संपादकीय

भारतीय संविधान; त्यागाचं स्वरूप!

भारतीय संविधान; त्यागाचं स्वरूप!

     संविधान सव्वीस नोव्हेंबर १९४९ ला लिहून पुर्ण झालं. ते लिहिणं भाग होतं. कारण संपूर्ण देशाचा कारभार चालवायचा होता. तसं पाहता देश काही लहान नव्हताच की ते चालवायला काही नियम लागणार नाही.
      संविधानाला राज्यघटना असे म्हणतात. ही राज्यघटना बनविण्याचे काम जोखमीचे काम होते. त्यातच देशाला व्यवस्थीत नियमांची गरज होती. जी गरज देश विनाकायदेतज्ञानं पुर्ण करता येत नव्हती. देश पर्याय शोधत होता. देशात कोण कोण तशी राज्यघटना लिहिणारे कायदेपंडीत आहेत. 
      देश संविधान लिहिण्यासाठी कायदेपंडीतांचा शोध घेत असतांना त्यांना देशात एवढी शिकलेली मातब्बर मंडळी असूनदेखील देशाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. त्यामुळं त्यांनी त्या इतर देशातील लिहिणारे कायदेपंडीत शोधण्याचा निर्णय घेतला. परंतू त्यांना ती राज्यघटना लिहिणारे  कायदेपंडीत सापडले नाहीत. त्यातच शेवटी ते इंग्लंडमध्ये गेले.
    अमेरीकेत परीदृढ राज्यघटना होती. स्वीत्झर्लंडमध्ये परीवर्तनशील. त्यातच फ्राँन्सचीही राज्यघटना अभ्यासली. ती लिखीत होती. काही ठिकाणी लिखीत राज्यघटना होत्या, तर काही ठिकाणी अलिखीत. परंतू देशातील काही नागरीकांना लिखीत राज्यघटना हवी होती. म्हणून हा सारा खटाटोप चाललेला असतांना ते अचानक इंग्लंडमध्ये गेले. ज्या इंग्लंडमध्ये अलिखीत राज्यघटना होती.
      राज्यघटना बनविण्याचं जाहिर करणारं शिष्टमंडळ जेव्हा इंग्लंडमध्ये गेलं. तेव्हा त्या इंग्लंडवासीयांनी सांगीतलं की तुमच्याच देशात डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत की जे संविधान लिहू शकतात. त्यातच त्यांनी स्वतः संविधान लिहिण्यास नापसंती दर्शवली. शेवटी पर्याय नाही म्हणून शिष्टमंडळ परत आलं व त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांवर संविधान निर्मीतीची जबाबदारी सोपवली. परंतू त्यातही पुर्ण जबाबदारी सोपवली नाही. त्यातच ते श्रेय बाबासाहेबांना मिळू नये म्हणून त्यांच्यासोबत आणखी संविधान निर्मीती प्रक्रियेत चार सदस्य जोडले. ज्यांनी टाळाटाळ करीत संविधान निर्मीतीला मदत केली नाही. हं, संविधान निर्मीतीला मदत फक्त एकाच व्यक्तीनं केली. ती म्हणजे त्यांची पत्नी. जिचं नाव सविता आंबेडकर होतं.
      घटनेचा प्रवास खडतर होता. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समीती गठीत झाली. सचिदानंद सिन्हा हे या समीतीचे अध्यक्ष होते. पुढे ११ डिसें. १९४६ ला डॉक्टर राजेंद्रप्रसाद घटनासमीतीचे अध्यक्ष झाले. समीतीत ३८९ सदस्य होते. फाळणानंतर त्याची सदस्यसंख्या २९२ होती. समीतीच्या अकरा बैठका झाल्या.
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर संविधान निर्मीतीची जबाबदारी येताच त्यांनी अमेरीका, फ्राँन्स सह इतर देशाचा अभ्यास केला. त्यातच त्यांनी एकएक कलम बनविण्यास प्रारंभ केला. ती एकएक कलम बनवीत असतांना ती कलम बनविल्यानंतर ती संसदेच्या सभागृहात ठेवण्यापुर्वी आपल्या पत्नीसमोर ती कलम ठेवीत व विचारीत असत की ही कलम बरोबर राहिल का? तसं पाहता सविता आंबेडकरही शिकल्या होत्या. त्या तेवढ्या शिकल्या नव्हत्या. पण त्या चर्चेतील काही ज्ञान त्यांनाही असेलच. त्यातच बाबासाहेब तिला समजावून देतांना प्रकरणांची उकल करीत असत. त्यावर तिला तो मुद्दा पटला की ती होकार देत असे. त्यातच ती कलम संसदेच्या सभागृहात बाबासाहेब मांडत असत. या दरम्यान बाबासाहेब आजारीही असायचे. त्यातच सविताबाई डॉक्टर असल्यानं त्यांची सेवाशुश्रृषा करीत असे. बाबासाहेबांना या काळात उच्चरक्तदाब व मधुमेह होता.
        सविताशी चर्चेदरम्यान बाबासाहेब रात्रंरात्र झोपतही नसत. त्यातच त्यांच्याबरोबर सवितादेखील रात्रंरात्र झोप नसे. त्यातच त्यांचं जेव्हा एखाद्या मुद्द्यावर  सविताकडून समाधान होत असे. तेव्हाच ते शांतपणे झोपत असत. तेव्हापर्यंत नाही.
      आज देशातील काही मंडळी डॉक्टर बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार म्हणतात. पण सविताला विसरतात. परंतू सविता जर नसती आणि सवितानं त्यांची त्या काळात प्रकृती सांभाळली असती तर संविधान तरी बनलं असतं का? असा विचार कोणी करीत नाहीत.
      संविधान निर्मीती एका अस्पृश्याकडून व्हावी ही देशातील संविधान निर्मीती करणा-या शिष्टमंडळाची नव्हती. त्यातच मजबुरीनं का होईना इंग्लंडने सुचविल्यानुसार बाबासाहेबांना संविधान लिहिण्याचं काम मिळालं. त्यातच बाबासाहेबांनाच एकटं श्रेय मिळू नये म्हणून या प्रक्रियेत इतर चार लोकं. परंतू त्यांनी काहीच केलं नाही. सगळी मेहनत बाबासाहेबांची. त्यातच ज्यावेळी संविधान बनलं. त्यावेळी ते काही राज्यातच प्रयोगांती लागू झालं. काही राज्यात नाही.
       आज संविधान आहे. सशक्त असं संविधान. जगातील राज्यघटनाच्या पेक्षा कितीतरी मोठं असं संविधान. परंतू हे संविधान आजचे धुर्त हितकारणी बदलवू पाहात आहे. कारण भेदभाव आजही गेलेला नाही. ते हितकारणी आजही बाबासाहेबांचा तिरस्कार करीत अाहेत. जे इतर देशातल्या संविधानाहून महान ठरलेलं संविधान. ते बदलवू पाहण्याची भाषा करणं निव्वळ हास्यास्पद व द्वेष करणारी गोष्ट आहे. हे संविधान बदलविण्यापेक्षा त्यातील काही कलमा बदलवणे ठीक. परंतू त्यांना डॉक्टर बाबासाहेबांचे नाव त्यामध्ये नको, म्हणून संविधान बदलविण्याची गरज. परंतू संविधान बदलवून काय मिळेल? खरंच तसं संविधान बनवता येईल का? तसेच आज असं का घडत आहे की संविधान बदलवावं लागतं. सर्वात परंतू पहिली गोष्ट ही की काहीही गरज नसतांना संविधान का बदलंवावं? हा प्रश्न प्रत्येक जनमाणसांना पडल्याशिवाय राहात नाही. तसेच जे या संविधानातील कलमानुसार सुख उपभोगतात. त्यांच्याही तोंडून संविधान बदलण्याची भाषा निघणे बरोबर नाही. त्यातच आपण जर संविधान बदलविणारे आहोत, तर मग आपण किती विद्वान आहोत असा विचार प्रत्येकानं करावा. मगच संविधान बदलविण्याची भाषा करावी. अन्यथा नाही. भारतीय संविधान हे सर्वसमावेशक, सशक्त, परीपुर्ण आणि महत्तम असं संविधान असून त्याचा आदर प्रत्येकानं करावा. संविधान बदलविण्याची भाषा करु नये. भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नीच्या त्यागाचं स्वरुप आहे. त्यांनी आपल्या त्या काळातील झोपा जर उडवल्या नसत्या किंवा अपार मेहनत जर घेतली नसती तर आज हे सशक्त, महत्तम संविधान बनलं नसतं हे तेवढंच खरं आहे.

        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button