बातमी

कमळवेल्ली येथे दिड दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन

कमळवेल्ली येथे दिड दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात तल्लीन

सुनील शिरपुरे/ झरीजामणी

तालुक्यातील कमळवेल्ली येथे ब्रह्मलीन ब्रह्मनिष्ठ सद्गुरु संत श्री बाजीराव महाराज यांची दिक्षा घेतलेले बरेच भक्तगण आहे. तसेच वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे पण भक्त आहेत. यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामस्थांच्या वतीने श्री संत बाजीराव महाराज यांच्या 10 व्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून या दिड दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काल सकाळी समितीद्वारे स्वच्छता अभियान राबवून सायंकाळी श्री संत बाजीराव महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून व हार अर्पन करून या कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच रात्रभर किर्तन व भजनाचे सादरीकरण करण्यात आले. आज रोजी सकाळी गावात पालखी काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली आहे. या कार्यक्रमाला बाहेरील गावातील भक्तगणांचा प्रचंड जनसमुदाय उसळला. सर्व गावकरी व भक्तगण भजनात अगदी तल्लीन झाले. अशाप्रकारे गावात सर्वत्र भक्तीमय व प्रसन्न वातावरण निर्माण झाले. संपूर्ण गावात पालखीची फेरी व दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री संत बाजीराम महाराज समितीचे अध्यक्ष श्री.अमोलभाऊ ठाकरे, उपाध्यक्ष श्री.इस्तारी राखुंडे, सचिव श्री.शंकर उईके, सर्व सदस्य, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाचे सर्व सदस्य, ग्रा.पं.कमळवेल्लीचे सरपंच श्रीमती पुष्पाबाई चुक्कलवार, श्री प्रविणभाऊ चुक्कलवार, उपसरपंच श्री.वामनराव हलवेले, इतर सदस्य व गावकरी यांनी अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील दिसून आले. अशाप्रकारे हा दिड दिवशीय कार्यक्रम अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडत असल्याचं चित्र दृष्टीक्षेपास पडले आहे.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button