‘जय भीम’व्यवस्थेने माणूसपण नाकारलेल्या माणसांना न्याय मिळून देणारी संविधानिक कायद्याची वास्तव गाथा
भारतीय संविधानाच्या पृष्ठा-पृष्ठातुन बहाल करण्यात आलेला सामाजिक न्याय देशाच्या कारभारव्यवस्थेत रूजण्यात आजही अपयशयी आहे.त्याचे करणं म्हणजे जातीय वर्णव्यवस्था होय ज्या जातीव्यवस्थेत भारतीय जनतेची विभागणी आढळते ती विभागणी त्या त्या समुदायाच्या न्याय ,हक्क अधिकाराच्या प्रश्नाबाबत दुट्टपी भूमिका बजावते. पर्यायाने उच्यवर्णीयांस जात -धर्म कालही साधक होते;तर शोषित,पीडित,दलित,दुर्बल आदिवासी भटके मागासवर्गीय घटकांच्या बाबतीत काल आणि आजही जात बाधकच ठरत आहे. मुळातच जात -धर्म हे मानवनिर्मित असलेतरी ती निर्मितीचा उद्देश वर्चस्ववाद होय.गेली पाच हजार वर्षांपासून चालत आलेला वर्चस्ववाद भारतीय संविधान मोडीस अनु पाहत आहे;पण इथली व्यवस्था मात्र संविधानाची अचूक अंमलबजावणी न करता शासन,प्रशासन आणि न्यायालयीन व्यवस्थेतून अधिकारा व संविधानिक मूल्यांचा दुरूपयोग करून सामाजिक न्यायाची लक्तरे उडवीत आहेत. त्यामुळे इथला दलित,पीडित ,शोषित, आदिवासी, दुर्बल घटक आजही भारतीय समाजव्यवस्थेत शोषणाच्या कचाट्यातच आहे. एखाद्या जात- वर्ग समूहास खालच्या पातळीचे कामे करण्यास भाग पाडणे हा इथला इतिहास असलातरी भारतीय समजव्यवस्थेत फासी पारधी,बंजारा, आदिवासी या घटकांना गावात कोणीही चोरी केली तरी पोलीस अगोदर यांनाच पकडणार मग त्यांनी चोरी केलेली असो वा नसो पण चोरीचं लेबल त्यांना व्यवस्थेने लावले आहे. याच मांडणीच्या कसोटीवर उतरलेला जयभीम तमिळ चित्रपट इरूला आदिवासींच्या शोषित जीवणावर बोट ठेवते. ययापूर्वीच्या ‘काला’, ‘असुरन’ ‘कर्णन’ या तामिळी भाषेतील चित्रपटाने सामाजिक वास्तवतेच दाहक,शोषित आणि क्रांतीला चालना देणारे चित्रण ज्या पद्धतीने मांडले त्या पद्धतीचे धाडस अन्य सिनेमा इंड्रस्ट्रीजने अजून केलेले नाही.जय भीम या नावाने असलेल्या पूर्वीच्या दोन चित्रपटाचा उल्लेख करता येईल. जय भीम या अभिवादनाची सुरवात केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी राहिलेल्या एल. एन. हरदास यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘सुबोध नागदिवे दिग्दर्शित’
‘बोले इंडिया जयभीम’ (२०१६) हा मराठी भाषेतील चित्रपट आहे तर दुसरा म्हणजे आनंद पाठवर्धन दिग्दर्शित ‘जय भीम कॉम्रेड ‘(२०११) हा भारतीय माहितीपट १९९७ च्या रमाई हत्याकांडातील पोलीस हिंसाचाराच्या वर्णनाने या चित्रपटाची सुरुवात झाली. त्यानंतर १९९५ मध्ये तामिळनाडू मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आजचा टी. जे.ग्वानावेल यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तर जोतिका सुर्या निर्मित “जय भीम” हा चित्रपट आपल्यासमोर आला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत रक्षकच भक्षक असलेल्या पोलीस प्रशासनात दबलेल्या कुचलेल्या दलित ,पीडित,आदिवासी घटकावर केला जाणारा अन्याय अत्याचार आणि शोषण हा प्रकार म्हणजे जणू त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील विषय ज्याच्यावर कुठलाच न्याय पोलीस प्रशासन देऊ शकत नाही; पण वेळ प्रसंगी याच घटकांच्या प्रत्येक घटना यांच्या विरुद्धच माथी मारून गुन्हेगार ठरवून प्रत्येक घटनेला दाबून दडपून तिथंच जिरवण्याचे काम हा रोजचाच दिनक्रम देशात चालतो. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील सत्य घटनेवर आधारित ‘अनुभव सिन्हा दिग्दर्शित’ आर्टिकल 15 (२०१९)या चित्रपटातून दलित मुलीवर झालेल्या बलात्कारात पोलीस प्रशासन कसे त्या घटनेला दाबून ठेवतो.न्याय मागणारे पीडित जातीने दलित असल्याने त्यांची दखल घेतली जात नाही ह्या सगळ्या बाबीचे चित्रण आणि संविधानाच्या कलम -१५ चे उल्लंघन ,अस्प्रश्यता ,भेदभाव ,सार्वजनिक ठिकाणी जात-धर्मावरून प्रतिबंध करणे ह्या सर्व रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनाच ह्या सर्व बाबीचे वास्तव चित्रण आर्टिकल 15 मध्ये अनुभवयास मिळते. हीच पोलीस प्रशासनातील अन्यायाची बाब पुन्हा एकदा “जय भीम” च्या बाबतीतून पुढे आली.तामिळनाडू राज्यातील कोणमालाई जिल्ह्यातील विलमपूरन येथे चित्रित झालेल्या जय भीम मध्ये आदिवासी जमातीला चोर ठरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी गुन्हा कबूल करावा म्हणून अमानुषपणे नशेधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यातील मारहाणीत राजा कन्नु या बेकसुर तरुण मजुराचा गेलेला जीव आणि हे सर्व लपवण्याचे पोलिसांनी केलेले कारनामे पोटुशी असलेली महिला व इतर निष्पापांना मारहाण करत चाललेला छळ या दरम्यान जर सुर्यासारखा (चंद्रु) वकील जर या ठिकाणी नसतातर कदाचित ‘जयभीम’ या चित्रपटाचं नाव वेगळं असतं.भारतीय समाजव्यवस्थेत ‘जय भीम’हा शब्द जेवढा लौकिकार्थ आहे तेवढाच तो काहीसा द्वेषात्मक अशा विभिन्न मानसिकतेच्या लोकांत जय भीम वेगवेळ्या अर्थाने घेतला जातो.मुळातच ‘जय भीम ‘ आणि या चित्रपटाचा काहीही संबंध नाही असाही प्रत्यय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित होतो.पण चित्रपटाच्या सुरूवातीलाच एका जेल मधून गुन्हेगारांना त्यांची जात विचारून सोडून देण्यात येण्याचा सिन आहे.त्यात नायडू, वाणी देवर या उच्यवर्णीय जातीच्या व्यक्तीला ‘जा घर जा ‘म्हणून सोडून देण्यात येते. तर इरूला,कोरव ,ओटर, इडलर या जातीच्या निम्नवर्गीय व्यक्तींना पुन्हा खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी बाजूला थांबवलं जात.या व्यक्ती प्रति दोन पोलिसातीळ संवाद असा की, “गलती क्या है इन लोगोकी?”
” यही की ये पैदा हुवें”
त्यानंतर पुढे तर
“कोणसा कानून कहता हैं कीं, एक आदमी पर एकही केस लगाओ, हर बकरेपर दोदो केस ठोक दो कोई नहीं पुछेगा”
या डॉयलॉग नंतर आपल्या बेकसुर मुलावर खोटे गुन्हे दाखल करून मारत घेऊन जाणाऱ्या वृद्ध पित्याची मंडतीसाठीची विनवणी
“हे भगवान ये कैसा अन्याय है?
आणि या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद ज्या प्रेरणायुक्त उर्जेतून प्राप्त होते तो “जय भीम” म्हणजेच जणू न्याय. तामिळनाडू राज्यातील आदिवासी समुदाय उंदीर पकडून खाणारे,वीटभट्टीवर काम करत आपली संस्कृती जपत आपला उदरनिर्वाह करत करतात.
इमानदार व संवेदनशील इतकी की,साप गावातील सरपंचाच्या घरी साप पकडायला गेल्यावर सोन्याच्या दागिन्याजवळचा साप पकडतील पण सोन्याला हात लावणार नाही उलट तसं काही सापडलं तर वापस करणार. साप ठार मारण्याऐवजी जंगलात सोडतात. उंदराच्या छोट्या पिलांना पकडले तरी सोडून देणार सध्या घरात राहणारी ही जमात;पण जेव्हा सरपंचाच्या घरात चोरी होते तेव्हा याच राजा कन्नु नावाच्या इसमास चोरी केली म्हणून पोलीस त्यांच्या वस्तीवर येतात.नासधूस करतात.स्त्री मनुष्य यांना मारहाण करतात राजा कन्नु कुठं आहे म्हणून त्याच्या पत्नीला मारहाण करतात व रात्रीच्या अवेळीक तिला व राजा कन्ननचा भाऊ इट्टपण ,त्याची पत्नी अशा तिघांना मारत फरफडत पोलिसस्टेशनला घेऊन जातात.यावेळी राजा कन्नु गरोदर पत्नी संगिनी (लिजोमोल जोस) व होणाऱ्या अपत्यासाठी पैसा पाणी कवण्यासाठी वितभट्टीवर कामाला जातो.इथूनच सुरू होतो तो पोलिसांचा अमानुष मारहाणीचा खेळ त्यानंतर राजनही पोलिसांना सापडतो पण त्या सर्वांनी खोटे आपण न केलेल्या चोरीचा गुन्हा कबूल करावा हाच पोलिसांचा उद्देश असतो उठता बसता अमानुष मारहानिचे ते जिवंत चित्रण पाहत असताना कोणालाही चित्रपट पाहत आहोत असं वाटत नाही तर आपल्यासोमर घडणारं वास्तव अशा प्रकारे मन हेलावून टाकणारे ते प्रसंग आणि त्या व्यक्तिरेखा मन सुन्न करणाऱ्या आहेत.या चित्रपटात राजा कन्नुची बायको संगिनीने(लिजोमोल जोस) इतकी जिवंत व्यक्तिरेखा साखरलेली आहे की,तिच्यासोबत होणारा छळ, अन्याय अत्याचार,वेदना, आक्रोश गरोदरपणातील दिसणार मोठं पोठ त्याच अवस्थेत पोलीस स्टेशन ,कोर्ट कचेरीत फिरणारी संगिनी आपल्या पतीच्या सुटकेसाठी सर्वार्थाने प्रत्येक प्रसंगाला तोंड देते. मुळातच संगिनी हीच या चित्रपटाची दुय्यम पण मुख्य भूमिका या कामी तिला शेवट पर्यंत मदत करणारी शिक्षिका (रजनीशा विजयने)ही वक्तिरेखाच संगीनीला सुर्या (चंद्रू )या वकीलापर्यंत पोहचवते.
चंद्रू (वकील सुर्या)एक मुख्य भुमिकेतील नायक असलातरी त्यास नायिका म्हणून शिक्षिकेची भूमिका करणारी वक्तिरेखाच असेल हा प्रत्यय संपूर्ण चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनात येते पण त्या धर्तीवर हा चित्रपट उतरत नाही. चंद्रु चळवळीतील वकील पूर्णतः न्यायवादी.आंदोलन, मोर्चे रस्त्यावरील लढायी लढणारे नेतृव , मार्क्सवाद ,पेरियार, बुद्धाला,आंबेडकर यांना अनुसारणारा ह्या सर्व गोष्टीतून त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्याच्या तोंडून केवळ एकदा निघते आजच्या व्यवस्थेवरील कायद्याचे महत्व सांगताना चंद्रु म्हणतो,
” लॉ इज अ व्हेरी पावरफुल वेपन” लेकिन एस हातीयार से आप किसे बचाते हैं ,इसे जरुरी कुछ नहीं होता. चंद्रु पुढे असेही म्हणतो की,” गांधी ,नेहरू जैसे बडे नेता हैं यहां लेकिन आंबेडकर क्यु नहीं दिखाई देता” चंद्रुचा हा डायलॉग म्हणजेच या चित्रपटाला लागू होणारे जय भीम हे शीर्षक खऱ्या अर्थाने साकार होते.
कारण आजचा न्याय हा सामाजिक न्याय नसून एक कुचकामी यंत्रणा आहे. कायद्याचा उपयोग जर समाजाला न्याय आणि संरक्षण देण्यासाठी होत नसेल तर अशी नेते मंडळी काय कामाची त्यामुळेच आंबेडकरांची उणीव चंद्रुला भासत आहे.कारण आंबेडकरच एक अशी आस आहे की, ही विस्कळीत व्यवस्था बदलू शकतो.कारण कायदा या शस्त्राचा अचूक उपयोग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला म्हणून ‘जय भीम ‘या शीर्षकाला आधार भेटतो.भारतीय संविधान कलम ३२ हा संविधानाचा आत्मा म्हणा की, बॅक बोन पण याच बाबतीत पोलीस प्रशासन अनुच्छेद 32 व 226 द्वारे विशेष तरतूद केली आहे. म्हणून जय भीम या चित्रपटातील नायक संविधानातील याच तरतुदीचा उपयोग करून हेबियस कॉर्पस (देहोपस्थिती – बंदी प्रत्यक्षीकरण) या रिट द्वारे पीडितांना न्याय मिळवून देतो.चित्रपटात दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (पेरूमलासामी)यांची एक उच्य पोलीस अधिकारी असलेली भूमिका चंद्रुला ही केस यशस्वी होण्यासाठी सहाय्यभूत ठरते. पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांकडून राजा कन्नु याची झालेली हत्या व त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट शेजारील राज्यात म्हणजेच पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशात लावतात. या सर्व प्रकियेचा छडा प्रचंड अभ्यासू वकील चंद्रु मोठ्या तल्लख बुद्धीने उघड करून कोर्टात प्रतिवादी वकिलांना घामेघुम करून सोडतो.राजा कन्नुच नाहीतर अशा ७०००निष्पाप आदिवासींना चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेला सगळा प्रकार चंद्रु न्यायालयात मांडतो व ज्या प्रकियेतून ही न्यायालयीन लढा चालतो त्यातील प्रत्येक प्रसंग मानवी मनाला विचार करण्यास भाग पाडतो.हळव्या मनाची माणसे यातील अनेक प्रसंग पाहून अश्रू अनावर होतील इतका सदोदीतपणे हा चित्रपट साकार झाला आहे. त्यामुळे सूर्याने मिळून दिलेला न्याय सर्वार्थाने समजून घेण्यासाठी विद्यार्थी,वकील,संशोधक अभ्यासक,स्त्री-पुरुष अशा सर्वांनी हा चित्रपट पहावा.कायद्याचा वापर जर चांगल्या पद्धतीने केला गेला तर कुठलाच व्यक्ती, समुदाय हा अन्यायग्रस्त राहणार नाही.या परिवर्तनासाठी गरज आहे ती जय भीमची.कारण जय भीम म्हणजे सत्यासाठी चालणारा संघर्ष,जयभीम म्हणणे न्याय ,जय भीम म्हणणे सामाजिक न्याय.”जय भीम ही अशी अविरत चालणारी मानववादी संकल्पना जी सत्यावर आधारित आधारित असेल, सत्य निर्माण करणारी असेल आणि सत्यच टिकवील”.
तमिळ भाषेतील स्तुत्य अशी ही “जय भीम’ कलाकृती त्यांनी जगासमोर आणली त्यासाठी झटलेल्या प्रत्येकांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…
चित्रपट:जय भीम
भाषा:तमिळ
लेखन व दिगदर्शन :टी जे. ग्वानावेल
निर्मिती: सुर्या ज्योतिका
वितरण:अमेझॉन विडिओ प्राईम
कलाकार:सुर्या(चंद्रु) राजीशा विजयन, लिजोमोल जोस (संगिनी) मणिकंदन, प्रकाश राज(पेरूमलासामी)
-मनोहर सोनकांबळे
–8806025150,8459233791
manoharsonkamble255@gmail.com
( एम.फील.संशोधक विद्यार्थी
स्कूल ऑफ मीडिया स्टडीज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
Good 👍👍
Chan nirikshan sir
Thanks वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद💐💐