चित्रपट

जय भीम सिनेमातुन आंबेडकरवाद डिलीट ;हे तर जय भीमच्या नावाने मार्क्सवादी डोस

जय भीम सिनेमातुन आंबेडकरवाद डिलीट ;हे तर जय भीमच्या नावाने मार्क्सवादी डोस

नुकताच प्रसिद्धच्या क्षितिजावर असलेला टी.जे.जे.ग्वानावेल
लिखित आणि दिग्दर्शित जय भीम हा चित्रपट देशभरातून डोक्यावर घेण्यात आला.मुळातच हा चित्रपट ज्या भावनेच्या भरात डोक्यावर घेण्यात आला.ते म्हणजे त्या चित्रपटाचं असलेले जय भीम हे नाव होय. जय भीम या नावासाठी जीवाची पर्वा न करणारा एक मोठा वर्ग भारतीय समाजात आहे.त्यास कारणही तसेच आहे.जय भीम ही अशी क्रांती आहे.ज्या क्रांतीची बीजमुळे बुद्धाशी सुसंगत आहेत.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित अनेक ग्रंथांपैकी बुद्ध की कार्ल मार्क्स  हेही पुस्तक आपल्या समोर ठेवले;पण जय भीम या नावाच्या भावणीकतेत आज आमच्यासमोर असलेला जय भीम चित्रपट खरच आंबेडकरवादाच्या मोजमापात खरा उतरतो का याची चिकित्सा केली गेली नाही.आणि यामुळेच जय भीम हे टायटल इथल्या आंबेडकरवाद्याच्या माथी मारून जय भीमच्या आतून मार्क्स,लेनिनचा डोस  देण्यात  इथला मार्क्सवादी कम्यानिस्ट यशस्वी झाला आहे. चित्रपटातील सुर्या( चंद्रू ) या नायकाच्या भूमिकेचा जो गवगवा चालू आहे.ती अस्सल भूमिका एका आंबेडकरी नायकाची नाही. सुर्या यांच्या भूमिकेतून आंबेडकरीवाद नाही तर मार्क्सवाद झळकतो. एव्हाना त्याच्या ऑफिसात एकदा पेरियार,आंबेडकर व मार्क्स या प्रतिमा दिसत असल्यातरी  त्याच्या वारंवार  केवळ  मार्क्सवर जास्त  फोकस केलेलं चित्रण आपणास पाहावयास मिळते.वास्तवात कोपऱ्यात लावलेल्या त्या प्रतिमेपेक्षा ऑफिसातील माध्यभागीची मार्क्सची प्रतिमा हीच सूर्याचा आयडियल आहे.ज्या पद्धतीने सुर्या अभिनय करतो त्याचा असणारा वकील कोट या सर्व बाबी मार्क्सवादी आहेत.
“गांधी नेहरू सब दिखते हैं यहां लेकिन आंबेडकर नहीं दिखते” आंबेडकरांची कोणती बाब चित्रपटातून साकार झाली.सुर्या जे आंदोलन करतो त्यात तर सरळ सरळ मार्क्सवाद स्पष्ट झळकते. ज्या निकषावर जय भीम हे शीर्षक चित्रपटास देण्यात आले त्या अर्थी साधा निळा ध्वजही दाखवण्यात आला नाही.मुळातच हा न्याय तो ट्रायबलसाठी लढतो. आदिवासीचे शोषण, दुःख ज्या पद्धतीने मांडण्यात आले आणि त्यांना न्याय मिळवून देणारा नायकही मान्यच पण ज्या अर्थाने मार्क्सवाद प्रमोट करण्यात आला त्यासाठी  जय भीम हा मुखवटा वापरून केलेली दिशाभूल ही निंदनीय आहे.ट्रायबल हा आमचाच भाग आहे;पण जय भीमचे लेबल लावून एकतर्फी मार्क्स मांडणे हे अयोग्यच.त्यात जय भीम या नावामुळे अमेझॉन  विडिओ प्राईमची मेम्बरशिप वाढली हे नाकारता येत नाही.संपूर्ण चित्रपट मार्क्सवादाकडे झुकणारा आहे.आंबेडकरी चळवळ शून्य आणि आंबेडकरी टायटल देऊन एका अर्थाने ही वैचारिक आणि भावनिक फसवेगिरीच म्हणता येईल.तामिळ भाषेतच चित्रित झालेला ‘काला’या चित्रपटात दाखवलेलं चित्रण आणि त्यातील दलितांच्या झोपड वस्त्या व नायकाची भूमिका आंबेडकवाद प्रकर्षाने जाणवते. एवढेच नाही तर ‘असुरन’, ‘कर्णन’यातून झालेली मांडणी ही आंबेडकरी म्हणता येईल.पण सर्वार्थाने मार्क्स वापरून टायटल जय भीम देण्याची काय गरज पडली .हे निर्मात्याने अद्यापी स्पष्ट केले नाही.जय भीम ऐवजी कॉम्रेड,लाल सलाम हे टायटल घेतलं असते तर एक संयुक्त झालं असतं. पण ज्या प्रकारे जय भीमचे टायटल देऊन  परिणामकारक मार्क्सवाद समाजावर थोपवायचा होता तर सरळ मार्गी लाल सलाम हेच त्याच टायटल हवे होते. ज्या पद्धतीने जय भीम मधून आंबेडकरवाद डावलण्यात आला त्याअर्थी तामिळनाडू मध्ये परिवर्तनाची नांदी निर्माण करणारे पेरियार यांच्या विचारधारेला बगल देऊन मार्क्सवाद का बिंबवण्यात आला? हाच मोठा प्रश्न आहे.
चित्रपटातील कथानक,पात्रे त्यांनी साकारलेली सर्व भूमिका ही अप्रतिम आहे. एवढेच नाहीतर सूर्याने (चंद्रु)ची केलेली भूमिका ही वाखाणण्या योग्य आहे; पण ती आंबेडकरी भूमिका होऊ शकत नाही. प्रत्येकाला आपला इझम मांडण्याचे त्याचा प्रसार करण्याचे पूर्णतः  स्वातंत्र्य आहे.पण टायटलच्या नावाखाली या पद्धतीने अवहेलना करून पूर्णतः आंबेडकरवादाला कमी लेखण्याचा हा प्रकार आहे. या  चित्रपटातून कायद्याची लढाई ज्या अर्थाने लढली गेली ते सारे प्रयत्न आणि आदिवासींचे प्रश्न त्यांच्यवरील अन्याय या सर्व बाबी पूर्णतः मनाला सुन्न करणाऱ्या असल्यातरी  यातून कुठलीच आंबेडकरवादी भूमिका स्पष्ट झाली नाही. कायद्याची लढाई अमेरिकेतही लढली गेली.व आय.पी.सी.कायदा जवळपास जगभरातील 60टक्के राष्ट्रात सारखाच आहे.ज्या पद्धतीने चित्रपटाची सुरवात ते शेवटी मार्क्सवादावर चितारलेला आहे .किंबहुना चित्रपटाला  वापरण्यात आलेले टायटल  तेव्हाही समर्पक ठरले असते जर चित्रपटाचा शेवट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर करण्यात आला असता तर;ज्या पद्धतीने शेवटी सांगिनींची मुलगी पेपर वाचण्यासाठी सूर्याच अनुकरणन करता या ठिकाची जी चित्रभाषा आहे बरच काही सांगून जाते की ही जी व्यवस्था आहे तिला बद्दलण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजेच शिक्षण .यावेळी तरी  डॉ.बासाहेब आंबेडकर दाखवायला पाहिजे होते:पण तसे न करता लेनिनची मूर्ती दाखवण्यात आली. मग आंबेडकरवादी टायटल वापरण्याचा काय उद्देश होता ही बाब डोळेझाकपणे स्वीकारणे म्हणजे  वैचारिक दृष्ट्या दुधखुळे होणेच होय.

  -डॉ.हर्षवर्धन दवणे

77099 75562

( संशोधक विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
  

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

One Comment

  1. मुळात माझ्या माहितीप्रमाणे आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद यात काही तत्वे सोडली तर बऱ्याअंशी साम्य आहे…
    खुद्द डॉ.बाबासाहेबांनी देखील काठमांडू येथील त्यांच्या भाषणात यावर भाष्य केले आहे..
    आता राहता राहिला विषय सिनेमा ला दिल्या गेलेल्या नावाचा, तर अख्खा सिनेमा पाहिला तरी समजत नाही की सिनेमा ला ‘जय भीम’ हे नाव का देण्यात आलं आहे…
    बाकी एक प्रेक्षक आणि विशेषतः वकील म्हणून मला हा सिनेमा खूप आवडला…
    So, तुम्हीही एन्जॉय करा…😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button