Student या शब्दाचा अर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी असा केला..
Student या शब्दाचा अर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी असा केला..
विद्यार्थीं चळवळीतून सुरू झालेल्या अनेक वैचारिक हालचालीने क्रांती केली आहे.कारण समाजातील सर्व घटकांपैकी विद्यार्थी हा असा घटक आहे. जो परिवर्तनाचं रान पेटवणारं सर्वात मोठे वादळ आहे. तशी पाहता समाजात अनेक वादळं येतात नि जातात ;पण जी वादळं क्रांतीसाठी,मानवी लढ्यासाठी आक्रमक होते, अशीच वादळं जगाचा इतिहास बनली.म्हणून ज्या देशातला विद्यार्थीं जागृत आणि तर्कशीलवृत्ती ठेऊन मानवी लढ्याप्रती आपली दिशा आखतो तो देशाचं चित्र बदलू शकतो. म्हणून डॉ.बाबासाहेबांचे विद्यार्थी व युवकावर विलक्षण प्रेम होत.विद्यार्थी ,युवक हे चळवळीचे अंगभूत घटक मानले.
असा हा विद्यार्थी म्हणजेच STUDENT
या शब्दाचा डॉ .बाबासाहेबांनी केलेला अर्थ हा आजच्या घडीला क्रांतिचे रणशिंग फुंकणारा आहे.आज देशात समतावादी ,संविधानाच्या कक्षेतील मानवी जीवन धोक्यात आले आहे.असा यावस्थेत विद्यार्थी हा विषमतेच्या विरोधातील आवाज बनणे अपरिहार्य ठरते.कारण ज्या पद्धतीने मानवी अधिकार मानवाच्या हातातून नाहीसे होत आहेत;आणि ते प्राप्त करण्यासाठी जो लढा उभारणे गरजेचे तो लढा जर देशपातळीवर लढला गेला तर परिवर्तनाची अपेक्षा करता येऊ शकेल. आणि परिवर्तनाची क्रांतीबीजे जर विद्यार्थ्यांनी पेरली तर विद्यापीठ,महाविद्यालय, शहरे, गावे,राजधानी ते ते संसद हा सगळा घेराव करून एक आवाज जर निर्माण केली तर यातील प्रत्येक आवाजाचे दहा दहाच्या गुणकारातून वाढ झाली तर देशात एक लाठ निश्चितच निर्माण होऊ शकते.यात विद्यार्थी हा घटक इतका महत्वाचा आहे .कारण शिक्षणाने माणसाचा तर्क जागृत होतो.तर्कवादी डोकं,तर्कवादी विचार प्रत्येक बाबीची चिकित्सा करते.चिकित्सा न करणे म्हणजे गुलामी नाकारने होय तर चिकित्सा न करणे म्हणजे गुलामी पत्कारने होय.आज भारतीय विद्यार्थी, व तमाम तरुणांनी चिकित्सा करूच नये अशी वातावरण निर्मिती करून भारतीय प्रसारमाध्यमातून मनोरंजनातून भटकावण्याचे काम चालू आहे. विद्यार्थी म्हणजे केवळ शिक्षण वा अध्ययन करणारा नाही तर त्याने घेतल्येल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करणारा असावा. तरच विद्यार्थीं या शब्दाला अर्थ आहे. तोच अर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट स्पष्ट केला.
त्यात Student म्हणजे,
S = Sincerity,Seriousness ( प्रामाणिकपणा, गंभीरता)
T = Thinking of Planning, (योजनेचा विचार करणे)
U =Informality of thought,speech and action (विचार, भाषण आणि कृतीची अनौपचारिकता)
D =Discipline,Development,Democracy (शिस्त, विकास, लोकशाही)
E =Energy,Exploration (ऊर्जा ,शोध)
N =Nationality (राष्ट्रीयत्व)
T =Thoughts (विचार)
आज वरील अर्थाने प्रेरित असणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज आहे.कारण जो केवळ शिक्षण घेऊन नोकरीच्याच दिशेने न जात सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून त्याच्या ज्ञानातून लोकांना न्याय मिळवून देऊ शकेल.आरक्षण,शिक्षण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय ,हक्क,अधिकार,आणि नोकऱ्यासह तमाम बाबी संपवल्या गेल्या आहेत.आजचा तरुण,विद्यार्थी,पालक,व तमाम राष्ट्रातील जनतेने आता यासाठी लढा देण्यासाठी विद्यार्थ्याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे.
-राटर्समचं