संशोधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर ‘न्यूयार्क टाइम्स’ आणि अन्य वृत्तपत्रांनी छापलेले मथळे या प्रमाणे

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर न्युयार्क टाइम्स आणि अन्य वृत्तपत्रांनी छापलेले मथळे या प्रमाणे

प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर न्युयार्क टाइम्स आणि अन्य वृत्तपत्रांनी आपले मत असे मांडले होते.की त्यात भारतीय वृत्तपेक्षा जगातील वृत्तपत्रांनी मांडलेली मते अधिक प्रभावी वाटतात.

त्यात भारतातील सर्वात जुने आणि आजचे सर्वधिक खपाचे वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया असे म्हणतो की,

अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यात भारताने जी झपाट्याने प्रगती केली, त्याकडे आंबेडकरांनी हेतुतः कानाडोळा केला होता, असे त्यांचे मत पडले, आंबेडकर ही एक कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि अष्टपैलू व्यक्ती होती. निराळ्या परिस्थितीत त्यांनी आपल्या समाजाची आणि देशाची याहीपेक्षा फार मोठी सेवा केली असती, असे मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ दैनिकाने मृत्युलेखात म्हटले.

अंबाल्यातील ‘ट्रिब्यून’ ह्या दैनिकाने म्हटले,

‘जर असे कार्य हाती घेणारे आंबेडकर कार्य करीत असता बहुतांशी एकाकी पडले, तर त्यांच्या जीवनाला जी निराशा आणि विफलता ग्रासून टाकते ती व्यक्त करण्याचे त्यांनी टाळावे अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.’

दिल्लीच्या ‘हिंदुस्थान टाइम्स’ दैनिकाने म्हटले, ‘त्यांनी केलेल्या देशाच्या महान सेवेची आठवण मागे राहील.

मुंबईचे ‘फ्री प्रेस जर्नल’ दैनिक म्हणाले,
‘अन्यायाच्या विरुद्ध सात्त्विकपणे झगडणारा एक नेता म्हणून देशाला आंबेडकरांची आठवण चिरकाल राहील’.

‘आंबेडकरांची कारकीर्द म्हणजे बुद्धिमत्ता नि मनोनिग्रह यांचा झगडा होय,
असे वर्णन करून कलकत्त्याच्या ‘स्टेट्समन’ दैनिकाने म्हटले,
‘त्यांची प्रकांड विद्वत्ता व निर्बंधशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कामगार आणि राजकारण या निरनिराळ्या शास्त्रांतील नि क्षेत्रांतील त्यांचा अनुभव ह्यांनी त्यांना वेगळ्या परिस्थितीत आणखी ठसठशीत अशी भर टाकण्यास समर्थ केले असते.

आंबेडकरांच्या आश्चर्यकारक कारकिर्दीचा गौरव करून, कलकत्त्याचे ‘अमृत बझार पत्रिका’ दैनिक म्हणाले,
‘अन्यायी नि माणुसकीचे हक्क नाकारणाऱ्या समाजरचनेचा विध्वंस करण्याचा जणू आंबेडकरांच्या लढाऊ वृत्तीने विडाच उचलला होता. ज्या थोर गुणांमुळे ते देशाचे सुपुत्र ठरले होते, त्या थोर गुणांचे नि थोर देशभक्तीचे सर्व देशबंधूंना पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूने स्मरण दिले आहे.

  १८५१ साली सुरू झालेले अमेरिकन वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाइम्स' दैनिक म्हणाले,
         'मुख्यतः अस्पृश्यांचे कैवारी म्हणून आंबेडकरांचे नाव सर्व जगास माहीत होते. जे कदाचित माहीत नव्हते ते हे की, त्यांनी आपल्या व्यक्तित्वाचा ठसा भारताच्या नैबंधिक रचनेच्या मोठ्या भागावर उठविलेला आहे. 

लंडन येथील ‘टाइम्स’ दैनिक म्हणाले,
‘ब्रिटिश सत्तेच्या शेवटच्या काळातील भारतातील सामाजिक आणि राजकीय उत्क्रांतीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात आंबेडकरांच्या नावाचा प्रामुख्याने निःसंशय उल्लेख होईल. निर्धार आणि धैर्य ह्या भरदार व्यक्तिमत्त्वाच्या चष्माभूषित पुरुषाच्या मुखावर कोरलेली होती. मात्र त्यांच्या आचरणात वा भाषणात त्यांनी तीन खंडांत परिश्रमपूर्वक संपादित केलेल्या विद्याभ्यासाचा प्रत्यय आढळत नसे. कारण त्यांनी आपल्यावर झालेल्या संस्कारांचे परिष्करण करण्याची काळजी कधीच घेतली नाही.’

तर
ब्रह्मदेशाचे त्या वेळचे पंतप्रधान यांनीही आपले मत एका समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलून दाखविले. ते म्हणाले,
‘आंबेडकर ही एक नामांकित व्यक्ती होती. बदलणारे प्रवाह आणि परिस्थिती जेव्हा राष्ट्राच्या सामाजिक रचनेवर आणि जीवनावर मोठा परिणाम करीत आहेत, त्या वेळी त्यांनी हिंदुस्थानातील मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. देशातील सामाजिक जीवनपद्धतीत फरक घडून येत असता तिला गती देणान्यांपैकी आंबेडकर हे एक होत. त्या पद्धतीस लक्षावधी लोकांच्या जीवनात प्रगती करण्यासाठी नि सुख देण्यासाठी समर्थ करण्यात येत आहे. ‘

अशा प्रकारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणांनंतर या वृत्तपत्रांनी अशी स्टेटमेन्ट केलेली होती.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button