. पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला. त्याच्याशी संभाजीच्या शत्रूंनी हातमिळवणी केली. त्यातच संभाजीला पकडण्यासाठी शत्रूंच्या गोटातून गुप्तपणे हालचाली सुरु झाल्या. त्यातच ज्यावेळी नाशिकजवळील रामसेजचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी औरंगजेब प्रयत्न करु लागला. त्यावेळी तो किल्ला लढविण्याची जबाबदारी संभाजीनं गोविंदावर टाकली. ती जबाबदारी गोविंदानं चांगलीच पेलवून धरली. त्यानं ती जबाबदारी समर्थपणे पेलवून औरंगजेबाच्या सैन्याचा पाडाव केला. त्यातच संभाजींनी गोविंदाला किल्लेदाराचे वस्र देवून त्याचा सन्मान केला.
रामसेजचा किल्ला औरंगजेब बादशाहाचे सैन्य अफाट असूनही त्याला जिंकता आला नव्हता. त्या किल्ल्यावर चढाई करणारे औरंगजेबाचे सरदार शाहबुद्दीन व फिरोजनंग यांचा पराभव झाला होता. त्यातच या प्रकरणानं बादशहा ज्याप्रमाणे संभाजीवर चिडून होता. त्यातच तो याच प्रकरणानं गोविंदावरही चिडला होता. तसेच संभाजीचा ज्यावेळी राज्यभिषेक झाला. त्यावेळी चौदा दिवसातच त्यांनी ब-हाणपूर येथे हल्ला चढवून जी लुट मिळवली. त्यातही गोविंदा आघाडीवरच होता. त्यातच ती संपत्ती सुरक्षीतपणे रायगडावरही पोहोचवली गेली. त्यात ती जबाबदारीही गोविंदानंच विश्वासानं पार पाडली. तसेच ज्यावेळी संभाजी संगमेश्वर मार्गे रायगडाला निघाली. तेव्हा ते संगमेश्वर भागात काहीवेळ थांबले. त्यावेळी संताजी घोरपडे व इतर माणसे सोबत होते. संभाजीनं संताजी व गोविंदाला पुढं पाठवलं व ते शेतक-यांची गा-हाणी ऐकण्यासाठी संगमेश्वरला थांबले. त्यातच या संगमेश्वरला संभाजीचे नातेवाईक गणोजी शिर्केच्या फितूरीमुळं संभाजींना पकडलं गेलं, त्यावेळीही गोविंदा रायगडाकडे निघून गेल्यानं, परंतू थोड्याशा चुकीनं संताजी व गोविंदा पुढे निघून गेल्यानं घात झाला. त्यातच संभाजीचं अपहरण होताच महाराणी येशूबाईनं त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथकं नेमली. त्यामध्ये एका पथकाचं नेतृत्व संताजी व दुस-या पथकाचे नेतृत्व गोविंदाच करीत होते.
ज्यावेळी औरंगजेबानं गोविंदाला पकडलं. त्यावेळी त्याला औरंगजेबाच्या मनात भयंकर राग होता. त्याला वाटत होतं की यापुढं संभाजीला मानणारे पैदा होवूच नये. म्हणून बादशाहा भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर. कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता. त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करु नये. तर ते मांस गिधाडांनी खावं. पण तसं काही घडलं नव्हतं. आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळं औरंगजेबाची मान खाली गेली होती. कालचा औरंगजेबाचा हुकूम धुळीस मिळाला होता. ती दवंडीही धुळीस मिळाला होता. त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्यसेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होतं. तो दुखावला गेला होता.
ज्याप्रमाणे औरंगजेबानं गोविंदाला कैद केलं, त्याचप्रमाणे औरंगजेबानं जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं.
“डाल दो इसे काले घने अंधेरे मे। इन्हे ऐसे तडपाना की ये खुद अपने मृत्यू को याद करे। मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नही देना। यह बाद याद रहे। जो गुस्ताख इसे पानी देगा। उसे भयानक मौत मिलेगी। याद रहे।”
गोविंदाला त्या अंधा-या कालकोठडीत नेण्यात आलं. सोबतच जनाबाईलाही नेण्यात आलं. जनाबाईला कुठं ठेवलं माहित नव्हतं. त्यातच जनाबाईच्याच मुळं संभाजीला अग्नी देण्यात आली होती.
गोविंदाला आज हायसं वाटत होतं की त्यानं आपल्यावर उपकार करणा-या संभाजीचं ऋण चुकवलं. त्याला आता मरण आलंही, तरी तो सुखानं मरेल.
असाच तो दिवस उजाडला होता. पण तो दिवस उजाडल्यासारखा त्या कालकोठडीत वाटत नव्हता. ज्या कालकोठडीत गोविंदाला ठेवण्यात आलं होतं. सर्वत्र अंधार पसरला होता. तसा तो आज पाण्यासाठी तडपत होता. पण जल्लादांनी त्याला पिण्याचं पाणी दिलं नव्हतं.
ती कालकोठडी औरंगजेबानं संभाजीलाच संपविण्यासाठी बनवली होती. त्या कालकोठडीत हवाही औरंगजेबाच्याच मर्जीनं आत प्रवेश करीत होती. त्याच कालकोठडीत आज गोविंंदाही होता.
गोविंदा विचार करीत होता त्या संभाजीचा. तो संभाजी या कालकोठडीत कसा राहिला असेल. आपल्यालाच एवढा त्रास होत आहे. कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल. हा औरंगजेब म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा.
तसा औरंगजेबही विचार करीत होता. या मराठ्यांना हरविण्याची स्वप्न पाहात होता. असाच एक दिवस उजळला. बादशाहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी. त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत. कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होवू शकतच नाही. यात आणखी काही लोकं सहभागी असू शकतात.
या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता. कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती. कोणी गोव-या आणल्या होत्या. तर कोणी धसकटं. त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जावू नये म्हणून दामाजीनं चांगली तरणेताठ पोरं गोफनगुंडा घेवून गावाच्या बाहेर उभे केले होते. प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंगजेबाचे सैनिक दिसलेच तर त्यांचेवर त्या गोफणीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच मरुन पडतील. आपल्या अग्नीसंस्कारात व्यत्यय येणार नाही.
ती तरणीताठ मुलं अंत्यसंस्कार जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती. त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला. परंतू प्रेत लवकर जळलं नव्हतं. काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता. आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला. त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटतं शरण विझवून याला जमीनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही. कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खैर नाही. शेवटी नाथानं सांगीतलं की असं काहीही होणार नाही. तुम्ही निश्चींत असा. शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजी राजाचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला.
नाथानं सांगीतलं की असंं काहीच होणार नाही. त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत. तर त्याची यथोचित विल्हेवाट लावत आहोच.
बादशाहा औरंगजेब त्या अंधा-या कालकोठडीकडं आला. तसं त्यानं गोविंदाला न्याहाळलं. तसा तो विचार करु लागला की ज्यावेळी संभाजीला जाळलं असेल, ते काम काही एकट्याचं नाही. ते काम इतरही गावातील माणसांचं असावं. तसा तो त्याला म्हणाला,
“हे गोयंद्या, तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत?”
“………..” गोविंदा काहीच बोलला नाही. तसा बादशाहा पुुन्हा म्हणाला,
“हे पाहा, तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित. काय त्या संभाजीची काही माणसं. पण त्यांना तर काहीच माहित नाही की हे तुकडे मी कुठं आणि कसे टाकले. मग त्यांना ते कसं कळलं. कदाचित गोविंदा माझ्याच गोटातील माणसं! तुला माहित तरी कसं झालं आधी ते तर सांग.”
गोविंदानं त्याच अंधा-या खोलीतून बादशहाकडं एक कटाक्ष टाकला. तसा तो गप्प झाला. त्यानं चूप राहाणं योग्य समजलं. तसा औरंगजेब बादशाहा ओरडत म्हणाला,
“बता प्यार से हरामज्यादे, नही तो तेरी खाल उधाड देंगे।”
गोविंदानं बादशाहाच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही. तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं. त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंंदाला चाबकाचे फटके मारा.
गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं. त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या. त्याला बाहेर काढण्यात आलं. त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले. त्यातच त्याच्यावर एकामागून एक चाबकाचे फटके मारण्यात येवू लागले. जे चाबकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीच्या आदेशानं इतरांना मारले होते. आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं. तो चाबकाचा एकेक फटका जीवघेणा वाटत होता. अगदी असह्य होत होता. त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चाबकाचा फटका पडताच अंगार होत होती. पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्वकाही झेलत होता. तसा बादशाहा म्हणाला,
“बोल साले, जल्दी बोल। कौन कौन था वहाँपर?”
संभाजीलाही असेच मारले असेल या बादशाहाने. गोविंदा विचार करु लागला. थोड्याच वेळात तो लहूलूहान झाला होता. त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं. तसा बादशाहा जवळ आला. त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारु लागला. तसे त्यानं दोन्ही गाल आपल्याा हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला,
“गोयंद्या, तुले बोलावंच लागेल. तुझ्या या कटात कोण सहभागी होता?”
गोविंदा काहीच बोलला नाही. ते पाहून बादशाहा अाणखी वैतागला. याचं करु तरी काय, असं त्याला वाटायला लागलं. तसा तो विचार करु लागला. तशी त्याला एक नामी युक्ती सुचली.
बादशाहा औरंगजेबानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेवून जावं व पुन्हा कालकोठडीत टाकावं. त्याला आज अन्न देवू नये. पाणीही नको.
दुसरा दिवस उजळला. काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही. तसा तो त्या अन्नपाण्यावाचून तडपत होता. तसा आज बादशाहा पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला. म्हणाला,
“सांगतोस गोयंद्या. कोण होता तुला मदत करायला.”
गोविंदानं बादशाहाकडं एक कटाक्ष टाकला. तसा तो हसला व म्हणाला, औरंग्या, तू मले मारुच शकत नाही. माहित हाये, मी जर मेलो तं तू बी मरशीन. तडपू तडपू. हा राज जो आहे ना. तो राजच राहिन. जर हा राज तुले मालुम जर झाला नाही तं तुले झोप बी येणार नाही रातीची.” तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून जावून त्यावर विचार करु लागला.

क्रमश:पुढील भाग

https://writersmanch.com/2021/10/18/संभाजी-राजेवर-जीवापाड-प्-3/

-अंकुश शिंगाडे, नागपूर

(९३७३३५९४५०)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button