राजकीय

जेव्हा शरद पवारांच्या त्या योजनेपुढे युनेस्कोनेही गुडघे टेकले तो बदल असा यशस्वी ठरून चोफेर गौरवाचा डंका वाजला

जेव्हा शरद पवारांच्या त्या योजनेपुढे युनेस्कोने गुडघे टेकले तो पहिला बदल असा ठरला यशस्वी…

भारतीय राजकारणाच्या आखाड्यातील सद्यस्थितील राजकारण्यांच्या गुरूंचा गुरू ठरतो असे राजकीय पटलावरचा शिलालेख म्हणजे शरद पवार हे व्यक्तिमत्व होय.
भारतीय राजकारणाचा इतिहास लिहत असताना शरद पवार या नावाला विस्मरून जाणे म्हणजे हवेत चालवलेली लेखणी असेल.
अशा या मात्तबर राजकरण्याच्या बाबतीतील महत्वपूर्ण आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उभारी मिळालेली.महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी राहिलेले शरद पवार यांनी वयाच्या 24 व्या वर्षी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिलेले आहेत.यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. शरद पवार यांच्या बाबतीत त्यावेळी एक गोष्ट महत्वपूर्ण ठरली ती अशी की,
ज्या वयात शरद पवार युवक काँग्रेसचे नेतृत्व करत होते त्या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबरच बारामतीच्या विकासासाठीही लक्ष दिलेले आहे. विद्यार्थी तो काळ साधारण 1964 ते 65 असा होता.या काळात दुष्काळामुळे लोकजीवन विस्कळीत झाले होते. अशा या परिस्थितीत हतबल झालेली जनता. भुकेने -तहानेने व्याकुळ होणारे लोक असा काहीसा मन सुन्न करणारा तो काळ होता.
दरम्यान याच काळातील ही अवस्था पाहून युनेस्कोकडून भारतात तहानलेल्या व भुकेल्या लोकांसाठी food for Hungers ही योजना राबविण्यात आली होती. पण शरद पवारांनी याबाबतीत एक वेगळीच भूमिका मांडून त्यांनी युनोस्कोला पत्र लिहून एक प्रस्ताव मांडला.
त्यात ते म्हणतात की, ‘अन्न फुकट वाटण्यापेक्षा त्याबदल्यात काम करून घ्या ,त्यामुळे तालुक्याचा विकास होईल’असा प्रस्ताव त्यांनी चक्क युनेस्कोच्या कार्यालयात मांडला .
त्यांच्या या प्रस्तावाला बारामतीतून सुरुवात करण्यासाठी परवानगी मिळाली आणि शरद पवार यांनी बारामतीतील तांदुळवाडी येथे एक अभिनव उपक्रम हत्ती घेऊन तांदुळवाडी येथे पहिला पाझर तलाव त्यांनी बांधला.
त्यांच्या या योजनेतून पुढे त्याच 1964 ते 66 या काळात एकूण 300 पाझर तलाव बांधण्यात आले.
पवारांचे हे यश पाहून युनेस्कोने जणू एक प्रकारे पवारापुढे गुडघे टेकले असेच म्हणावे लागेल.
कारण पवारांनी ज्या आखणीतून ही योजना उभी केली त्या ययोजनेचे यश पाहून युनोस्कोने Food for Hungers ही योजना बदलून Food For work ही योजना सुरू केली .आणि पवारांच्या या कार्याचा गौरव राज्याच्या संपूर्ण कानाकोपर्‍यात पोहोचला होता.
शरद पवारांनी ज्या 300 पाझर तलावांची निर्मिती केली त्यातून त्या परिसरातील कृषिविकास ,रोजगार यांना चलना मिळाली.आणि जिथे कृषक सुखी असतो तिथे नंदनवन फुलल्याशिवाय राहत नाही म्हणून अशी दूरदृष्टी ठेऊन राजकारणातील सर्व रंग बदलवणाऱ्या शरद पवारांना रायटर्समंचकडून जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

12 डिसेंबर

राजकीय पटलावरील शिलालेख शरद पवार यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

       -रायटर्समंच

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button