महात्मा बसवेश्वर दलित व शोषितांचे मसीहा
महात्मा बसवेश्वर दलित व शोषितांचे मसीहा
संत हरळ्याच्या एकाकीपणामुळे त्यांचे मन गावात रमत नव्हते.त्याचे वडील ज्यांच्याकडे काम करीत असत,त्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळत असे. माहीत नसतांनाही वडीलांच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे पादत्राणे बनविण्याचा धंदा हरळ्या करु लागला. एक दया म्हणून लोकं हरळ्याची पादत्राणे घेत असत. अशाच अनुभवातून हरळ्याची पादत्राणे कलाकुसर पद्धतीने तयार होवू लागली. आज त्यांच्यात कौशल्य निर्माण झाले होते. एकटेपणामुळे लवकरच लवकरच त्यानं आपला विवाह कल्याणी नावाच्या मुलींशी केला होता. लहानाचा हरळ्या संसार सांभाळता सांभाळता मोठा होवू लागला. कल्याणीपासून त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव शिलवंत ठेवण्यात आलं होतं. बसवेश्वराने याच काळात जन्म घेतला होता. आपल्या लहानपणापासूनच बसवेश्वराने दलित आणि स्रियांवरील अत्याचार अगदी जवळून पाहिले होते. जन्माच्या वेळीच या बसवेश्वराने मुंज नाकारुन प्रथेला सुरुंग लावला होता. त्याचे शल्य बसवेश्वराच्या मातापित्यांना होतं. त्याला वेदविद्या यावी,तो वेदविद्येत पारंगत व्हावा म्हणून त्याला एका ब्राम्हणाकडे विद्यार्जनासाठी ठेवण्यात आले होते. पण बसवा तेथे दलितांबद्दलचे उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने त्याचेशी तेथील ब्राम्हण वर्ग दुजाभावाने वागत असे. तसेच मत्सरभावानेही वागत होता. त्यामुळे बागेवाडीत जन्म घेवून लहानाचे मोठे होतांना त्याचे मन रमत नसल्याने त्याने बागेवाडी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुंडलसंगम गावी स्थलांतर केले. जातेवेळी त्याने रस्त्यात पडलेल्या गावाचे निरीक्षण केले. कृष्णा व मलप्रभेच्या छायेत बसवअण्णा व त्याची बहिण अक्क नागम्मा लिंगायत धर्माच्या साक्षात्काराचे धडे घेत होते. ते शिवाला जास्त पुजत होते. त्यांना मातृपितृप्रेमाचा विसर पडला होता. दोघेही प्रातःकाळी उठायचे. प्रातःविधी आटोपून ग्रंथचिंतनात कुलगूरुंचे दर्शन घेवून त्यात दंग होवून जायचे. त्याच ठिकाणी वैदिक ग्रंथ, उपनिषद, पुराण वाचून त्यावर चिंतन मंथन करुन त्या ग्रंथवाचनातून समाजाची सेवा करण्याची प्रेरणा बसवेश्वराला मिळाली. कृष्णेत स्नानादी आटोपून बसवेश्वर बिल्वपत्र व फुले संगमनाथाच्या समाधीवर वाहात व नंतर शिवध्यानास बसत. सायंकाळी ते गुरुबंधूसोबत ब-याच विषयावर चर्चाही करीत. एकदा ते आश्रमातील मित्रांसोबत यलम्मा देवीच्या दर्शनाला निघाले. तिथे सा-या देवदासीचा बाजार भरला होता. त्यांच्याजवळ त्यांच्या पोटच्या मुलीही होत्या. त्याच ठिकाणी अर्धनग्न अवस्थेतल्या मुली विकणारे मायबाप बसवाने पाहिले. या मुली कमरेला कडूनिंबाच्या डहाळ्या व तोंडात लिंबडहाळी धरुन आपल्या देहाचं प्रदर्शन करतांनाही बसवानं पाहिलं. त्याच्या मनात त्या विचित्र प्रसंगाने खोल दरी निर्माण केली. त्यानंतर देवीच्या नावानं कोंबड्या बक-याचा बळीही देतांना बसवानं पाहिलं. त्यामुळं ही सर्व अंधश्रद्धा असून दया हे धर्माचे मुळ नाहीच, हा रास्त विचार बसवाच्या मनात अगदी लहानपणापासूनच रुजला. गुरु जातीवेदाने बसवांना शिवतत्व लय पावल्यावर पुन्हा शिवतत्व जन्माला येतं हा विचार शिकवला होता. त्यामुळे बसवाने पुर्ण लक्ष शिवभगवानावर केंद्रीत केले होते. पुढे तेच तत्व बसवाच्या विरशैव धर्मकार्याचे उगमस्थान बनले होते. तेहत्तीस कोटी देव असतील तरी विश्व एक असल्याने देवही एकच असा उपदेश जातीवेदाने बसवाला शिकविल्याने त्याचा पुढील काळात अंधश्रद्धेवर विश्वास उरला नाही. देवाच्या नावाने कोंबडे बकरे काढून पैशाची लुट करणारे पंडीत बसवाने पाहिले. त्यामुळे देवालयावर बसवाचा विश्वास उरलाच नाही. खरे दर्शन देवालयात नाही, तर आपल्या तळहाताचे जरी दर्शन घेतले तरी देव आपल्यावर प्रसन्न होतो हा चमत्कारी विचार बसवाला समजला व तोच विचार बसवाने समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. तद् नंतरच्या काळात मंदीरातील पुरोहिताच्या शोषणापासून समाजाला मुक्त करण्याचा निश्चय बसवाने केला. देव देवळात नसून आत्म्यात आहे असे त्याने सांगितले. इष्टलिंगाला गळ्यात बांधल्यावर व ते ह्रृद्यावर धारण केल्यावर मानवी शरीरच देवालय बनते. त्यामुळे देव आणि माणूस यामध्ये पुरोहीत हा दलाल नसावा असा विचार बसवेश्वराच्या रुपाने समाजाच पसरु लागला. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याच्या बहिणीचा नागम्माचा विवाह शिवदेव नामक व्यक्तीशी झाला. बसवाचे मामा बलदेव हे ब्रिज्वल दरबारी मंत्री होते. जातीवेदाच्या म्हणण्यावरुन त्यांनी आपली मुलगी गांगाबिका बसवाला देवून त्यांच्या प्रस्तावाचे स्वागतच केले. आपल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर जावयाच्या नोकरीची चिंता बलदेवाला होती. त्यामुळे मंगळवेढ्याला ब्रिज्वल दरबारी बसवेश्वराला बलदेवाने कर्णिकाची नोकरी लावून दिली.वया पदावर असतांना कामाची चिकाटी, प्रामाणिकपणा व कार्यनिष्ठा राजाला उचित वाटली. गणित विषय चांगला असल्याने हिशोबातील चूक शोधून बसवाने भरपूर संपत्ती वाचवली. त्यामुळे खुश होवून मंत्री सिद्धण्णाने बसवाची कोषागार पदी नियुक्ती केली. कोषागार पदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा खजिना बसवाने वाढवला. मंगळवेढ्यातील राजमहालाची दुरुस्ती करतांना एक ताम्रपट दिसला. त्या ताम्रपटात कलचूरी राज्यात सिंहासनाच्या खाली भरपूर खजिना आहे हे लिहिलेले होते. ते बसवेश्वराने राजा ब्रिज्वलाला सांगितले. त्यामुळे ते ब्रिज्वलाने खोदकाम करुन मिळवताच ब्रिज्वल बसवेश्वरावर खुप खुश झाले. महात्मा बसवेश्वर दलितांचे व गरीबांचे मसीहा होते. ते त्यांची सेवा करीत. त्यांच्यासाठी कामही करीत. त्यांच्या सेवेसाठी आपली संपत्ती खर्च करण्याचे व्रत बसवाने घेतले होते. सिद्धम्मा राजाचा मंत्री होता.त्याच्या पत्नीने ब्रिज्वल लहान असतांना आपल्या स्तनातून दूध पाजले होते. म्हणून सिद्धमाच्या मृत्यूनंतर ही निलांबिका उर्फ नीललोचना राजदरबारात भगीनी म्हणून वावरत होती. ब्रिज्वल राजाला तिच्या विवाहाची चिंता होती. त्यांनीच बसवेश्वरापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. बसवेश्वराने गांगाबिकेला विचारुन निलांबिकेशी विवाह केला. कारण त्या काळात बहुपत्नीत्व ही प्रथा रुढ होती. त्यानंतर बसवअण्णाची नियुक्ती राजाने प्रधानमंत्री पदावर केली. एकदाचा प्रसंग. प्रधानमंत्री बनताच बसवेश्वर एकदा हरळ्याच्य.झोपडीत गेले. हरळ्या संत होता. बसवेश्वर झोपडीत येताच हरळ्याचं संतपण पाहून त्यानं हरळ्याला त्रिवार वंदन केलं. त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून हरळ्यानं आपल्या उजव्या मांडीचं कातडं काढलं व आपल्या पत्नीच्या डाव्या मांडीचं आणि त्याची पादत्राणे बनवून ती बसवेश्वराला दान दिली. हा केवढा मोठा असीम त्याग होता. बसवेश्वरानं याच दलित शोषींतांससाठी अनुभवमंटपाची स्थापना केली होती. त्यात सर्व धर्माचे व जातीचे लोकं होते. त्याचबरोबर ते भेदभाव करीत नसत. ह्या अनुभवमंटपाच्या स्थापन करण्याने व त्याकाळी असलेल्या भेदभावाने व बसवेश्वराच्या सल्ल्याने अनुभवमंटपात होत असलेल्या वेगवेगळ्या जातीच्या विवाहाने बसवेश्वरांबाबतची कुरघोडी मंत्रीवर मचण्णानं ब्रिज्वल दरबारी केल्यानं बसवेश्वराला पुढे प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच ते निराश झाले व त्यांचे त्याच निराशतेत महापरीनिर्वाण झाले. त्यांनी त्या काळी जी समाजाला दिशा दिली. ते पाहता वाटते की महात्मा बसवेश्वरासारखा असा मानव…….. त्यांच्याकडून बरंच शिकून घ्यावं. कारण त्यांच्याकडे सर्वकाही असतांना त्यांनी त्या ऐषआरामाचा केवळ आणि केवळ दलित व शोषींतांच्या सेवेसाठीच त्याग केला. ही विचार करण्यालायक बाब आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर