शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार भवानी मातेची नाही तर;या विदेशातली
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वास्तव इतिहास जगाच्या समोर यावा.कारण मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांना भोंदू भक्तपासून धोका आहे.ही बाब कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी स्पष्ट केली.ज्यापद्धतीने समाजात शिवाजी महाराज पेरला जातो त्यात त्यांच्या विचारांची तोडमोड करून जनमानसात रुजवणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूळ कार्य कृत्वावर घातलेला घालाच होय.
त्यातील एक मोठी गोष्ट म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत असतांना “जय भवानी, जय शिवाजी” ही घोषणा देली जाते.त्यात अशीही चुकीची माहिती पसरवण्यात आली की, ती म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली व शिवाजी महाराजांना तलवार भवानी मातेंनी दिली ;पण हे पुर्णतः चुकीचे आहे.
कारण शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार करण्यात आली होती. हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा प्रगत होते.पोर्तुगाल मार्फत ही तलवार गोव्यात आली. तिथून ती सावंताकडे गेली व नंतर शिवाजी महाराजांकडे.
त्यामुळे या तलवारीचा व भवानी मातेचा काहीच संबंध नाही. साताऱ्यातील एका म्युझियममध्ये एक तलवार आहे. तीच तलवार शिवाजी महाराज वापरत होते असे सांगितले जाते. पण तीच भवानी तलवार आहे की नाही हा वाद आहे.
पण या तळवरीवर पोर्तुगाल भाषेत अक्षरे आहेत व ती सर्वाना पाहण्यास खुली आहे.
पण तूर्तास तरी छ्त्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेचे तलवारीचा काहीही संबंध नाही.
संदर्भ- शिवाजी कोण होता
-कॉ. गोविंद पानसरे