समिश्र
गुलाम मानसिकता नको
गुलाम मानसिकता नको आम्ही गुलाम नाही. अगदी स्वातंत्र्यात वावरतो आहोत. स्वतंत्र भारतात राहात आहोत. स्वतंत्र्य भारताचे काही नियम आहेत. त्यानुसार वागतो आहोत नव्हे तर फायदेही घेतो आहोत. असे असतांना आम्ही आमची गुलाम मानसिकता का ठेवतो, तेच कळत नाही. आज भारत साक्षरच नाही तर जगात विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. देशात वेगवेगळे क्षेपणास्र आहेत. जगामध्ये जागतीक क्रमवारीत या देशाचाही क्रमांक लागतो. त्यातच आज देश चीन, अमेरीकेलाही घाबरत नाही. परंतू आमची मानसिकता मात्र आमच्या देशातील अधिका-यांनाच घाबरते. त्याचं कारण म्हणजे आमचा स्वार्थ व आमचा मोह. आमच्या मनात मोह आहे. त्याचबरोबर स्वार्थही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळंच आम्ही आमच्या देशातील अधिका-यांना घाबरतो नव्हे तर आमचे अधिकारी हे आमच्यावर हावी होत असतात. जणू त्यावेळी असं वाटतं की आम्ही साक्षर नाही तर निरक्षरच आहोत. देशात शिकण्यावर पुर्वीच्या काळात बंधन होतं. एका विशिष्ट वर्गाचेच लोकं शिक्षण घेत असत. ज्यात राजे महाराजे, ऋषीमुनी यांचा जास्त प्रमाणात समावेश होत होता. परंतू भारतीय संविधानानुसार आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला व आम्ही शिकू लागलो. त्यातच आम्ही या शिक्षणाचा वापर करुन मोठमोठ्या नोक-या आणि पदव्याही मिळवू लागलो. मात्र त्या शिक्षणाचा वापर करुन आम्ही गुलामी दूर करु शकलो नाही. आम्ही तसेच गुलाम राहिलो नव्हे तर स्वतःला मानसिकतेनं गुलाम बनवलं. आज आम्ही त्याच गुलामीचा वापर करुन आम्ही गुलाम नाही असे सिद्ध करुन वारंवार गुलाम आहे असंच दाखवतो. आजही उच्च अधिकारी वर्गापुढं त्याचं चुकलं असतांनाही त्यांच्याविरोधात ब्र देखील काढत नाही. याबाबतीत एक उदाहरण देतो. शाळेमध्ये सर्व कर्मचारी काम करीत असतात. त्यांचं काम बरोबर असते प्रत्येक वेळी असं नाही. परंतू ते काम बरोबर असलं तरी तेथील कर्मचारी हे निरक्षरासारखे वागत असतात. ते मुख्याध्यापकाचे आदेश हे कितीही चूक असले तरी त्यांच्या हो ला हो लावतात. तसंच दुसरं उदाहरण देतो. आज निवडून आलेले आमदार खासदार, त्यांच्या हाताखालच्या माणसांना निरक्षर समजूनच वागणूक देत असतात. तसेच मोठमोठ्या कंपनीतील सुपरवायजर हे आपल्या कंपनीतील मंजूरांना निरक्षर च समजत असतात. जरी त्या सर्वांना जगण्याचा अधिकार आहे तरी आणि संविधानानं असा अधिकार दिला असला तरी. आज अशीच गुलाम मानसिकता आहे आम्ही गुलाम नसलो तरी. मुळात आम्ही कुणाला गुलाम समजू नये आणि तसं समजण्याचा आमचा अधिकारही नाही. आज बदलत्या काळानुसार आम्ही बदलायला पाहिजे. आम्ही आमच्या शिक्षणाचा वापर हा आजच्या बदलत्या परीस्थितीनुसार करुन घ्यायला हवा. तसेच ह्या बदलत्या परीस्थितीनुसार स्वतःला कमजोर समजू नये आणि त्यानुसार वागायला हवं. एक सृजाण नागरीक म्हणून. मोह आवरलाच पाहिजे. आज मोह असल्यानंच आम्ही गुलामासारखे वागतो नव्हं तर वागवलं जातं. पुर्वीच्या काळीही गुलाम होते. तसेच ते गुलाम जबरदस्तीनं बनवले जात असत. तसं पाहता तो काळच त्या पद्धतीचा होता. कारण त्यावेळी शिक्षणाचा अभाव होता. विशेषतः स्रीयांना शिक्षणाचा अभावच होता. परंतू महात्मा फुले व सावित्री फुलेंनी पुण्यात शिक्षणाची पहिली शाळा काढली. त्यानंतर शिक्षणासाठी कर्वे, रानडे, शाहू व पाटील यांनी कार्य केले. त्यानंतर स्रीयांसाठी नव्हे तर अस्पृश्यांसाठीही शाळा निघाल्या. त्यातच आज शिक्षणाचं सार्वत्रीकीकरण झालं. आज शिक्षणाचा अभाव नाही. दोनचार सोडले तर सर्व लोकं हे शिकलेले आहेत. त्यांना काय करावं आणि काय नको, ते अगदी चांगलं कळतं. अशा वेळी गुलाम मानसिकता ठेवून चालत नाही. चांगली मानसिकता ठेवावी. जेणेकरुन सर्वांना आजच्या लोकशाही जगात लोकशाही पद्धतीनं आचरण करता येईल. लोकशाही पद्धतीनं वावरता येईल. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०