संपादकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर– एक चिरंतन उगवणारा महासुर्य…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर– एक चिरंतन उगवणारा महासुर्य…

          माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातुन मिळवून देणारे महाप्रकांड पंडीत, असामान्य, अद्वितीय महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन. देश विदेशातील लक्षावधी आंबेडकरी अनुयायी मुंबईस्थित दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. महामानवाला अभिवादन करताना ऊर अभिमानाने भरून व कंठ दाटून येतो.दादरच्या चैत्यभूमीवर येणारा भिमसागर पाहून  बाबासाहेबांच्या सांगितलेल्या वैचारिकतेच्या चळवळीचे ठसे उमटलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. बाबासाहेबांनी या देशात चिरंतन क्रांती घडवली पृथ्वीला प्रकाशमान करण्याचं कार्य सूर्यचं करु शकतो.या उक्तीप्रमाणे या महासुर्याने देशाला समतेच्या दिशेने वाटचाल करायला लावली या महामानवाच्या सांगितलेल्या विचारांच्या दिशेने वाटचाल करीत जगाच्या इतिहासातील अनेक देश-विदेशांनी क्रांती घडवली. अनेक देशांनी त्यांचे विचार स्वीकारून प्रगती केली. संघर्ष हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तुत्वनाम आहे. त्यांना सर्वच क्षेत्रात संघर्ष करावा लागला संघर्षाशिवाय त्यांचे एकही पाऊल पुढे पडले नाही ते म्हणतात ” भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे याचा अर्थ इतकाच आपल्या प्राचीन इतिहासाचा गौरव करणे म्हणजे विषमतेचा , जातीयतेचा, विसंवादाचा गौरव करण्यासारखे आहे” म्हणून प्रत्येक माणसाने यातून बाहेर येऊन स्वत्व जोपासन्याची त्यांना गरज वाटत होती. त्यांनी सामाजिक संकल्पना मांडल्या आणि त्यांचे हित साधले. समाजाचे प्रश्न वेळोवेळी त्यांच्या ज्ञानाच्या परिघात असायचे. बाबासाहेबांचे असे मत होते की,’व्यक्तीला परिस्थिती पोषक मिळाली तर व्यक्तिमत्त्वातील बदल हे धनात्मक राहतील आणि व्यक्तीला परिस्थीती पोषक मिळाली नाही तर व्यक्तिमत्त्व विकास हा ऋणात्मक राहील ह्यांविषयी त्यांना चांगलेच आकलन होते. बाबासाहेबांना सामजिकस्थिती बरोबरच आर्थिक व राजकीय दृष्टीकोनातून जग बदलवण्याचे काम केले आहे.भारतीय आर्थिक आणि राजनैतिक वांड.मय, कायदा धर्मशास्त्र, इतिहास , तत्वज्ञान, समाजशास्त्र, राजकारण, अशा अनेक ज्ञानाच्या शाखांमधील त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे याशिवाय त्यांच्या लिखानातून तितकेच सैद्धांतिक व अनेक प्रश्नासंबंधीचे दृष्टिकोन पुढे आले आहेत.  त्यांनी केलेल्या राजकारणातील क्रांतीतून अस्तित्वशुन्य समाजाला सामजिक क्रांतीबरोबरच राजकीय अधिकाराची जाणीवही अपरिहार्य असते ही भाषा बाबासाहेबानी समाजाला दिली.”स्वतंत्र मतदार संघ हा त्यातलाच भाग होता”  यातून त्यांचा सामजिक आर्थिक, राजकीय दृष्टीकोन काळाच्या पुढे असल्याचे आपणास दिसते . यामुळेच त्यांच्या व्यक्तीमत्वाची अलौकिकता सर्व जगाला भुरळ घालत आहे.बाबासाहेबांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना म्हणजे बुद्धधम्म स्वीकार ही बाब युग निर्माण करणारी ठरली ज्या धर्मात व्यक्तीमुल्य ,व्यक्तिस्वातंत्र्य नाही, अवमान आणि अप्रतिष्ठा आहे तो धर्म नाकारण्यासाठी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली आणि एकवीस वर्षाच्या कालावधी नंतर त्यांनी बुध्द धम्म स्वीकारला आणि देशाला बौध्दमय करण्याची शपथ घेतली “विश्वविख्यात पंडीत राहुल सांकृत्यायन म्हणतात की,बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकात बुध्द धम्माचा स्तंभ इतक्या भक्कमपणे रोवला आहे की, त्याला कोणीही उखडून फेकू शकणार नाही आणि हे वस्तुनिष्ठ आहे.  म्हणूनच त्यांनी केलेली क्रांती ही वर्षानुवर्ष ही या भूमीत आपली मूळ रोवून राहिली आहे या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरूषामध्ये त्यांचे स्थान आहे ते मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार होऊन गेले त्यांचे स्थान उज्ज्वल आहे त्यांनी भारतीय समाजाच्या उत्कर्षाचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान निर्माण करुन लोकांच्या भवितव्याला अधीकार दिला आणि हा वैश्विक ऐतिहासिक दस्तावेज निर्माण केला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केले. त्यांनी प्रत्येकाला  दिलेला समानतेचा अधिकार हा जग बदलाची भाषा करणारा ठरला ” बाबासाहेब हे असे दृष्टे महामानव
होते की बुद्धाप्रमानेच त्यांच्या अंतंकरणात करुणा होती म्हणूनच या संस्कृती पुरुषाने या विश्वात युग निर्माण केले” म्हणुन तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चिरंतन सूर्य ठरतात. बाबासाहेब  नावाच्या प्रज्ञासूर्याला शतवार विनम्र अभिवादन.  .. क्रांतिसूर्या तू मावळूनही आज चिरंतन उगवलेला सुर्यच आहेस….

निलेश वाघमारे.. नांदेड…8180869782

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button