राज्य
शाळा वाचविणे आहे
शाळा वाचविणे आहे
अलिकडे कोरोना शाळा वाचविणे आहे नाकात दम करुन टाकलाय. त्यातच आता ओमीक्रोन आला. हा कोरोनाचाच बांधव. परंतू हा लसीलाही मानत नाही. असे म्हणतात की हा व्हायरस कोरोनाच्या डेल्टा व्हायरसपेक्षा तीस पट वेगानं वाढत असून हा व्हायरस आफ्रिकेतून आलाय. हळूहळू त्याचा प्रसार होत असून चिंता व्यक्त केली जात आहे की ह्या व्हायरसनं सत्तर प्रतिशत सृष्टी(माणसं) कमी होणार. त्यातच अशी धास्ती सर्वांना लागलेली असून लोकं घाबरायला लागले आहेत. त्यातच शाळाही घाबरायला लागली आहे. तीही सुरु होण्याची चिन्ह दिसत नाही.
दि. १ डिसेंबर........या दिवशी महाराष्ट्रात शाळा सुरु होणार होती.परंतू ओमीक्रोनची भीती. शाळेबाबतचा निर्णय तुर्तास मागे पडला. शाळा सुरु झाली नाही. शाळा सुरु व्हायची, परंतू ती पुढे ढकलली. कोरोना पुन्हा झपाट्यानं वाढू नये म्हणून. तशाही शाळा ह्या मरणाच्या दारातच उभ्या आहेत. असे म्हणायला काहीही हरकत नाही.
शाळा मरणाच्या दारात आहेत असे म्हटल्यास सर्वांना आश्चर्य वाटेल. परंतू शाळा एक जीव नाही की ती मरेल हा विषय थोडा बाजूला ठेवून शाळेचा जीव आहे असा अर्थ घेतल्यास काहींना शाळा मरत आहेत असे जर म्हटले तर ते खरं वाटेल.
*शाळा मरण्याची कारणे*
१) सध्या कोरोनाचं संकट. शाळा दिड वर्षापासून बंद आहे. ऑनलाइन अभ्यास सुरु आहे. पण पालक शुल्क भरत नसल्यानं काँन्व्हेंट शाळेच्या शिक्षकांना पुरेसं वेतन मिळत नाही. अगदी अल्प वेतनात त्या शिक्षकांना काम करावं लागतं. त्यातच त्या वेतनावर शिक्षकांचं पोट भरत नाही. अशावेळी ते शिक्षक ते काम करणं सोडून दुसरं काम पोट भरण्यासाठी पकडतील व शाळेत शिकविणं बंद करतील अशा वेळी शाळा मरणार नाही तर काय?
२) अलिकडं काँन्व्हेंटच्या शाळा निघाल्या. जो तो काँन्व्हेंटलाच टाकतो. कोरोना काळ गेल्यावर पुन्हा काँन्व्हेंटची भरभराट होवू शकते अशा वेळी शाळा मरणार नाही काय?
३) मराठी खाजगी शाळेत शिक्षकांना संचालक त्रास देतो. एवढा त्रास देतो की आज डी एड करायला कोणी पुढं येत नाही. शिक्षण पदवीका महाविद्यालये ओसग पडलेली आहेत. शाळेत शिक्षकांच्या भरत्या होत नाही. अशावेळी शाळेत शिकवायला शिक्षक मिळणार नाही. मग शाळा मरणार नाही तर काय?
४) काँन्व्हेंटला मुलं जास्त जरी असली तरी शिक्षकांना मराठी शाळेपेक्षा वेतन कमी असतं. अशा अल्पवेतनात शिक्षकांचे पोट भरत नाही. म्हणून शिक्षक कोणी बनायला धजत नाही. यावरुन शाळा मरणार नाही काय?
५) अलिकडे पालकांचा शाळेत हस्तक्षेप वाढला. ते शिक्षकांवर विशेष लक्ष ठेवून असतात. त्यातच विद्यार्थ्यांना शिक्षक रागवू शकत नाहीत. अन् थोडंसंही रागावल्यास शिक्षकांवर ताशेरे ओढले जातात. म्हणून लोकं शिक्षक व्हायला पाहात नाही. मग जिथे शिक्षक मिळणार नाही, तिथे शाळा मरणार नाही कशावरुन?
६) अशाही परीस्थीतीत काही शिक्षक आपल्या छातीला माती लावून शिकवतात. पालकांचे लाड पुरवतात. विद्यार्थ्यांना त्रास देत नाहीत. तरीही संचालक त्यांचेवर ताशेरे ओढतो. त्यातच शिक्षकांकडून खंडणी वसूल करतो. ती न दिल्यास आरोप प्रत्यारोप लावतो. हे सारं जग पाहतो. त्यावरुन त्यांची शिक्षक बनायची इच्छा उडते. मग शाळा मरणार नाही तर काय?
७) शाळा वाचविण्याची प्रत्येक शिक्षक पायपीट करतो. लोकांना मार्गदर्शन करतो आणि पटसंख्या मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतू त्यात कुटूंबनियोजन आड येतं.,आता एका घरी एकच मुल आहे. शाळेची संख्या जास्त आहे. शाळेसाठी विद्यार्थी सापडत नाही.,मग शाळा मरणार नाही तर काय?
*शाळा वाचू शकते*
१) शाळा वाचू शकते. त्यासाठी महत्वाचं म्हणजे आजही शाळेचा स्तर सुधारायला संचालकानं मदत करावी. स्वार्थ सोडावा. शिक्षकांना अभय द्यावे. त्यांच्याशी आत्मीयता बाळगावी. शाळेत खेळीमेळीचं वातावरण तयार करावे नव्हे तर तसं वातावरण तयार करायला शिक्षकांना मदत करावी. त्यातच संचालकाचे आपल्याच पोटाचा विचार करु नये.
२) शासनानेही शिक्षकांच्या जीवाचे जीवघेणे आदेश काढू नये. जे सध्या नोकरीला आहेत. त्यांचा विचार करावा.
३) पालकांनीही शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांना मदत करावी. विनाकारण त्रास देवू नये. शिक्षकांना विनाकारण धारेवर धरु नये.
४) विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या शुल्लक रागावण्याच्या गोष्टी मनावर घेवू नये. शिक्षक रागावतही असेल थोडासा. तो ते त्यांना आपलं समजून. त्यांना त्रास देण्याचा हेतू नसतोच मुळी. त्यांना समजून घ्यावे. तरच शाळा वाचेल.
महत्वाचं म्हणजे शाळा वाचविण्याची आज गरज आहे. शाळाच नसेल तर त्या देशाची स्थिती जनावरांसारखी होईल आणि तशी अवस्था जर झाली तर मुकी जनावरे व आपल्यात काहीच फरक उरणार नाही हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे,नागपूर
९३७३३५९४५०