चक्क 6 टन वजनाचे भारतातील सर्वात मोठे अशोक चक्र ज्याची नोंद लिम्का बुक मध्ये आहे

चक्क 6 टन वजनाचे भारतातील सर्वात मोठे अशोक चक्र ज्याची नोंद लिम्का बुक मध्ये आहे
हरियाणा:–
हरियाणातील यमुना नगर जिल्ह्यातील टोपरा कला या गावी स्थापन करण्यात आलेलं 30 फूट व्यास व 6टन वजनी 24 आऱ्याचे असणाऱ्या या अशोक चक्रास भारतातील सगळ्यात मोठा धमचक्र असण्याचा बहुमान मिळाला आहे.हे अशोक चक्र 1एक्कर जागेत स्थापित आहे. टोपरा कला ग्रामपंचायत आणि बुद्धिष्ट फोरम या सेवाभावी संस्थेने हे बनवले आहे.३० फूट उंच असणाऱ्या या अशोकचक्राचे अनावरण जानेवारी 2019 मध्ये राज्यसभा खा. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान हे ऐतिहासिक अशोकचक्र बनवण्यासाठी तब्बल 240 दिवस म्हणजे 8 महिने लागले आहेत. ‘तारीख ए फिरोजशाही’ या पुस्तकातील वर्णनानुसार 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने टोपरा कला गावात अशोक चक्र स्थापन केला होता.1453 साली फिरोजशहा शिकारीला आल्यानंतर त्याची नजर या चक्रावर पडल्याने तो ते घेऊन दिल्लीला गेला. आणि दिल्लीतील फिरोजशहा कोटला येते स्थापन केलं गेलं. इतिहासकार डॉ. राजपाल यांच्या मतानुसार सम्राट अशोकानीं गुजरात मधील गिरनार पहाडी भागात हे चक्र बनवले होते.ज्याची लांबी 42 फूट आणि रुंदी 2.5फूट असून त्यावर सात राजआज्ञा ,प्राचीन लिपी व प्राकृत भाषा आहेत. त्यामुळे दिल्ली स्थित अशोकचक्र परत आणणे शक्य नसल्याने येथील ग्रामस्थ आणि बुद्धिस्ट फोरम यांनी निर्णय घेऊन हा अशोक चक्र उभारला. त्यामुळे आता हरियाणातील यमुनानगर मध्ये स्थापन करण्यात आलेले हे अशोक चक्र भारतातील सगळ्यात मोठा बहुमान मिळणारे धमचक्र झालेले आहे.