आता ! रास्त भाव दुकानातून खुल्या बाजारातील या वस्तू विक्री करता येतील
आता ! रास्त भाव दुकानातून खुल्या बाजारातील या वस्तू विक्री करता येतील
रास्त भाव दुकान हे शासनाकडून देण्यात येणाऱ्या गहू तांदूळ,ज्वारी,साखर,तेल,डाळ,रॉकेल यासारख्या वस्तू मिळण्याचे ठिकाण असले तरी आता याच दुकानातून खुल्या बाजारातील वस्तूची विक्री करण्याची परवानगी राज्यातील सर्व रास्त दुकानदारास देण्यात आली आहे.
नुकतेच आलेल्या शासन निर्णयात असे म्हटले आहे की, खुल्या बाजारातील वस्तू उदा.साबण अंघोळीचा व कपड्याचा,डिटर्जेन्ट हँडवाश, चहा,कोफी,शॅम्पू यासारख्या खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री करण्यास रास्त भाव दुकानदारास देण्यात आला आहे. पण यात असे म्हटले आहे की, वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन रास्त दुकानदार ठरवतील .त्यात शासनाचा काहीही संबंध राहणार नसल्याचे म्हटले आहे.त्यामुळे रास्त भाव दुकानदारांनी परस्पर कंपनीच्या वितरकाशी बोलून त्यांचे घाऊक व किरकोळ व्यवहार परस्पर करण्यात यावेत असेही म्हटले आहे.
मात्र यात शासनाचा कुठलाही संबंध राहणार नाही असे म्हटले आहे.
त्यामुळे आता खुल्या बाजारातील किरकोळ वस्तू रास्त भाव दुकानातून खरेदी -विक्रीला मार्ग मोकळा झाला आहे.हे मात्र नक्कीच